दारू पेक्षा जास्त विषारी प्रश्न ?

विषारी दारु प्रकरणानंतर पडलेले प्रश्न.

ज्या भागातले लोक मेले नाहीत
तिकडे लोक दारु पितच नाहीत?
कि दारु चांगल्या प्रकारची बनवतात?

बिनविषारी दारु बनवाणारे उद्योजक कि समाजसेवक?

बिनविषारी दारु बनवणारे मॅगी चांगली बनवतात का?

विषारी दारु पिउन नष्ट झाले त्यांच्यामुळे उरलेली दारुपण नष्ट झाली का?

जी दारु नष्ट केली गेली ती विषारी होती कि बिनविषारी ?
ह्या विषाची परीक्षा घेणारे नियमीत घेत होते का?

बिनविषारी दारुच्या गुत्त्यांवर कोणी पहारा देतात का?

जे मेले त्यांच्या कुटुंबियाना मयताच्या जागी काम कराव लागणार असेल तर त्यांच्या साठी विषपरीक्षा कोण करणार?

ज्या सरकारी अधिकार्यांवर निलंबन किंवा बडतर्फी लागु झाली आहे त्यानी कुणावर बोट दाखवायच?
दारु पिणार्यांवर कि विकणार्यांवर कि बनवणार्यांवर कि दारुसाठी कच्ची सामग्री उपलब्ध करुन देणार्यांवर?

किती वेळा विषारी दारु कांड घडल्यावर दारुबंदी लागु होइल ?

संमेलन ते सुद्धा चोरून (अर्थातच!)

चोरुन भरेल सुद्धा संमेलन
चोरांच्या वाटा चोरालाच ठावुक.
उपभोगल जाईल साहित्य
ओरिजनल होतील भावुक.
कविंचे पीक उदंड
काव्य पिकतय घाउक.
यमकाला जुळवायच यमक
पितळेवर सोन्याची चमक.
उठला कवी कि काव्य फेक
कधी कॅश तर कधी चेक.
दोन वेळेच जेवण, प्रवासाचा खर्च
नोकरी अधिक उधारी, भागतय घरच.
झब्बा कुर्ता शबनम आणि दाढी
कधी डावे कधी उजवे, कधी युती कधी आघाडी.
कोण पाहतय ओरिजीनल आणि डुप्लिकेट
टाळ्या वाजल्या कि शाल श्रीफळ भेट.
प्रेमकाव्य ते क्रांतीची मशाल
प्रवास करावा बिंधास्त खुशाल.
आपणच उठवायची आपलीच आवई
साहित्यक्षेत्राचे पदसिद्ध जावई.
तोंडच्या काव्याला कशाला आरसा
चोरानीच चालवयाचाय थोरांचा वारसा.

समलिंगी

genetic mutation मुळे एखादी व्यक्ती विरुद्ध लिंग (स्त्री ला पुरुषाचे लिंग, किंवा पुरुषाला योनी) घेउन जन्माला येते, कधी संपुर्ण स्त्रीदेह किंवा पुरुषदेह म्हणुन जन्माला आलेल्या व्यक्तीला समजुन न घेता , जबरदस्ती करणार का?

निसर्गाने दिलेल्या शरीरात जन्माला आले , ही प्रकृती,
त्या शरीरावर किंवा मनावर जबरदस्ती तुमचे नियम लादणे ही विकृती, खर म्हणजे बलात्कार.

तस पाहिल तर समलिंगी संबंधामुळे संतती नियमन होईल ना ?
मुळात बहुतेक समलिंगी हे कलासक्त असतात. सामान्य आणि ढोंगी लोकांसारखे विषयासक्त नाही.
ज्यानी डोळे कान आणि मेंदु उघडे ठेवले आहेत , त्याना हे समजते, पण वाचनाला बुरशी , विचाराना किड आणि अनुभवाच्या ईंद्रियाना बधीरपणा आलाय त्यांच्याकडुन अपेक्षा व्यर्थच आहेत.

धर्म , इतिहास आणि अतिरेक

प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो
आणि असायलाच हवा.
पण ज्यांच पोट धर्मावर अवलंबुन आहे
ते धर्माचा अतिरेक करतात,
मग दंगे आणि द्वेष पसरायला वेळ लागत नाही.
धर्म घरात किंवा खाजगी जागेत ठेवला
तर कुणाला त्रास होत नाही.
जेव्हा धर्म सार्वजनिक होतो ,
तेव्हाच सगळ्या समस्या उभ्या रहातात.
इतिहास सांगतो,
देव आपल्याला वाचवतील
म्हणुन सामान्य हिंदु सुस्त बसुन राहीले
आणि परकीय आक्रमणाचे शिकार झाले.
आता हे ईतक सोप्प नाहीये,
कारण सर्वच धर्मात माथेफिरु आहेत,
पण इस्लाम जास्त बदनाम आहे
आणि त्यामुळेच धार्मिक बातम्याना महत्व दिले जाते.

जीन्स पुराण

जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स शिवुनसुद्धा मिळतात!!
आठवड्याचे 5 दिवस सक्तीने ट्राउझर घातल्यावर 2 दिवस जीन्स वापरण्याचा आनंदच वेगळा..
जीन्स पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत , आणि उन्हाळ्यात गरम होते.
जीन्स प्रवासात उत्तम सोबती असतात, कितीही मळल्या तरी वापरता येतात.
जीन्सवर शर्ट टी-शर्ट, झब्बा कुर्ता काहिही शोभते.

अगदीच तुलना करायची तर ,
ट्राउझर म्हणजे स्कॉच, जीन्स म्हणजे बीअर.

ज्याचा त्याचा चॉईस असतो.
अर्थात पायाला अतिघट्ट बसणार्या जीन्स 'मुल' का घालतात हे समजत नाही!!
 जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स तुम्हाला हव्या त्या मापात शिवुनसुद्धा मिळतात!! फक्त शिंपी चांगला पाहिजे.
आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे चांगली शिवलेली जीन्स वेगवेगळ्या किंवा नको त्या ठीकाणी फाडल्यास किंवा ठिगळ लावल्यास जीन्सला परी पुर्णता येते !!!

मोदीद्वेशी कि अंधद्वेशी ?

मोदीद्वेशी सेक्युलरोके लिये खास,

आपके प्यारे पिछले सरकारो ने पुरा पाकिस्तान दे दिया.. अब मोदी को बुरखा पेहेनके उंगली कर रहे हो !!

मोदी बाकी आफ्रिकी,युरोपीय, मध्य आशिआई देशोसे राजनैतिक संबंध मजबुत कर रहे है. ऐसे देश जो भारत से आयत करे, और हमे अधिक चलन प्राप्त हो.

पाकिस्तानी कुत्ते बॉर्डरपर भौक रहे है,
अगर भारत करारा जवाब दे, तो पाकि युनायटेड नेशन्स के पिछे छुप जायेंगे. जो वो 1947 से करते आ रहे है.

और यहा देश के गद्दार पाकियो से मिलके फेसबुक ट्वीटर पर टट्टी कर रहे है..

तुम जैसे घर के भेदी देश को कमजोर बना रहे हो..

अगर मोदी सपोर्टर अंधभक्त है तो तुम कौनसा देश प्रेम जता रहे हो?
पुरा दिमाग नकारात्मक और झूटी खबरोसे भरा हुआ है.
कभी सबूत दिखाओ.

जो भी बंदर उठे वो मोदी कि नीजी जिंदंगी मै घर ना बसने कि गुलाटी मारता है..

तुमने घर बसा के कौनसी देश कि सेवा कि है?

ये मोदी को दोष देने वाले सब विदेशी वस्तुए इस्तेमाल करते है. अभीभी ये मेसेज वो विदेशी स्मार्टफोनमे ही पढ रहे है!!

जिनको मोदी पसंद नही वो ये समझे कि देश कि 65% से ज्यादा जनताने उन्हे स्विकार किया है. बचे 35% मे आधे घुसखोर और बाकी बहुतांश अंधद्वेशी है.

फार तिखट प्रश्न आणि दुखद उत्तर !!

कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते,
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.

पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.

गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?

फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?

सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.