नक्षत्रांच्या पुराणकथा : २

सुहास गोखले @ facebook :

ग्रह नक्षत्राांवर आधारीत पुराणकथाः आणखी काही कथा.
अश्विनीच्या पाठोपाठ येणारे नक्षत्र म्हणजे भरणी, तीन तार्‍यांचा समुह असलेले हे नक्षत्र अत्यंत अशुभ समजले गेल्याने, त्याचा उल्लेख किंवा संदर्भ, कथांमध्ये फारसा होत नाही. मी पहील्या पोस्टमध्ये लिहीले तसे दशराथाच्या तीन राण्या हे भरणी नक्षत्राची प्रतिक होते म्हणुन दशरथाचे अकाली निधन झाले.
त्यानंतरचे नक्षत्र कृत्तिका, सहा तार्‍यांचा समुह, सप्तर्षी सारखाच आकार त्या सहा ऋषींच्या पत्नी असल्याच्या कथेचा मी यापुर्वीच उल्लेख केला होता, त्यात लिहीण्याचा राहुन गेलेला तपशिल म्हणजे, सप्तर्षींना सोडुन गेल्यामुळे, सप्तर्षी आपल्या ऋषीपत्नींशी संबंध ठेवत नव्हते, त्यामुळेच कृत्तिका मावळण्याच्या मार्गाला पश्चिमेकडे सरकायला लागल्यावरच सप्तर्षी अकाशात येतात.
या व्यतिरीक्तही कृत्तिकेच्या काही कथा वाचायला मिळतात. कृत्तिके मधिल सर्वात प्रखर तारका म्हणजे आंबा, ईतर पाच तारकांची नावे आहेत 1) दुला, 2) नितत्नी, 3) अभ्रवंती, 4) मेघयंती आणि 5) वर्षयंती. कृत्तिका तारकासमुहाला प्लिहादीही असेही नाव आहे आणि बहुतेक त्यावरूनच इंग्लिश नाव प्लिडस पडले असावे.
दुसर्‍या कथेनुसार महादेवामुळे अग्निला गर्भ राहीला. अग्निला याची खुप लाज वाटल्याने त्याने त्या गर्भाचे सरोवरात विसर्जन केले, त्याच सरोवरात रहाणार्‍या सहा कृत्तिकांनी तो गर्भ धारण करून मुलाला जन्म दिला, तो मुलगा म्हणजे महादेवपुत्र षडानन (सहा मुखे असलेला) किंवा कृत्तिकेय किंवा कार्तीकेय.
कृत्तिकेनंतरचे नक्षत्र रोहीणी, पुन्हा एक तीन तार्‍यांचा समुह.
प्रजापतीनी यज्ञकर्मासाठी विराट नावाची स्त्री तयार केली पण यज्ञविधीत योग्य तो मान न मिळाल्याने ती आकाशात निघुन गेली. आवकाश आरोहण करणारी म्हणुन तीचे नाव पडले रोहीणी. रोहीणी तारकासमुहातला सर्वात प्रखर तारा नेहमी चंद्राच्या जवळ दिसत असल्याने, अत्यंत जिवलग प्रमिकांना चंद्र आणि रोहीणीची उपमा दिली जाते.
दुसर्यां कथेनुसार प्रजापतीनी आपल्या 27 मुलींचे (नक्षत्रही 27 च आहेत) लग्न चंद्राशी लावुन दिले पण चंद्र रूपसुंदर रोहीणीशिवाय ईतर 26 जणींकडे लक्ष देत नसल्याने, प्रजापतीनी चंद्राला क्षय होईल असा शाप दिला पण रोहीणीच्या विनंतीवरून त्याला वृध्दीचा उश्शापही मिळाला म्हणुन चंद्राच्या क्षय आणि वृध्दीचे चक्र सुरू झाले.
काही वेळा पिता प्रजापती मुलीच्या सौंदर्यावर भाळल्याने ती मुलगी रोहीणी आकाशात निघुन गेल्याचाही उल्लेख झाला आहे.

सुहास गोखले @ facebook

त्यानंतरच्या मृगशिर्ष नक्षत्रावरून रामायणामधिल सोन्याच्या हरीणाची कथा आली त्या चार तार्‍याांच्या मध्ये एका रेषेत असलेले तीन तारे म्हणजे रामाचा बाण आणि त्या बाणाच्या सरळ रेषेत आकाशातला सर्वात प्रखर तारा व्याध दिसतो.
रोहीणीचा पिता प्रजापती तीच्यावर भाळल्याने, सर्वांनाच चिड आली आणि रागाच्याभरात रूद्र प्रजापतीवर धाऊन गेला. घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप धारण केले व त्याच्या मागे असलेला व्याध म्हणजे रूद्र, अशीही एक कथा ऐकायला मिळते.
त्यानंतरच्या आर्दा नक्षत्राची मात्र कोणतीही कथा कधी ऐकायला मिळाली नाही. बहुधा पावसाळी नक्षत्र असल्याने सगळेच शेतीच्या कामात गुंतल्याने असावे.
त्यानंतरचे पुनर्वसु नक्षत्र म्हणजे दोन तार्‍यांचे नक्षत्र, अर्थात मिथुन राशीत येणारे. सगळ्यात भाषातल्या पुराण कथात यांची जोडीच असते, कधी स्त्री आणि पुरूष, कधी दोन झाडे. आपल्याकडे आदीवासी भागात मात्र त्यांना ती मोराची जोडी दिसते. आपल्या पुराणातल्या कथेप्रमाणे पुनर्वसु ही दोन राक्षस होते, दोघांनी देवांच्या तोडीस तोड यज्ञ करायचे ठरवले. नॅचरली देवांचा विरोध होता. देवांनी यज्ञ उधळायचे ठरवले. इंद्रदेव ब्राम्हणाच्या रूपात गेले (इंद्र म्हणजे हिंदु देवातला मेक ओव्हरचा तज्ञ असावा. तो ओरीजीनल रूपात कमीच आढळतो) ब्राम्हणाने सांगीतले की चांगल्या रिझल्टसाठी यज्ञकुंडात सोन्याची वीट लावा, असे सांगुन त्यानेच सोन्याची विट दिली आणि यज्ञ अर्ध्यावर आल्यावर आपली विट परत मागीतली आणि जबरदस्तीनी काढुन घेतली व आकाशात फेकली, विट घ्यायला आकाशात धावलेले दोन राक्षस म्हणजे पुनर्वसुचे दोन तारे आणि ती विट म्हणजे चित्रा नक्षत्र.
पुनर्वसु पाठोपाठचे नक्षत्र आहे पुष्य. अत्यंत अंधुक नक्षत्र. पुनर्वसु पासुन काही अंतरावर मघा नक्षत्राची टपोरी चांदणी दिसते आणि या दोन चांदण्यांमध्ये अंधुक धुरकट पुष्य नक्षत्र, खुपबारकाईने पाहीले तर त्यात तीन चांदण्या दिसतात. प्राचिन काळात ऋषीमुनी आकाशवेध घेताना, गुरु ग्रह जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा तो ग्रह असल्याचे ऋषीमुनींना ओळखता आले म्हणुन तो गुरूपुष्य योग अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो, पण गुरू ग्रह 12 वर्षांनी एकदा पुष्य नक्षत्रात येत असल्याने, (आम्हा भटा ब्राम्हणांच्या) सोयीसाठी चंद्र पुष्य नक्षत्रात आला आणि त्या दिवशी गुरूवार असला तर त्याला गुरूपुष्य योग समजला जाऊ लागला.
त्यानंतरचे नक्षत्र अश्लेषा, नागाच्या फण्यासारखे पाच तारे, यांना अश्लेषा पंचकही म्हणतात. यावरून महाभारतात पाच फणे असलेल्या वासुकी या सर्पाचा उल्लेख झाला असावा. आकाशात हा सर्प अश्लेषा नक्षत्रापासुन सुरू होऊन, हस्त नक्षत्रापाशी संपतो.
पुष्य नक्षत्राच्या पुर्वेकडे दिसणारी ठळक चांदणी म्हणजे मघा नक्षत्र. पाच तार्‍यांच्या नक्षत्राचा आकार विळ्यासारखा आणि मघेची चांदणी त्या विळ्याची मुठ आहे, थोडी कल्पना केल्यास हे नक्षत्र उलट्या प्रश्नचिन्हासारखे दिसते. नघा नक्षत्रावरचा पाउस खुप बेभरवशाचा असल्याने, या नक्षत्राबाबतही फारशा कथा रचण्याच्या मुडमध्ये कोणी फारसे नसावे. शेतात काम करणारी खेड्यापाड्यात भाषाही खणखणीत स्पष्ट त्यामुळे काही भागात या नक्षत्रावरच्या पावसाबद्दल, ‘’कोरड्या मघा तर नभाकडे बघा पण बरसल्या मघा तर चुलीपाशी हगा’’ असेही म्हणतात. मघा नक्षत्राचा आकार काहींना सिंहासारखा दिसतो, हे नक्षत्र सिंह राशीतच येते, या काळात साजरा केला जाणारा शिमगा हे बहुधा सिंह – मघा याचे मिश्रण होऊन पडलेले नाव असावे.U

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा