चिनी मालावर बहिष्कार


चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन वाचून पुरोगाम्यांच्या हृदयाला भोके पडली आहेत. असे केले तर रस्त्यावर या वस्तू विकणारांचे नुकसान होईल म्हणून बहिष्कार टाकू नका अशी आवाहने वाचते आहे. सरळमार्गी मध्यम वर्गाला ते वाचून आपण मोठ्या पापातून वाचलो असे वाटते आणि बहिष्कार नको हे पटते. एक तर अशा वस्तू विकणारांना इतरही अनेक वस्तू विकता येतील. त्यामुळे त्यांच्या नुकसानाचे पाप आपल्या माथी येणार हा भ्रम आहे. सरकारला एवढे वाटते तर त्यांनी बंदी घालावी असेही हे शहाणे सुचवतात. परराष्ट्र संबंधात कधी काय करावे हे या सरकारला कळते आणि ते तसे करेलच. इथे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार चालू आहे. अनेक शहाण्यांनी अमुक गोष्टी कशा फक्त चिनी कंपन्या बनवतात टाका बहिष्कार तुम्हाला स्मार्टफोन मिळणार नाहीत असे पांडित्यही मिरवले आहे. जे भारतात बनत नाही ते इथे बनविण्यासाठीच मोदींनी Make In India ची सुरुवात केली आहे. जेव्हा या वस्तू भारतात बनतील तेव्हा त्याही बंद करू पण आज शक्य आहे तेवढा तरी बहिष्कार टाकणे गैर कसे? एखादा रोग झाला तर सगळे उपाय करणे शक्य नाही म्हणून कोणताच उपाय करू नका असेही हे शहाणे सांगतील. ही एक खूणगाठ बांधा त्यांना माहिती आहे की चिन्यांवर तुमचा राग आहे. तिथे तुम्हाला समजावणे शक्य नाही हे कळते त्यांना. मग काय तर तुम्हाला confuse करणे सोपे. तुमची दिशाभूल करण्यात ते पटाईत आहेत. त्यांना बळी पडू नका.

एक कसोटी देते ती लावून पहा. असाच बहिष्कार कोकाकोला आणि अन्य अमेरिकन मालावर अफगाण युद्ध प्रकरणी इथे भारतातही घालण्यात आला.तेव्हा यातले किती शहाणे हेच मुद्दे घेऊन त्यांना समजवायला गेले होते? नसतील तर ते दुतोंडी ठरत नाहीत का?

दिशाभूल करणारा आपले नुकसान करतो आपला शत्रू असतो.

-Facebook साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा