राग आला तर वाल्या प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे

*कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषूकदाचन* तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फलाची अपेक्षा करु नकोस असे हिंदु धर्म सांगतो.

१) ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकार
बापू बुवा हे हिंदु धर्मात मान्य नाहीत. गरीबी हा जागतिक प्रश्न आहे ख्रिस्ती अमेरिका-युरोप, इस्लामीक मध्यपूर्व, आदिवासी आफ्रिका, बौद्ध जपान-थायलंड-म्यानमार इथे गरीबी आहेच.

२) विद्येच्या देवता असल्या तरी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अभ्यास मेहनत सराव करावा लागतो.

३) भविष्य म्हणजे स्थल-काल-अवकाश ह्यांच्या हजारो वर्षांच्या अभ्यासातून मांडलेले ठोकताळे. त्यात एखाद्या घटकात फरक घडून आला तरी भविष्य बदलते, quantum mechanics हेच सांगते.

४) उपवास म्हणजे उप विषती इति. देवाच्या सानिध्यात रहाणे. शास्त्रानुसार देवाच्या सानिध्यात रहाण्यासाठी उग्र आहार (लसूण कांदा मांसाहार) वर्ज्य आहे. हा उपवासाचा अर्थ. त्यात पुढे धान्य आणि मसाले जोडले गेले.

५) नवस केला तरी कर्म करावेच लागते.

६) देव सर्वत्र आहे आणि कुठेही नाही. हे तुकाराम सांगतात.

७) जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. लोक तर घरात बिछान्यावर मरतात. देवाचे कार्य वाचवण्याचे नसून तुम्हाला जगण्यासाठी धैर्य देण्याचे आहे.

८) देव चोरीला जात नसून देवाच्या मौल्यवान मुर्त्या आणि दानपेट्या चोरीला जातात. हा मानवी अवगुण आहे. असे होऊ नये ह्यासाठी आपण जागृती करायची असते.

९) देव अंगात येणे हा प्रकार हिंदु धर्मात नाही. ती मानसिक अवस्था आहे, त्यावर उपचार करता येतात.

१०) देव आजार बरा करतो? कोणत्या देवाने सांगितले? देव तुम्हाला उपचार सहन करण्यासाठी धैर्य देतात. जे तुमच्यावर उपचार करतात ते डॉक्टर तुमचे देव. देवावर विश्वास ठेवा.

११) देव-दानव ह्या परस्परविरोधी आणि परस्परपुरक संकल्पना आहेत. आणि प्राचीन काळापासून सर्वच संस्कृतीत ह्यावर गहन चर्चा झाली आहे. देव न मानणारे कम्युनिस्ट खून बलात्कार करतात.

१२) जवळपास सर्वच देशात (संस्कृतीत) देव हि कल्पना आहे. झ्यूस अल्ला फॅरो निसर्ग इत्यादि

१३) देवांच्या रुपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुर्त्या व मौल्यवान वस्तुंच्या संरक्षणासाठी तसेच कुप्रवृत्तींच्या व्यक्तिकडून विटंबना होऊ नये ह्यासाठी बंदोबस्त असतो. रस्त्यावरच्या दगडाला देव मानतात तिथे पोलिस असतात?

१४) नवस करून काहीही मिळत नाही, कर्म अत्यावश्यक आहे.

१५) भ्रष्टाचार जागतिक समस्या आहे. प्राणीसुद्धा भ्रष्टाचार करतात.

१६) देव तुम्हाला धैर्य देतात, कर्म तुम्हालाच करायचे आहे.

१७) भिकारी हि मनोवृत्ती आहे. मानसिक दौर्बल्य असल्याने भिकारी होतात. ते आपण निवडणुकांमध्येसुद्धा पहातो. १ आठवडा राजकारणी जनतेकडे भीक मागतात, ५ वर्षे जनता राजकारण्यांकडे

तुम्ही प्रश्न विचारून स्वतः मधली विकृती भागवली. तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. निंदानालस्ती करून हिंदु धर्मातल्याना स्वतःच्या धर्मजातपंथ विचारधारेत ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कारण जे हिंदु देवळांच्या दानपेटीत जमा होणारा पैसा तुम्हाला तुमच्या प्रचारासाठी वापरता येईल. लक्षात घ्या, झारखंड असो वा केरळ सर्व आपत्तीत हिंदु देवस्थानांनी मदत केली. इतर लोक फक्त हिंदु देवळांच्या पेट्या उघडण्याची मागणी करत राहिले.

तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्यात जितका वेळ घालवता तितक्या वेळात तुम्ही कदाचित स्वतःचे आयुष्य सुधारू शकला असतात आणि इतरांचे जीवन सुंदर बनवू शकला असता. बुद्ध, अशोक, आंबेडकरांनी तसे केले म्हणून ते महान झाले. तुम्ही दुसऱ्यांची कृरुपता शोधताना स्वतःच्या मनातली घाण वाढवत रहाणार का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा