
सन २०१० च्या ५८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट ‘बाबू बँड बाजा’मधील अभिनयाने मिताली जगताप वराडकरला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला. ‘मी सिंधुताई सपकाळ’ ने तीन तर सामजिक आशयाचा सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह ‘चॅम्पियन्स’ या मराठी चित्रपटातील शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर तसेच ‘बाबू बँड बाजा’तील अभिनयासाठी विवेक चाबुकस्वार यांनी सवरेत्कृष्ट बाल कलावंतांचा विभागून पुरस्कार पटकावित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा