थोड्या गप्पा मारूया !

    थोड्या गप्पा मारूया !

    

    गप्पा मारायला जमायचंय दोस्तांनो. आपल्या या ई मेलने जाणार्‍या अंकाचे वाचक आणि कवी आणि संपादक कधी एकत्र भेटतच नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे संपादक आहेत की जे गेली चार वर्षं एकत्र काम करतात पण एकमेकांना आजवर भेटलेले नाहीत. कवी आहेत जे नेटमुळे दोस्त झालेत पण प्रत्यक्षात भेटलेच नाहीत. तर रवीवारी प्रत्यक्ष असे कॉलेजच्या एका वर्गात एकत्र भेटून गप्पा माराव्यात. समव्यसनी लोकांच्या नुसत्या अनौपचारीक गप्पा. ओळख. कविता. गाणी.

    

    कशी आहे कल्पना ?

    

    तर निमित्त म्हणून नेटाक्षरीचा शतकोत्सवी अंक .

    

    रविवार दिनांक २९ मे २०११ रोजी नेटाक्षरीच्य़ा शंभराव्या अंकाचे प्रकाशन कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते होत आहे.

    

    त्यानंतर आपल्या आपल्यात गप्पा गोष्टी वगैरे करायला भेटुया का ? एकमेकांचे विचार समजून घेऊयात.

    

    स्थळ : SIES कॉलेज, सायन सर्कल जवळ. सायन(ईस्ट). मुंबई

    

    वेळ : रविवार २९ मे सकाळी ११.०० वाजता

    

    भेटाच्चं, बरं का ! नक्की या !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा