नेट लावून..

नक्षत्रांच्या पुराणकथा १

सुहास गोखले @ facebook

माझ्या तरूणपणी मी महाराष्ट्रात आणि हिमालयात बरेच ट्रेकिंग केले. बर्‍याचदा रात्री किंवा पहाटे डोंगरातुन चालताना आम्ही तारे आणि नक्षत्रांच्या मदतीने दिशा आणि वेळ ठरवण्याच सराव केला होता, त्यावेळी डोक्यात आलेला एक विचार होता की पुर्वीच्या काळी जेव्हा ऋषी मुनी जंगलातुन फिरत तेव्हा दिशाज्ञानाची हीच पद्दत होती त्यामुळे त्यांचा खगोल शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्या ज्ञानाचा वापर करून काही कथा लिहील्या, महाकाव्ये रचली, ती म्हणजे रामायण आणि महाभारत.
राजा दशरथाला तीन राण्या होत्या, भरणी नक्षत्रात तीन तारे असतात. पत्रिकेत भरणी योग हा मृत्यू योग समजतात म्हणुन दशरथाला अकाली मृत्यू आला.
तेजस्वी चंद्र म्हणजे प्रभु रामचंद्र आणि डागाळलेला चंद्र म्हणजे लक्ष्मण. चंद्र जेवढा तेजस्वी दिसतो तेवढेच त्याच्यावरचे डाग स्पष्ट दिसतात, म्हणुन राम आणि लक्ष्मण कायम सोबत असतात. (लक्ष्मणाचे वर्णन काळासावळा, कायम रामासोबत रहाणारा आहे ते त्यामुळे)
तुटणारा तारा म्हणजे सिता. तुटलेल्या तार्‍याचे दगड (अशनी) शेतात नांगराच्या फाळाला लागतात, सिता देखिल जनक राजाला नांगराच्या फाळाखालीच मिळाली होती. उल्कापात होतो तेव्हा तारे जळत येतात आणि जमिनीत जातात, सितेनी देखिल अग्निदिव्य केले आणि शेवटी ती जमीनीत गेली.
धुमकेतु म्हणजे हनुमान, मोठी शेपटी, कायम सुर्याकडे तोंड, क्षणात येणारा अचानक नाहीसा होणारा हनुमान.
मृग नक्षत्रावरून सोन्याच्या हरीणाची कथा आली.
सात आद्यऋषी सप्तर्षीवरून आले, तशाच सप्तकन्या म्हणजे सात ऋषींच्या पत्नी, त्यातल्या सहाजणी पतीशी भांडुन घर सोडुन गेल्या म्हणुन आकाशात सप्तर्षीच्या विरूध्द दिशेला कृत्तिका नक्षत्र आहे, सप्तर्षीसारखीच रचना पण छोटा आकार, त्यात सहाच तारे आहेत. सप्तर्षीकडे बारकाईने पाहीले तर शेपटीचा मधला तारा हा जोड तारा आहे. ती आत्री ऋषींची पत्नी अनुसया, तीने पतीची साथ सोडली नाही म्हणुन ती महासती ठरली.
पुराणातील कथेनुसार विंध्यमुनीनी स्वतःचा आकार वाढवुन सुर्याचा मार्ग रोखला होता आणि सुर्याला परतवले होते. मकरवृत्तावर विंध्यपर्वताची रांग आहे, सुर्य मकरवृत्तापर्यंत येऊन परत जातो, म्हणुन ही कथा. आणखीही साम्यस्थळे आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.........

पुढिल भाग 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा