हिंदु धर्म संस्कृती विज्ञान तत्वज्ञान


एक मेसेज फिरतो आहे त्यात डार्विनच्या साक्षीने हिंदु धर्मावर घाण उडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे

डार्विनचा सिद्धांत वाचा मग अकलेचे तारे तोडा.
माकड व मानव ह्यांचा पुर्वज एकच आहे. माकडापासुन माणुस झाला नाही. एका प्राण्यापासून माणुस व माकड वेगवेगळे उत्क्रांत झाले.

आदिमानव अंगावर वल्कले घालायचा. हिंदु संस्कृतीनुसार देव म्हणजे नैसर्गिक तत्व. ज्यांना कालांतराने मानवी प्रतिमेत पाहिले गेले. म्हणून देवांच्या चित्र किंवा मुर्तींवर कपडे व अलंकार असतात.

माणसाने देव निर्माण केला नाही. मानवी आकलनाच्या आधीपासून जी तत्व अस्तित्वात आहेत त्यांना देव मानण्यात आले.

रामायण महाभारत सुमारे ५ ते ८ हजार वर्षे प्राचीन आहे. म्हणजे जवळपास ४०० पिढ्या. त्याच्याही आधीपासून धातुयुग अस्तित्वात आहे.

चाकाचा शोध इसवीसनाच्या आधीपासून लागला आहे. ब्रॉंझ युग म्हणजे १२००० वर्षांपासून चाकांचा वापर होतो आहे. मग ८००० वर्षांपुर्वी हिंदु संस्कृती रथ वापरत होती हे सत्यच आहे. पण हिंदुद्वेष्ट्या मुर्खांना ते माहिती नाही.

वानर हे गण होते , त्यांनी वानर हे प्रतिक स्वीकारले होते. ती माकड नव्हती. पाण्यावर तरंगणारे दगड ज्वालामुखीच्या परीसरात असतात. मूळ रामायणानुसार श्री राम उच्चारण करुन दगड पाण्यात ठेवले गेले. लिहिण्याचा उल्लेख नंतर भाषांतरीत रामायणात जोडला गेला.

हनुमंताने द्रोणागिरी पर्वतावरील शक्य तेवढे सर्व वनौषधी आणले. म्हणून द्रोणागिरी पर्वत आणला हे रुपक प्रचलित झाले.

वानर गण हे जलद प्रवास करणारे होते. त्यांना त्रास होण्याचे कारण नव्हते.

स्त्रीबीज पुरूषबीज एकत्र आल्याशिवाय जन्म होत नाही ह्याच्यासारखा वैज्ञानिक अडाणीपणा नाही. सर्वप्रथम जीव हे एकपेशीय होते. तिथे स्त्रीपुरुष बीज अस्तित्वात नव्हते.

सर्वप्रथम जीव हा पुरुष म्हणजे आदिम किंवा प्रथम ह्या अर्थाने आहे.

ब्रम्ह हा प्रथम जीव असल्याने तर सर्वच त्यांचे संतती होतात.

नाती नंतर जोडण्यात आली. वैज्ञानिक दृष्ट्या सर्वचजण एकमेकांचे भाऊबहिण होऊ शकतात. कारण मानवी उत्पत्ती एकाच जीवातुन झाली आहे.

हिंदु संस्कृतीतील दशावतार हे मानवी उत्क्रांतीचे प्रतीक आहेत. सप्तफण्यांवर असलेली पृथ्वी म्हणजे टेक्टोनिक प्लॅट्सवर असलेले भूखंड. राहुकेतु म्हणजे चंद्रसुर्यांच्या परीक्रमेचे छेदनबिंदू.

आर्यभटाने शुन्याचा वापर सुरु केला. अंक गणना किमान १२ ते १५ हजार वर्षापासून होते आहे.

आदिमानवाला जातधर्म नव्हते कारण जात धर्म हि संकल्पना मानवी उत्क्रांतीबरोबर विकसित झाली.

जाती पंथ सर्वच धर्मात आहेत. इस्लाममध्ये शिया सुन्नी वहाबी, ख्रिश्चनधर्मात ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथलिक प्रोटेस्टंट सिरेनिटीक लॅटिन , बौद्धधर्मात हीनयान महायान थेरवाद आहेत. किंबहुना नास्तिकातही अगम्यावर विश्वास ठेवणारे आहेत. विख्यात शास्त्रज्ञही विश्वाच्या उत्पत्तीविषयी साशंक आहेत.

स्त्री हा हिंदु संस्कृतीचा मानबिंदु आहे. स्त्रियांना पूजाविधी अध्ययन अधिकार आहे. हिंदु संस्कृतीत स्त्री ही आदिशक्ती आहे. अनेक हिंदु मंदिरात स्त्रीया पुजा व धर्मविधी करतात. हिंदु धर्मस्थळातील गाभाऱ्यात स्त्रीया स्वच्छतेच्या कारणाने मासिक पाळीचा अपवाद वगळता जाऊ शकतात. इतर धर्मात जिथे सर्वोच्च धार्मिक प्रतिमा आहे तिथे स्त्रीयांना प्रवेश नाही.

दोन सहस्त्रकांच्या ज्ञात धार्मिक इतिहासात कोणत्या धर्मात्या स्त्री धर्मप्रमुख होती? हिंदु संस्कृतीत स्त्री धर्मगुरू बनु शकते. त्यासाठी न्यायालयातुन कायदा होऊ शकतो. इतर धर्मात असे शक्य आहे?

हिंदु संस्कृती प्रथम संस्कृती आहे ज्यात पृथ्वी व सुर्याचे भ्रमण मान्य आहे. पृथ्वी हा ग्रह , सुर्य हा तारा ब्रम्हांडात इतर ताऱ्याभोवती फिरत आहेत हे सांगितले आहे. हिंदु संस्कृतीत खगोल अवकाश रसायन जीव औषध वनस्पती भौतिक धातु भाषा असे अनेक प्रकारचे शास्त्र आहेत.

विदेशी आक्रमकांनी नालंदा विश्वविद्यापीठ जाळुन टाकण्याआधी हिंदु संस्कृतीत सर्व ज्ञानाचा समावेश होता. म्हणून जगभरच्या संस्कृतीना इथे येऊन व्यापार करायचा होता. इथे दैन्य गरिबी हिंसा असती तर  मुघल इंग्रज डच फ्रेंच आक्रमक इथे स्थिरावले नसते. किंबहुना इथली संपत्ती जहाजे भरुन युरोपात नेण्यात आली.

आजही पृथ्वी सपाट व विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रंथांच्या धर्मांवर तुम्ही टीका करु शकत नाहीत कारण तिथे तुमचे समुळ उच्चाटन करण्यात येते.

विज्ञान तत्त्वज्ञान ह्यांचा सुरेख संगम असलेल्या हिंदु संस्कृतीत परकीय आक्रमकांनी अनिष्ट रीतींचा समावेश केला असेलही. पण त्याचप्रमाणे अशा अनिष्ट रीतींचा कालानुरूप त्यागही हिंदु संस्कृतीने केला आहे.

हिंदु संस्कृती तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत नसाल तर त्यात हिंदु संस्कृतीचा कमीपणा नाही, त्यात तुमचा अडाणीपणा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा