गरज , खेडी, विकास


ज्या समस्या आहेत, त्यावर राजकारणी उपाय शोधणार नाहीत.. कारण प्रश्न सहज सुटले तर निवडणुका घ्यायची गरज उरणार नाही..

आपण छोट्या व्यापाऱ्यांकडुन वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करतो , पण किती व्यापारी साठेबाजी नफेखोरी न करता सचोटीने धंदा करतात ?

पेट्रोल-डिझेल गाड्या विमान ह्या आपण निर्माण केलेल्या गरजा आहेत.. पुर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या, म्हणून खर्च कमी होता .. आता जाहिराती करुन चैनीच्या गोष्टीचे  गरजेत रूपांतर केले गेले आहे, म्हणून मागणी वाढत गेली त्याप्रमाणात त्या वस्तु आणि सेवेची किम्मत वाढवण्यात आली..

महाराष्ट्रतले दारु कोल्ड्रिंक सिगारेट तंबाखू आणि फास्टफुड चे कारखाने बंद केले तर दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा होणार नाही.
शहरातली लोक हे मान्य करणार का ?

गावाशहरात रोजगार आणि सरकारी कार्यालय (जिथे गेल्यावर जिल्हा मुख्यालय किंवा मंत्रालयात जायची गरज भासु नये) उपलब्ध असते तर प्रवास कमी झाला असता आणि पेट्रोलडीझेलची गरज कमी झाली असती. पण हे जाणीवपूर्वक टाळले जाते.

युरोपीय सत्ता येण्या आधी खेडी स्वयंपूर्ण होती , औद्योगिकिकरण होण्याआधी प्रदूषण नव्हते, हरीतक्रांती दुग्धक्रांती होण्याआधी डायबेटिस कॅन्सरचे इतके रुग्ण नव्हते.

विकासाच्या नावाखाली खेड्यांचे शहरीकरण करण्यात आले , आणि सर्वच तोल सुटला.. अनिर्बंध विकास करताना निसर्गाचा आणि भविष्यातील परीणामांचा अभ्यास झाला नाही. मोठमोठे रहिवासी प्रकल्प बांधताना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची तजवीज झाली नाही. प्रगत देशातले हानीकारक उद्योगाना भारतात परवाना देताना इथल्या सुपीक भुमीचा पाण्याचा हवेचा विचार केला गेला नाही.

सामान्य माणुसाला लहानपणापासूनच श्रीमंताकडे नोकरी करण्यासाठी शिक्षण देण्यात येते.. ज्यांना त्रास होतो ते थोडाफार विरोध करतात, काही मोर्चे काढतात तर काही लेखणी , उरलेले गुलामीत सुख शोधण्याला प्रगती म्हणतात.. पिढ्यानपिढ्या हि गुलामी सुरु रहाणार आहे, त्याला राजेशाही लोकशाही कम्युनिझम समाजवाद भांडवलशाही ह्यातल्या कोणत्याही प्रकाराने फरक पडणार नाही.

बदल घडवुन आणायचा असेल तर तक्रार करायचे बंद करा. शासनव्यवस्था कशी कार्य करते , आपला ज्या व्यक्ती समुहाशी संबंध येतो ते कोणत्या प्रकारचे वस्तु किंवा सेवा घेतात,  त्यांचे  दोन किंवा जास्त व्यक्ती किंव समुह ह्यांचे व्यवहार कसे होतात, गरज मागणी पुरवठा ह्यांचा अभ्यास करा.  अतिरिक्त उपलब्ध असलेली चैनीची वस्तु किंवा सेवा गरज म्हणून कशी द्यावी व त्याचा जास्तीतजास्त जास्त मोबदला कसा घ्यावा हे ज्यांना जमणार आहे तेच सर्वात पुढे असणार  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा