विज्ञानाच्या नावाखाली, गोमूत्र, भानामती, पुर्वज, कावळे, ग्रह दिशा, आत्मा, लिंबूमिरची गंडेदोरे, सत्यनारायण, घरातील वाद ह्यावर जालीम उपाय.

*पुरोगाम्यांच्या ढोंगाचे काय करणार ?*

*विज्ञानाच्या नावाखाली हिंदु धर्म टार्गेट करुन धर्मांतराची बाजारपेठ मोकळी करत आहेत!*

पुरोगाम्यांचे आरोप आणि त्यांचे सोंग उघडे पाडणारे उत्तर सोबत दिले आहेत.

🤨पुरोगामी - माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि जनावराच्या मुत्राने शुद्ध होतो… ते आमच्या देशात…!
हिंदु -  *हिंदु धर्मसंस्कृती चातुर्वर्ण्य आहे. कर्म हेच श्रेष्ठ. आरोग्यविषयक सुचनांचे कालांतराने अंधश्रद्धेत रूपांतर झाले. पण संसर्गजन्य रोग किंवा जीवाणूंपासून संरक्षण होण्यासाठी स्पर्श करताना सावध असावे. गोमुत्रातील घटकामूळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.*

🤨पुरोगामी - शेकडो किलोमीटर दुरूनच एखाद्याचं वाटोळं करण्याच्या भानामतीचा किंवा करणीचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *करणी भानामती रामायण महाभारत गीता किंवा वेदांत नाही. मध्ययुगात आलेली अनिष्ट अंधश्रद्धाच अशा प्रकारांना कारणीभूत आहेत.*
*अर्थात, हस्तकांकडून हजारो किलोमीटरवर असलेल्या व्यक्तिस मानसिक किंवा शारीरिक अपाय घडवून आणता येतो. जे पुर्वी शक्य होते*

🤨 पुरोगामी - वरच्या गॅलरीत असलेल्या पूर्वजांना, कावळ्यांद्वारे अन्न, बिड्या, दारू डिलिव्हर करता येतात ते आमच्याच देशात…!
हिंदु - *दान अर्पण निस्वार्थी भावनेने करायचे असते.  पुर्वजांबद्दल आदर म्हणून अन्न व प्रिय वस्तू अर्पण करायच्या असतात.  कावळा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीत. अन्नपदार्थ कावळे फस्त करतात आणि इतर वस्तू घरट्यांसाठी वापरतात. कावळे मानवी वस्तीच्या आसपास असतात आणि शेतांचे नुकसान होऊ देत नाहीत.*

🤨पुरोगामी - 11 ते 101 रुपयात ग्रहांची दिशा बदलण्याचा पराक्रम करणारी माणसे आहेत ती फक्त आमच्याच देशात…!
हिंदु - *ग्रहज्योतिष्य म्हणजे ग्रहांच्या गतीवर आधारित कालगणना आणि गणित. ह्या दोन्हीमूळे एखाद्या ठिकाणचे हवा पाणी उजेड ह्यांचे जवळपास अचूक अनुमान करता येते. हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचे अंदाज देखील घेता येतात. ग्रह ताऱ्यांची दिशा बदलली जात नाही. ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणाच्या गणिताने कालगणना होते त्यातील उत्तम काळ निवडता येतो.*

🤨 पुरोगामी - आत्म्याला स्पर्श करता येत नाही,  पण बांधून ठेवता येतोे, तेलात डूबवता येतो… ते आमच्याच देशात…!
हिंदु - *आत्मा ही प्राचीन संकल्पना आहे. आत्मा म्हणजे उर्जा. उर्जेविषयी विज्ञान जे सांगते, तेच तत्वज्ञान आत्म्याविषयी सांगते.*

🤨पुरोगामी - लिंबू-मिरचीने आणि गंडे-दो-याने अतिशय माफक दरात संरक्षण करण्याचा महान शोध आमचाच…!
हिंदु - *लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. पुर्वी आपत्कालीन स्थितीत दवाखाने नव्हते तिथे लिंबू मिरची बिब्बा तार इत्यादीने प्राथमिक उपचार करता यायचे.*

🤨पुरोगामी - सत्यनारायण पुजा घातल्यावर बुडालेली नौका पाण्यावर तरंगून मालासह मेलेली माणसे जिवंत होतात आमच्याच देशात...!
हिंदु - *सत्यनारायण कथा गेल्या १०० वर्षातील, हिंदु धर्माची सार्वजनिक पीछेहाट टाळणे, समाज एकत्र येणे, नैतिकतेने वागणे अशा हेतूने सत्यनारायण पूजन आहे.*
 *सत्यनारायण नाकारून इफ्तार पार्टी आयोजित करणाऱ्यांचा पक्षच बुडाल्याचे उदाहरण आपण गेले ५-६ वर्षे पहातो आहे.*

🤨पुरोगामी - घरातील वस्तूंची, दरवाज्याची, खिडकीची दिशा बदलून घरातील वाद थांबविण्याचा शोध आमच्याच देशात
हिंदु - *हवा पाणी उजेडामूळे मानवी जीवनावर परिणाम होतात. कृत्रिम हवा उजेड पाण्याचे दुष्परिणाम शहरात सहज दिसतात.*

जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान म्हणजे पाश्चिमात्य प्रयोगशाळेत पांढरे कोट घालून परिक्षानळीत ओतले जाणारे ज्ञान नव्हे. विज्ञान म्हणजे अनेक कसोट्यांवर पडताळून सिद्ध झालेले ज्ञान. तेच ज्ञान जे हिंदु धर्मसंस्कृतीकडून अरबांनी युरोपियन लोकांना दिले.
मध्यपूर्व आणि पाश्चिमात्य आक्रमकांनी हिंदुंवरती धर्मयुध्द लादले. विद्यापीठ वाचनालये गुरुकुल नष्ट करुन अंधश्रद्धा लादल्या. हिंदु धर्म मागास असल्याचा न्यूनगंड दिला.

आता हिंदु धर्म जागा होतो आहे. मंगळयान यशस्वी उड्डाणानंतर इस्त्रोत पुजा केली जाते. यशस्वी उद्योजक पुजा करत आहेत. मनोरंजन सृष्टीत हिंदुंवर आडून टीका करणारे, तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणारे उघडे पडले आहेत.
आता पूर्वजांच्या ज्ञानाची मशाला तेवते आहे. आणि त्यात आधुनिक ज्ञानाचे इंधन आहे.
धर्मांतराची बाजार उघडणाऱ्या दलालांनी कितीही टिका केली तरी ती सप्रमाण खोडून काढण्यासाठी हिंदु सिद्ध आणि समर्थ आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा