चित्रपटगृहात प्राईम टाईमला मराठी सिनेमा दाखवणं अनिवार्य! मुंबई : महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दररोज संध्याकाळी 6 ते 9 (प्राईम टाईम) या वेळेच मराठी चित्रपट दाखवणं अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज याची घोषणा केली.  येत्या काळात सर्व मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये राष्ट्रगीतासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी एक चित्रफित दाखवण्यात येणार आहे, असंही विनोद तावडे म्हणाले.  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार पाठपुरावा करेल, असंही आश्वासन विनोद तावडेंनी यावेळी दिलं. गेल्या आठवड्यात राज्यातील कला संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाबद्दल विधानसभेत चर्चा झाली, त्यावर आज विनोद तावडेंनी उत्तर दिलं. याशिवाय ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं स्मारक बांधण्यात येईल. तसंच शाहीर साबळे यांच्या नावाने नवा पुरस्कार सुरु करणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.

उदासबोध

पाडगावकरानी दासबोधावरून उदासबोध लिहिला! त्यांचीच एक कविता ' दिवस तुझे हे फुलायचे' आयुष्यातील एक नाजुक वळणावरील मुलीला उद्देशून! जेव्हा ती फूलते !एका कळीचे जेव्हा फुलात रूपांतर होते! आता 'दिवस तुझे हे फुलायचे' याचे चाळीशी नंतर 'दिवस तुझे हे फुगायचॆ' केलयं कोणीतरी ! वाचा!😀 दिवस तुझे हे फ़ुगायचे….. दिवस तुझे हे फ़ुगायचे मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥ लाडकी माझी तु राणी नको तु खाऊ गं लोणी पाण्यात लिंबाला पिळायचे॥१॥ दिवस तुझे..... साजुक तुपाची धार वाढवी calories फ़ार पोटात salad भरायचे॥२॥ दिवस तुझे..... प्रभाती फिराया जाणे वाटेत धाप लागणे दमुन जरासे टेकायचे॥३॥ दिवस तुझे..... वजन वाढते फ़ार सोसेना काट्याला भार कळेना काय ते करायचे॥४॥ दिवस तुझे ..... आपुल्या घरच्यापाशी फिर तु गडे जराशी हालत चालत राहायचे॥५॥ दिवस तुझे ......😀😀

देशी तंत्रज्ञानाची कमाल:

हा एक अफलातून किस्सा आहे... प्रत्यक्षात एका सिव्हिल इंजिनीअरने सांगितलेला... एका जर्मन कंपनीचं कार्यालय बीकेसीमध्ये बांधलं जात होतं. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हा भाग समुद्रात भराव टाकून तयार केला आहे. इमारतींचा पाया खोल घट्ट दगडापर्यंत खणला जावा म्हणून अनेक इमारतींचे दुमजले जमिनीच्या पोटात आहेत. तर या जर्मन कंपनीच्या कार्यालयात बेसमेंटच्या भागात एक प्रचंड मोठं ३० टनांहूनही अधिक वजनाचं यंत्र बसवण्यात येत होतं. बंदरात जहाजामधून उतरवून एका माथाडी कामगारांच्या टोळीने ट्रेलरवर चढवून ते बीकेसीमध्ये आणलं. मात्र ते खाली उतरवून इमारतीच्या तळमजल्यात ३० फुट खाली उतरवायचं कसं हा मोठाच प्रश्न त्यांना पडला. कारण जर्मनीहून आलेलं ते यंत्र प्रचंड महाग होतं, रिस्क घेणं शक्यच नव्हतं. आणि त्यावेळी एवढं वजन उचलू शकणारी मोबाइल क्रेन मुंबईत नव्हती. ऐन पावसाळ्यात हे सगळं होत असल्याने आसपास दलदलही खूप होती. विचार करण्यातच दोन दिवस गेले. शेवटी जमशेदपूरहून एक मोबाइल क्रेन मागवण्याचं ठरलं. त्याला दोन आठवडे सहज लागणार होते. तोपर्यंत माथाडी कामगार थांबणं शक्य नव्हतं. त्यांचा काँट्रॅक्टर घाई करू लागला. मी मशीन कामगारांच्या साहाय्याने खाली उतरवतो. मला मोकळं करा असं तो म्हणू लागला. अखेरीस त्याला सांगण्यात आलं की हे मशीन खाली उतरवणं कठीण जातंय. त्यासाठी लांबून क्रेन मागवलीय. ती येईपर्यंत पंधरा दिवस तरी थांबावं लागेल. त्यावर तो काँट्रॅक्टर म्हणाला, 'साहेब, मला सांगितलं असतं तर मी झटक्यात मशीन खाली उतरवून दिलं असतं.' त्यावर कंपनीचा इंजिनीअर हसला. त्याला म्हणाला, 'एवढं सोपं काम नाही ते. आम्ही सगळे इंजिनीअर दोन दिवस त्यावर डोकं घासतोय.' हे चॅलेंज घेत माथाडी कंत्राटदार म्हणाला, मी अगदी अल्लद मशीन उतरवून दिलं तर मला काय द्याल? तरीही भारतीय इंजिनीअर त्याची खिल्ली उडवत राहिला. मात्र त्यांच्या जर्मन साहेबाने ते ऐकलं आणि त्याची काय युक्ती आहे ते ऐकून तर घेऊया, असं तो म्हणाला. माथाडी त्यांना म्हणाला, 'मला आइस फॅक्टरीतून हा खड्डा भरेल एवढ्या बर्फाच्या लाद्या आणून द्या आणि एक चांगला पंप लावा इथे.' त्या खड्ड्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे बर्फ आणून भरला गेला आणि मग त्यांनी ते यंत्र त्या बर्फावर उभं केलं. आणि जस जसा बर्फ वितळत गेला तस तसं ते पाणी खड्ड्यातून पंपाद्वारे बाहेर टाकत गेले. ते मशीन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच अल्लद खाली उतरत गेलं. भारतीय तांत्रिक जुगाडाला जर्मन तंत्रज्ञानाने केलेला तो सलाम होता.👌👌👌 (दि. ०४-०४-१५: श्री. किरण श्रीकांत गायकवाड, चेंबूर, मुंबई यांचे कडून)

आईनी शिकवलेली बडबड गीते :)



अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल
रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू

... --------------------------------------------------------------------------

एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ

--------------------------------------------------------------------------

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठ्ठा

--------------------------------------------------------------------------

येग येग सारी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून

--------------------------------------------------------------------------

चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निम्बोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खावून जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी

--------------------------------------------------------------------------

एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!

प्रत्येकाने शेयर करा
हि गाणी सर्व जनन पर्यंत पोहोचू दे....
By: :-)""-:माझीया प्रियाला प्रित कळेना Mazhiya Priyala Prit Kalena:-""(-:

१५०० कोटी आणि सरकार , वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर वगैरे वगैरे

वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर
या सारख्या रिटेल क्षेत्रात पारंगत परकिय उद्योजकांना भारतात संधी देण्यापेक्षा आपले सरकारच स्वतः १५००कोटी रुपये गुंतवतणुक करुन का हे उद्योग सुरु करत नाही
त्यामुळे खालील फायदे होतील.
१ मक्तेदारी ःMONOPOLY
फक्त भारत सरकारची राहील जशी रेल्वेची आहे तशीच
२ रोजगार ः LABOUR
अंदाजे २००० व्यक्ती किमान काम करतील
आणि जोड व्यवसायक RELETED SECTOR आहेतच.
३ स्थायी नागरिक
रोजगार मिळेल म्हणजे प्रांतवाद कमी होईल सदर प्रदेश सक्षम बनतील
३ डबघाईत BANKCRUPCY
आलेले व्यापारी सुद्धा प्रेरित होतील गुंतवणुक करायला भारतात ़
जागतिक बाजारपेठेत भारत प्रगती करेल
PLEASE GIVE YOUR IMP ADVCE
कृपया आपले सल्लेरुप मत नोंदवा.

बालभारती - आठवणीतील कविता


या पुस्तकाची original कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. मराठी भाषा आता कात टाकते आहे. नव्या सुंदर स्वरूपात ती विश्वाला गंवसणी घालण्यास सज्ज झाली आहे. साता समुद्रापार मायबोलीची पताका फ़डकावी  हे तो श्रींची ईच्छा. मराठी भाषेला नव्या युगात मानाच्या स्थानावर नेण्याच्या असंख्य लोकांच्या प्रयत्नाला आम्ही हातभार लावू शकतो यात आम्हाला आनंद आहे. इंग्रजी भाषेत सुमारे चार लाखांहून अधिक पुस्तके आहेत. या युगात मराठीला मागे राहून चालणार नाही. म्हणून आपल्यासारख्या वाचकांच्या पाठिंब्यासह आम्ही वाटचाल करत आहोत. आजवर आम्ही नियतकालिके आणि -पुस्तकांची १५० प्रकाशनं केली अहेत. आणि जिद्द आहे इंग्रजीच्या महासत्तेला टक्कर देण्याची. माझी अमृताते पैजा जिंकणारीआपली मायबोली, आम्हाला ही पैजही जिंकूनच देईल असा आम्हांला ठाम विश्वास आहे.

ई साहित्य प्रतिष्ठानची पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठीभेट द्या : www.esahity.com
हे ई पुस्तक कसे वाटले ते जरूर कळवा.

ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तके विनामूल्य़ नियमित मिळण्यासाठी लिहा : esahity@gmail.com

हा अंक नियमीत मिळण्याकरिता आपला ईमेल ऐड्रेस आमच्याकडे नोंदवा
-
ई साहित्य प्रतिष्ठान

मराठी माणूस कधीच झोपत नाही,
कोणाच्या वाटेला हि जात नाही आणि दुसर्याच्या तोंडाचा घास सुद्धा खात नाही,
पण कोणी जर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळेच काय पोटातली आतडी पण बाहेर काढायला मागे सरत नाही.
तो शांत आहे शांतच राहूद्या नाहीतर नवा इतिहास लिहायला कागद पुरणार नाही आणि वाचायला शत्रू उरणार नाही.
अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.

फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.

आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्‍यावरती जाऊ नका.

करुन टाकेन तुकडे तुकडे aamchay नादाला लागू नका
 
-http://www.facebook.com/aawarakar