esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

  • विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला | तेथे पैजाराचे काम, व्हावे अधमाशी अधम............. माउली माफ करा.......आता नको तुमचे पसायदान...... आता हवी तुकोबांच्या हातातली वहाण............... 
  • मेन बत्त्या गोळा करू या चला
  • हे सरकार काहीही करू शकणार नाही. आता एकच करा, काश्मीर पाकला देऊन टाका आणि इस्ट इंडिया कंपनीला सरकार चालवन्याचा ठेका द्या. आऊत सोर्स करा.
  • बहुतेक केंद्र सरकार भारताची लोकसंख्या बॉम्बस्फोटात मरून अर्ध्यावर येण्याची वाट पाहत आहे. म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला.
  • अफझल गुरु तुम जियो हजारो साल - हम मरते रहेंगे सालोसाल !!!  
  • आता परत एकदा चर्चा, चौकशी आणि मेणबत्या घेऊन फिरणे; परत तीच NSG धावपळ, आणि कातडी वाचवण्यासाठी राजकारण्याची लगबग; शांततेचं आवाहन; जगण्याचं Mumbai Spirit; देवा एकतर तुच आता बदल हे सारं, अथवा मुर्दाड बनवं आम्हाला असं कि काहीच वाटु नये परत परत ... 
  • पाकिस्तान या बाबतीत पूर्णपणे निर्दोष आहे. लवकरच पुन्हा दुसरा बॉम्बस्फोट झाल्यावर हे सिद्ध होईल. हे फक्त पाकिस्तान, कसाब "जी", अफजल "जी" यांना बदनाम करण्याचा कट आहे.  
  • १००% कॉंग्रेसचा हात !!! हातावर शिक्का मारा आणि कॉंग्रेस ला विजयी करा ... 
  • मेडियाच्या टेबल मध्ये आणखी एका हल्ल्याची भर पडली...४ दिवस फुल धंदा...जाहिरातींचे रेट वाढवलेसुद्धा असतील...  
  • सर्वात प्रथम, दयेचा अर्ज राष्ट्रपती कडे करण्याचा निंयम बंद करा आत्ता तरी आणि या हरामखोर कसाब ला आणि त्या अफझल गुरु ला फाशी द्या. कोणती माहिती गोळा करत आहे सरकार त्याच्या कडून कोण जाणे. " हे दहशतवादी मंत्रालयावर आणि संसदेवर बॉम्ब का टाकत नाहीत." म्हणजे निम्मे तर कमी होतील. 
  • मला आता वाटते कि "सायमन परत ये" चे एक आंदोलन करायला पाहिजे.. इंग्रजांच्या शिवाय या देशाला चांगला पर्याय दिसत नाही... शिवाजी राजे, झाशीची राणी या सारखी मुत्सदी लोक जन्माला घालणे आमच्या देशाने बंद केलेले दिसते.. कोण कोण येणार आंदोलन करायला... मी ब्रिटन च्या राणी ला पत्र लिहायला तयार आहे.... :)  

- esakal.com वाचकांच्या प्रतिक्रिया :D

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा