चिनी मालावर बहिष्कार


चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन वाचून पुरोगाम्यांच्या हृदयाला भोके पडली आहेत. असे केले तर रस्त्यावर या वस्तू विकणारांचे नुकसान होईल म्हणून बहिष्कार टाकू नका अशी आवाहने वाचते आहे. सरळमार्गी मध्यम वर्गाला ते वाचून आपण मोठ्या पापातून वाचलो असे वाटते आणि बहिष्कार नको हे पटते. एक तर अशा वस्तू विकणारांना इतरही अनेक वस्तू विकता येतील. त्यामुळे त्यांच्या नुकसानाचे पाप आपल्या माथी येणार हा भ्रम आहे. सरकारला एवढे वाटते तर त्यांनी बंदी घालावी असेही हे शहाणे सुचवतात. परराष्ट्र संबंधात कधी काय करावे हे या सरकारला कळते आणि ते तसे करेलच. इथे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार चालू आहे. अनेक शहाण्यांनी अमुक गोष्टी कशा फक्त चिनी कंपन्या बनवतात टाका बहिष्कार तुम्हाला स्मार्टफोन मिळणार नाहीत असे पांडित्यही मिरवले आहे. जे भारतात बनत नाही ते इथे बनविण्यासाठीच मोदींनी Make In India ची सुरुवात केली आहे. जेव्हा या वस्तू भारतात बनतील तेव्हा त्याही बंद करू पण आज शक्य आहे तेवढा तरी बहिष्कार टाकणे गैर कसे? एखादा रोग झाला तर सगळे उपाय करणे शक्य नाही म्हणून कोणताच उपाय करू नका असेही हे शहाणे सांगतील. ही एक खूणगाठ बांधा त्यांना माहिती आहे की चिन्यांवर तुमचा राग आहे. तिथे तुम्हाला समजावणे शक्य नाही हे कळते त्यांना. मग काय तर तुम्हाला confuse करणे सोपे. तुमची दिशाभूल करण्यात ते पटाईत आहेत. त्यांना बळी पडू नका.

एक कसोटी देते ती लावून पहा. असाच बहिष्कार कोकाकोला आणि अन्य अमेरिकन मालावर अफगाण युद्ध प्रकरणी इथे भारतातही घालण्यात आला.तेव्हा यातले किती शहाणे हेच मुद्दे घेऊन त्यांना समजवायला गेले होते? नसतील तर ते दुतोंडी ठरत नाहीत का?

दिशाभूल करणारा आपले नुकसान करतो आपला शत्रू असतो.

-Facebook साभार

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

नक्षत्रांच्या पुराणकथा : २

सुहास गोखले @ facebook :

ग्रह नक्षत्राांवर आधारीत पुराणकथाः आणखी काही कथा.
अश्विनीच्या पाठोपाठ येणारे नक्षत्र म्हणजे भरणी, तीन तार्‍यांचा समुह असलेले हे नक्षत्र अत्यंत अशुभ समजले गेल्याने, त्याचा उल्लेख किंवा संदर्भ, कथांमध्ये फारसा होत नाही. मी पहील्या पोस्टमध्ये लिहीले तसे दशराथाच्या तीन राण्या हे भरणी नक्षत्राची प्रतिक होते म्हणुन दशरथाचे अकाली निधन झाले.
त्यानंतरचे नक्षत्र कृत्तिका, सहा तार्‍यांचा समुह, सप्तर्षी सारखाच आकार त्या सहा ऋषींच्या पत्नी असल्याच्या कथेचा मी यापुर्वीच उल्लेख केला होता, त्यात लिहीण्याचा राहुन गेलेला तपशिल म्हणजे, सप्तर्षींना सोडुन गेल्यामुळे, सप्तर्षी आपल्या ऋषीपत्नींशी संबंध ठेवत नव्हते, त्यामुळेच कृत्तिका मावळण्याच्या मार्गाला पश्चिमेकडे सरकायला लागल्यावरच सप्तर्षी अकाशात येतात.
या व्यतिरीक्तही कृत्तिकेच्या काही कथा वाचायला मिळतात. कृत्तिके मधिल सर्वात प्रखर तारका म्हणजे आंबा, ईतर पाच तारकांची नावे आहेत 1) दुला, 2) नितत्नी, 3) अभ्रवंती, 4) मेघयंती आणि 5) वर्षयंती. कृत्तिका तारकासमुहाला प्लिहादीही असेही नाव आहे आणि बहुतेक त्यावरूनच इंग्लिश नाव प्लिडस पडले असावे.
दुसर्‍या कथेनुसार महादेवामुळे अग्निला गर्भ राहीला. अग्निला याची खुप लाज वाटल्याने त्याने त्या गर्भाचे सरोवरात विसर्जन केले, त्याच सरोवरात रहाणार्‍या सहा कृत्तिकांनी तो गर्भ धारण करून मुलाला जन्म दिला, तो मुलगा म्हणजे महादेवपुत्र षडानन (सहा मुखे असलेला) किंवा कृत्तिकेय किंवा कार्तीकेय.
कृत्तिकेनंतरचे नक्षत्र रोहीणी, पुन्हा एक तीन तार्‍यांचा समुह.
प्रजापतीनी यज्ञकर्मासाठी विराट नावाची स्त्री तयार केली पण यज्ञविधीत योग्य तो मान न मिळाल्याने ती आकाशात निघुन गेली. आवकाश आरोहण करणारी म्हणुन तीचे नाव पडले रोहीणी. रोहीणी तारकासमुहातला सर्वात प्रखर तारा नेहमी चंद्राच्या जवळ दिसत असल्याने, अत्यंत जिवलग प्रमिकांना चंद्र आणि रोहीणीची उपमा दिली जाते.
दुसर्यां कथेनुसार प्रजापतीनी आपल्या 27 मुलींचे (नक्षत्रही 27 च आहेत) लग्न चंद्राशी लावुन दिले पण चंद्र रूपसुंदर रोहीणीशिवाय ईतर 26 जणींकडे लक्ष देत नसल्याने, प्रजापतीनी चंद्राला क्षय होईल असा शाप दिला पण रोहीणीच्या विनंतीवरून त्याला वृध्दीचा उश्शापही मिळाला म्हणुन चंद्राच्या क्षय आणि वृध्दीचे चक्र सुरू झाले.
काही वेळा पिता प्रजापती मुलीच्या सौंदर्यावर भाळल्याने ती मुलगी रोहीणी आकाशात निघुन गेल्याचाही उल्लेख झाला आहे.

सुहास गोखले @ facebook

त्यानंतरच्या मृगशिर्ष नक्षत्रावरून रामायणामधिल सोन्याच्या हरीणाची कथा आली त्या चार तार्‍याांच्या मध्ये एका रेषेत असलेले तीन तारे म्हणजे रामाचा बाण आणि त्या बाणाच्या सरळ रेषेत आकाशातला सर्वात प्रखर तारा व्याध दिसतो.
रोहीणीचा पिता प्रजापती तीच्यावर भाळल्याने, सर्वांनाच चिड आली आणि रागाच्याभरात रूद्र प्रजापतीवर धाऊन गेला. घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप धारण केले व त्याच्या मागे असलेला व्याध म्हणजे रूद्र, अशीही एक कथा ऐकायला मिळते.
त्यानंतरच्या आर्दा नक्षत्राची मात्र कोणतीही कथा कधी ऐकायला मिळाली नाही. बहुधा पावसाळी नक्षत्र असल्याने सगळेच शेतीच्या कामात गुंतल्याने असावे.
त्यानंतरचे पुनर्वसु नक्षत्र म्हणजे दोन तार्‍यांचे नक्षत्र, अर्थात मिथुन राशीत येणारे. सगळ्यात भाषातल्या पुराण कथात यांची जोडीच असते, कधी स्त्री आणि पुरूष, कधी दोन झाडे. आपल्याकडे आदीवासी भागात मात्र त्यांना ती मोराची जोडी दिसते. आपल्या पुराणातल्या कथेप्रमाणे पुनर्वसु ही दोन राक्षस होते, दोघांनी देवांच्या तोडीस तोड यज्ञ करायचे ठरवले. नॅचरली देवांचा विरोध होता. देवांनी यज्ञ उधळायचे ठरवले. इंद्रदेव ब्राम्हणाच्या रूपात गेले (इंद्र म्हणजे हिंदु देवातला मेक ओव्हरचा तज्ञ असावा. तो ओरीजीनल रूपात कमीच आढळतो) ब्राम्हणाने सांगीतले की चांगल्या रिझल्टसाठी यज्ञकुंडात सोन्याची वीट लावा, असे सांगुन त्यानेच सोन्याची विट दिली आणि यज्ञ अर्ध्यावर आल्यावर आपली विट परत मागीतली आणि जबरदस्तीनी काढुन घेतली व आकाशात फेकली, विट घ्यायला आकाशात धावलेले दोन राक्षस म्हणजे पुनर्वसुचे दोन तारे आणि ती विट म्हणजे चित्रा नक्षत्र.
पुनर्वसु पाठोपाठचे नक्षत्र आहे पुष्य. अत्यंत अंधुक नक्षत्र. पुनर्वसु पासुन काही अंतरावर मघा नक्षत्राची टपोरी चांदणी दिसते आणि या दोन चांदण्यांमध्ये अंधुक धुरकट पुष्य नक्षत्र, खुपबारकाईने पाहीले तर त्यात तीन चांदण्या दिसतात. प्राचिन काळात ऋषीमुनी आकाशवेध घेताना, गुरु ग्रह जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा तो ग्रह असल्याचे ऋषीमुनींना ओळखता आले म्हणुन तो गुरूपुष्य योग अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो, पण गुरू ग्रह 12 वर्षांनी एकदा पुष्य नक्षत्रात येत असल्याने, (आम्हा भटा ब्राम्हणांच्या) सोयीसाठी चंद्र पुष्य नक्षत्रात आला आणि त्या दिवशी गुरूवार असला तर त्याला गुरूपुष्य योग समजला जाऊ लागला.
त्यानंतरचे नक्षत्र अश्लेषा, नागाच्या फण्यासारखे पाच तारे, यांना अश्लेषा पंचकही म्हणतात. यावरून महाभारतात पाच फणे असलेल्या वासुकी या सर्पाचा उल्लेख झाला असावा. आकाशात हा सर्प अश्लेषा नक्षत्रापासुन सुरू होऊन, हस्त नक्षत्रापाशी संपतो.
पुष्य नक्षत्राच्या पुर्वेकडे दिसणारी ठळक चांदणी म्हणजे मघा नक्षत्र. पाच तार्‍यांच्या नक्षत्राचा आकार विळ्यासारखा आणि मघेची चांदणी त्या विळ्याची मुठ आहे, थोडी कल्पना केल्यास हे नक्षत्र उलट्या प्रश्नचिन्हासारखे दिसते. नघा नक्षत्रावरचा पाउस खुप बेभरवशाचा असल्याने, या नक्षत्राबाबतही फारशा कथा रचण्याच्या मुडमध्ये कोणी फारसे नसावे. शेतात काम करणारी खेड्यापाड्यात भाषाही खणखणीत स्पष्ट त्यामुळे काही भागात या नक्षत्रावरच्या पावसाबद्दल, ‘’कोरड्या मघा तर नभाकडे बघा पण बरसल्या मघा तर चुलीपाशी हगा’’ असेही म्हणतात. मघा नक्षत्राचा आकार काहींना सिंहासारखा दिसतो, हे नक्षत्र सिंह राशीतच येते, या काळात साजरा केला जाणारा शिमगा हे बहुधा सिंह – मघा याचे मिश्रण होऊन पडलेले नाव असावे.U

नक्षत्रांच्या पुराणकथा

सुहास गोखले @ facebook

नक्षत्रांच्या पुराणकथाः-
अश्विनी नक्षत्रात तीन तारे, आडव्या व्ही च्या आकारात म्हणजे घोड्याच्या तोंडाच्या आकारात दिसतात त्यामुळे आलेली कथा. दधिची ऋषी अश्विनी कुमाराला (अश्विनीकुमार म्हणजे हिंदु वैद्यकशास्त्राचे प्रणेते), मृताला जिवंत करण्याची विद्या देणार होते. देवांनी दधीची ऋषींना भिती घातली की, त्यांनी अश्विनीकुमाराला विद्या शिकवल्यास त्यांचा शिरच्छेद केला जाईल, यातुन मार्ग म्हणजे, दधिची ऋषींचा शिरच्छेद करून त्यांना घोड्याचे (अश्व) शिर बसवण्यात आले व त्या मुखातुन अश्विनी कुमाराला ज्ञान दिले गेले म्हणुन त्यांचा शिरच्छेद झाल्यावर त्यांना पुन्हा मुळ दाधिची ऋषींचे शिर बसवले गेले. म्हणुन ते नक्षत्र अश्विनी.
शंकरानी गणपतीच्या मस्तकावर केलेली शस्त्रक्रिया आपण देवांच्या खात्यात जमा केल्यास, ही मानवानी केलेली ऑर्गन ट्रान्सप्लंटची पहीली शस्त्रक्रिया म्हणता येईल. मनात आलेला दुसरा मजेशिर विचार म्हणजे, स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ या वाक्प्रचाराचे मुळ हेच असेल का?

पुढिल भाग 

नक्षत्रांच्या पुराणकथा १

सुहास गोखले @ facebook

माझ्या तरूणपणी मी महाराष्ट्रात आणि हिमालयात बरेच ट्रेकिंग केले. बर्‍याचदा रात्री किंवा पहाटे डोंगरातुन चालताना आम्ही तारे आणि नक्षत्रांच्या मदतीने दिशा आणि वेळ ठरवण्याच सराव केला होता, त्यावेळी डोक्यात आलेला एक विचार होता की पुर्वीच्या काळी जेव्हा ऋषी मुनी जंगलातुन फिरत तेव्हा दिशाज्ञानाची हीच पद्दत होती त्यामुळे त्यांचा खगोल शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्या ज्ञानाचा वापर करून काही कथा लिहील्या, महाकाव्ये रचली, ती म्हणजे रामायण आणि महाभारत.
राजा दशरथाला तीन राण्या होत्या, भरणी नक्षत्रात तीन तारे असतात. पत्रिकेत भरणी योग हा मृत्यू योग समजतात म्हणुन दशरथाला अकाली मृत्यू आला.
तेजस्वी चंद्र म्हणजे प्रभु रामचंद्र आणि डागाळलेला चंद्र म्हणजे लक्ष्मण. चंद्र जेवढा तेजस्वी दिसतो तेवढेच त्याच्यावरचे डाग स्पष्ट दिसतात, म्हणुन राम आणि लक्ष्मण कायम सोबत असतात. (लक्ष्मणाचे वर्णन काळासावळा, कायम रामासोबत रहाणारा आहे ते त्यामुळे)
तुटणारा तारा म्हणजे सिता. तुटलेल्या तार्‍याचे दगड (अशनी) शेतात नांगराच्या फाळाला लागतात, सिता देखिल जनक राजाला नांगराच्या फाळाखालीच मिळाली होती. उल्कापात होतो तेव्हा तारे जळत येतात आणि जमिनीत जातात, सितेनी देखिल अग्निदिव्य केले आणि शेवटी ती जमीनीत गेली.
धुमकेतु म्हणजे हनुमान, मोठी शेपटी, कायम सुर्याकडे तोंड, क्षणात येणारा अचानक नाहीसा होणारा हनुमान.
मृग नक्षत्रावरून सोन्याच्या हरीणाची कथा आली.
सात आद्यऋषी सप्तर्षीवरून आले, तशाच सप्तकन्या म्हणजे सात ऋषींच्या पत्नी, त्यातल्या सहाजणी पतीशी भांडुन घर सोडुन गेल्या म्हणुन आकाशात सप्तर्षीच्या विरूध्द दिशेला कृत्तिका नक्षत्र आहे, सप्तर्षीसारखीच रचना पण छोटा आकार, त्यात सहाच तारे आहेत. सप्तर्षीकडे बारकाईने पाहीले तर शेपटीचा मधला तारा हा जोड तारा आहे. ती आत्री ऋषींची पत्नी अनुसया, तीने पतीची साथ सोडली नाही म्हणुन ती महासती ठरली.
पुराणातील कथेनुसार विंध्यमुनीनी स्वतःचा आकार वाढवुन सुर्याचा मार्ग रोखला होता आणि सुर्याला परतवले होते. मकरवृत्तावर विंध्यपर्वताची रांग आहे, सुर्य मकरवृत्तापर्यंत येऊन परत जातो, म्हणुन ही कथा. आणखीही साम्यस्थळे आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.........

पुढिल भाग 

टिळक : शिक्षण हक्क आणि अधिकार

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात ..... एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'
- सर्व श्रेय मूळ लेखकांचे

वयात येताना


संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. ती ज्ञानेश्वरी की जी भगवद् गीतेवर टीका आहे.

तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.

समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.

जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.
तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या 16 व्या वर्षीच.
अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.
ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची,  स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती..
इस कदर वाकिफ है,
मेरी कलम मेरे जज्बातोसे ।
मै इश्क लिखना भी चाहू,
तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।
एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.
ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.
अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?
आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात,  एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.
हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.  शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत.  शाळेत शिकणा-या  विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय
ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात.
मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?
इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.
सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची.  जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.
जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?
आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर,  त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी, आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.
ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.
सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे.  तुला बाॅयफ्रेंड  किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.
असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????
ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?
की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?
दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.
एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
दुसरी अधोगतीकडे जाणारी.

संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.
दोनच गोष्टी कळतायत
आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...
आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...
अखंड असावे सा..व..धा..न
-व्हाट्सप वरुन