भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी, अहिंसा आणि शांततेचे प्रतीक.
शालेय इतिहासाच्या पुस्तकात गांधींजींच्या अनुयायांनी आणि अहिंसेच्या वारसानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक प्रकरण लिहिली आहेत, त्यात सुद्धा इंग्रजी अत्याचारांची वर्णन आहेत.
म्हणजेच अहिंसेचा मार्ग इंग्रजांपुढे उपयोगाचा नव्हता. 1920 ते 1942 पर्यंत प्रत्येक अहिंसक आंदोलनात हजारो बळी गेले. त्यांचे रक्त म्हणजे पाणी होते का? मग हि अहिंसक क्रांती कशी?
अहिंसा फक्त बलवानाला शोभते हे इतिहासात सिद्ध झाले आहे. आणि वर्तमानात सुद्धा!
27 वर्षात प्रत्येक ठिकाणी गांधींचे सेवक त्यांच्या भोवती कडे करुन असायचे. इतका लाठीमार गोळी होऊन सुद्धा गांधीजी सुखरुप कसे?
उपवासाने इंग्रजांच मन जिंकता आल असत तर देशात गरीब जनता काय कमी होती ?
गांधीना अपाय झाल्यावर हिंसाचार वाढेल म्हणुन गांधीना सुखरुप ठेवल जात असे.
शेवटी भारतीयसैन्याने उठाव केल्यावर इंग्रज निघाले.
जाताना फाळणी करुन गेले.
गांधीनी 1920 नंतर इंग्रजांचे मन वळवण्यासाठी येशुच्या तत्वांचा आधार घेतला आहे. अगदी 3 माकडा सकट.
फाळणीच्या आणि दंगलीच्या वेळी ते कोणत्या बाजुने उभे राहिले?
शांतता गांधीपुरतीच राहिली. त्यांच्या मागे धावणारी जनतेची डोकी फुटली गोळ्या लागुन जीव गेला.
शेवटी पाकिस्तानात लाखो हिंदु मेल्यावरसुद्धा फक्त हिंदुनाच शांततेच आवहन केल, त्यानंतर भारतात हिंदुंच्या कत्तली सुरु झाल्यावर गांधीनी कोणाची वकिली केली?
गांधींच्या वारसदारानी पण हिंसाच केली शेवटपर्यंत. आणि शांतता तिकडे इंग्लंडातच राहिली.
गांधी आफ्रिकेत जे म्हणाले त्याप्रमाणे भारतात काय केल नक्की? 1920-1948 सर्वात जास्त बळी कोणाचे गेले?
गांधी कृष्णापेक्षा ख्रिस्ताचे भक्त जास्त बनले होते. त्यात चुकीच काहीच नाही, येशुचा शांती आणि प्रेमाचा संदेश सर्वमान्य आहे, फक्त इंग्रजाना सोडुन. ते अत्याचार करत राहिले, आणि गांधीजी अत्याचार सहन करायला शिकवत राहिले.
पण कृष्णाने शस्त्र धारण केले होते, धर्माच्या रक्षणासाठी कृष्णाने स्वतची प्रतिज्ञासुद्धा मोडली,द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कृष्णच पुढे आला होता हे कसे विसरले?
भारतमातेचे तुकडे होत असताना ना ख्रिस्त ना कृष्ण आठवला. फक्त अहिंसेचा पुरस्कार केला. आणि अहिंसा फक्त बलवानाला शोभते. ह्याचा धडा इंग्रजानी 1920 ते 1947 पर्यंत अमानुष राज्य करुन दिला. त्याच जोरावार आजची लोकशाही टीकुन आहे. बघा आजुबाजुला अहिंसक नेत्यांकडे किती खाजगी सेना असते ती.
.
अहिंसेला इंग्रजानी प्रोत्साहन दिले, स्वातंत्र्य लढा का लांबला? स्वातंत्र्य हे भारतीय सेनेच्या बंडानंतरच मिळाले हे सत्य आहे.
अहिंसेने मिळायचे असते तर 1920 ते 1945 मध्ये का मिळाले नाही?
गांधी जिंवत असतानाच दंगे झाले ज्यात हिंदुच निर्वासित झाले, ज्याना नेहरु सरकारने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. दिल्लीच्या थंडी पावसात हिंदुना उघड्यावर टाकणार्या अहिंसेला काय बोलणार? निधर्मीपणा?
ह्याच निधर्मी अहिंसेने देशाचे तुकडे केले, देशावर आणिबाणी लादणारे गांधींच्या अहिंसेचे शिष्य नव्हते का? 1948 मध्ये ब्राम्हणांचे आणि 1984 मध्ये शिखांचे शिरकाण करणारे कोण होते?
गेली 70 वर्षे काश्मिरी पंडीताना निर्वासित करणार्या अहिंसकाना डोक्यावर घेउन नाचणार का?
अहिंसेच्या मार्गाने न जाणाऱ्या क्रांतिकारकांची फाशी टाळण्यासाठी उपोषण केल्याचे किंवा वॉईसरॉय ऑफिसवर मोर्चा नेला होता का ? दुसऱ्याला स्वातंत्र्यलढ्याच क्रेडीट मिळु नये म्हणून का ?
फाळणीला जबाबदार असणारे मंत्री झाले, भारतरत्न म्हणुन स्वत:लाच पुरस्कार दिले,
त्यांच्या सातशे पिढ्या बसुन खातीक एवढी संपत्ती निर्माण झाली, एकही उद्योग धंदा न करता इंग्लंड अमेरीका युरोपात महाल विकत घेतले फाळणीला जबाबदार असणार्या नेत्यांच्या वारसदारानी.
फाळणीला विरोध करणार्या नेत्यांची वाताहात झाली. जे शिल्लक उरले त्यांच्या मागे खटल्यांची माळ लावुन दिली. का नाही सर्व नेत्याना समान सन्मान मिळाला?
राहु केतु सुर्य व चंद्राच्या परीक्रमेचे छेदन बिंदु आहेत.
भारतीय खगोलशास्त्रज्ञानी २००० वर्षापूर्वी ९ ग्रहांची आणि इतर ताऱ्यांची माहिती लिहून ठेवली आहे.
आर्यभट्ट वराहमिहिर हि नाव ऐकून माहिती असतीलच.
हे घ्या दुर्बिणीशिवाय शनी बघा nakedeyeplanets.com/index.htm
पण स्वतःच हसु करुन घेउ नका.
शनीतुन स्पंदन बाहेर पडतात कि नाही ह्या साठी शनीवर जायची गरज काय ? सोलार फ्लेअर अनुभवायला सुर्यावर जातात का?
uv किरण असतील तर चव घेउन बघणार का ?
देव देवता ह्या मानसशक्ती आहेत, स्वर्ग नरक ह्या काल्पनिक आहेत, पोथ्या पुराणे ह्या रुपक कथा आहेत, हा तत्कालिन संस्कृतीचा शब्दश: इतिहास नाही. काव्यरुपाने एका पिढीकडुन दुसर्या पिढीत आले आहे हे सर्व.
पण नैतिक जबाबदारीसाठी ह्या जागांचे मोह आणि भय आहे.
देवाच्या प्रतिमा किंवा देऊळ हे माणसाची कल्पना आहेत. त्यामुळे एखादी मुर्ती आणि लंबाकृती आयत ह्या दोन्ही शनीच्या प्रतिमा आहेत.
प्रत्येक प्रदेशातल्या नैसर्गिक स्थिती प्रमाणे देवाची संकल्पना आहे. त्यामुळे रुप किंवा उत्त्पती किंवा रुढी वेग वेगळ्या आहेत.
प्राचीन साहित्यातात शस्त्रास्त्र मिसाईल्स, आकाशविहाराचे वर्णन आहे जे आज सुद्धा तसेच आढळुन आले आहे. अवयवरोपण व प्लॅस्टिकसर्जरीच्या शस्त्रक्रिया तपशीलात आहेत.
अमेरीकेचे उदाहरण घ्या.तिथे नारायण अस्त्र,पर्जन्यास्त्र, बह्मास्त्र अशी अनेक अस्त्रे व स्त्री-पुरूष वैवाहिक जीवन व महाभारत कालीन जीवन यात साम्य आहे. त्यामुळे जांबूद्विपात समृद्धी होती हे निश्चित.
भारतीय खगोल शास्त्र अमेरिका जपान जर्मनीपेक्षा प्राचीन तरीसुद्धा अचुक आहे.
जपानी सुद्धा त्यांच्या देवळात कर्मकांड करतात.
आणि जर्मन सुद्धा चर्च मध्ये तितकेच धार्मिक असतात.
वर्जिन मेरीच्या कथेवर विश्वास ठेवला तर ते श्रद्धाळु.
राहु केतुंवर विश्वास ठेवला तर हिंदु अंधश्रद्धाळु?
मंगळावर यान पाठवणाऱ्या आधुनिक भारतीय शास्त्रज्ञांनी देवांचे आभार मानले होते. हिंदुंची चेष्टा करणारे इंग्रज आज भारतीय अवकाशातंत्रज्ञानाचा आस धरत आहेत.
हिंदु धर्मात स्त्रीशक्तिला आदिमाया मानले आहे. स्त्रीचा आदर मान सन्मान समानतेने केला पाहिजे अशी शिकवण आहे. समाजव्यवस्थेचा गैरफायदा घेणार्यानी, स्त्रीयाना दुय्यम स्थान दिले.
सती सारख्या प्रथा तिरस्कारणीय आहेतच. स्त्री शिक्षणावर आक्षेप घेणारे मुर्ख आहेत. पण हे धर्माच्या नावाने करणारे नीच हरामखोर आहेत.
मनुस्मृतीत स्त्रियांना हक्क आणि अधिकार आहेत.
गार्गी, अत्रेयी , मैत्रेयी ह्या इसपू काळातील महिला सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या विदुषी होत्या. तेव्हा अरब वाळवंटात आदिमानवी जीवन जगत होते आणि युरोपीय एकमेकांचा जीव घेत होते.
आता तुम्ही म्हणाल भारतीयांचे ज्ञान कुठे गेले.
उत्तर ऐकल तर दुख: होईल का तुम्हाला?
१२ व्या शतकापासुन होणार्या मुसलमानी आक्रमणात ही ज्ञानपरंपरा नष्ट झाली. ईंग्रजानी तर शैक्षणिक आणि वैचारीक गुलामीच लादली, त्यातुन भारतीय ज्ञानाला कमी लेखणार्या कारकुनी पिढ्यांचे छापखाने तयार झाले.
तरी सुद्धा आज पण आमचा अडाणी शेतकरी पावसाचा आखाडा वेधशाळेपेक्षा चांगला बांधतो.
आयुर्वेदाने असे आजार ठिक होतात जे आधुनिक वैद्यकशास्त्राला जमत नाही.
महाभारत रामयणातली अवकाश प्रवासाची वर्णन खरी कशी ह्याच उत्तर द्यायला जड जाईल तुम्हाला.
सुश्रूताने शस्त्रकिया यशस्वी केल्याच माहिती नसेलच तुम्हाला. अवकाश विद्येची पुस्तक नष्ट झाली म्हणुन आसुरी आनंद का?
गणित भुमिती खगोल अवकाश वैद्यक ह्या शाखात भारतीय ज्ञान परीपुर्ण होते व आजसुद्धा वापरता येते.
पण पाश्चात्य विज्ञान खुप ठिकाणी चुकले आणि प्रत्येक शतकात बदलत गेले. आपण लादल गेल आहे म्हणुन पाश्चात्य ज्ञान प्रमाण मानतो. त्याला प्रणाम करायची गरज नाही.
वर्षातला शेवटचा थर्टीफस्ट आज माझा असणार आहे. न्यु ईयरच्या स्वागताला मी रात्रभर बसणार आहे. दुखाचे घोट घेतानासुद्धा मी मनसोक्त हसणार आहे. Goodbye 2015च्या अंत्ययात्रेत मी तुमच्यासोबत नसणार आहे. संस्कार आणि संस्कृतीच्या छायेत मी स्वतःहुन असणार आहे. नव्या उमेदीने मनाची शेती मी दिवसरात्र कसणार आहे. स्वप्नांच्या राज्यात वास्तवाच तुफान बनुन बरसणार आहे. आयुष्य झिजेपर्यंत सुखाची चव घ्यायला तरसणार आहे. मुहूर्त तीथी मोजायला मी पोथ्या पंचांग घेणार आहे. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी पाडव्यालाच देणार आहे !
हॅप्पी न्यु ईयर
हॅप्पी न्यु ईयर
चार वोडका
पाच बीयर
आपला माईंड एकदम क्लिअर कोण बोलला नाय नो नेवर मी सुपर स्मार्ट बुद्धिमान क्लेवर प्रत्येक बाटलीला माझाच फ्लेवर कशाला ब्रेक डायरेक्ट टॉप गीअर विसरायच दुख, आता नो पेन, नोमोअर टीअर मार दोन पेग माय दोस्त डीअर तुला उचलायला आय अम हीअर फ*क द फीअर लेट्स चीअर हॅप्पी न्यु ईयर
मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या दीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागतपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मध्ये मला... इंग्रजी पण एक शिवचरित्र मी लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली... मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की त्यांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इनाम करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी केली नाही गणपतीवर आरती. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चलू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन ह्याचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल. एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो.कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता.. हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगताहे, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती, व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे. त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांचं.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे. त्याच्याकडं गावक-यांनी विनंती केली काही कर माफ़ करण्याची ती मान्य केलीये ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो छापलाय हं! कमल गोखल्यांचं जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं.त्यांचं... जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, ते हेन्री रेव्हिंग्टन नं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, तो त्यांना, महाराजांना ओळखलं होतं. तो वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत!असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाचे प्रारंभीपासून आखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो. नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील, सुंदर नारायणाचं देऊळ आहे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको त्यांनी करायला पाहिजे होतं, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे वाटतं कोणाला, पण त्यांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आता, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाहे वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? ते म्हणे औरंगाबाद म्हणून एक शहर आहे तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या दळभद्र्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी सरकारी नाव, त्याचं अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. अशां कुठे जगात नाही उदहरण. मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावनी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावाने मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख! असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. ५८ साली अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? ५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याचं पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला फ़त्तेखान सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते १६५७, १० मार्चपर्यंत , त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितलं, एवढी ३ अहेत. ५७ नंतर यांचं काही नख सुद्धा दिसत नाही. ही कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं ५८ साली स्वराज्य शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. ५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं?बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळातमध्ये जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? कुठली ही जात हिंदू धर्मातली म्हणायचे आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे,नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल तो हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता त्यांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता. दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारतीय भारत जेंव्हा स्वतंत्र झाला ४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते.भारतीय नाव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळुक होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं, मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालनंतर हकीकत लिहिलेली अहे आणि काय लिहिलिये?की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते.त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक.. दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते.नव्हतेच... आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरनं काही पगार जात नव्हता. त्यांच्या पदरचा जाणार होता, मला तुम्हाला सांगयला काही माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे,
दारू पिणाऱ्यांनी, ३१ ला हवी तेवढी ढोसा. अगदी ओकेपर्यंत प्या. पण गाडी चालवू नका. तुमच्यामुळे कुणा इतराची लाईफ कशाला डेंजरमध्ये यार. बात छोटीसी है रे, पर लई इम्पोर्टन्ट है. आत्महत्येसाठी माझ्याकडे भारी भारी पर्याय आहेत. विचारलं तर सांगतो. पण दुसर्याची लाईफ रिस्कमध्ये टाकायचा अधिकार आहे का आपल्याला ?
लाईफ एकदाच मिळते यार. त्यावर फक्त आपला अधिकार. फुल जियो, पर होशोआवाज में.
आयुष्य सुंदर आहे आणि असेल. पण ते सौंदर्य टिकवण्यासाठी थोडा झगडना पडता है रे. झगडायचं रे थोडं. मग लाईफ बघ, कशी नांगी टाकते आपल्यासमोर. कुछ पाना तो कुछ खोना, लाईफ का दस्तूर है रे मियां.
>भारत माझा देश आहे (म्हणूनच आम्ही विदेशात नोकऱ्या मिळवून तिथे स्थाईक होऊन त्या देशांना डेव्हलप करायच्या प्रयत्नात असतो) >सारे भारतीय माझे बांधव आहेत (आम्ही सतत एकमेकांचा मत्सर करत असतो, तुझी जात ती..... तर माझी जात हि.... आणि चार पाचशे वर्षापूर्वीचे उकरून काढून भांडत बसण्यात आमचा हात तर कुठलाच देश करू शकत नाहीत) >माझ्या देशावर माझे प्रेम आहे (म्हणूनच आम्ही रस्त्यावर थुंकतो, नियम मोडतो, आणि फक्त आपली ताकद सिद्ध करायचा प्रयत्नात असतो) >माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे (आम्हाला वेस्टर्न परंपरा जास्त भावतात, त्यां देशातील सणांचे (वेलेन्टाईन्स डे, रोज डे, प्रपोज डे ई.) मेसेज लगेच फॉरवर्ड होतात, आमचे सण लक्षातही नसतात) >मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन (म्हणूनच whatsapp वर गुरुजनांवर आम्ही उत्तम प्रकारे विनोद करू शकतो, पालकांना घरा बाहेर काढतो, आणि रस्त्यावरून चालणाऱ्या, वडीलधार्या माणसांशी वयाचा मान न ठेवता आरेरावीने बोलतो) >आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन (आम्हाला साधा गाडीवरून ओव्हरटेक जरी कोणी केला तरी आम्हाला त्याचा राग येतो, पुढे जाऊन त्याला गाठून कशा शिव्या घालता येतील....आपली भाईगिरी कशी सिद्ध करता येईल....... वगैरे ) >माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे (आम्ही एकमेकांवर सतत कुरघोडी करतो, आमचा आवडता वाद म्हणजे जातीवाद) >त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे (आम्ही एकमेकांचे पाय घेचतो..... मीच कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करतो..... कोणि संकटात असल्यास त्याला मदत करायचे सोडून त्याचे vdo चित्रीकरण करून आपल्या पेज वर किंवा whatsapp वर कसे सर्वांचा आधी पाठवता येईल याचा प्रयत्न करतो)
आता यात काही विनोद नाहीये, तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यास- या 10 लोकांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहात.... वरील (कंसात लिहिलेल्या) अर्थाप्रमाणे त्यातील काही लोक वागताना दिसतील.... आता सर्वच जण असे चुकीचे वागतात असे नाही, आता ज्या लोकांना या शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे आणि समजला आहे ते याचे आचरण योग्य पद्धतीने करतात, ज्यांना समजला नाही ते वरील कंसात लिहिलेल्या अर्थाप्रमाणे वागतात..... तोडा आणि राज्य करा या इंग्रजांचा पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आपल्या हातात आहे. या 5 ओळींचा प्रतिज्ञेत आपली पूर्ण भारत संस्कृती आहे, इतरांची कॉपी करून आपण पुढे जाऊच शकत नाही, वेगळेपण सिद्ध केले तरच पुढे जाऊ शकतो, जर का आपण या प्रतिज्ञे प्रमाणे वागलो, आणि सर्व एकत्र येऊन काम करायला लागलो, तर जगात पहिल्या नंबरचा देश व्हायला आपल्याला 5 वर्षे पुष्कळ झाली...... जय हिंद