शांत जीवन कि धर्म?

जनता कट्टर धर्मांधाना घाबरते,
सामान्य मुस्लिमाना नाही,
मेणबत्त्या घेउन मोर्चे काढले
म्हणजे शांतीप्रियता होते का?

इतर धर्मांवर सामजिक व आर्थिक वर्चस्व,
तसेच धर्मांतरास प्रोत्साहन देणे हा दहशतवाद नाही?

एक धर्म तुमची माणसे मारुन कमी करतो,
दुसरा न मारता तुमची माणसे कमी करतो.

तुम्हाला काय हवे आहे?
शांत जीवन कि धर्म?
जरी शांत जीवनासाठी
तुम्ही धर्म बदलला तरी
तुम्ही बाहेरचेच रहाणार.

म्हणुन
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब यांचे चरणी..

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

प्रती,
माननीय आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब,

२३ जुलै आणि १ ऑगस्ट हे पुण्यदिन. 

दिन असं लिहिलं कारण तीथी भारतीय आहे. दिन इंग्रजी आणि मॉडर्न आहे
आम्ही सुट्ट्यांपुरता भारतीय असतो. बाकी वेळ इंग्रजी कालगणना सोयीची असते.

प्रात:स्मरणीय लिहिणार होतो , पण रात्री सुरु होऊन प्रात:कालापर्यंत चालणार्या मद्यप्रश्नाला सामाजिक मान्यता आहे. तेव्हा प्रात:कालीन सामाजिक परिस्थिती बाकी प्रहाराप्रमाणेच असते.

तुम्हाला साहेब उपाधी लावल्याबद्द्ल क्षमस्व. तुम्हाला स्वर्गवासी (तुम्ही तरी स्वर्गातच जाल) होऊन 95 वर्षे झाली, इंग्रज जाऊन 68 वर्षे उलटतील. पण जनतेवरच उलटलेल्या नेत्यानी साहेब हि उपाधी प्रतिष्ठेची केली आहे. तेव्हा तुम्ही आमची मानसिक आर्थिक सामाजिक शासकिय आणि राजकिय गुलामगिरी समजुन घ्याल हि अपेक्षा.बघा गुलामीची सवय जातच नाही, आमच्या अपेक्षा संपतच नाहीत, त्यामुळेच देशाला भीकाऱ्यांचा देश म्हणतात का?

देश म्हणजे आसिंधु-सिंधु नाही हो. तुम्ही गेल्यावर तुमचे छायाचित्र टांगवणाऱ्या (सध्या ते ही फक्त जन्मदिन आणि पुण्यदिना पुरता दिसतात) तुमच्या नावाने पक्ष चालवणार्यानी इंग्रज आणि मुस्लिम लीगच्या कृपेने तोडुन मोडुन मिळवला ( तरी पोर्तुगीजानी दिलाच नाही, काही हजार लोक धारातीर्थी पडल्यावर निधर्मी सरकारने गोवा मुक्त केला.) बघा देश स्वतंत्र होतानाच विभक्त करुन मिळवला.. अहो 8x10 च्या खोली करता भांडणार्या सामान्य जनतेला हक्काच्या देशाची आस होती, जमिनीची किम्मत होती त्यानी बलिदान केल. महालात रहाणाऱ्यानी मिळेल तेवढा देश स्विकारला.. 150 वर्षांचा लढा 15 वर्षांच्या वाटाघाटीत (धंद्याची भाषा बोलायची तर घाटाच) संपवुन टाकला. माणस छोट्यश्या खोली साठी आयुष्यभर लढा देतात, पण उतावळ्या नेत्याना सत्तेच बाशिंग बांधायची घाई झाली..

असो. स्वातंत्र्यानंतर ताळतंत्र सोडुन लोक वागु लागले. संस्कार मर्यादा समाज सन्मान लाज निर्भयता सभ्यता ह्यांच्या व्याख्याच बदलल्या.

गेल्या 95 वर्षात विश्वास बसणार नाही असे शोध लागले. पण माणसाचा माणसावर विश्वास बसत नाही. माणुस माणसावर विश्वास ठेवत नाही पण कागदांच्या तुकड्यांवर ठेवतो. अर्थात हे गीतेत सांगितल आहेच.

तुम्ही गेल्यावर परीस्थिती तशीच राहिली. फार पुर्वी स्वकियांची गुलामी केली , नंतर मधल्या हजारो वर्षात परकियांची गुलामी केली, आता परकीय मानसिकतेच्या स्वकियांची गुलामी करतो आहोत.

तुम्ही विचारल खडसावुन कि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..
आता अस विचारणाऱ्याचाच ठावठिकाणा लागत नाही.
लोकशाही ही ठोकशाही बनली आहे.
राजकारण्याना **गना (***stitues) ,
रक्षकाना रक्षांगना (polistutes) ,
पत्रकाराना पत्रांगना (prestitutes) बोलतात ,
पण बोलणार्याची जीभ हासडण्याचा अधिकार असलेले तुमच्या सारखे कधीच राजकारण आणि पत्रकारितेला पोरक करुन गेले आहेत.

पुर्वी घोटाळ्यात नाव आल तर नेते आणि जनता तोंड लपवायची,
आता पत्रकार परिषदा घेतात आणि निवडणुकीच्या तयारीला लागतात
राजकारणाच्या गजकरणावर निवडून येण्याचा मलम शोधल्यावर सर्वच गोष्टी पवित्र झाल्या.

तुम्ही गेल्यावर तुमच्या नावाने जो टिळक फंड सुरु झाला होता त्यानेच सुरुवात झाली,
कि इंग्रजानी शिकवल ते त्यानाच माहिती,
पण पापाची प्रसिद्धी मिळवुन माणस थोरपदाला पोहचली.

जनतेला सरकारची कामगिरी विचारली तर "भ्रष्टाचार" सोडुन दुसर काही ऐकायला मिळण्याची अपेक्षाच नाही.
विरोधी पक्ष फक्त विरोध आणि पुढच्या निवडणुकीच्या प्रचारापुरताच उरला आहे.

लवकरच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी सुरु होईल. पण देशात समाजात विद्वेशाच विष भिनल आहे.

मवाळ आता टवाळ झाले
जहाल तर मस्तवाल झाले.

सरकारी निधींच्या शेंगा खाऊन पुराव्यांच्या टरफलांचे राजकारण करणाऱ्यांकडून साष्टांग नमस्कार.

वॅलेंटाईन डे आठवडाभर सेलिब्रेट करण्याच्या हक्कासाठी भांडणाऱ्या पिढी आणि पाठिराख्यांच्या वतीने तुम्हाला पुण्यदिनाच्या शुभेच्छा.

ता.क. सर्व भ्रष्टाचार्यांची संपत्ती जप्त करुन जनतेला वाटली तर जनतेला अपचन होईल का? भ्रष्टाचाऱ्याना पुण्य लाभेल कि जनतेला शिव्या शाप?

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या: आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न...

आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

गटारी अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.

आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरातील दीप -निरांजन-कलश इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात. कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो. अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

साभार : मायबोली मिसळपाव  माझा कट्टा  

गणपती सेलिब्रेशन आणि ईव्हेंट मॅनेजमेंट


आता गणपती येतील.
जागोजाग मंडप लागतील,
दिवसभर आणि रात्रभर सुद्धा DJ वाजतील.
कार्यकर्ते वर्गणीसाठी दारोदार फिरतील.
कधी प्रेमाने तर कधी दमाने वर्गणी घेउन जातील.
दारु आणि गुटखा विकणार्यांची देणगीदारांच्या नावाखाली बॅनर लागतील.
आयुष्याभर केलेले सगळे गैरधंदे आणि काळा पैसा पचवुन, कंटक आणि टगे झब्बे कुर्ते घालुन बॅनवर गणपतीच्यापण आधी झळकतील, गणेश मंडळाच्या समितीवर पण दिसतील.
दुसर्या गणपती मंडळापेक्षा आपला भारी आणि मोठ करताना वाद, संवाद, विवाद, राडा सगळ यथासांग होईल.
सिनेस्टार सेलिब्रिटी पैसे वाल्याना डायरेक्ट उर्फ VIP एंट्री कार्यकर्ते मिळवुन देतील.
सेक्युलर लोक तक्रारी करतील.
मंडपामुळे ट्रॅफिक आणि गैरसोय होते.
DJ खुप मोठ्याने लावतात..
DJवर अश्लील गाणीच लावतात..

हे सर्व पाहिल्यावर टिळक (बाळ गंगाधर) स्वर्गातुन अग्रलेख लिहतील.

लोकमान्य टिळकानी सार्वजनिक सण (गणेशोत्सव) साजरे करायला उद्युक्त केले ते रस्त्यावर मंडप आणि DJ वर अश्लील गाणी लावुन नाचायला नाही.

हिंदु आणि इतरही समाज एकत्र व्हावा म्हणुन सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. आज मुसलमान किंवा ख्रिश्चन कार्यकर्ते संपुर्णवेळ गणेशमंडपात असतात , हे सामजिक सलोख्यासाठी खुपच महत्वाचे आहे.

व्याख्यानमाला किंवा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणार्यांची चेष्टा होते.
अश्लील गाण्यावर ढुंगण उडवायचे नाचगाण्याचे कार्यक्रम असले की मंडळाचा संपुर्ण खर्च वसुल!!

आता, मंडळाचे मॅनेजमेंट झाले
आणि उत्सवाचे ईव्हेंट झाले.

"इंटरनेट तटस्थता" #NetNeutrality

"इंटरनेट तटस्थता" #NetNeutrality काय आह?? ❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗ आपल्याला इंटरनेट सेवा पुरवणारे (BSNL, MTNL, Vodaphone, Airtel, TATA, etc.. ) ह्या कंपन्या आपल्याकडून इंटरनेट साठी सेवाशुल्क घेतात . (मर्यादित वापर साधाराण २५० प्रती महिना ) , आणि हेच पुरवठादार आपण काय सेवा (Facebook, Whatsapp, Instagram, Flipcart, Hike, etc..) , किती वापरणार हे ठरवू शकतात. उदा.. Airtel तुमचे Whatsapp चा वेग Hike पेक्षा इतका कमी ठेवेल कि तुम्ही Whatsapp वापरू शकणारच नाही , आणि Whatsapp साठी अतिरिक्त सेवाशुल्क भरावे लागेल. Vodaphone तुम्हाला Flipcart च्या ऐवजी Ebay वापरायला भाग पाडू शकते. पण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ह्या वर नियंत्रण ठेवून आहे. हे महत्वाचे आहे कि , सर्व वेबसाईट किंवा online Apps समानरीत्या उपलब्ध असली पाहिजे सर्व वेबसाईट किंवा online Apps साठी समान दर व वेग (per KB/MB) असला पाहिजे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने (TRAI) जर आभासी सेवा पुरवठादारांना( (Facebook, Whatsapp, etc..) इंटरनेट सेवा पुरावाठादारांचे परवाना दिल्यास ह्या कंपन्या आपण काय वारायाचे आणि किती वापरायचे हे ठरवू शकतात , आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. Whatsapp ची सेवा आपण घेतली असेल तर आपण कदाचित Hike किंवा Instagram वापरूच शकणार नाहे. थोडक्यात , > आभासी सेवा पुरवठादारांना इंटरनेट सेवा पुरावाठादारांचे परवाना देऊ नये. > Internet.org, Data VAS सारखे पर्याय , censorship असू नये. > फक्त काही ठराविक वेबसाईट किंवा online Apps ना प्राधान्य असू नये. अजून वेळ गेली नाही.. २४ एप्रिल २०१५ पर्यंत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला आपले मत ttp://www.savetheinternet.in किंवा for http://www.netneutrality.in/. अधिक माहितीसाठी ही चित्रफीत पहा youtube.com/watch?v=mfY1NKrzqi0

आयुष्य आणि छोट्या छोट्या गोष्टी..

👍: लाईक नाही केले तरी चालेल, पण जरूर वाचा. जिवनात खूप शिकायला मिळेल नक्कीच..

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं.

पण तासा भरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता.

त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय?

सुरक्षा रक्षक म्हणाला या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जिव वाचवेल

म्हणून नेहमी लक्षात ठेवा,

जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा मला नाही माहीत कधी पण तुमच्या आयुष्यात पण असाच एखादा चमत्कार निश्चित घडेल.