मनःशुध्दीसाठी

महाभारतातील ही गोष्ट आहे.
नक्की वाचा
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे ठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो.
तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले, "आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करुन सर्वांना खावयास दिले व म्हणाला, "प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले. कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करुनही कडूनिंबाची चव गोड झाली का ?" "कशी होईल ? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?" धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला, "तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल. परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध सदाचरणाशी, सदगुणांशी आहे.
बोध :
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा,
सत्त्वगुण यांनी सुस्नान व्हावे तीर्थस्नानांने नव्हे.
करा विचार !
नाहितर चला नाशिकला गोदाकाठी...!!.
🚩🙏

स्वातंत्र्यसमर आणि गृहस्ती.

लंडनमध्ये लॉर्ड कर्झन चा वध केल्यानंतर मदनलाल धिंग्रांनी त्याला वाचवायला आलेल्या लालकाका ला हि उडवले ...मदनलाल धिंग्रा ह्यांना पकडले व त्यांची स्थिर नाडी बघून पोलीसही चक्रावले ....ज्या एमा बेक ह्या मैत्रिणीने मदनलालना पार्टी ला बोलावले होते ती तर स्तंभित झाली होती ...
एवढ्यात आक्रोश करत कर्झनची पत्नी तिथे आली ...तिचा टाहो ऐकून सगळेच हेलावले ....
ह्या प्रसंगाचा वृत्तांत सांगण्यासाठी तिथे धिंग्रांचा अजून एक सहकारी तिथे उपस्थित होता संपूर्ण प्रसंग सांगता सांगता ...ह्या पत्नीच्या आक्रोशाचे वर्णन हा सहकारी आपल्या नेत्याला हसत हसत सांगू लागला ...ते कर्झनचे प्रेत ..ती छाती पिटणारी मड्डम वगैरे वगैरे ... ते खळखळणारे हसू ऐकताच सर्व वृत्तांत हाताची घडी घालून गंभीर पणे ऐकून घेणाऱ्या त्या नेत्याने आपल्या तीक्ष्ण नजरेने त्या ह्स्तकाकडे बघितले ... नापसंतीची एक पुसत रेषा त्यांच्या कपाळावर उमटली ...सर्व कथन संपल्यावर त्या हस्तकाला तिथून जायला सांगितले गेले ...तो तिथून पुरेसा दूर जाताच तो नेता उर्वरित सहकार्यांकडे बघून म्हणाला "ह्या माणसाला आत्तापासून आपल्या संघटनेतून बडतर्फ केले आहे ... एका विधवेच्या विलापात जो आनंद मानतो तो कधीही विश्वासपात्र नसतो ...कुणाच्याही मृत्यू चा विनोद होऊ शकत नाही...हा माणूस लौकरच काहीतरी घोळ करेल ..." आश्चर्य म्हणजे पुढे काहीच महिन्यात हा सहकारी एका सामान्य गुन्ह्यात अडकला आणि अतिशय लाजिरवाणी शिक्षा होऊन अब्रू घालवून बसला ...
बँरिस्टर विनायक दामोदर सावरकर आपले एक एक सहकारी पारखून घेत ते हे असे ...
जाता जाता : त्याच वेळी लंडन मध्ये शिकणाऱ्या एका दुसऱ्या बलिष्टराला त्याच्या भारतातील बलिष्टर पित्याने ह्या सगळ्या भानगडीत तू अजिबात पडू नकोस अशी तार ठोकली होती ...खुद्द मदनलाल ह्यांच्या पित्याने त्यांना disown केले होते ..
कधीतरी वाचलेले काय काय आठवत राहते मला ...
(-Abhijit Kaskhedikar
ह्यांच्या द्वारे फेसबूकवर प्रकाशित असल्याचे पाहिले व तुम्हा सोबत सामायिक केले.)

अस काही वाचल कि देशभक्ती जागी होते
हृदयाचे ठोके मोजण्यापलीकडे जातात
शरीराच्या रोमा रोमात रक्त उसळते ,
ह्य गद्दारांचा वध करायला मनगट शिवशिवतात
मग गृहस्थीच्या प्रेमळ शृंखला संसाराला जखडतात..

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

सभ्य स्त्री पुरुष हो,
बंधु हो, भगिनी हो,
मित्र हो, श्रोते हो, वाचकहो,

मी सांगणार आहे ते महत्वाचे असल्याचा मी दावा करणार नाही. पण माझ्या अनुभवातुन जे काही मी शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी घेणार आहे.

माझ्या साठी माझे पहिले शिक्षक म्हणजे माझे आई बाबा.
ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत किंवा घडतील, त्यांच श्रेय मी माझ्या आई बाबाना देतो. माझ्यावर जे काही चांगले संस्कार झाले आणि अजुनही होत आहेत, ते माझ्या आई बाबामुंळे.

शाळा मला नेहमी तुरुंगच वाटायची, 10 वर्षे वाट पाहिल्यावर शाळेच्या तुरुंगातुन सुटका झाली. पण शाळे बाहेरच्या जंगलात आल्यावर शाळाच उबदार वाटु लागली,
माझ्या बाबतीत तरी अभ्यासापेक्षा शिक्षेच्या आठवणी जास्त आहेत. शिक्षकानी घालुन दिलेली शिस्त कधी झेपलीच नाही. माझ बालमन खिडकीच्या बाहेरच जग शोधत असायच. तरी सुद्धा जी काही शिस्त किंवा बालमनाचा कोष सोडुन बाहेर यायला मदत झाली त्याच श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षकाना आहे.

कॉलेज आणि माझा संबंध, प्रवेशाचा पहिला आठवडा आणि परीक्षेच्या काळापुरता मर्यादित राहिला. अगदीच आर्थिक दंड किंवा पालकाना बोलवायची परीस्थिती आली तर नाईलाजाने कॉलेजात जाणे होई. तरी सुद्धा शिक्षकानी सांभाळुन घेतल. अवेळी विचित्र शंका किंवा प्रश्न असले तरी उत्तर समजावुन दिली. त्यामुळे निदान पदवी तर मिळाली.

अल्प अभ्यासाच्या काडीने पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता परीक्षा सुद्धा पार केली. MCA च्या शिक्षणाच्या वेळी शिक्षकानी मला सुधारण्याचा फार प्रयत्न केला, मी अभ्यासच केला नाही, थोड्या प्रयत्नानंतर मी सोडुन दिला MCA चा नाद. अर्थात मला पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करुन डॉक्टरेट करायची आहे आणि माझ्या पहिल्या शिक्षकांचा अर्थात आई बाबांचा अजुनही पाठिंबा आहे.

माझ्या सहधर्मचारणीच्या उल्लेखाशिवाय हे पुराण अपुर्ण राहिल असत, पत्नी ही गुरुस्थानी असु शकते हे लग्नानंतरच समजल. पुस्तक किंवा कुणी वयक्तिक अनुभवात हे सांगितल नव्हत! लोक लाजतात कि हे स्वत:च अनुभवयाच असते म्हणुन सांगत नाही?

माझ्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त विद्यालयीन नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षणाला परीक्षा चालुच असते. प्रत्येक अनुभव आणि माणुस माझे शिक्षक बनले आहेत.

प्रत्येक विद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी माझ्या पालकांची ओळख आणि पुण्याई कामी आली. ह्यात काही अतिशयोक्ती नाही,काही असेलच तर शिक्षकांचे न ऐकणे हा माझा नाकर्तेपणा म्हणता येईल.

पुस्तक वर्तमानपत्र जाहिराती चित्रपट आणि इतर दृश्य किंवा श्राव्य माध्यमानी सुद्धा खुप शिकवल आहे. इंटरनेटचा तर फार प्रभाव पडला आहे. माझ्या जवळ ज्ञानाची जी काही अल्प तुटपुंजी जमा आहे, त्यात इंटरनेटचा मोठा हिस्सा आहे.

तर अश्या ह्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझी जीवनयात्रा सुरु आहे.

हे जे काही तुम्ही वाचले ते तुमच्या पसंतीस आले नसल्यास, तो माझाच कमी पणा समजावा, मी शिक्षकांच्या सांगण्यानुसार वागण्यास कमी पडलो हाच अर्थ घ्यावा.
तुमचा फार वेळ घेतला असल्यास उदार मनाने क्षमा करावी
काही आवडले असल्यास जरुर कळवा, माझ्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा होईल.

आपला नम्र.
एक घडत असलेला विद्यार्थी.

On 27th July 2015.

So, on 27th July 2015.

Gurdaspur, Punjab was hit by secular terrorist attacks. Few dead, candle march has been arranged at your nearby popularity center.

Dr. APJ Abdul Kalam took his last breath while sharing wisdom & vision. People have forwarded messages which Kalam never said. Things Kalam said, might never be followed.

Peace Warrior Yakub Memon's death penalty's decision forwarded for opinion poll of judges. 257 souls waiting for decision since 22 years.

Animal Friend & Human Being Salman Khan's 12 years case final (never heard of this word before) hearing on 30th July. He may be set free or punished with minimal time in jail, he might be able to attend functions & cinema shootings.

Nothing #religious about it.

मराठीत बोला , मराठी वाचवा चळवळ.

मराठी नेत्यांच्या ताब्यात बहुतेक सगळी विद्यालय आणि शिक्षणसंस्थान आहेत. पण कारभार चालवणारे इंग्रजांचे वारसदार आहेत. इंग्रजी शिक्षणपद्धतीचे गुलाम आहेत, आणि प्रत्येक पिढी गुलामीचे बाळकडु घेउन पुढे सरकतात.. त्यामुळे मराठी बाणा व्यर्थच आहे.

ज्याना मराठी बाण्याचा अभिमान आहे त्यानी राजकारण अर्थकारण ह्या दोन गोष्टीत प्राविण्य मिळवुन शिक्षणसंस्था चालु कराव्या. मराठी माणसांच्या मराठी माणसानी मराठीच्या प्रचारासाठी चालवलेल्या शिक्षणसंस्था.
मग चळवळ करायची गरज पडणार नाही.

कपाळी टिळा व पांडुरंग हरि चा ट्रेंड -_-

सध्या व्हाट्सअप आणि फेसबूकवर खालील संदेश प्रसारित होत आहे.


उद्या आपल्या हिंदूंचा सण ....आषाढी एकादशी !!! ...कपाळी गुलाल लावा बुक्का लावा ....शाळेत असो वा ऑफिस मध्ये.... घरी असो कि सोसायटीत....रेल्वेत असो कि बस मध्ये असो कि बाईक वर .... जीन्स मध्ये असो कि थ्रीफोर्थ्स मध्ये...बॉयफ्रेंड असो कि गर्लफ्रेंड...सज्जन असो कि टपोरी असो ....जो हिंदू दिसेल त्याला उद्या "पांडुरंग हरि" "पांडुरंग हरि" म्हणूनच संबोधन करा ....नको ते "हाय हाय" "बाय बाय" "यो यो" किंवा आणखी काही !!! केवळ "पांडुरंग हरि" उद्या ट्रेंड बनवा "कपाळी टिळा व पांडुरंग हरि" चा !

----------------------

मी म्हणतो, रोज देवाच नाव घेतल तर जीभ बारीक होईल का तुमची?

आषाढी पुरता हिंदु?
अरे, रोज सण साजरे करा.
हिंदुत्वाचा जयजयकार करा.
गर्जु दे हिंदुत्वाची गगनभेदी ललकारी..

भित्र्यासारख एक दिवस बोलायच पांडुरंग हरी..
रोज लावणार का गुलाल बुक्का?
तुमच्या निधर्मी विदेशी ऑफिसात नाही चालणार ना?
उंदरा सारखे चोरुन सण साजरे करा.

रक्त उसळते असले ट्रेंडी धार्मिक पाहिले की,
म्यानातुन तलवारीच पात उसळते तस..

ईतर धर्मीय असले ट्रेंड ठेवतात का?

देवा धर्माच्या नावा खाली एक दिवस celibration ?
सेल्फी काढुन dp ठेवा.
फेसबूक वर लाईक्स मिळाले की तुम्ही परमार्थाला पोहचले कि,
मग असे ढोंगी सेल्फी टॉयलेट पेपरवर छापुन मी *** पुसेन

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

🚩🙏

मराठी माणुस आणि उद्योग

त्यापेक्षा मराठी तरुणाना बांधकाम व्यवसाय शिकवा.. मुंबईवर मराठी राज्य पाहिजे ना? सर्व व्यवसायात मराठी तरुणाना प्रशिक्षण आणि संधी द्या. शिवसेना , मनसे , स्वाभिमानचे नेते बांधकाम व्यवसायिक होते / आहेत.

मराठी माणुस बाकी समाजाइतका (मुंबईत स्वत:ची हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याइतका तरी) श्रीमंत झाला तर काय कुणाची बिशाद आहे बोट दाखवण्याची?

पण आपण चव्हाण कुटुंबियाना न्याय मिळवनु देताना मुख्य मुद्दाच सोडुन देतो आहोत.

ह्या वादात गुजराती/जैन नेते पुढे आले का?
त्याना माहिती आहे मराठी माणुस मोठ स्वप्न बघणार नाही, शेवटी आपल्याकडेच घर मागायला येईल.

आज मराठी बिल्डरने बांधलेल्या बिल्डींगमध्ये सगळीच मराठी माणस असती तर?

फार पुर्वी मुंबई चाळ आणि गरणी संस्कृतीची होती तेव्हाच सुरुवात करायला हवी होती.. चाळी आणि गिरण्याच्या जमिनी कुणाच्या ताब्यात कुणाच्या सहकार्याने गेल्या?  पण आपण लुंगीला विरोध करताना गेली 35-40 वर्षे फक्त वडापाव च्या गाड्याच टाकल्या.. दुसरे काही उद्योग शिकवले किंवा मदत मिळवुन दिली तर? गिरण्या बंद पडल्यामुळे वडापावाच्या नावाखाली रस्त्यावर आणण्यात आला मराठी माणुस. वडापाव विकण्यात कमीपणा नाही, पण फक्त वडापाव विकण्यात कोणती प्रगती आहे?
वडपावाचे पुरस्कर्ते नेते बिल्डर आणि मोठे व्यावसायिक  झाले ना? मग वडापावाच्या जोडीला बांधकामास पुरक धंद्यांच शिक्षण आणि मदत द्या मराठी तरुणाना.. तिथे असलेली परप्रांतियांचीच मक्तेदारी मोडुन काढा. महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांवर मराठी तरुणानी वर्चस्व मिळवले पाहिजे.

स्वाभिमान आणि स्वामिभक्ती मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे, पण लाचारांच्या फौजाच निवडणुकीत कामाला येतात. ब्रिटीश गेले पण फोडा आणि राज्य करा हेच शिकवुन गेले.  म्हणुन मराठी माणुस अश्या बातम्या पहातोय.