मुलींसाठी स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षण

मुलींसाठी मानसिक शारीरिक शिक्षण संरक्षण आणि प्रबोधनाची गरज सर्वात जास्त आहे. ५ रुपये किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी करण्यावर भर दिला गेला पाहिजे.
पॅड वापरण्याचे महत्व सांगताना मासिक धर्म हा विटाळ अपवित्र अस्वच्छ असे न सांगता नैसर्गिक आहे व मानवजातीसाठी महत्वाचे आहे हे सांगितले पाहिजे.
वयाच्या १२-१३व्या वर्षी तोंड लपवून बॉयफ्रेंड किंवा मॅनफ्रेंडबरोबर फिरणाऱ्या मुलींना लैंगिकतेचे व मानसिकतेचे भान आणुन देणे महत्वाचे आहे.
आज मुलींना पॅड्स दिले तर मुलांना कंडोम्स वाटावे लागतील अशी सध्याच्या पिढीची लैंगिक प्रगती आहे. १०वी पास होण्यापूर्वीच लैंगिकसंबंध नसणारी मुलीमध्ये दोष असल्याचे पसरवले जाते. पुर्वी लग्नाआधी संबध म्हणजे थ्रिल असायचे आता कॉलेजला जाण्याच्या आधीच उपभोग घेऊन झाला असतो. ह्यात उचवर्गीय मुलींचे शौक किंवा गरज पुर्ण होत असेल पण मध्यमवर्गीय किंवा गरीब मुलींचे आयुष्य उध्वस्त होते.

 बॉयफ्रेंड मॅनफ्रेंड किंवा एका पेक्षा जास्त लैंगिक संबंध असणाऱ्या मुलीसुद्धा आहेत्च ज्यांना थोड्याफार पैसे व भेटवस्तु (परफ्युम कपडे मोबाईल) चा मोह सोडवत नाही.

घरुन पूर्ण कपडे घालुन निघालेली शाळकरी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर गाडीवर शक्य तितक्या कमी कपड्यात शक्य तितक्या जवळ चिकटुन बसते.

शहरात दिवसाउजेडी जी शाळकरी जोडपी चिकटुन शारिरीक लगट करत असतात ते प्रेम असते कि वासना ? ही जोडपी दुसऱ्या शहरगावातली असतात, ह्याचे कारण म्हणजे पालकांनी बघणे नसुन दुसऱ्या गर्ल/बॉयफ्रेंडने बघितल्यावर ब्रेकप होणे हे आहे.

ह्या सर्वात लैंगिक संबंधांच्या फोटो विडीओचे काय ? वयात येताना नैसर्गिकरीत्या यौवनाचे आकर्षण असते. आपल्या लैंगिक भावनिक गरजा पुऱ्या करणाऱ्या व्यक्तिंवर विसंबुन फोटो विडीओ पाठवले जातात मग लैंगिक संबधांची विडीओच बनते. व्हाट्सप शेअरइट ने ते खाजगीत पसरवले जातात. ह्यातुन ब्लॅकमेल आणि वासनाकांड घडुन येतात. सुर्यनेली किंवा अजमेर प्रकरण तर इंटरनेटच्या आधीची आहेत.

xvideo debonairblog xossip आणि बाकी देशी वेबसाईटवर अशा मुलींची लाज उघड्यावर पाडली जाते. youtube facebook वरसुद्धा ह्या विडीओ फोटो येत आहेत. हे कुटुंबासमोर आले कि पुढे आत्महत्या , वेश्याव्यवसाय आणि एखादा आधार लाभला तर पुनर्वसन ह्यातुन जावे लागते.

मुलांना लैंगिक व सामाजिक जबाबदारी काय असते हे शिकवण्याची गरज आहे. आज त्यांच्यापुढे दारु सिगारेट पिउन हिरोगीरी करणाऱ्यांचा आदर्श आहे, आणि अशा हिरोंच्या अंगाखांद्यावर चिकटलेल्या अर्धनग्न स्त्रीयांची हाव आहे. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली माफ असेल तर पुढच्या पिढीकडून स्वैराचाराशिवाय दुसरी कसलीही अपेक्षा करु नका.

अजुन एक पैलू आहे , तो म्हणजे घरातल्या कुटुंबातल्या शेजारातल्या ओळखीतल्या वासनाअंध विकृतांचा. ह्यांच्यापासुन लहान मुले आणि मुली दोघांना वाचवायची गरज आहे. खेळायला घेऊन जायच्या नावाखाली बंद दरवाज्याआड हे विकृत अनैसर्गिक लैंगिक चाळे करतात. ज्याचा शारीरिक बलात्कार असतोच पण मानसिक आघात जास्त मोठा असतो. हे अत्याचार चुकीचे आहेत हे समजणेसुद्धा लहान मुलांना कठीण जाते. वयात आलेल्या मुलींवर अत्याचार करणारे सक्खे बापभाऊ असतात. मुलांवरसुद्धा अत्याचार होतात. तक्रार केल्यावर कुटुंबीयच पांघरूण घालतात कारण घराण्याची अब्रू.

मुलींना खरोखरच स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. बाकी अडचणी संकट त्या सहज पार करतील.

नर्मदेच्या निमित्ताने..

नर्मदेच्या निमित्ताने..


गेली १५ वर्षे संगणक आणि माहिती सेवा क्षेत्रात काम केले. ह्या क्षेत्रासाठी वीज हा सर्वात महत्वाचा घटक. संगणक आणि इंटरनेट अविरत सुरु रहाण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात वीज येते कुठुन ?

औष्णिक जलविद्युत किंवा अणुविद्युत प्रकल्पातून. हे स्त्रोत प्रदुषकारी किंवा उपलब्ध साधनसंपत्तीचा बळी घेणारे पण काही अनाकलनीय कारणांमुळे शासकीय आणि खाजगी उद्योजकांना सोयीचे आहेत. त्यामुळे पर्यायी वीजनिर्मिती प्रकल्प जसे सौर पवन किंवा जैविक कचरा विघटन ह्यातुन स्थिर प्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याचा अपप्रचार होतो. पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन वापरण्यासाठीही आपली तयारी नाही. आपला मुख्य मुद्दा आहे वीज आणि आपण त्याचाच विचार करु.

गेल्या ५ दशकात प्रवास वेगाने सुसूत्रतेने होऊ लागला. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वीजेशिवाय काम करु शकत नाही. विशेषत: जमिनीवरचा प्रवास रेल्वेने मोठ्या प्रमाणात होतो तिथे वीज आहे. उर्वरित जल आणि वायु प्रवास संगणकाशिवाय अपूर्ण आहे. ह्या प्रवासाचे नियंत्रण करणारे संगणक वीजेचा वापर करतात.

सध्या सोशल मिडीयाशिवाय जगु न शकणारी पिढी आहे. तिथेही अवाढव्य संगणक प्रणाली आहे जी विजेशिवाय बिनकामी आहे.

हे सर्व टाळले तरी जीवनावश्यक बनलेल्या वस्तु तयार करण्यासाठी असलेले कारखाने वीज वापरतात. आणि स्वतःचे सौर पवन किंवा पर्यावरणाचा संतुलन राखुन वीजनिर्मिती करणारे प्रकल्प नगण्यच.


गेल्या ३ दशकांपासून नर्मदेच्या पात्रातील टाहो आपण ऐकतो आहे. काही ऐकुन दुर्लक्ष करतात कारण नर्मेदेच्या परीसरातील वीज आसपासच्या औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरली जाते. संवेदनशील असलेल्या व्यक्ती निषेध नोंदवतात आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्ती पुढे सरसावतात. ह्यातही तात्पुरता विरोध करुन लाभ पदरात पाडुन घेणारे आहेत तसे संपूर्ण आयुष्य प्रकल्पातुन होणाऱ्या विनाशापासुन आसपासच्या लोकांना वाचवणारे आंदोलकही आहेत.


नर्मदेच्या प्रकल्पातुन होणाऱ्या वीजनिर्मितीचा लाभ तीन राज्यातील गोरगरीब जनतेला होईल. पाण्याची बचत होईल. वाळवंटी जमीन सुपीक होईल. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होईल अशी ग्वाही देण्यात आली.


प्रत्यक्षात लाखो प्रकल्पग्रस्त निर्वासित आणि बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत.


स्थानिक बातमीपत्रासाठी वृत्तसंकलन करताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता. Development at what cost ? कोणाचा बळी देऊन विकास होणार आहे?


नर्मदेच्या पात्रातील शेकडो पिढ्यांपासून शेती मच्छीमारी आणि इतर उदरनिर्वाह करणाऱ्यांना उठवुन अशा ठिकाणी जागा देण्यात येते कि तिथे नव्याने कसली सुरुवात करायची हा प्रश्न उभा रहावा.


नर्मदा प्रकल्पाचा लाभ उपटणाऱ्या औद्योगिक यंत्रणेत ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावुन घेता आले नसते ? इतके वर्षे काम सुरु होते प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक प्रशिक्षण सहज देता आले असते. पण २ पिढ्या फक्त जगण्याचा हक्क मागण्यात उद्ध्वस्त झाल्या.


काही हजार लोकांना रोजगार देणारी कोकाकोला कंपनी काही लाख लोकांपेक्षा मोठी कशी ? अशा हानीकारक वस्तु विकणाऱ्या ( पेप्सी कोकाकोला किंवा इतर फास्टफुड ) कंपन्या पाणी आणि शेतीमालाचा वापर करुन जे पदार्थ बनवतात ते आरोग्यास अपायकारक आहेत. ५ ते ६ माणसांसाठी पुरेसे असलेले अन्नघटक वापरल्यावर २ ते ३ माणसांसाठी फास्टफुड बनते.


एकीकडे लाखो लोकांना विस्थापित करायचे. उर्वरीत स्थानिकांना प्रकल्पातुन कोणतेही फायदे द्यायचे नाहीत. त्याचवेळी ज्यातून समाजात कोणतेही उपयुक्त पदार्थ देऊ शकत नाहीत अशा कंपन्यांचे लाड पुरवायचे हा विकास कसा ?


नर्मदा प्रकल्पाची वीज स्थानिक गावात न जाता औद्योगिक प्रकल्पात जाते. हे प्रकल्प करचोरी करण्यात सर्वात पुढे आहेत शिवाय नफ्याचा मोठा वाटा परदेशात जातो.


आपले बांधव बेघर उपाशी करुन आपणच परदेशात पैसा पाठवत आहोत. पोर्तुगीज आणि इंग्रज वेगळे काय करत होते?


तुम्ही प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन मोर्चा काडु शकत नाही, उपोषण करु शकत नाही, कायदेशीर लढा देऊ शकत नाहीत ?

निदान अशा प्रकल्पाच्या ठिकाणी जा. तिथल्या स्थानिकांना स्वतःचे शहरीकरण विसरुन भेटा. आपल्या देशाची लुट करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या वस्तुसेवांना विरोध करा. तिथे स्वदेशी कंपन्यांच्या वस्तु सेवांना प्राधान्य द्या. आज ह्या कंपन्या तंत्रज्ञान प्राथमिक यंत्रणा परदेशातुन आणत असतीलही , पण आपण पाठिंबा दिला , विदेशी वस्तु नाकारल्या तर शासकीय यंत्रणेला झुकावे लागेल.


आजच्या वेगवान आणि वेगवेगळ्या प्रकारे जोडल्या गेलेल्या जगात वीज आणि इतर गरजा वाढणार आहेत. त्यासाठी सुपीक जमीनीची नासाडी होऊन द्यायची ? अणुप्रकल्पारुन होणाऱ्या आण्विक गळतीचे दुष्परिणाम आपण आता अनुभव आहोत. एकेकाळी सुजलाम्सुफलाम् असणारा देश आज रासायनिक खते आणि परदेशी बियाणांच्या दुष्टचक्रात सापडला आहे.


आमचे पुर्वज संथ असतीलही पण पुढच्या पिढीसाठी विषारी तंत्रज्ञानाची पेरणी करत नव्हते.


अन्न बनवण्यासाठी लागणाऱ्या पीकपाण्यापासुन ते रासायनिक मारा असलेल्या तयार अन्नापर्यंत आपण पोखरलो गेलो आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी ॲलोपॅथीचा उपाय करत आहोत. जिथे रोगापेक्षा इलाज भयंकर होतो.


आयुर्वेद असो वा पारंपरिक शेती , आम्ही जमीन हवा पाणी ह्यांची जपणुक केली होती. वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासुराला आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम केले आहे.


आज आम्हाला गरज आहे ती संपूर्ण नैसर्गिक जीवनशैली आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणाची. एक संतती नियमाने २ ते ३ पिढ्यात लोकसंख्या निम्मी आणि सुदृढ होऊ शकते. मात्र आम्ही वाढत्या लोकसंख्येसाठी जंगले तोडुन घर आणि औद्योगिकीकरण करत आहोत.

गेली लाखो वर्षे मानवाला आश्रय देणारी पृथ्वी आता अपुरी पडते आहे म्हणून परग्रहांवर जायची तयारी सुरु आहे.

पण लोकसंख्येवर नियंत्रण आणु शकत नाहीत, कारण धर्म. धर्माचे अनुयायी जेवढे जास्त तितका धर्म मोठा आणि त्यातुन प्रभाव पडुन अधिक अनुयायी. हे चक्र गेले दोन सहस्त्रक सुरु आहे. त्यासाठी जास्तीतजास्त संतती जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. गर्भपात हा नैतिक अपराध ठरवला जातो. दोन सहस्त्रकांपुर्वी जेमतेम ४० कोटी असणाऱ्या जगाची लोकसंख्या आज जवळपास २० पट वाढली आहे. हीच लोकसंख्या १ अब्ज असती तर नैसर्गिक साधनसंपत्ती अजुन जास्त प्रमाणात टिकून राहिली असती. मात्र ऐहिक संपत्तीच्या हव्यासासाठी गरीबांचा उद्धार ह्या हेतुन विकासाची जबरदस्ती सुरु झाली.

एकीकडे हजारो घरे रिकामी असताना मोठ्या संखेने गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत. कोणासाठी ?


गेल्या दोन सहस्त्रकात प्लेग पोलिओ पासुन अनेक असाध्य विकारांवर आपण मात केली त्याच वेळी त्यापेक्षां मोठी पिळवणूक करणाऱ्या वैद्यकीय व्यवस्थेचा बाजार मांडला. मॅट्रिक्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे सध्याची व्यवस्था मानव जन्माला घालत नसुन उच्च स्तरावर असलेल्यांसाठी गुलाम जन्माला घालत आहे.


बघा , विचार करा, आपल्या गरजा व्यसन लोभ हाव हव्यास ह्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत ?

https://www.facebook.com/thevikrant/posts/10154996810703520

व्यापार परप्रांतीय आणि आपण

एक लक्षात घ्या.

एक पिशवी घेऊन आलेला परप्रांतीय एका खोलीत १०-१२ लोकांसोबत रहातो, दिवसातुन एकदा जेवतो

२-३ वर्षात भाड्याने स्वतंत्र खोली घेतो त्यात बायकापोरांना आणतो, त्यांच्या बायकासुद्धा छोटीमोठी लाम करायला सुरुवात करतात, ५-६ वर्षात ते स्वतःची खोली-ब्लॉक विकत घेतात.
साधा स्क्रू पिळु न शकणारा माणुस दिवसाला १५ तास काम करुन तंत्र शिकतो आणि २-३ वर्षात कंत्राटदार बनतो. ४ थी नापास असलेला परप्रांतीय वेल्डिंर  पेंटर कार्पेंटर मेकॅनिक बनून महिन्याला ५०-६० हजार कमावतो. त्यावर टॅक्स नाही.

मराठी माणसं काय करतात ?
 राजकारण्यांची वाट बघतात.. अरे ते करोडपती होतात, ५ वर्षात तुमची काय प्रगती होते ? भांडण मोर्चे आंदोलनात गेली तुमची ५ वर्षे.. सगळी सरकारी खाजगी कंत्राटी काम परप्रांतीय घेतात. मराठी कार्यकर्ते काय करतात ?

नेतेच जर तुम्हाला व्यवसायात पुढे आणत नसतील तर स्वतः करा नेतृत्व, तंत्रशिक्षण घ्या आणि पगाराच्या दहापट कमाई करा.

सरकारी नोकरीत मराठी टक्का कमी का ? परप्रांतीय काम करता करता शिकतात, १२ तास काम करणारा परप्रांतीय ८ तास पाठांतर करत असतो. एकदा नापास झाल्यावर ते जिद्द सोडत नाहीत. निवड होई पर्यंत परीक्षा देतात.
आमचे नेते अशा परीक्षांची पुस्तक आणि अभ्यास करण्यासाठी सुविधा प्रत्येक शाखा ऑफिसवर का देत नाहीत ? प्रत्येक वॉर्डात मतदारसंघात १० IAS IPS UPSC MPSC SSC Army त मराठी माणसं असायला पाहिजेत. प्रत्येक काम मराठी माणसांना मिळाल पाहिजे. आता काम घेतात आणि परप्रांतियांना देतात. कामाच्या निविदेवर मराठी माणुस असतो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी परप्रांतीय काम करत असतात.

धर्म का कशासाठी ?

💭 शनिच्या दगडावर महागडे लाखो लिटर तेल वाया जरी गेले तरी चालेल; पण हातावरचा चिमुटभर प्रसादाचा कण सुध्दा जमिनीवर पडला नाही पाहिजे...
🚩 : भाविक स्वतःच्या श्रद्धेने स्वतःच्या खर्चाने तेल वाहतात. त्याने त्यांना मानसिक उभारी येते. जगण्याची ताकद वाढते. तेल विकणारे व इतर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना चालना मिळते.
✋🏼इतर धर्मिय मेणबत्त्या किंवा काहीतरी लावतातच त्यांनी स्वतःपासुन सुरुवात करावी. नास्तिकांनी पेट्रोल डिझेल वीजेचा वापर करणारी वहाने वापरु नये. तेलापेक्षा जास्त महाग आहेत हे प्रकार.
💭 दलित आदिवासींची मुलं अन्न पाणी व  दुधावाचून कुपोषणाने मेली तरी चालतील; पण शंकराच्या दगडी पिंडींला लाखो लिटर दूधाने आंघोळ घालून धुतलेच पाहिजे..
✋🏼 दलित आदिवासी धर्म बदलुन मागास कसे राहिले ? कोणी काढल्या धर्मांतरासाठी मोहिमा ?
✋🏼  उपदेश करणाऱ्यांनी स्वतःच्या जेवणातले दोन घास बाजुला काढुन मग सांगावे. स्वतःच्या धर्मातल्या सणांमध्ये पार्ट्या नसतात का ?
✋🏼 नास्तिकांनी आपली व्यसने सोडुन उपदेश करावे.
💭 रेशनवर गरिबांना तांदूळ नाही मिळाले तरी चालतील; पण लग्न कार्यामध्ये अक्षता म्हणून हजारो टन तांदूळ उधळलेच पाहिजे.
✋🏼 एका हिंदु लग्नात  लग्नात जास्तीतजास्त ४-५ किलो तांदूळ अक्षतेसाठी वापरला जातो. म्हणजे १२० ते १६० रुपये. बाकिच्यांनी  आपल्या लग्नातल्या मांस आणि बाकि जेवणाचा खर्च ह्यावर विचार करावा.
💭 चपातीला तुप नसले तरी चालेल; पण गुजरात मधील मंदिरामध्ये पायाखाली लाखो लिटर घी तुडवलेच पाहिजे.
✋🏼 तुमच्या घरातले तुप काढुन नेत नाही. स्वतःच्या कष्टाने कमावलेले तुप आहे. तुम्ही गाय कापायला तयार असता , मग गायीपासुन मिळालेल्या तुपावर बोट दाखवु नका.
💭 मुलांच्या शाळेला फी भरायला पैसा नसला तरी चालेल; पण मंदिराच्या दानपेटी मार्फत ब्राह्मणांना करोडो रुपयांचा मलिदा महिन्याला  पोहोचलाच पाहिजे.
✋🏼 शाळांचा व्यवसाय करणारे धर्म कोणते आहेत हे स्वतःच तपासून बघावे. धार्मिक शाळांमध्ये फी न भरल्यास हाकलून देतात.
नोकरी व्यवसाय न करणारा फक्त मंदिरात पुजा करणारे श्रीमंत पुजारी कोणत्याही देवळात नाहीत. देवस्थानाचे व्यवस्थापक असतात. त्यांच्यावर सरकारी अधिकारी देखरेख ठेवतात आणि हिशोब सार्वजनिक होतात. बघा बाकि धर्म हिशोब देतात का.
💭 कुंभ मेळयात नागडया साधूंनी धुमाकूळ घातला तरी चालेल; पण आपल्या शिकलेल्या मुलींना, आया-बहिणी व सुनेला त्या नागडया साधूंचे आशिर्वाद मिळालेच पाहिजे.
✋🏼 आता बघा कि बाकि धर्मात लहान मुलांवर अत्याचार कोण करतात आणि ती प्रकरणे कशी लपवली जातात. तुमच्या लहान मुलांना विश्वासात घेउन विचारा कि धर्मगुरू काय करतात.
💭 हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल आया-बहिणीची ऊन्हातान्हात पायपीट झाली तरी चालेल; पण देवा धर्माच्या नावाखाली तलाव नद्या दूषित केलेच पाहिजेत.
✋🏼 प्रदूषण जगभर आहे. हिंदु अल्पसंख्यांक आहेत तिथल्या नद्या सर्वात जास्त प्रदूषित आहेत.
💭 शरीर अशक्त झाले तरी चालेल; पण दार आठवड्याचे उपवास केलेच पाहिजेत.
✋🏼 उपवासाने शरीर शुद्ध होते. विषारी घटक निघुन जातात. कुठल्याही चांगल्या डॉक्टरना विचारा.
💭 घराच्या चार भिंतीसाठी लाखाचे कर्ज काढले तरी चालेल; पण सुखशांतीसाठी सत्यनारायण घातलाच पाहिजे.
✋🏼 बघा कोणत्या धर्माची बांधकाम मोठी आहेत. सत्यनारायण पुजेत वेगवेगळ्या लोकांना रोजगार मिळतो.
💭 आया बहिणींची अब्रू लुटली गेली, हुंड्यासाठी छळ झाला तरी चालेल; पण आपण 'तिचे नशीबच फुटके' असे म्हणत शांत बसले पाहिजे.
✋🏼 अब्रू लुटणाऱ्या गुन्हेगारांचे नाव धर्म बघा. त्यांच्यावर कारवाई झाली कि अल्पसंख्याक खतरे मे.
💭 उच्च शिक्षण घेणारया व शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल; पण लग्न कार्यात तसेच सणासुदीला डिजे ढोल ताशे वाजलेच पाहिजेत.
✋🏼 डीजे संस्कृती कोणाची ? ढोलताशे डीजेपेक्षा सुसह्य आहेत.
💭 महाग खतबियाणं आणि पाणीपावसाला पारखा होऊन कर्जबाजारी झालेल्या  शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी चालेल; पण शेतकर्यांची सतत  फसवणूक करून पंचतारांकित हॉटेलात जेवणाऱ्या त्याच त्याच पक्ष नेत्यांना सतत निवडून दिलेच पाहिजे.
✋🏼 हे ७० वर्षे सुरु आहे. आणि हे नेते इतर धर्मांच्या कार्यक्रमांना तशा वेशभूषेत जातात. पण हिंदु वेशभूषा करत नाहीत.
💭 म्हातारे-कोतारे, आजारी-पाजारींना, तान्हया बाळांना आवाजाचा त्रास झाला तरी चालेल; पण दिवाळीत प्रदूषण वाढवणारे फटाके वाजलेच पाहिजेत.
✋🏼 फटाके संस्कृती कोणाची ? दिवाळीपेक्षा जास्त फटाके ३१ डिसेंबरला वाजतात. हिंदु संस्कृतीत दिवाळी म्हणजे अंधार दुर करणाऱ्या दिव्यांची आरास. त्यात मंगल वाद्ये आहेत. गोंगाट आणि कर्कश्शपणा नाही.
💭 ट्राफिक जाम होऊन देशाचे नुकसान झाले तरी चालेल; पण करोडो रुपयाची उधळण करणारे गणेशोत्सवाचे मांडव रस्त्यावर लागलेच पाहिजेत. गरबाही झालाच पाहिजे.
✋🏼 रस्त्यावर गणेशोत्सव मांडव आठवडाभर असतात. त्यातही आता घट होते आहे. बाकी धर्म वर्षभर रस्त्यावर प्रार्थना करतात.
💭 तरूण मुले विविध नशा करून बिघडली तरी चालेल; पण उत्सवी मिरवणुकीत व  निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत मुले नाचायला पाठवलीच पाहिजेत.
✋🏼 दारुची दुकाने कोणाची आहेत ? दारु पिणारे १ जानेवारीला सर्वात जास्त दिसुन येतात. दारुच्या सवयी कोणी लावल्या ? गेली ७० वर्षे दारु कोणी वाटली निवडणुकांमध्ये ?
💭 जातीपाती मध्ये विभाजित राहून एकमेकांचे जीव घेतले तरी चालेल; पण स्वार्थी नेत्यांपुढे व पाखंडी धर्ममार्तंडांपुढे झुकलेच पाहिजे.
✋🏼 सर्व धर्मात पंथ आहेत. आणि धर्मगुरूंचे एकमेकांशी वैर आहे. हिंदु धर्मात कोणत्याही जातीचा मनुष्य किंवा स्त्री देवळात पुजारी बनुन पवित्र स्थानी पुजा करु शकतो. इतर धर्मात स्त्रीयांना पवित्र स्थानी स्पर्श करायची परवानगी नाही. सर्वोच्च स्थानी आजपर्यंत स्त्री , कृष्णवर्णीय किंवा इतर रंगाच्या लोकांना स्थान नाही.
💭 केव्हा थांबणार हे ? बस झाली स्वत:चीच फसवणूक करून घेणे. अंधश्रद्धा बागळणे थांबवा. सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनो, आपण विकृत प्रथांना तिलांजली दिलीच पाहिजे. सक्षम देश उभारणीसाठी आता प्राणपणाने लढा उभारलाच पाहिजे... लढा उभारलाच पाहिजे .
✋🏼 हिंदु धर्म हा विशाल संस्कृतीतुन आला आहे. जिथे इतर रीतीरीवाज स्विकारले जातात. अन्यायकारक रीतीरीवाजांवर चर्चा लढा होऊन ते रीवाज बंद होतात. बाकी धर्मात चर्चा करणे पाप आहे. हिंदु धर्मात वैज्ञानिक तत्वे जसे सुर्य पृथ्वी भ्रमण, टेक्टॉनिक प्लेट्स (सात फण्यांवरील पृष्ठभाग) अणु , रसायन भौतिक जीवशास्त्र ह्यांचा अभ्यास आहे.  बाकी धर्मात पृथ्वी स्थिर सपाट आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
--
अंधश्रध्दा मुक्त परिवार , सुखी परिवार.
 ✋🏼
 अंधश्रद्धानिर्मूलनासाठी आम्ही देणग्या स्वीकारतो आणि हिंदु धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो मग कितीही धर्मांतर झाले तरी आम्ही त्या धर्माचे नाव घेत नाही. एकीकडे आम्हाला चमत्कार मान्य नाहीत म्हणून आम्ही हिंदु धर्मातील संतांवर आणि कथांवर टीका करतो, दुसरीकडे बाकी धर्मांच्या प्रमाणित ग्रंथांवर एक शब्द बोलत नाही.
-

विष

इथे माणसच कालवतात
विष माणसाच्या मनात,
सैतानच बसल्यात
धर्माच्या दुकानात

मी मोठा
माझा धर्म मोठा,
माणसांना अपुरा
जनावरांचा गोठा

कुणी झाले पिता,
कोणी झाले गुरु ,
धर्माचा मांडला बाजार,
लिलाव झाले सुरु

धर्माची चिन्ह बनल्यात
जिवनाची ओळख,
दिव्यांच्या उजेडात
मेणबत्यांच्या प्रकाशात
लपलाय पापांचा काळोख

काळिमा फासलाय गर्वाने
हजारो वर्षांच्या शिकवणुकीला,
वर्चस्वाच्या कर्माने
धर्मगंडांच्या मिरवणुकीला

https://fb.com/vichrant

सार्वजनिक गणेशोत्सव आणि पर्यावरण

श्री गणेशाच्या मुर्त्या gst मुळे महाग झाल्याची बोंबाबोंब निधर्मी पत्रकार आणि सर्वधर्मसमभाववाले विद्वान करत आहेत.
मुर्त्या २५ ते ४०% महाग झाल्याची आकडेवारी दिली जात आहे.

प्रत्यक्षात शाडुची माती आणि नैसर्गिक रंगांवर gst नाही. ऑईल पेंट , पीओपी आणि बाकी सजावटीसाठी gst आहे.

दरवर्षी १५ ते २५% दरवाढ होतेच आहे ह्याचे कारण म्हणजे कारागीरांचे मानधन. जिथे पगारादार २० ते ३०% पगारवाढ करवुन घेतात तिथे गणेशमुर्तीकारांचे मानधन का वाढु नये. इतर खर्च म्हणजे ऑईल पेंट व तत्सम सजावट.

*पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव असेल तर कुठेही gst चा प्रभाव नाही.*

जिथे पीओपीची मोठी टिकाऊ दिखाऊ मुर्ती ऑईल पेंट थर्माकोल आणि प्लॅस्टिकच्या सजावटीने आहे तिथेच gst लागू आहे.

सणांचे व्यापारीकरण करणार तर त्यावर कर लागू शकतो. पारंपरिक नैसर्गिक मुर्ती व सजावट असेल तर पावित्र्य असेल आणि बचतसुद्धा होईल. ती रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरता येईल.

गणेशोत्सव सजावटीसाठी थर्माकोल किंवा प्लॅस्टिक न वापरता आयुर्वेदीक वनस्पती, देशी फळ फुलझाडे ह्यांचा वापर करता येईल. येणाऱ्या भाविकांना रोप देता येतील जी घरात लावता येतील. त्यानिमित्ताने श्री गणेशाचे सदोदित स्मरण राहिल.

ठणठणात करणारा dj , डोळे दिपवणारे disco lights , ह्यापेक्षा निसर्गरम्य मंडप , पारंपरिक वाद्ये ह्यांच्यामुळे बचत होईल, भाविकांना समाधान लाभेल.

अर्थात दिखावा करणाऱ्यांना हे पटणार नाही. आमचा पैसा आहे आणि आम्ही पाहिजे तसा वापरु असे सांगणारे कमी नाहीत. मग विसर्जनानंतर दिसणारे गणेशमुर्तीचे अवशेष पहावत नाहीत आणि सणांचा व्यापार करणारे ते पहायलाही जात नाहीत.

निर्णय तुमचा आहे. स्वतःपासुन सुरुवात करा. गणेशोत्सवास भेट देताना शाडुची मुर्ती आणि नैसर्गिक सजावट ह्यांचा आग्रह करा. गणेशोत्सव मंडळाला देणगी देताना ती देणगी सामाजिक कार्यासाठी वापरली जात असल्याचे निश्चित करा. कार्यकर्त्यांनी आपला वेळ भक्तिभावाने दिला असतो, त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हा आणि शक्य तिथे आर्थिक सहयोग करा. मिरवणुकीत किंवा मंडपात दारू गुटखा तंबाखू मोठ्या आवाजात dj असल्यास  जुगार किंवा इतर अपप्रकार असल्यास पोलिस किंवा सामाजिक संस्थाना तक्रार करा. ह्या प्रकारांमुळे सर्वात जास्त बदनामी होते. इतर धर्म लाऊड स्पीकर वापरत असतील तर त्यांच्या तक्रारी नंतर करा. आधी आपल्या सणांमध्ये विदेशी संस्कृती आहे ती बाहेर काढा.
 सार्वजनिक गणेशोत्सवाचे ह्यापेक्षा मोठे यश नसेल.

भीमा-कोरेगावचं वास्तव

आता १ जानेवारी निमित्त "भीमा-कोरेगावच्या" पोस्ट्स पडतील. पण आपल्या माणसांना पारकीयांचा राज्य करण्याच्या हेतूने आपल्यातच भांडणं लावून देण्याचा कआवा कधीच समजला नाही असं दिसतंय.. भीमा-कोरेगावचं वास्तव काही वेगळं आहे पण इंग्रजांनी राज्य करण्याच्या हेतूने "फोडा आणि राज्य करा" ही नीति अवलंबली आणि आपली माणसं अकारण बळी पाडली. वास्तविक याला "महार विरुद्ध ब्राह्मण" हे लेबल नंतर चिकटवण्यात आले. वास्तविक, ही मनस्थिती तत्काळी कोणाचिही नव्हती. दुसर्या बाजीरावांच्या काळात महार समाजाला सरंजाम सुद्धा दिल्याचा एक उल्लेख त्यांच्याच रोजनिशीत सापडतो. शिवाय, मराठी फौजेत "अरब" होते बहुतांशी. शिवाय '५०० महारांनी २५००० ब्राह्मणांचा केलेला पराभव' वगैरे अतिशयोक्ती तर हास्यास्पद आहे, कारण मूळात, मराठी फौजेत मूठभर ब्राह्मण वगळता बहुतांशी अब्राह्मण होते, त्यामूळे हा दावाही फोल ठरतो. इंग्रजांना चार वर्षानंतर केवळ येथे हा 'तथाकथित जयस्तंभ' उभारावा लागतो यातच सारे स्पष्ट होते. पण ना इथल्या ब्राह्मणांना हे कधी समजले ना ब्राह्मण विरोधकांना ! दोघेही इंग्रजांच्या या अपप्रचाराचे बळी पडले. "भीमा-कोरेगाव" ची लढाई इंग्रजांनी मुळात "जिंकली" नसून 'इंग्रजांना इतके मारले, आता आणखी काय करणार' म्हणून मराठी फौजा दक्षिणेकडे वळल्या, पण याअलाच चार वर्षानंतर इंग्रज "आमचा विजय झाला" असं समजतात, समजो बापडे, आपल्याला काय.. पण भीमा कोरेगावचे वास्तव काय आहे ? आपण गैरसमजातून आपल्याच समाजात दुही पसरवतोय का ? पाहुया-
================================================
भीमा-कोरेगाव : विजयाची कहाणी


दि. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळ कोरेगाव येथे झालेल्या तिसर्या इंग्रज-मराठा युद्धातील एका चकमकीत इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला खरा, पण इंग्रजांनी “झाकली मूठ सव्वा लाखाची” या उक्तीनुसार जगासमोर आम्ही जिंकलो अशी हूल उठवली आणि त्यातही, इथल्या जाती-पातींमध्ये भांडणे लावून द्यायला ‘महार रेजिमेंट’ विरुद्ध ‘पेशवा’ वगैरे किनार या वादाला मुद्दाम जोडून दिली. वास्तविक पाहता, तत्कालीन पुरावे अभ्यासल्यास, या युद्धात इंग्रजी फौजांची अक्षरशः लांडगेतोड मराठी फौजांनी केली असून या फौजांच्या मदतीला येणार्या दुसर्या इंग्रजी फौजांनाही सतावून सोडले होते हे आपल्याला सहज लक्षात येईल. काय आहे ही कोरेगावची मराठ्यांना अभिमानास्पद असलेली लढाई ?
येरवड्याच्या लढाईनंतर दुसरे बाजीरावसाहेब एकदम दक्षिणेकडे वळले आणि त्यांनी वर्तुळाकार पलायन सुरु केले. इंग्रजांना बाजीराव ‘पळत आहेत’ असे वाटणे स्वाभाविक होते, पण हा ‘गनिमीकावा’ काही इंग्रजांच्या लक्षात आला नाही, आणि आला तेव्हा मात्र बराच उशीर झालेला होता. येरवड्यानंतर मराठी फौजा या पुरंदर-माहुली करत पुसेसावळीला येऊन पोहोचल्या. माहुलीला पेशव्यांना सरलष्कर अप्पा देसाई निपाणकर येऊन मिळाले. पुसेसावाळीहून मिरजमार्गे बाजीराव दक्षिणेकडे न जाता थेट पूर्वेकडे पंढरपूरच्या रोखाने वळले. इंग्रजांच्या फौजा, अजूनही बाजीराव दक्षिणेच्या रोखाने जात आहेत असे वाटून पुसेसावळीत आल्या तेव्हा त्यांना बाजीरावांनी आपल्याला चकवले हे त्यांच्या ध्यानात आले. पुढे या इंग्रजी फौजा पंढरपुरच्या रोखाने येत असताना सेनापती बापू गोखल्यांच्या सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. बाजीरावसाहेब पुढे येथून नगर जिल्ह्यातील पीरगाव आणि तेथून नाशिकच्या दिशेने वळले. बाजीरावसाहेबांच्या या हालचाली इतक्या जलदगतीने केलेल्या आहेत की इंग्रजी फौजांना आता बाजीरावांचा पाठलाग करणे अशक्य होऊ लागले. मराठयांचा “गनिमीकावा” काय असतो याची ब्रिगेडीअर जनरल स्मिथला खात्री पटून तो मोठा तोफखाना सोबत नेण्यामूळे कंटाळला आणि नाशिककडे जाण्याचा नाद सोडून तो शिरूरला पोहोचला. तेथे त्याने आपला तोफखाना मागे ठेवून सड्या फौजेनिशी प्रवरा नदीच्या काठी संगमनेरला येऊन पोहोचला.
आतापर्यंत स्मिथची अशी समजूत होती की बाजीराव नाशिकला गेले आहेत. पण संगमनेरवरून बाजीरावसाहेब त्रिंबकजी डेंगळ्यांच्या सोबत थेट डाविकडे वळून ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून थेट पुण्याकडे वळले हे ऐकताच स्मिथ अगदी रडकुंडीला आला. बाजीराव स्मिथला झुकांड्या देत दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पुण्याजवळ चाकण येथे जाऊन पोहोचले. येथून पुणे आता अगदी जवळ, म्हणजे जेमतेम आठ कोस (साधारणतः २५ किमी) होते. १८ नोव्हेंबरला पुणे सोडल्यापासून सुमारे दीड महिन्याच्या अवधीत पुरंदर, सालप्याचा घाट, माहुली, पुसेसावळी, मिरज, पंढरपूर, पीरगाव, संगमनेर, ओझर, जुन्नर, खेड आणि चाकण करत बाजीराव पुन्हा पुण्याजवळच आले आणि आपल्याला गोल फिरवून दमण्याचा बाजीरावांचा “गनिमीकावा” इंग्रजांच्या चांगलाच लक्षात आला. गेल्या दीड महिन्यात दहा-बारा ठिकाणच्या मुक्कामात आणि सुमारे दोनशे कोसांच्या प्रवासात स्मिथला बाजीरावांचे नखही दिसले नाही, यावरूनच या सार्या रणनीतीचे यश स्पष्ट होते. ही तर इंग्रजांना नामुष्कीची गोष्ट होतीच, पण त्याहूनही नामुष्कीची गोष्ट असही, की ज्या पेशव्यांना इंग्रजांनी पुण्यातून पळवून लावले असा डंका ते पिटत होते ते पेशवे इंग्रजांनाच मूर्खात काढून अगदी सहज दीड महिन्यात पुन्हा फिरून पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते. म्हणजे गोर्यांचा सारा खटाटोप गेला की फुकटच. दीड महिना इंग्रजी सैन्य बाजीराव हाती लागतील या आशेने उगाच रानोमाळ फिरत राहीले. बाजीरावांनी या सगळ्या खेळात एक अशी चाल खेळली होती की सैन्याच्या मागे लहान तुकड्या इंग्रजांच्या नजरेस पडतील अशा पद्धतीने मुद्दाम रेंगाळत राहत, आणि बाजीराव गेले त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने हळूहळू सरकत. साहजिक, इंग्रजांना बाजीरावही याच वाटेने पुढे गेले आहेत असे वाटे आणि दुसर्या वाटेने पेशवे बरेच पुढे गेले याची खात्री पटताच मागे असणार्या या तुकड्या जंगलात हळूच काढता पाय घेत. मग मात्र इंग्रज सेनाधिकारी विचार करण्या शिवाय काहीकरू शकत नसत.
बाजीराव चाकणला पोहोचले तेव्हा कर्नल बर या नावाचा अधिकारी पुण्याच्या इंग्रजी तुकडीचा प्रमुख होता. त्याने स्मिथचा पत्ता नाही आणि बाजीराव तर आता केव्हाही पुण्यावर हल्ला चढवू शकतात हे पाहताच काहीतरी मदत मिळावी असं म्हणून शिरूरला कॅप्टन स्टाँटनकडे मदत मागितली. शिरूरच्या, पाचशे बंदुका, दोन तोफांसह पंचवीस गोरे गोलंदाज, आणि तीनशे मराठी लोक असणार्या या पलटणीला “सेकंड ग्रेनेडीअर अथवा सेकंड बटालिअन” असे म्हणत. बरचा निरोप आल्यावर स्टाँटन ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता शिरूरहून निघाला आणि दि. १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी १० वाजता कोरेगाव नजिकच्या एका टेकडीवर जाऊन पोहोचला. अर्थात, आपण आत्ता पुणे घेतले तर पुन्हा अडकू हे माहित असल्याने बाजीरावांनी पुण्याला वळसा घालून येणार्या स्टाँटनला मराठी हिसका दाखवत, वाट मोकळी करून पुन्हा दक्षिणेकडे जाण्याचे ठरवले. स्टाँटनला याची काहीच खबरबात नव्हती. १ तारखेला सकाळी तो टेकडीवरून खाली पाहतो तर भीमा नदीच्या खोर्यात त्याला पेशव्यांची प्रचंड फौज दिसली. एवढ्या मोठ्या सैन्यापासून आता आपला काही बचाव होत नाही हे पाहताच स्टाँटन आपली पलटण घेऊन जवळच असणार्या कोरेगावात शिरला. इंग्रज गावात शिरत आहे हे पाहताच त्यांना मारण्यासाठी आणि मुख्यतः त्यांची गळचेपी करण्यासाठी मराठी फौजेच्या एका तुकडीनेही इंग्रजांवर चालून घेतले. कोरेगावला चारही बाजूंना तटबंदी होती. येथेजास्त वेळ काढणे उपयोगी नाही म्हणून केवळ तीन हजारांची एक तुकडी मागे ठेवून पेशवे सोलापूरच्या रोखाने निघून गेले.
इंग्रज रात्रभरच्या प्रवासाने दमलेले होते, अशातच सकाळी सकाळी युद्धाचा प्रसंग उभा ठाकला. इंग्रजी तोफा आधी भीमेच्या रोखाने वाळवंटात उभ्या होत्या पण मराठे दुसर्याच्य बाजूने हल्ला करू लागले हे पाहताच इंग्रजांनी नाईलाजाने त्या तोफा तटबंदीच्या आत घेतल्या आणि मार्याच्या ठिकाणी बसवल्या. इंग्रजांचे पाणी मराठ्यांनी तोडले होते. भीमेवर मराठी चौक्या बसल्या असल्याने इंग्रजी सैन्याला पाण्याची वानवा होती. अशातच, पेशव्यांच्या फौजेतील अरबांनी इंग्रजांवर चालून घेतले आणि त्यांची एक तोफ बंद पाडली. या तोफेवरील इंग्रज अधिकारी लेफ्टनंट चिशोम याला ठार मारण्यात आले आणि विजयाप्रित्यर्थ त्याचे मस्तक पेशव्यांकडे पाठवण्यात आले. इंग्रजांकडील लेफ्टनंट स्वाँस्टन, लेफ्टनंट कोनलन आणि असिस्टंट सार्जंट विंगेट यांना जबरदस्त जखमा झाल्या. विंगेटला गावातील एका धर्मशाळेत हलवण्यात आले असता अचानक मराठी फौजांनी ती धर्मशाळा काबिज केली आणि विंगेटलाही ठार केले. एवढ्यात इतर काही इंग्रज अधिकारी तेथे आल्याने बाकीचे दोघे अधिकारी वाचले आणि मराठ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याशिवाय गावात एक मोठी मजबूत गढी होती. इंग्रजांची नजर तीच्यावर पडण्याआधीच मराठी फौजांनी ती गढी काबीज केली. आता येथून इंग्रजी फौजांना मारणे चांगलेच शक्य होते. मराठे मोक्याच्या जागी पोहोचले हे पाहताच इंग्रजांची पाचावर धारण बसली.
इकडे रात्र झाली आणि दिवसभरात पेशवे लांबच्या मजला मारत खूप पुढे निघूलन गेले हे पाहताच मराठी फौजांनी आपले काम झाले असे समजून हळूच काढता पाय घेण्याचे ठरवले, कारण पुन्हा स्मिथच्या फौजा कोरेगावनजिक आल्या तर आपण आतच अडकू त्यामूळे तसंही इंग्रज मोडले आहेत, येथून गेलेले बरे असा विचार करून मराठी फौजा रात्री नऊच्या सुमारास गावातून बाहेर पडल्या आणि त्या भीमा ओलांडून गेल्याची खात्री होताच इंग्रजी पलटण चक्क भीमेकडे पाण्यासाठी धावत सुटली. दिवसभर मराठ्यांनी इंग्रजांचे पाणी तोडले होते. अशा रीतीने कॅप्टन स्टाँटनचा पूर्ण पराभव करून मराठी फौजा लोणीमुक्कामी आल्या. इकडे स्टाँटनची मराठ्यांनी ही गत केली हे स्मिथला आणि बरला माहीतही नव्हते. संगमनेरहून निघाल्यानंतर ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या माणसांनी स्मिथची अक्षरशः लांडगेतोड करवली होती आणि तो कसाबसा दि. २ जानेवारी रोजी चाकणला येऊन पोहोचला. स्टाँटनचाही पूर्ण पराभव झाल्याने तो पुण्याला बरच्या मदतीला जाणे शक्यच नव्हते, म्हणून तो २ जानेवारी रोजी रात्री पुन्हा शिरूरला निघाला. या लढाईत इंग्रजांकडील तीनशे तर मराठी फौजेतील सुमारे पाचशे लोक पडले, पण यातही इंग्रजांचे २ नामांकीत सरदार मारले गेले. समकालीन इंग्रज अधिकारी आणि पुढे सातार्याचा रेसिडेंट ग्रँट डफ इंग्रजांच्या झालेल्या नुकसानीबद्दल म्हणतो, “त्या लढाईत इंग्लिशांचे मेले व जखमी मिळून एकशे छप्पन शिपाई व वीस गोरे गोलंदाज पडले. इतके होऊन तो उरातून दोन गोळ्या पार झालेला पॅटीसन साहेब आपल्या तळाअवर पोहोचल्यानंतर मेला. त्याशिवाय दुसरे दोघे साहेब त्या लढाईत मृत्यू पावले व दोन जखमी झाले. आणि नवे ठेवलेले मराठे तीनशे त्यापैकी दीडशे उरले वरकड काही मेले व कित्येक जखमी झाले व काही पळाले. मराठ्यांचे सुमारे पाच साहाशे पडले”
रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१ कोरेगावसंबंधी काही बातमीपत्रे प्रसिद्ध केली आहे. त्यातील मजकूर असा- “१ स्वारी श्रीमंत माहाराजाची (पेशव्यांची) राजेवाडी जेजुरीनजिक आहे तेथे आली. चाकणचे ठाणे राजश्री त्र्यंबकजी डेंगले यांणी घेतले. ताम्रमुख (इंग्रज) यांजकडील आत लोक होते ते कापून काढिले. स्वारी ब्राह्मणवाड्याचे घाटातून निघोन फुलगाव आपटीचा मु॥ आहे. नंतर गुरुवारी कूच होऊन फुलगावापुढे तीन कोश कोरेगाव आहे तेथे फौजा गेल्या, तो तेथे इंग्रजांकडील दीड पलटण व तोफा आल्या. नंतर त्याणी तोफ डागली. तेव्हा सरकारफौजेनी चालून घेतले. ते गावात सिरले. फौजाही बेलासिक गावात सिरून दीड पलटण व तीनशे तुरुप स्वार कापून काढीले. त्यात जो खासा होता त्याचे डोसके मारीले”. दुसर्या बातमीपत्रात “गोखले, रास्ते वगैरे पायउतारा होऊन पारपत्य केले. त्याजपैकी येक तोफ व दोनशे लोक कोरेगावचे वाड्यात सिरले ते मात्र राहीले. येक तोफ व येक पलटण कापून काढिले”. यानंतर इंग्रज जवळपास बुडाल्यात जमा आहेत हे पाहताच मराठी फौजा मागे फिरल्या.
इंग्रजांनी मात्र या वेळी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण मूळात पेशव्यांनी दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्रजांना कोरेगावात डांबून ठेवण्याची ही युक्ती केली होती हे काही त्या बिचार्यांना समजले नाही. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीरावसाहेब बापू गोखल्यांना स्पष्ट म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”. ‘ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले’ असं स्पष्ट नमूद आहे.
एकूणच, इंग्रजांचे सुमारे पावणे तीनशेच्या आसपास लोक पडले आणि मराठ्यांचे पाचशेच्या आसपास पडले. कोरेगावात मराठी फौजांचा निःसंशय विजय झाला, पण नंतरच्या काळात, योगायोगाने पेशव्यांचा पाडाव झाल्याने इंग्रजांनी खुशाल ‘आमचाच जय झाला’ अशी थाप ठोकून दिली. १८२२ मध्ये मराठी राज्य बुडाल्यानंतर इंग्रजांनी भीमेच्या काठावर चक्क विजयस्तंभ उभारला अन् त्यावर लिहीले, One of the proudest triumphs of the british army in the east ! म्हणजे ‘गीरे तो भी टांग उपर’ यातली गत ही. शिवरामपंत परांजपे यांनी चपखल शब्दात ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’ मध्ये याचे वर्षन केले आहे- “ब्रिटीश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे !”
इंग्रजांनी उभारलेल्या विजयस्तंभावरील इंग्रजी आणि मराठी मजकुरातही प्रचंड तफावत आहे. इंग्रजी मजकुरातून त्यांची परिस्थिती वास्तविक किती बिकट होती हे उघड उघड दिसते, पण मराठी मजकुरात इथल्या लोकांना सहज वाचता येईल म्हणून शक्य तितके आपल्या बाजूने लिहीण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रथम इंग्रजी मजकूराचा मराठी सारांश पाहूया-
“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अॅँड कर्नल लेवलीन स्कॉट, कलकत्ता” असे लिहीले आहे.
आता याच स्तंभावरील मराठी मजकूर पाहू-
“कप्तान स्थान्तनसाहेबाच्या स्वाधीन मुंबई सर्कार्च्या पळटणचे लोक ५०० व स्वार २५० व तोफखान्याचीं मनुष्ये २५ व तोफा २ होत्या त्याजवर सन इसवी १८१८ ज्यानेवारी तारीख १ शके १७३९ मार्गशीर्ष वद्य ९ गुरुवार ते दिवसी कोरेगावच्या मुकामी पेशव्यांच्या सारे फौजेने चालन येऊन घेरा दिला आणि आरब व दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यांनी मोठ्या चढायावर चढाया केल्या अस्तां पेशव्यांच्या फौजेचा मोड करून इंग्रेजी लोकांनी जय मेळविला. ही कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारीला आहे. यावर या वीरांचा पराक्रम व सर्कार्चाकरी विषई प्राणास उदार जाले हा लोकीक बहुत काळ राहावा यास्तव त्यांच्या पळटणाचीं व लढाईत पडले व जखमी जाहाले यांची नावे इंग्रेजी सर्कार्ची आज्ञा होऊन या जयस्तंभावर दुसर्या अंगास लिहीली आहेत. सन इसवी १८२२, शके १७४३”
समकालीन मराठी साधने जे सांगतात त्याच्या नेमके उलटे चित्र इंग्रजांनी चार वर्षानंतर, जेव्हा त्यांना अडवायला येथे कोणीही नव्हते तेव्हा उभारले आहे. अर्थात, साधा प्रश्न एवढाच, की स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या मदतीला गेला ना पेशव्यांच्या पाठलागावर गेला. असो, बहुत काय लिहीणे ? आपल्याच जातीजातींमध्ये फूट पाडण्याची ही नीति आम्हांला तेव्हा तरी कळली नाही.
कारण, इंग्रजांनी जेव्हा पेशव्यांना बंडखोर ठरवले आणि राज्य घेतले तेव्हा इथल्या लोकांच्या मनातून ‘पेशव्यांची’ प्रतिमा जोवर मलिन होत नाही तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना पक्के समजून चूकले होते. बंडखोर ठरवूनही आणि पेशवे पदावरून दूर करवूनही बाजीराव चार महिने इंग्रजांशी लढत होते आणि माल्कम त्यांच्या पाठलागावर जंगल तुडवत होता यातच इंग्रजांना पेशव्यांची किती धास्ती होती हे समजून येते. म्हणूनच, ३जून १८१८ ला बाजीरावांकडून शरणागती लिहून घेतल्यावर माल्कमने त्यांना शक्य तितके महाराष्ट्रापासून दूर ठेवले, जेणेकरून इथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत. यासोबतच इथाल्या माणसांच्या मनात ‘ब्राह्मण-अब्राह्मण’ हा संघर्ष पेटवून इंग्रजांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले आणि त्याकरीता मुद्दाम पेशवाईत ब्राह्मणेतरांवर किती अन्याय झाला अशा अर्थाने कथा पसरवून दिल्या. इंग्रजी अमदानीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाले हे उघड आणि सर्वज्ञात आहेच, किंबहुना म्हणूनच डॉ. आंबेडकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजसुधारकांना वर्णवर्चस्वतेविरुद्ध झगडावे लागले, पण म्हणून हे सारे पेशवाईपासून सुरु आहे हा समज पूर्ण निराधार आहे.
दि. ५ जून १९३६ च्या “केसरी”मध्ये इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर (साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे पुत्र) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘पेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होता’ या आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच पत्रोत्तर देऊन “ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली दंतकथा असून लिखित पुरावा नसल्याचे” मान्य केले. अर्थात, बाबासाहेबांनी हे उत्तर देण्यापूर्वी जवळपास सव्वाशे वर्षे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या मनात फूट पाडण्यासाठी जातियवादाची बिजे रोवली होती, त्यामूळे नंतरच्या पिढ्यानपिढ्या इंग्रजांनी पसरवलेल्या या गैरसमजुतींना खर्या मानू लागल्या. पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. “पेशवेकालीन सामाजिक आणि आर्थिक इतिहास” यावार भारत इतिहास संशोधक मंडळाने एक विशेष त्रैमासिकच प्रसिद्ध केले आहे. पण तरिही इंग्रजांनी पसरवलेल्या या विषवल्लीचा परीणाम मात्र ब्राह्मण आणि बहुजन या दोघांवरही इतका झाला की एकेकाळी एकमेकांच्या साथीने, विचाराने काम करणारे, लढणारे हे दोन समुह एकमेकांचा न भूतो न भविष्यती दुस्वास करू लागले. यात दोन्हीही समाजांचे आजवर नुकसानकच झाले. पण इंग्रजी राज्य जाऊन, आज इतकी ऐतिहासिक साधने उपलब्ध असतानाही या दोन्हीही समाजांना हे समजू नये का ? किमान आतातरी हे सगळे गैरसमज दूर करून ही जातियता संपेल अशी अपेक्षा करावी काय ? दुर्दैवाने आपण अजूनही परकीयांच्याच बोलण्यावर-लिहिण्यावर विश्वास ठेवत आपल्याच लोकांवर सूड उगवत आहोत. अगत्य असु द्यावे. हा लेख लिहिण्याचे कारण कोणावरही जातिय दृष्टीकोनातून पाहण्याचा नसून आपण आपल्याच इतिहासाची विल्हेवाट लावत आहोत ती थांबावी असा आहे.


खाली दुसर्या बाजीरावसाहेबांच्या युद्धातील हालचाली, कोरेगावच्या लढाईचा नकाशा तसेच भीमा-कोरेगावच्या इंग्रजांनी उभारलेल्या स्तंभाची छायाचित्रे जोडलेली आहे.
© www.kaustubhkasture.in