सार्वजनिक गणेशोत्सव आणि पर्यावरण

श्री गणेशाच्या मुर्त्या gst मुळे महाग झाल्याची बोंबाबोंब निधर्मी पत्रकार आणि सर्वधर्मसमभाववाले विद्वान करत आहेत.
मुर्त्या २५ ते ४०% महाग झाल्याची आकडेवारी दिली जात आहे.

प्रत्यक्षात शाडुची माती आणि नैसर्गिक रंगांवर gst नाही. ऑईल पेंट , पीओपी आणि बाकी सजावटीसाठी gst आहे.

दरवर्षी १५ ते २५% दरवाढ होतेच आहे ह्याचे कारण म्हणजे कारागीरांचे मानधन. जिथे पगारादार २० ते ३०% पगारवाढ करवुन घेतात तिथे गणेशमुर्तीकारांचे मानधन का वाढु नये. इतर खर्च म्हणजे ऑईल पेंट व तत्सम सजावट.

*पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव असेल तर कुठेही gst चा प्रभाव नाही.*

जिथे पीओपीची मोठी टिकाऊ दिखाऊ मुर्ती ऑईल पेंट थर्माकोल आणि प्लॅस्टिकच्या सजावटीने आहे तिथेच gst लागू आहे.

सणांचे व्यापारीकरण करणार तर त्यावर कर लागू शकतो. पारंपरिक नैसर्गिक मुर्ती व सजावट असेल तर पावित्र्य असेल आणि बचतसुद्धा होईल. ती रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरता येईल.

गणेशोत्सव सजावटीसाठी थर्माकोल किंवा प्लॅस्टिक न वापरता आयुर्वेदीक वनस्पती, देशी फळ फुलझाडे ह्यांचा वापर करता येईल. येणाऱ्या भाविकांना रोप देता येतील जी घरात लावता येतील. त्यानिमित्ताने श्री गणेशाचे सदोदित स्मरण राहिल.

ठणठणात करणारा dj , डोळे दिपवणारे disco lights , ह्यापेक्षा निसर्गरम्य मंडप , पारंपरिक वाद्ये ह्यांच्यामुळे बचत होईल, भाविकांना समाधान लाभेल.

अर्थात दिखावा करणाऱ्यांना हे पटणार नाही. आमचा पैसा आहे आणि आम्ही पाहिजे तसा वापरु असे सांगणारे कमी नाहीत. मग विसर्जनानंतर दिसणारे गणेशमुर्तीचे अवशेष पहावत नाहीत आणि सणांचा व्यापार करणारे ते पहायलाही जात नाहीत.

निर्णय तुमचा आहे. स्वतःपासुन सुरुवात करा. गणेशोत्सवास भेट देताना शाडुची मुर्ती आणि नैसर्गिक सजावट ह्यांचा आग्रह करा. गणेशोत्सव मंडळाला देणगी देताना ती देणगी सामाजिक कार्यासाठी वापरली जात असल्याचे निश्चित करा. कार्यकर्त्यांनी आपला वेळ भक्तिभावाने दिला असतो, त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हा आणि शक्य तिथे आर्थिक सहयोग करा. मिरवणुकीत किंवा मंडपात दारू गुटखा तंबाखू मोठ्या आवाजात dj असल्यास  जुगार किंवा इतर अपप्रकार असल्यास पोलिस किंवा सामाजिक संस्थाना तक्रार करा. ह्या प्रकारांमुळे सर्वात जास्त बदनामी होते. इतर धर्म लाऊड स्पीकर वापरत असतील तर त्यांच्या तक्रारी नंतर करा. आधी आपल्या सणांमध्ये विदेशी संस्कृती आहे ती बाहेर काढा.
 सार्वजनिक गणेशोत्सवाचे ह्यापेक्षा मोठे यश नसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा