व्यापार परप्रांतीय आणि आपण

एक लक्षात घ्या.

एक पिशवी घेऊन आलेला परप्रांतीय एका खोलीत १०-१२ लोकांसोबत रहातो, दिवसातुन एकदा जेवतो

२-३ वर्षात भाड्याने स्वतंत्र खोली घेतो त्यात बायकापोरांना आणतो, त्यांच्या बायकासुद्धा छोटीमोठी लाम करायला सुरुवात करतात, ५-६ वर्षात ते स्वतःची खोली-ब्लॉक विकत घेतात.
साधा स्क्रू पिळु न शकणारा माणुस दिवसाला १५ तास काम करुन तंत्र शिकतो आणि २-३ वर्षात कंत्राटदार बनतो. ४ थी नापास असलेला परप्रांतीय वेल्डिंर  पेंटर कार्पेंटर मेकॅनिक बनून महिन्याला ५०-६० हजार कमावतो. त्यावर टॅक्स नाही.

मराठी माणसं काय करतात ?
 राजकारण्यांची वाट बघतात.. अरे ते करोडपती होतात, ५ वर्षात तुमची काय प्रगती होते ? भांडण मोर्चे आंदोलनात गेली तुमची ५ वर्षे.. सगळी सरकारी खाजगी कंत्राटी काम परप्रांतीय घेतात. मराठी कार्यकर्ते काय करतात ?

नेतेच जर तुम्हाला व्यवसायात पुढे आणत नसतील तर स्वतः करा नेतृत्व, तंत्रशिक्षण घ्या आणि पगाराच्या दहापट कमाई करा.

सरकारी नोकरीत मराठी टक्का कमी का ? परप्रांतीय काम करता करता शिकतात, १२ तास काम करणारा परप्रांतीय ८ तास पाठांतर करत असतो. एकदा नापास झाल्यावर ते जिद्द सोडत नाहीत. निवड होई पर्यंत परीक्षा देतात.
आमचे नेते अशा परीक्षांची पुस्तक आणि अभ्यास करण्यासाठी सुविधा प्रत्येक शाखा ऑफिसवर का देत नाहीत ? प्रत्येक वॉर्डात मतदारसंघात १० IAS IPS UPSC MPSC SSC Army त मराठी माणसं असायला पाहिजेत. प्रत्येक काम मराठी माणसांना मिळाल पाहिजे. आता काम घेतात आणि परप्रांतियांना देतात. कामाच्या निविदेवर मराठी माणुस असतो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी परप्रांतीय काम करत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा