दारू लाईफ आणि ३१ डिसेंबर

दारू पिणाऱ्यांनी,
३१ ला हवी तेवढी ढोसा. अगदी ओकेपर्यंत प्या. पण गाडी चालवू नका.
तुमच्यामुळे कुणा इतराची लाईफ कशाला डेंजरमध्ये यार. बात छोटीसी है रे, पर लई इम्पोर्टन्ट है.
आत्महत्येसाठी माझ्याकडे भारी भारी पर्याय आहेत. विचारलं तर सांगतो.
पण दुसर्याची लाईफ रिस्कमध्ये टाकायचा अधिकार आहे का आपल्याला ?

लाईफ एकदाच मिळते यार. त्यावर फक्त आपला अधिकार.
फुल जियो, पर होशोआवाज में.

आयुष्य सुंदर आहे आणि असेल. पण ते सौंदर्य टिकवण्यासाठी थोडा झगडना पडता है रे.
झगडायचं रे थोडं. मग लाईफ बघ, कशी नांगी टाकते आपल्यासमोर.
कुछ पाना तो कुछ खोना, लाईफ का दस्तूर है रे मियां.

https://www.facebook.com/mangesh.sapkal.5/posts/987133061347874?fref=nf
Mangesh Sapkal@Facebook

भारत माझा देश आहे

>भारत माझा देश आहे
(म्हणूनच आम्ही विदेशात नोकऱ्या मिळवून तिथे स्थाईक होऊन त्या देशांना डेव्हलप करायच्या प्रयत्नात असतो)
>सारे भारतीय माझे बांधव आहेत
(आम्ही सतत एकमेकांचा मत्सर करत असतो, तुझी जात ती..... तर माझी जात हि.... आणि चार पाचशे वर्षापूर्वीचे उकरून काढून भांडत बसण्यात आमचा हात तर कुठलाच देश करू शकत नाहीत)
>माझ्या देशावर माझे प्रेम आहे
(म्हणूनच आम्ही रस्त्यावर थुंकतो, नियम मोडतो, आणि फक्त आपली ताकद सिद्ध करायचा प्रयत्नात असतो)
>माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
(आम्हाला वेस्टर्न परंपरा जास्त भावतात, त्यां देशातील सणांचे (वेलेन्टाईन्स डे, रोज डे, प्रपोज डे ई.) मेसेज लगेच फॉरवर्ड होतात, आमचे सण लक्षातही नसतात)
>मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन
(म्हणूनच whatsapp वर गुरुजनांवर आम्ही उत्तम प्रकारे विनोद करू शकतो, पालकांना घरा बाहेर काढतो,
आणि रस्त्यावरून चालणाऱ्या, वडीलधार्या माणसांशी वयाचा मान न ठेवता आरेरावीने बोलतो)
>आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन
(आम्हाला साधा गाडीवरून ओव्हरटेक जरी कोणी केला तरी आम्हाला त्याचा राग येतो, पुढे जाऊन त्याला गाठून कशा शिव्या घालता येतील....आपली भाईगिरी कशी सिद्ध करता येईल....... वगैरे )
>माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे
(आम्ही एकमेकांवर सतत कुरघोडी करतो, आमचा आवडता वाद म्हणजे जातीवाद)
>त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे
(आम्ही एकमेकांचे पाय घेचतो..... मीच कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करतो..... कोणि
संकटात असल्यास त्याला मदत करायचे सोडून त्याचे vdo चित्रीकरण करून आपल्या पेज वर किंवा whatsapp वर कसे सर्वांचा आधी पाठवता येईल याचा प्रयत्न करतो)

आता यात काही विनोद नाहीये, तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यास- या 10 लोकांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहात....
वरील (कंसात लिहिलेल्या) अर्थाप्रमाणे त्यातील काही लोक वागताना दिसतील....
आता सर्वच जण असे चुकीचे वागतात असे नाही, आता ज्या लोकांना या शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे आणि समजला आहे ते याचे आचरण योग्य पद्धतीने करतात, ज्यांना समजला नाही ते वरील कंसात
लिहिलेल्या अर्थाप्रमाणे वागतात..... तोडा आणि राज्य करा या इंग्रजांचा पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आपल्या
हातात आहे.
या 5 ओळींचा प्रतिज्ञेत आपली पूर्ण भारत संस्कृती आहे, इतरांची कॉपी करून आपण पुढे जाऊच शकत नाही, वेगळेपण सिद्ध केले तरच पुढे जाऊ शकतो, जर का आपण या प्रतिज्ञे प्रमाणे वागलो, आणि सर्व एकत्र येऊन काम करायला लागलो, तर जगात पहिल्या नंबरचा देश व्हायला आपल्याला 5 वर्षे पुष्कळ झाली......
जय हिंद

#‎अखंडभारत‬

#‎अखंडभारत‬

अमेरीकेने इराक-इराण-अफगाणिस्तानवर ताबा मिळवला १० वर्ष सरकार चालवल, आणि लष्करी तळ मांडून ठेवले आहेत, रशिया कमी नाही, चीनने तिबेट खाल्ला, भूतान चिमटीत पकडून ठेवला आहे, नेपाळची गोची करुन ठेवली आहे, पाक-बांगलादेश चीनच्या इशार्यावर नाचतात, म्यानमारची परिस्थिती फारशी वेगळी नाही.
अश्यावेळी भारतीय उपखंडातले देश भारताच्या नेतृत्वाखाली एकत्र येउ शकले तर काय हरकत आहे, योग्य नियोजन असेल तर भारतीय उपखंड अभेद्य असेल, प्रशिक्षित आणि अर्धविकसीत मनुष्यबळ सर्वात जास्त भारतीय उपखंडात उपलब्ध आहे, व्यापारासाठी कच्चा माल सर्वात जास्त इथेच उपलब्ध असणार आहे आणि हे सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असणार आहे. युरोप-अमेरीके चीन-जपानला मागे टाकण्याची हिच संधी आहे.
पाकिस्तान-चीन दरवर्षी इंच-इंच पुढे सरकत आहे, ६० वर्षांपूर्वीच्या बावळटपणामुळे काश्मीर-अक्साईप्रदेश आपण गमावला आहे, आता अरुणाचलप्रदेश पण सोडायचा का ? प.बंगाल-केरळ-आसाम धर्माच्या गणितावर वेगळे व्हायची मागणी करायला लागले तर तोडणार का अजुन तुकडे?
offence is the best defence असताना जात-धर्माची गणित मांडणारे आणि भारतीय उपखंडांतल्या देशांच्या एकत्र येण्याला विरोध करणारे विद्वान-विचारगट अमेरिका-चीनच्या पैश्यावर पोसले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निदान माझ्या विचारातले "अखंड भारत" आणि "अखंड हिंदुस्तान" हे दोन्ही वेगळे आहेत.
अर्थात मला कोणीच विचारत नाहीत हि गोष्ट वेगळी!!

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती
बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते. माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.
दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
"ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.
दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो. त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते. त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले. रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते. आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता. याबद्दल मला मुळीच शंका नाही. "[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे. [समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.
[जनता,१०-२-१९५१]
दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:- "माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये? [जनता,३जानेवारी१९५३]
बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९ मधील हे सर्व श्लोक आहेत:-
[मनुस्मृती, अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:- सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.
श्लोक १२९- यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//
अर्थ:- मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है. तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?
श्लोक १३०:- जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है. श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.
श्लोक १३८- मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.
श्लोक८९- ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.
स्लोक १२- ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.
श्लोक१९१- सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.
श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.
श्लोक १९३- सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-
१.विवाहाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले. ३. नवर्यानेभेट म्हणून दिलेले. ४.वडिलांनी दिलेली.
५.आईने दिलेले ६.भावाने दिलेले.
श्लोक१९४:- या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.
आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:- ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्म्रुतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले. या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.
राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत, जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.
या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:- "बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ. या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ. गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो. त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले. "[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती, बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष, सोहनलाल शास्त्री, सम्यक प्रकाशन].
By :- Madhusudan Cherekar

धर्म आणि रक्षण

दंगल झाली तेव्हा लपुन बसलेल्या निधर्मी सहिष्णुतावाद्यांचे रक्षण सेनेच्या वाघानी केले.

धर्म नाकारता तुम्ही ?
तुमचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणारे जवान धर्म सोडत नाहीत,
तुमचा जीव वाचवण्यासाठी झटणारे डॉक्टर धर्म नाकारत नाहीत,
ज्यांच्या जीवावर तुम्ही प्रसिद्धी मिळवता त्या facebook google twitter news चे मालक धर्म नाकारत नाहीत.
इतकच कशाला ते भारतात येतात मन:शांती साठी तेव्हा हिंदु मंदीर आणि संताकडेच शरण जातात.
तुम्ही कोणत्या आधारावर हिंदुत्वाला दोष देता ?
ज्यानी हिंदुत्व समजावुन घेतलेच नाही, ते सनातन वैदीक ब्राम्हणी वगैरे बडबडत राहिले. खरे हिंदुत्व सर्व जाती-पंथांच्या एकीत आहे.

ह्या एकीलाच मुघल-इंग्रज घाबरत होते म्हणुन त्यानी जाती-पातीत भांडण सुरु केली.
आज सुद्धा त्याच द्वेशाचे विष चाटुन हिंदुत्व विरोधी उलट्या करत आहेत.

भारतीय म्हणुन जगायच म्हणजे कस?

जिथे जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक कागदावर जात-धर्म लिहावा लागतो ,
जिथे जात-पात आणि धर्मावर आरक्षण मागितल जाते,
तिथे फक्त भारतीय म्हणुन कस जगायच ?

हिंदुत्व, जातीयवाद आणि आरक्षण

रोमन-प्रोटेस्टंट , शिया-सुन्नी असे ख्रिश्चन मुस्लिम धर्मियात जाती-पंथ आहेत, पण संविधानाचे हक्क लाभ अधिकार आरक्षण घेताना ते फक्त ख्रिश्चन किंवा मुसलमान असतात. कोणताही ख्रिश्चन किंवा इस्लामी धार्मिक नेता स्वत:च्या पंथासाठी वेगळे आरक्षण हक्क मागत नाही.
हिंदुंवर टीका करताना तर एकजुट असतेच
ह्यातुन काय शिकावे : धार्मिक एकता.
आपापसात कितीही भांडले तरी परक्यांविरुद्ध एकत्रच येतात.

आरक्षणाची वेळ येते तेव्हा हिंदुन्मध्ये शेकडो जाती दाखवल्या जातात. प्रत्येक जातीचा एकतरी नेता असतो. पण आज पर्यंत ह्या जातीयवादी नेत्याना एकत्र येऊन जातींमधले भेद मिटवता आले नाही, प्रत्येक वेळी फक्त तेढ वाढते.

गेली 60 वर्षे आरक्षण असुनही हिंदु जाती मागासच कश्या ? आरक्षणाने प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली. ह्याचे खापर हिंदुत्वावर फोडण्यात येते. पण सत्तेवर तर कायम हिंदुत्वविरोधी पक्षच होते. गरीबी हे आमचा दागिना असल्याचे सतत सांगितले गेले. रोजगार देण्याऐवजी भत्त्याच्या नावाखाली भीक मागण्याची सवय लावली गेली.
मग सर्व संधी अधिकार असताना सुद्धा कमी न झालेल्या जातीयवादाला जबाबदार कोण ?

परदेशी देणग्यांवर पोसलेले निधर्मी-सर्वधर्मी विचारवंत पुस्तक व्याख्यान चर्चासत्र भरवुन हिंदुना हिंदुत्वाविषयी गैरसमज करणारे पोस्ट मेसेज शेअर करतात. त्यामागचे सत्य जाणुन न घेता, तथाकथित बुद्धीवादी तेच उष्टे चघळत बसतात.

जगातल्या सर्व आधुनिक आणि विकसीत देशाना स्वत:चा धर्म आहे, सर्व जागतिक नेते स्वत:ची धर्म चिन्हे अभिमानाने मिरवतात.
सोशल किंवा न्युज मिडीयाचे मालक धार्मिक असतात, आपल्याला विकणायात येणारी प्रत्येक वस्तु व सेवा धार्मिक व्यक्तीच बनवतात. आपले रक्षण करणारे सैनिक व पोलिस धार्मिक असतात, आपले आयुष्य वाढवणारे डॉक्टर धार्मिक असतात.

मग आपणच मागे का? कारण परकिय आक्रमण होत असताना आपण विज्ञानापेक्षा धार्मिक रुढीना महत्व दिले, जर रुढी मागचे ज्ञान परखडले असते आणि ज्ञानसाधनेची तपश्चर्या केली असती तर आज आपण विज्ञान व धर्म हया दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ असतो.

आंबेडरकर , समाज आणि आरक्षण

सध्या दलित - मुस्लिम ऐक्याचे वारे वहात असल्याचे भासवले जाते.

आंबेडकरानी हिंदु ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीन्ही धर्म नाकारले होते, मग हि एकी कुठुन आली?

जर अशी एकी अभिप्रेत असती तर आंबेडकरानी बौद्ध धर्म स्विकारला नसता,  इस्लाम कुबुल केला असतात. तसे घडले नाही, मग आता काय झाले?

हा आंबेडकरांचा विश्वासघात कि जनतेचा ?

आंबेडकरानी जे 60 वर्षांपुर्वी नाकारले तेच आज जनतेच्या माथी मारले जात आहे का?

बौद्ध म्हणायला हवे पण नेतेच दलित असा उल्लेख करुन जखम भळभळती ठेवत आहेत.
बौद्ध-मुस्लिम एकी नाही म्हणत. दलित-मुस्लिम म्हणतात, म्हणजे समाज कुठेही असला तरी दलितच का? का मागास ठेवला आहे समाज गेली 60 वर्षे? हिंदु धर्म अन्याय करुन प्रगती रोखत होता, आरक्षणानंतर सुद्धा समाज मागास दलितच कसा राहिला?

ज्यांचा उद्घोष केला जातो त्या भीमरावांचा आदर्श ठेवुन निम्मे सुद्धा शिक्षण पुर्ण करु न शकलेले नेते बनले. ज्यानी जिद्दीने शिक्षण घेतले ते जातीपासुन दुर झाले. असे का ह्याचा अर्थ गेल्या 60 वर्षात कोणत्याच नेत्याने समजावुन सांगितला नाही.

ब्राम्हण उच्चवर्ण सवर्ण वैदीक अन्याय असे शब्द वापरुन समाजत तेढ वाढवली गेली, पण एकही समाजउपयोगी कार्य दिसले नाही.

आंबेडकरानी आरक्षण हे हजारो वर्षे अन्यायाच्या खाईत पडलेल्या समाजाच्या उन्नतीचे साधन मानले होते.

पण आज आरक्षण हे कुंपण आहे.

आरक्षणाने निवडणुका जिंकता येतात.
जगण्याच्या शर्यती नाही.

तिथे कुंपण ओलांडणाराच संघर्ष करु शकतो.

दुर्दैवाने आज ज्यानी कुंपण मोडुन जग जिंकण्यासाठी मर्गदर्शन करायला पाहिजे, ते कुंपणाचे फायदेच सिद्ध करत आहेत.