गरज , खेडी, विकास


ज्या समस्या आहेत, त्यावर राजकारणी उपाय शोधणार नाहीत.. कारण प्रश्न सहज सुटले तर निवडणुका घ्यायची गरज उरणार नाही..

आपण छोट्या व्यापाऱ्यांकडुन वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करतो , पण किती व्यापारी साठेबाजी नफेखोरी न करता सचोटीने धंदा करतात ?

पेट्रोल-डिझेल गाड्या विमान ह्या आपण निर्माण केलेल्या गरजा आहेत.. पुर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या, म्हणून खर्च कमी होता .. आता जाहिराती करुन चैनीच्या गोष्टीचे  गरजेत रूपांतर केले गेले आहे, म्हणून मागणी वाढत गेली त्याप्रमाणात त्या वस्तु आणि सेवेची किम्मत वाढवण्यात आली..

महाराष्ट्रतले दारु कोल्ड्रिंक सिगारेट तंबाखू आणि फास्टफुड चे कारखाने बंद केले तर दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा होणार नाही.
शहरातली लोक हे मान्य करणार का ?

गावाशहरात रोजगार आणि सरकारी कार्यालय (जिथे गेल्यावर जिल्हा मुख्यालय किंवा मंत्रालयात जायची गरज भासु नये) उपलब्ध असते तर प्रवास कमी झाला असता आणि पेट्रोलडीझेलची गरज कमी झाली असती. पण हे जाणीवपूर्वक टाळले जाते.

युरोपीय सत्ता येण्या आधी खेडी स्वयंपूर्ण होती , औद्योगिकिकरण होण्याआधी प्रदूषण नव्हते, हरीतक्रांती दुग्धक्रांती होण्याआधी डायबेटिस कॅन्सरचे इतके रुग्ण नव्हते.

विकासाच्या नावाखाली खेड्यांचे शहरीकरण करण्यात आले , आणि सर्वच तोल सुटला.. अनिर्बंध विकास करताना निसर्गाचा आणि भविष्यातील परीणामांचा अभ्यास झाला नाही. मोठमोठे रहिवासी प्रकल्प बांधताना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची तजवीज झाली नाही. प्रगत देशातले हानीकारक उद्योगाना भारतात परवाना देताना इथल्या सुपीक भुमीचा पाण्याचा हवेचा विचार केला गेला नाही.

सामान्य माणुसाला लहानपणापासूनच श्रीमंताकडे नोकरी करण्यासाठी शिक्षण देण्यात येते.. ज्यांना त्रास होतो ते थोडाफार विरोध करतात, काही मोर्चे काढतात तर काही लेखणी , उरलेले गुलामीत सुख शोधण्याला प्रगती म्हणतात.. पिढ्यानपिढ्या हि गुलामी सुरु रहाणार आहे, त्याला राजेशाही लोकशाही कम्युनिझम समाजवाद भांडवलशाही ह्यातल्या कोणत्याही प्रकाराने फरक पडणार नाही.

बदल घडवुन आणायचा असेल तर तक्रार करायचे बंद करा. शासनव्यवस्था कशी कार्य करते , आपला ज्या व्यक्ती समुहाशी संबंध येतो ते कोणत्या प्रकारचे वस्तु किंवा सेवा घेतात,  त्यांचे  दोन किंवा जास्त व्यक्ती किंव समुह ह्यांचे व्यवहार कसे होतात, गरज मागणी पुरवठा ह्यांचा अभ्यास करा.  अतिरिक्त उपलब्ध असलेली चैनीची वस्तु किंवा सेवा गरज म्हणून कशी द्यावी व त्याचा जास्तीतजास्त जास्त मोबदला कसा घ्यावा हे ज्यांना जमणार आहे तेच सर्वात पुढे असणार  आहेत.

हिंदु सणांनिमित्ताने

श्रावणी सोमवार जवळ येत आहेत तसे महादेव श्री शंकराच्या पिंडीवर दुध पाण्याचा अभिषेक करण्याबद्दल टीका करणारे महाभाग जन्माला येत आहेत. गरीब अनाथ भुकेलेल्यांना हे दुध आणि पाणी का देत नाहीत , तुमचा धर्म माणूसकीच नाही म्हणे..

सर्वधर्मसमभावचा टाहो फोडणारे हे निधर्मी शहाणे पंढरीच्या वारीत दंग होत नाहीत.  पण रमदान आणि इदला टोपी चढवुन मिठ्या मारत होते. एकमेकांना भरवुन उपवास सोडत होते. मशिदीत वजु करताना पाणी वापरले जाते हे कसे विसरता ? चर्चमध्ये वेफर्स आणि वाईन बनवताना पाणी वापरले जात नाही? लवकरच ख्रिसमस येईल तेव्हा केक आणि इतर वस्तुंची देवाणघेवाण होईल. पण कोणताही हिंदु त्याविषयी तक्रार करत नाही, हिंदु सामील होतात सर्व सणात.. सत्यनारायण पुजेचा प्रसाद इतर धर्मीय खायला धजावत नाहीत. हिंदुना चर्चमधे पवित्र प्रसाद दिला जातो का ? कारण तो धर्मावर असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. तिथे कोणी प्रश्न विचारायला जात नाहीत. सहिष्णुता आणि व्यापकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे.

शेतकरी (?) रस्त्यावर भाज्या दुध ओतत होते तेव्हा नाही का आठवण झाली गरीब भुकेल्या अनाथांची ? तेव्हा  शेतकऱ्यांच्या बाजुने तावातावाने भांडत होते. कोणी जाऊन विचारलय का खऱ्या शेतकऱ्यांना कि बाबारे तुला कर्ज देतो कोण आणि तुला लुटतो कोण ?

शहरात बर्गर पिझ्झा पेप्सी कोकवर जगणारे काय आणि गावाकडे साहेबांच्या हुकुमाची बजावणी करणारे काय.. दोघे सारखेच तुटुन पडतात हिंदु सणांवर..

पिझ्झा बर्गर केक सिगारेट दारू ह्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो पण हे हिंदु धर्माचा भाग नसल्याने त्यावर टीका नाही..


हिंदु सणांनिमित्ताने छोट्या दुकानदार शेतकरी दुधवाले (गवळी नाही लिहित, मुंबईत फोन फिरायचे) ह्यांना रोजगार मिळतो.. गावातुन उत्साह वाढतो.  हे दुध किंवा पाणी सरकारी खर्चाने वाया घालवत नाहीत. सरकारी खर्च म्हणजे आम्ही भरलेला कर. तुम्ही करमाफी होण्यासाठी CA कडे पैसे चेपता.
श्री शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणाऱ्यांमुळे जितके दुध वापरले जाते त्याचा फायदा दुध उत्पादक आणि विक्रेत्यांना होतो. रस्त्यावर दुध ओतुन त्याचा फायदा कोणाला होतो?

धर्म म्हणा किंवा व्यापार म्हणा, तिथे भेदभाव करु नका. तुम्हाला करायची असेल बचत तर फास्टफुड दारु तंबाखू पदार्थ बंद करुन बचत करा पण तुम्हाला ते झेपणारे नाही.

तुमचे पुरोगामी बुडबुडे हिंदु सणांच्या वेळीच येतात हे आता सर्वांना माहिती आहे. हेच कारण आहे कि तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण तुम्ही परकीय व्यापारी प्रवृतींच्या तालावर नाचत आहात आणि त्यात तुमचा अध:पातही होतो आहे.

जिहाद , उत्क्रांतिवाद, धर्म

*तुर्कस्तान आता जिहाद शिकवणार !! उत्क्रांती विज्ञान अभ्यासक्रमातुन बाद.*

तुर्कस्तानचे नवे पंतप्रधान एर्दोगान ह्यांचा जयघोष करणारे उदारमतवादी ह्या निर्णयामुळे तोंडघशी पडले आहेत.

उत्क्रांतिवाद हा बायबल किंवा कुराणमधील स्पष्टीकरणास पृष्टी देत नाही. ख्रिश्चन धर्माने आधुनिक विज्ञानातील शोधाना काही शतकानंतर का होईना परंतु मान्यता दिली. १९९६ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी उत्क्रांतीविज्ञान हे स्पष्टीकरणापेक्षा अधिक आहे अशी अधिकृतरीत्या भूमिका जाहीर केली. वेळोवेळी इस्लामिक विद्वानांनी उत्क्रांतिवाद हा कुराणातील आयतांना प्रमाणित करत असल्याचे मांडले. आता २० वर्षे उलटल्यावर एर्दोगान विरूध्द प्रवास करत आहेत.

मध्यपूर्वेत कट्टरधार्मिक संघटनांनी केलेल्या तणावामुळे लाखो निर्वासित युरोपमध्ये प्रवेश करत आहेत. सुरुवातीला युरोपीय देशांनी निर्वासितांचे स्वागत केले. आता निर्वासितांनी स्वतःचे धार्मिक हक्क मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी निर्वासित ज्या भागात जास्त आहेत तिथल्या लोकांवर आपले धार्मिक नियम लादण्याची सुरुवात केली, त्यातुन दंगली होत आहेत.

अमेरीकन फौजा (एक प्रकारे ख्रिश्चन फौजा) ३ दशके मध्यपूर्वेत तळ ठोकुन आहेत. त्याचा राग कट्टर मुस्लिम संघटनांना आहेच. आता जिहादचे अधिकृतरीत्या शिक्षण सुरु झाले आहे.

ख्रिश्चन व इस्लामिक धर्मप्रसारकानी तलवार व तराजू सोबत घेउनच धर्मांतरण मोहिमा राबवल्या त्यात स्थानिक संस्कृतींचा ऱ्हास होत गेला. व धर्म मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातल्या १० पैकी ६ मनुष्य ख्रिस्ती किंवा इस्लामिक आहेत.

विज्ञानयुगात प्रचंड प्रगती असली तरी दोन्ही धर्माच्या प्रमाणित ग्रंथात पृथ्वी सपाट किंवा स्थिर असुन उत्क्रांतीविषयी स्पष्ट उल्लेख नाही. ज्या प्राचीन धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांच्या ग्रंथात वैज्ञानिक तत्वे स्पष्ट आहेत.

 वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरीकेत ४४% लोकांच्या मते उत्क्रांतिवाद हा सत्य नाही व शाळांमध्ये तसे आग्रही प्रतिपादन होते.
मध्यपूर्वेत आधुनिक वैज्ञानिक उत्पादने व सेवा वापरल्या जात असल्या तरी उत्क्रांतीविज्ञान हे सत्य नसुन इस्लामी तत्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे व जगभरात सर्वप्रकारे फक्त इस्लामच असला पाहिजे ह्यासाठी हे राज्यकर्ते आग्रही आहेत. एर्दोगान त्यांचे प्रतिनिधी आहेत.

ह्या दोन धार्मिक समुहात गेले १००० वर्षे असणाऱ्या धार्मिक वर्चस्वाच्या चढाओढीत अण्वस्त्रांची भर पडली आहे. ११ व्या शतकापासुन दोन शतके सुरु असलेल्या ख्रिश्चन विरूध्द मुस्लिम क्रूसेड्सची ही नांदी होऊ नये.

-=-

Turkey’s new school curriculum ditches evolution, teaches jihad: Report
19/07/2017 Washington post

Turkey’s education ministry reportedly announced a new school curriculum that excludes lessons on Charles Darwin’s theory of biological evolution while *allowing religious schools to teach the concept of Islamic jihad.*

“It is also our duty to fix what has been perceived as wrong. This is why the Islamic law class and basic fundamental religion lectures will include [lessons on] jihad,” Mr. Yilmaz said, Reuters reported.

*“The new policies that ban the teaching of evolution and requiring all schools to have a prayer room, these actions destroy the principle of secularism and the scientific principles of education,”* said Mehhmet Balik, chairman of the Union of Education and Science Workers.

http://m.washingtontimes.com/news/2017/jul/19/turkeys-new-school-curriculum-ditches-evolution-te/

शेतीप्रश्नावर काही उपाय

*शेतीप्रश्नावर काही उपाय : *

*पारंपरिक बियाणे, खते, पीकबदल*
*शेतीमाल साठवणुक, प्रक्रिया केंद्र,*
*प्रशिक्षित शेतकरी व शेतीकामगार,*
*पाणीबचत, पाणीव्यवस्थापन, नदीजोडणी,*
*वीजेसाठी सौरउर्जा, पवनउर्जा*
*शेतीसाठी इंटरनेट व इतर आधुनिक तंत्रज्ञान,*
*कर्ज किंवा कोणत्याही प्रक्रियेला ऑनलाईन फॉर्म भरणे.*
*नव्या पिढीसाठी शेतीमाल विक्री , वाहतुक विपणन व्यवस्थापन प्रशिक्षण.*

*ह्या मुळे कर्जाची रक्कम कमी होईल. शेतीमाल दलालाशिवाय थेट विकला जाईल. शेतीमालाचे दर शेतकरी ठरवु शकतील.*

*बचत : कर्ज काढुन  प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दुसऱ्यांवर खर्च करणे बंद करणे. लग्न व इतर समारंभात आवश्यकतेनुसार खर्च करणे. दारु व इतर व्यसनांपासुन लांब रहाणे.*

*शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शहर असो वा गाव. कामगार असो वा इतर कोणी. सर्वांना शेतकऱ्यांचे महत्व आहे. एक माणुस म्हणून कोणावरही आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.*

*शेतकऱ्यांना योग्य नेतृत्व लाभेल तेव्हा लाभेल , पण शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्यांनी शेतीचे नवे तंत्र , बचत, मार्केटिंग शिकुन घ्यावे. राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा हे शिकणे सोपे आहे. प्रत्येक तालुक्यात हे शिक्षण मराठीत उपलब्ध असायला पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या राजकारण्यांनी जागोजागी शिक्षणसंस्था उभ्या केल्यातच तिथे शेतकऱ्यांना मोफत शिक्षण द्यावे.*

*हे सर्व करायला वेळ लागेल पण जेव्हा होईल तेव्हा कर्जमाफीच्या रक्कमेपेक्षा कमी खर्चात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्महत्या थांबतील.*
-=-
शेवटी सामान्य जनतेच्या खिशात हात घालुनच कर्जमाफी होणार आहे आणि त्याचे श्रेय राजकारणी घेणार. *पण आम्हा सामान्य जनतेसाठी आमच्या शेतकरी बंधुंच्या आत्महत्या थांबल्या तेच पुरेसे आहे.*
-=-
जे कामगार दिवसाला १२-१४ तास रक्त घाम गाळुन कर भरतात त्यांच्या श्रमाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जे खरे शेतकरी कर्ज काढुन शेती करतात आणि नियमित कर्जफेड करतात त्यांच्या व्याजाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जी जनता छोट्या मोठ्या खरेदीवर कर भरते त्यांच्या करातुन करमाफीसाठी लागणार आहेत. *कर्जमाफी होते तेव्हा त्याचे ओझे कामगार वर्ग , छोटे व्यापारी उचलतो , सामान्य जनतेवर कराचे भार वाढतात. तेव्हा कर्जमाफीचा हिशोब सर्वांना मिळाला पाहिजे.*
-=-
 जे आता शेतकऱ्यांच्या नावाने करत आहेत ते गेली २० वर्षे सुरु आहे त्याला राजकारण म्हणतात. त्यात राजकारणी सोडुन सर्वांचा सत्यानाश आहे पण त्यांना त्यातच लाभ दिसतो आहे. कारण *शेतकरी शिकुन स्वतःच विकु लागला तर राजकारण्यांची गरज उरणार नाही.*
-=-
आधीच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफी खरोखरीच कोणाची झाली हे तपासायला पाहिजे.
-=-
*कर्जमाफी मागणाऱ्या  शेतकऱ्यांच्या एकातरी नेत्याने आत्महत्या केली आहे का ?* किती कोटी संपत्ती आहे त्यांच्याकडे ? देतात का स्वतःच्या गावातल्या शेतकऱ्यांना ? ना विरोधी पक्षाचे खासदार आमदार स्वतःचे मानधान सोडणार, ना सत्ताधारी. *जेव्हा खासदार आमदारांनी महिन्याचे मानधन आणि इतर भत्ते वाढवुन घेतले तेव्हा कर्जमाफीची आठवण आली नाही?*
-=-
कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची जाहीर संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी केली का मदत ? ३५-४० हजार एकरची जमीन , अनंत कोटींची संपत्ती असणाऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी पुढाकार घ्यावा ही रयतेची विनंती. निदान २ लाखांच्या खंडणीचा आळ निघुन जाईल.
-=-
*बीयाणे आणि खते कोणी महाग केली ?* शेतीक्रांतीच्या नावाखाली पारंपरिक बियाणे आणि खते बंद केली. पुर्वी आधीच्या पिकातले बियाणे वापरता यायचे. त्यावर रोग कमी होते. नैसर्गिक खते होती. *आता सहकारसम्राट श्रीमंत झाले आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत.*
-=-

हिंदुत्ववाद आणि देशाचा विकास

हिंदुत्ववादी अजेंडाच असता तर सर्वत्र हिंदुत्ववाद दिसला असता.. दिसत आहेत ती विकासाची कामे..स्टार्टप इंडीया, मेक इन इंडीया ते  सर्वात मोठ्या कर्जमाफीपर्यंत काम सुरु आहे.. स्टार्टप आणि मेक इन इंडीयात किती जणानी भाग घेतला ? विरोधाच्या राजकारणासाठी नव्या पिढीला व्यवसायापासून दुर ठेवण्यात येत आहे आणि पारंपरिक नोकरीतच जायला सांगितले आहे.

दादरी चघळुन चोथा केला , केरळ बंगालच्या प्रकरणांवर बोलायला तयार नाही. हा सर्वधर्मसमभाव ?

इंदु सरकार सिनेमावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आच नाही ?

मायवतींचा लाखो कोटींचा भ्रष्टाचार चौकशीच्या फेऱ्यात येत आहे म्हणून जातीयवादी राजकारणातुन संरक्षण मिळवले जात आहे. महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे ?

आम्ही इंटरनेट युगातील मतदार आहोत. सत्य लवकर उघड होते. गेली ६० वर्षे शालेय इतिहासाच्या पुस्तकात न सांगितलेला इतिहास आज प्रत्यक्ष मुळ कागदपत्रातुन उघड होतो.

 साहेब वेळोवेळी आधुनिक इतिहासकारांच्या लेखांवर विसंबुन विधाने करतात आणि पाठपुरावा करत नाहीत, कारण ह्या आधुनिक इतिहासकारानी आजपर्यंत कोणतेही पुराव्यानिशी संशोधन केलेले नाही. महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते हे सिद्ध करण्यासाठी अफजलखानाला मोठेपण देण्यापर्यंत मजल गेली. अफजलखानाने जे अत्याचार निशस्त्र हिंदुंवर केले त्याची वर्णने त्याने स्वतःच पत्रोतरात केली आहेत. तीच गत मोगल निजाम इंग्रज आणि पोर्तुगींजांची. पण आमचे आधुनिक इतिहासकार हे नाकारुन खोट्या इतिहासात समाधान मानत आहेत कारण वोट बॅंकेवर आफत येते.

गेल्या १० वर्षातील जे मतदार आहेत त्यांच्यापुढे मुळ कागदपत्रांचे पुरावे आहेत. गेल्या ६ दशकातील चुकांचे परीणाम आहेत. घराणेशाही ते अल्पसंख्याक लांगुलचालन ह्यात बरबाटलेल्या राजकारणात अल्पसंख्याक मागास समाज अजुन मागास होत गेले आणि त्यांच्यासाठी भांडणारे श्रीमंत होत गेले. हे आता गेल्या ३ निवडणुकांमधल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.

तुम्ही जेवढी टीका हिंदुत्ववादी व तत्सम समुहांवर कराल तितकीच जनता त्यांच्याकडे जाणार कारण गेल्या ६८ वर्षात जनता गरीबच राहिली. नोटंबदीमुळे श्रीमंती मिरवणारे आर्थिक अडचणीत आले हे पाहुन मागास गरीब आणि मध्यमवर्गीयांना (जे प्रमुख मतदार आहेत) नव्या सरकारवर विश्वास आहे. पहिल्यांदा सरकारी योजनांवर कोणत्याही घराण्याचे नाव नाही.  घराणेशाही संपुन आपल्यातील सामान्य मनुष्य पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती बनु शकतो हे जनतेने पाहिले आहे. हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

मुलींसाठी स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षण

मुलींसाठी मानसिक शारीरिक शिक्षण संरक्षण आणि प्रबोधनाची गरज सर्वात जास्त आहे. ५ रुपये किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी करण्यावर भर दिला गेला पाहिजे.
पॅड वापरण्याचे महत्व सांगताना मासिक धर्म हा विटाळ अपवित्र अस्वच्छ असे न सांगता नैसर्गिक आहे व मानवजातीसाठी महत्वाचे आहे हे सांगितले पाहिजे.
वयाच्या १२-१३व्या वर्षी तोंड लपवून बॉयफ्रेंड किंवा मॅनफ्रेंडबरोबर फिरणाऱ्या मुलींना लैंगिकतेचे व मानसिकतेचे भान आणुन देणे महत्वाचे आहे.
आज मुलींना पॅड्स दिले तर मुलांना कंडोम्स वाटावे लागतील अशी सध्याच्या पिढीची लैंगिक प्रगती आहे. १०वी पास होण्यापूर्वीच लैंगिकसंबंध नसणारी मुलीमध्ये दोष असल्याचे पसरवले जाते. पुर्वी लग्नाआधी संबध म्हणजे थ्रिल असायचे आता कॉलेजला जाण्याच्या आधीच उपभोग घेऊन झाला असतो. ह्यात उचवर्गीय मुलींचे शौक किंवा गरज पुर्ण होत असेल पण मध्यमवर्गीय किंवा गरीब मुलींचे आयुष्य उध्वस्त होते.

 बॉयफ्रेंड मॅनफ्रेंड किंवा एका पेक्षा जास्त लैंगिक संबंध असणाऱ्या मुलीसुद्धा आहेत्च ज्यांना थोड्याफार पैसे व भेटवस्तु (परफ्युम कपडे मोबाईल) चा मोह सोडवत नाही.

घरुन पूर्ण कपडे घालुन निघालेली शाळकरी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर गाडीवर शक्य तितक्या कमी कपड्यात शक्य तितक्या जवळ चिकटुन बसते.

शहरात दिवसाउजेडी जी शाळकरी जोडपी चिकटुन शारिरीक लगट करत असतात ते प्रेम असते कि वासना ? ही जोडपी दुसऱ्या शहरगावातली असतात, ह्याचे कारण म्हणजे पालकांनी बघणे नसुन दुसऱ्या गर्ल/बॉयफ्रेंडने बघितल्यावर ब्रेकप होणे हे आहे.

ह्या सर्वात लैंगिक संबंधांच्या फोटो विडीओचे काय ? वयात येताना नैसर्गिकरीत्या यौवनाचे आकर्षण असते. आपल्या लैंगिक भावनिक गरजा पुऱ्या करणाऱ्या व्यक्तिंवर विसंबुन फोटो विडीओ पाठवले जातात मग लैंगिक संबधांची विडीओच बनते. व्हाट्सप शेअरइट ने ते खाजगीत पसरवले जातात. ह्यातुन ब्लॅकमेल आणि वासनाकांड घडुन येतात. सुर्यनेली किंवा अजमेर प्रकरण तर इंटरनेटच्या आधीची आहेत.

xvideo debonairblog xossip आणि बाकी देशी वेबसाईटवर अशा मुलींची लाज उघड्यावर पाडली जाते. youtube facebook वरसुद्धा ह्या विडीओ फोटो येत आहेत. हे कुटुंबासमोर आले कि पुढे आत्महत्या , वेश्याव्यवसाय आणि एखादा आधार लाभला तर पुनर्वसन ह्यातुन जावे लागते.

मुलांना लैंगिक व सामाजिक जबाबदारी काय असते हे शिकवण्याची गरज आहे. आज त्यांच्यापुढे दारु सिगारेट पिउन हिरोगीरी करणाऱ्यांचा आदर्श आहे, आणि अशा हिरोंच्या अंगाखांद्यावर चिकटलेल्या अर्धनग्न स्त्रीयांची हाव आहे. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली माफ असेल तर पुढच्या पिढीकडून स्वैराचाराशिवाय दुसरी कसलीही अपेक्षा करु नका.

अजुन एक पैलू आहे , तो म्हणजे घरातल्या कुटुंबातल्या शेजारातल्या ओळखीतल्या वासनाअंध विकृतांचा. ह्यांच्यापासुन लहान मुले आणि मुली दोघांना वाचवायची गरज आहे. खेळायला घेऊन जायच्या नावाखाली बंद दरवाज्याआड हे विकृत अनैसर्गिक लैंगिक चाळे करतात. ज्याचा शारीरिक बलात्कार असतोच पण मानसिक आघात जास्त मोठा असतो. हे अत्याचार चुकीचे आहेत हे समजणेसुद्धा लहान मुलांना कठीण जाते. वयात आलेल्या मुलींवर अत्याचार करणारे सक्खे बापभाऊ असतात. मुलांवरसुद्धा अत्याचार होतात. तक्रार केल्यावर कुटुंबीयच पांघरूण घालतात कारण घराण्याची अब्रू.

मुलींना खरोखरच स्व-संरक्षण आणि लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. बाकी अडचणी संकट त्या सहज पार करतील.

नर्मदेच्या निमित्ताने..

नर्मदेच्या निमित्ताने..


गेली १५ वर्षे संगणक आणि माहिती सेवा क्षेत्रात काम केले. ह्या क्षेत्रासाठी वीज हा सर्वात महत्वाचा घटक. संगणक आणि इंटरनेट अविरत सुरु रहाण्यासाठी वीज अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात वीज येते कुठुन ?

औष्णिक जलविद्युत किंवा अणुविद्युत प्रकल्पातून. हे स्त्रोत प्रदुषकारी किंवा उपलब्ध साधनसंपत्तीचा बळी घेणारे पण काही अनाकलनीय कारणांमुळे शासकीय आणि खाजगी उद्योजकांना सोयीचे आहेत. त्यामुळे पर्यायी वीजनिर्मिती प्रकल्प जसे सौर पवन किंवा जैविक कचरा विघटन ह्यातुन स्थिर प्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याचा अपप्रचार होतो. पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन वापरण्यासाठीही आपली तयारी नाही. आपला मुख्य मुद्दा आहे वीज आणि आपण त्याचाच विचार करु.

गेल्या ५ दशकात प्रवास वेगाने सुसूत्रतेने होऊ लागला. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वीजेशिवाय काम करु शकत नाही. विशेषत: जमिनीवरचा प्रवास रेल्वेने मोठ्या प्रमाणात होतो तिथे वीज आहे. उर्वरित जल आणि वायु प्रवास संगणकाशिवाय अपूर्ण आहे. ह्या प्रवासाचे नियंत्रण करणारे संगणक वीजेचा वापर करतात.

सध्या सोशल मिडीयाशिवाय जगु न शकणारी पिढी आहे. तिथेही अवाढव्य संगणक प्रणाली आहे जी विजेशिवाय बिनकामी आहे.

हे सर्व टाळले तरी जीवनावश्यक बनलेल्या वस्तु तयार करण्यासाठी असलेले कारखाने वीज वापरतात. आणि स्वतःचे सौर पवन किंवा पर्यावरणाचा संतुलन राखुन वीजनिर्मिती करणारे प्रकल्प नगण्यच.


गेल्या ३ दशकांपासून नर्मदेच्या पात्रातील टाहो आपण ऐकतो आहे. काही ऐकुन दुर्लक्ष करतात कारण नर्मेदेच्या परीसरातील वीज आसपासच्या औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरली जाते. संवेदनशील असलेल्या व्यक्ती निषेध नोंदवतात आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्ती पुढे सरसावतात. ह्यातही तात्पुरता विरोध करुन लाभ पदरात पाडुन घेणारे आहेत तसे संपूर्ण आयुष्य प्रकल्पातुन होणाऱ्या विनाशापासुन आसपासच्या लोकांना वाचवणारे आंदोलकही आहेत.


नर्मदेच्या प्रकल्पातुन होणाऱ्या वीजनिर्मितीचा लाभ तीन राज्यातील गोरगरीब जनतेला होईल. पाण्याची बचत होईल. वाळवंटी जमीन सुपीक होईल. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होईल अशी ग्वाही देण्यात आली.


प्रत्यक्षात लाखो प्रकल्पग्रस्त निर्वासित आणि बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत.


स्थानिक बातमीपत्रासाठी वृत्तसंकलन करताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता. Development at what cost ? कोणाचा बळी देऊन विकास होणार आहे?


नर्मदेच्या पात्रातील शेकडो पिढ्यांपासून शेती मच्छीमारी आणि इतर उदरनिर्वाह करणाऱ्यांना उठवुन अशा ठिकाणी जागा देण्यात येते कि तिथे नव्याने कसली सुरुवात करायची हा प्रश्न उभा रहावा.


नर्मदा प्रकल्पाचा लाभ उपटणाऱ्या औद्योगिक यंत्रणेत ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावुन घेता आले नसते ? इतके वर्षे काम सुरु होते प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक प्रशिक्षण सहज देता आले असते. पण २ पिढ्या फक्त जगण्याचा हक्क मागण्यात उद्ध्वस्त झाल्या.


काही हजार लोकांना रोजगार देणारी कोकाकोला कंपनी काही लाख लोकांपेक्षा मोठी कशी ? अशा हानीकारक वस्तु विकणाऱ्या ( पेप्सी कोकाकोला किंवा इतर फास्टफुड ) कंपन्या पाणी आणि शेतीमालाचा वापर करुन जे पदार्थ बनवतात ते आरोग्यास अपायकारक आहेत. ५ ते ६ माणसांसाठी पुरेसे असलेले अन्नघटक वापरल्यावर २ ते ३ माणसांसाठी फास्टफुड बनते.


एकीकडे लाखो लोकांना विस्थापित करायचे. उर्वरीत स्थानिकांना प्रकल्पातुन कोणतेही फायदे द्यायचे नाहीत. त्याचवेळी ज्यातून समाजात कोणतेही उपयुक्त पदार्थ देऊ शकत नाहीत अशा कंपन्यांचे लाड पुरवायचे हा विकास कसा ?


नर्मदा प्रकल्पाची वीज स्थानिक गावात न जाता औद्योगिक प्रकल्पात जाते. हे प्रकल्प करचोरी करण्यात सर्वात पुढे आहेत शिवाय नफ्याचा मोठा वाटा परदेशात जातो.


आपले बांधव बेघर उपाशी करुन आपणच परदेशात पैसा पाठवत आहोत. पोर्तुगीज आणि इंग्रज वेगळे काय करत होते?


तुम्ही प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन मोर्चा काडु शकत नाही, उपोषण करु शकत नाही, कायदेशीर लढा देऊ शकत नाहीत ?

निदान अशा प्रकल्पाच्या ठिकाणी जा. तिथल्या स्थानिकांना स्वतःचे शहरीकरण विसरुन भेटा. आपल्या देशाची लुट करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या वस्तुसेवांना विरोध करा. तिथे स्वदेशी कंपन्यांच्या वस्तु सेवांना प्राधान्य द्या. आज ह्या कंपन्या तंत्रज्ञान प्राथमिक यंत्रणा परदेशातुन आणत असतीलही , पण आपण पाठिंबा दिला , विदेशी वस्तु नाकारल्या तर शासकीय यंत्रणेला झुकावे लागेल.


आजच्या वेगवान आणि वेगवेगळ्या प्रकारे जोडल्या गेलेल्या जगात वीज आणि इतर गरजा वाढणार आहेत. त्यासाठी सुपीक जमीनीची नासाडी होऊन द्यायची ? अणुप्रकल्पारुन होणाऱ्या आण्विक गळतीचे दुष्परिणाम आपण आता अनुभव आहोत. एकेकाळी सुजलाम्सुफलाम् असणारा देश आज रासायनिक खते आणि परदेशी बियाणांच्या दुष्टचक्रात सापडला आहे.


आमचे पुर्वज संथ असतीलही पण पुढच्या पिढीसाठी विषारी तंत्रज्ञानाची पेरणी करत नव्हते.


अन्न बनवण्यासाठी लागणाऱ्या पीकपाण्यापासुन ते रासायनिक मारा असलेल्या तयार अन्नापर्यंत आपण पोखरलो गेलो आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी ॲलोपॅथीचा उपाय करत आहोत. जिथे रोगापेक्षा इलाज भयंकर होतो.


आयुर्वेद असो वा पारंपरिक शेती , आम्ही जमीन हवा पाणी ह्यांची जपणुक केली होती. वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासुराला आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम केले आहे.


आज आम्हाला गरज आहे ती संपूर्ण नैसर्गिक जीवनशैली आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणाची. एक संतती नियमाने २ ते ३ पिढ्यात लोकसंख्या निम्मी आणि सुदृढ होऊ शकते. मात्र आम्ही वाढत्या लोकसंख्येसाठी जंगले तोडुन घर आणि औद्योगिकीकरण करत आहोत.

गेली लाखो वर्षे मानवाला आश्रय देणारी पृथ्वी आता अपुरी पडते आहे म्हणून परग्रहांवर जायची तयारी सुरु आहे.

पण लोकसंख्येवर नियंत्रण आणु शकत नाहीत, कारण धर्म. धर्माचे अनुयायी जेवढे जास्त तितका धर्म मोठा आणि त्यातुन प्रभाव पडुन अधिक अनुयायी. हे चक्र गेले दोन सहस्त्रक सुरु आहे. त्यासाठी जास्तीतजास्त संतती जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. गर्भपात हा नैतिक अपराध ठरवला जातो. दोन सहस्त्रकांपुर्वी जेमतेम ४० कोटी असणाऱ्या जगाची लोकसंख्या आज जवळपास २० पट वाढली आहे. हीच लोकसंख्या १ अब्ज असती तर नैसर्गिक साधनसंपत्ती अजुन जास्त प्रमाणात टिकून राहिली असती. मात्र ऐहिक संपत्तीच्या हव्यासासाठी गरीबांचा उद्धार ह्या हेतुन विकासाची जबरदस्ती सुरु झाली.

एकीकडे हजारो घरे रिकामी असताना मोठ्या संखेने गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत. कोणासाठी ?


गेल्या दोन सहस्त्रकात प्लेग पोलिओ पासुन अनेक असाध्य विकारांवर आपण मात केली त्याच वेळी त्यापेक्षां मोठी पिळवणूक करणाऱ्या वैद्यकीय व्यवस्थेचा बाजार मांडला. मॅट्रिक्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे सध्याची व्यवस्था मानव जन्माला घालत नसुन उच्च स्तरावर असलेल्यांसाठी गुलाम जन्माला घालत आहे.


बघा , विचार करा, आपल्या गरजा व्यसन लोभ हाव हव्यास ह्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत ?

https://www.facebook.com/thevikrant/posts/10154996810703520