शेतीप्रश्नावर काही उपाय

*शेतीप्रश्नावर काही उपाय : *

*पारंपरिक बियाणे, खते, पीकबदल*
*शेतीमाल साठवणुक, प्रक्रिया केंद्र,*
*प्रशिक्षित शेतकरी व शेतीकामगार,*
*पाणीबचत, पाणीव्यवस्थापन, नदीजोडणी,*
*वीजेसाठी सौरउर्जा, पवनउर्जा*
*शेतीसाठी इंटरनेट व इतर आधुनिक तंत्रज्ञान,*
*कर्ज किंवा कोणत्याही प्रक्रियेला ऑनलाईन फॉर्म भरणे.*
*नव्या पिढीसाठी शेतीमाल विक्री , वाहतुक विपणन व्यवस्थापन प्रशिक्षण.*

*ह्या मुळे कर्जाची रक्कम कमी होईल. शेतीमाल दलालाशिवाय थेट विकला जाईल. शेतीमालाचे दर शेतकरी ठरवु शकतील.*

*बचत : कर्ज काढुन  प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दुसऱ्यांवर खर्च करणे बंद करणे. लग्न व इतर समारंभात आवश्यकतेनुसार खर्च करणे. दारु व इतर व्यसनांपासुन लांब रहाणे.*

*शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शहर असो वा गाव. कामगार असो वा इतर कोणी. सर्वांना शेतकऱ्यांचे महत्व आहे. एक माणुस म्हणून कोणावरही आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.*

*शेतकऱ्यांना योग्य नेतृत्व लाभेल तेव्हा लाभेल , पण शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्यांनी शेतीचे नवे तंत्र , बचत, मार्केटिंग शिकुन घ्यावे. राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा हे शिकणे सोपे आहे. प्रत्येक तालुक्यात हे शिक्षण मराठीत उपलब्ध असायला पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या राजकारण्यांनी जागोजागी शिक्षणसंस्था उभ्या केल्यातच तिथे शेतकऱ्यांना मोफत शिक्षण द्यावे.*

*हे सर्व करायला वेळ लागेल पण जेव्हा होईल तेव्हा कर्जमाफीच्या रक्कमेपेक्षा कमी खर्चात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्महत्या थांबतील.*
-=-
शेवटी सामान्य जनतेच्या खिशात हात घालुनच कर्जमाफी होणार आहे आणि त्याचे श्रेय राजकारणी घेणार. *पण आम्हा सामान्य जनतेसाठी आमच्या शेतकरी बंधुंच्या आत्महत्या थांबल्या तेच पुरेसे आहे.*
-=-
जे कामगार दिवसाला १२-१४ तास रक्त घाम गाळुन कर भरतात त्यांच्या श्रमाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जे खरे शेतकरी कर्ज काढुन शेती करतात आणि नियमित कर्जफेड करतात त्यांच्या व्याजाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जी जनता छोट्या मोठ्या खरेदीवर कर भरते त्यांच्या करातुन करमाफीसाठी लागणार आहेत. *कर्जमाफी होते तेव्हा त्याचे ओझे कामगार वर्ग , छोटे व्यापारी उचलतो , सामान्य जनतेवर कराचे भार वाढतात. तेव्हा कर्जमाफीचा हिशोब सर्वांना मिळाला पाहिजे.*
-=-
 जे आता शेतकऱ्यांच्या नावाने करत आहेत ते गेली २० वर्षे सुरु आहे त्याला राजकारण म्हणतात. त्यात राजकारणी सोडुन सर्वांचा सत्यानाश आहे पण त्यांना त्यातच लाभ दिसतो आहे. कारण *शेतकरी शिकुन स्वतःच विकु लागला तर राजकारण्यांची गरज उरणार नाही.*
-=-
आधीच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफी खरोखरीच कोणाची झाली हे तपासायला पाहिजे.
-=-
*कर्जमाफी मागणाऱ्या  शेतकऱ्यांच्या एकातरी नेत्याने आत्महत्या केली आहे का ?* किती कोटी संपत्ती आहे त्यांच्याकडे ? देतात का स्वतःच्या गावातल्या शेतकऱ्यांना ? ना विरोधी पक्षाचे खासदार आमदार स्वतःचे मानधान सोडणार, ना सत्ताधारी. *जेव्हा खासदार आमदारांनी महिन्याचे मानधन आणि इतर भत्ते वाढवुन घेतले तेव्हा कर्जमाफीची आठवण आली नाही?*
-=-
कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची जाहीर संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी केली का मदत ? ३५-४० हजार एकरची जमीन , अनंत कोटींची संपत्ती असणाऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी पुढाकार घ्यावा ही रयतेची विनंती. निदान २ लाखांच्या खंडणीचा आळ निघुन जाईल.
-=-
*बीयाणे आणि खते कोणी महाग केली ?* शेतीक्रांतीच्या नावाखाली पारंपरिक बियाणे आणि खते बंद केली. पुर्वी आधीच्या पिकातले बियाणे वापरता यायचे. त्यावर रोग कमी होते. नैसर्गिक खते होती. *आता सहकारसम्राट श्रीमंत झाले आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत.*
-=-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा