हिंदुत्ववाद आणि देशाचा विकास

हिंदुत्ववादी अजेंडाच असता तर सर्वत्र हिंदुत्ववाद दिसला असता.. दिसत आहेत ती विकासाची कामे..स्टार्टप इंडीया, मेक इन इंडीया ते  सर्वात मोठ्या कर्जमाफीपर्यंत काम सुरु आहे.. स्टार्टप आणि मेक इन इंडीयात किती जणानी भाग घेतला ? विरोधाच्या राजकारणासाठी नव्या पिढीला व्यवसायापासून दुर ठेवण्यात येत आहे आणि पारंपरिक नोकरीतच जायला सांगितले आहे.

दादरी चघळुन चोथा केला , केरळ बंगालच्या प्रकरणांवर बोलायला तयार नाही. हा सर्वधर्मसमभाव ?

इंदु सरकार सिनेमावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आच नाही ?

मायवतींचा लाखो कोटींचा भ्रष्टाचार चौकशीच्या फेऱ्यात येत आहे म्हणून जातीयवादी राजकारणातुन संरक्षण मिळवले जात आहे. महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे ?

आम्ही इंटरनेट युगातील मतदार आहोत. सत्य लवकर उघड होते. गेली ६० वर्षे शालेय इतिहासाच्या पुस्तकात न सांगितलेला इतिहास आज प्रत्यक्ष मुळ कागदपत्रातुन उघड होतो.

 साहेब वेळोवेळी आधुनिक इतिहासकारांच्या लेखांवर विसंबुन विधाने करतात आणि पाठपुरावा करत नाहीत, कारण ह्या आधुनिक इतिहासकारानी आजपर्यंत कोणतेही पुराव्यानिशी संशोधन केलेले नाही. महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते हे सिद्ध करण्यासाठी अफजलखानाला मोठेपण देण्यापर्यंत मजल गेली. अफजलखानाने जे अत्याचार निशस्त्र हिंदुंवर केले त्याची वर्णने त्याने स्वतःच पत्रोतरात केली आहेत. तीच गत मोगल निजाम इंग्रज आणि पोर्तुगींजांची. पण आमचे आधुनिक इतिहासकार हे नाकारुन खोट्या इतिहासात समाधान मानत आहेत कारण वोट बॅंकेवर आफत येते.

गेल्या १० वर्षातील जे मतदार आहेत त्यांच्यापुढे मुळ कागदपत्रांचे पुरावे आहेत. गेल्या ६ दशकातील चुकांचे परीणाम आहेत. घराणेशाही ते अल्पसंख्याक लांगुलचालन ह्यात बरबाटलेल्या राजकारणात अल्पसंख्याक मागास समाज अजुन मागास होत गेले आणि त्यांच्यासाठी भांडणारे श्रीमंत होत गेले. हे आता गेल्या ३ निवडणुकांमधल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.

तुम्ही जेवढी टीका हिंदुत्ववादी व तत्सम समुहांवर कराल तितकीच जनता त्यांच्याकडे जाणार कारण गेल्या ६८ वर्षात जनता गरीबच राहिली. नोटंबदीमुळे श्रीमंती मिरवणारे आर्थिक अडचणीत आले हे पाहुन मागास गरीब आणि मध्यमवर्गीयांना (जे प्रमुख मतदार आहेत) नव्या सरकारवर विश्वास आहे. पहिल्यांदा सरकारी योजनांवर कोणत्याही घराण्याचे नाव नाही.  घराणेशाही संपुन आपल्यातील सामान्य मनुष्य पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती बनु शकतो हे जनतेने पाहिले आहे. हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा