ज्ञान हिंदु धर्म आणि अंधश्रद्धा

१)लिंबू मिरची औषधी असतात. प्रथमोपचारसाठी.
२)मांजराविषयक हिंदु धर्मात नकारात्मक काही नाही. जे आहे ते मांजरमुळे होऊ शकणाऱ्या रोगाविषयी आहे.
३) शिंक प्राणघातक असू शकते. कोणत्याही वैद्यकीय व्यक्तीकडून माहिती घ्या.
४) भूत म्हणजे आरोग्यास हानीकारक घटक. उदा पाणविंचू किटक किंवा साप
५) हिंदु धर्मात प्रत्येक घटनेत वैज्ञानिक मीमांसा आहे. तुम्ही चमत्कार पहाता ते टीव्हीमध्ये. वेद गीता किंवा प्राचीन धर्मसाहित्यात घटना आहेत, चमत्कार नाही.
६) बुवा बाबा प्रकार हिंदु धर्मात नाही. थोडा शोध घेतला तर उगम सापडेल.
७) करणी जादू टोणा प्रकार हिंदु धर्मात नाहीत. वेद गीता किंवा इतर साहित्यात हे प्रकार नाही.
८) वास्तूशास्त्र म्हणजे हवा पाणी उजेड ह्या घटकांच्या आधारे वास्तू उभारणी. हे संपूर्णपणे वैज्ञानिक आहे.
९) नवस म्हणजे कार्य करताना श्रद्धास्थानी केलेले दान. कर्मण्येवाधिकारस्ते सांगणारा हिंदु धर्म. लाच हा प्रकारच नाही.
१०) अंधश्रद्धा म्हणजे माहिती नसताना मेसेज करणे.

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?
मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

हिंदु धर्म संस्कृती विज्ञान तत्वज्ञान


एक मेसेज फिरतो आहे त्यात डार्विनच्या साक्षीने हिंदु धर्मावर घाण उडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे

डार्विनचा सिद्धांत वाचा मग अकलेचे तारे तोडा.
माकड व मानव ह्यांचा पुर्वज एकच आहे. माकडापासुन माणुस झाला नाही. एका प्राण्यापासून माणुस व माकड वेगवेगळे उत्क्रांत झाले.

आदिमानव अंगावर वल्कले घालायचा. हिंदु संस्कृतीनुसार देव म्हणजे नैसर्गिक तत्व. ज्यांना कालांतराने मानवी प्रतिमेत पाहिले गेले. म्हणून देवांच्या चित्र किंवा मुर्तींवर कपडे व अलंकार असतात.

माणसाने देव निर्माण केला नाही. मानवी आकलनाच्या आधीपासून जी तत्व अस्तित्वात आहेत त्यांना देव मानण्यात आले.

रामायण महाभारत सुमारे ५ ते ८ हजार वर्षे प्राचीन आहे. म्हणजे जवळपास ४०० पिढ्या. त्याच्याही आधीपासून धातुयुग अस्तित्वात आहे.

चाकाचा शोध इसवीसनाच्या आधीपासून लागला आहे. ब्रॉंझ युग म्हणजे १२००० वर्षांपासून चाकांचा वापर होतो आहे. मग ८००० वर्षांपुर्वी हिंदु संस्कृती रथ वापरत होती हे सत्यच आहे. पण हिंदुद्वेष्ट्या मुर्खांना ते माहिती नाही.

वानर हे गण होते , त्यांनी वानर हे प्रतिक स्वीकारले होते. ती माकड नव्हती. पाण्यावर तरंगणारे दगड ज्वालामुखीच्या परीसरात असतात. मूळ रामायणानुसार श्री राम उच्चारण करुन दगड पाण्यात ठेवले गेले. लिहिण्याचा उल्लेख नंतर भाषांतरीत रामायणात जोडला गेला.

हनुमंताने द्रोणागिरी पर्वतावरील शक्य तेवढे सर्व वनौषधी आणले. म्हणून द्रोणागिरी पर्वत आणला हे रुपक प्रचलित झाले.

वानर गण हे जलद प्रवास करणारे होते. त्यांना त्रास होण्याचे कारण नव्हते.

स्त्रीबीज पुरूषबीज एकत्र आल्याशिवाय जन्म होत नाही ह्याच्यासारखा वैज्ञानिक अडाणीपणा नाही. सर्वप्रथम जीव हे एकपेशीय होते. तिथे स्त्रीपुरुष बीज अस्तित्वात नव्हते.

सर्वप्रथम जीव हा पुरुष म्हणजे आदिम किंवा प्रथम ह्या अर्थाने आहे.

ब्रम्ह हा प्रथम जीव असल्याने तर सर्वच त्यांचे संतती होतात.

नाती नंतर जोडण्यात आली. वैज्ञानिक दृष्ट्या सर्वचजण एकमेकांचे भाऊबहिण होऊ शकतात. कारण मानवी उत्पत्ती एकाच जीवातुन झाली आहे.

हिंदु संस्कृतीतील दशावतार हे मानवी उत्क्रांतीचे प्रतीक आहेत. सप्तफण्यांवर असलेली पृथ्वी म्हणजे टेक्टोनिक प्लॅट्सवर असलेले भूखंड. राहुकेतु म्हणजे चंद्रसुर्यांच्या परीक्रमेचे छेदनबिंदू.

आर्यभटाने शुन्याचा वापर सुरु केला. अंक गणना किमान १२ ते १५ हजार वर्षापासून होते आहे.

आदिमानवाला जातधर्म नव्हते कारण जात धर्म हि संकल्पना मानवी उत्क्रांतीबरोबर विकसित झाली.

जाती पंथ सर्वच धर्मात आहेत. इस्लाममध्ये शिया सुन्नी वहाबी, ख्रिश्चनधर्मात ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथलिक प्रोटेस्टंट सिरेनिटीक लॅटिन , बौद्धधर्मात हीनयान महायान थेरवाद आहेत. किंबहुना नास्तिकातही अगम्यावर विश्वास ठेवणारे आहेत. विख्यात शास्त्रज्ञही विश्वाच्या उत्पत्तीविषयी साशंक आहेत.

स्त्री हा हिंदु संस्कृतीचा मानबिंदु आहे. स्त्रियांना पूजाविधी अध्ययन अधिकार आहे. हिंदु संस्कृतीत स्त्री ही आदिशक्ती आहे. अनेक हिंदु मंदिरात स्त्रीया पुजा व धर्मविधी करतात. हिंदु धर्मस्थळातील गाभाऱ्यात स्त्रीया स्वच्छतेच्या कारणाने मासिक पाळीचा अपवाद वगळता जाऊ शकतात. इतर धर्मात जिथे सर्वोच्च धार्मिक प्रतिमा आहे तिथे स्त्रीयांना प्रवेश नाही.

दोन सहस्त्रकांच्या ज्ञात धार्मिक इतिहासात कोणत्या धर्मात्या स्त्री धर्मप्रमुख होती? हिंदु संस्कृतीत स्त्री धर्मगुरू बनु शकते. त्यासाठी न्यायालयातुन कायदा होऊ शकतो. इतर धर्मात असे शक्य आहे?

हिंदु संस्कृती प्रथम संस्कृती आहे ज्यात पृथ्वी व सुर्याचे भ्रमण मान्य आहे. पृथ्वी हा ग्रह , सुर्य हा तारा ब्रम्हांडात इतर ताऱ्याभोवती फिरत आहेत हे सांगितले आहे. हिंदु संस्कृतीत खगोल अवकाश रसायन जीव औषध वनस्पती भौतिक धातु भाषा असे अनेक प्रकारचे शास्त्र आहेत.

विदेशी आक्रमकांनी नालंदा विश्वविद्यापीठ जाळुन टाकण्याआधी हिंदु संस्कृतीत सर्व ज्ञानाचा समावेश होता. म्हणून जगभरच्या संस्कृतीना इथे येऊन व्यापार करायचा होता. इथे दैन्य गरिबी हिंसा असती तर  मुघल इंग्रज डच फ्रेंच आक्रमक इथे स्थिरावले नसते. किंबहुना इथली संपत्ती जहाजे भरुन युरोपात नेण्यात आली.

आजही पृथ्वी सपाट व विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रंथांच्या धर्मांवर तुम्ही टीका करु शकत नाहीत कारण तिथे तुमचे समुळ उच्चाटन करण्यात येते.

विज्ञान तत्त्वज्ञान ह्यांचा सुरेख संगम असलेल्या हिंदु संस्कृतीत परकीय आक्रमकांनी अनिष्ट रीतींचा समावेश केला असेलही. पण त्याचप्रमाणे अशा अनिष्ट रीतींचा कालानुरूप त्यागही हिंदु संस्कृतीने केला आहे.

हिंदु संस्कृती तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत नसाल तर त्यात हिंदु संस्कृतीचा कमीपणा नाही, त्यात तुमचा अडाणीपणा आहे.

गरज , खेडी, विकास


ज्या समस्या आहेत, त्यावर राजकारणी उपाय शोधणार नाहीत.. कारण प्रश्न सहज सुटले तर निवडणुका घ्यायची गरज उरणार नाही..

आपण छोट्या व्यापाऱ्यांकडुन वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करतो , पण किती व्यापारी साठेबाजी नफेखोरी न करता सचोटीने धंदा करतात ?

पेट्रोल-डिझेल गाड्या विमान ह्या आपण निर्माण केलेल्या गरजा आहेत.. पुर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या, म्हणून खर्च कमी होता .. आता जाहिराती करुन चैनीच्या गोष्टीचे  गरजेत रूपांतर केले गेले आहे, म्हणून मागणी वाढत गेली त्याप्रमाणात त्या वस्तु आणि सेवेची किम्मत वाढवण्यात आली..

महाराष्ट्रतले दारु कोल्ड्रिंक सिगारेट तंबाखू आणि फास्टफुड चे कारखाने बंद केले तर दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा होणार नाही.
शहरातली लोक हे मान्य करणार का ?

गावाशहरात रोजगार आणि सरकारी कार्यालय (जिथे गेल्यावर जिल्हा मुख्यालय किंवा मंत्रालयात जायची गरज भासु नये) उपलब्ध असते तर प्रवास कमी झाला असता आणि पेट्रोलडीझेलची गरज कमी झाली असती. पण हे जाणीवपूर्वक टाळले जाते.

युरोपीय सत्ता येण्या आधी खेडी स्वयंपूर्ण होती , औद्योगिकिकरण होण्याआधी प्रदूषण नव्हते, हरीतक्रांती दुग्धक्रांती होण्याआधी डायबेटिस कॅन्सरचे इतके रुग्ण नव्हते.

विकासाच्या नावाखाली खेड्यांचे शहरीकरण करण्यात आले , आणि सर्वच तोल सुटला.. अनिर्बंध विकास करताना निसर्गाचा आणि भविष्यातील परीणामांचा अभ्यास झाला नाही. मोठमोठे रहिवासी प्रकल्प बांधताना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची तजवीज झाली नाही. प्रगत देशातले हानीकारक उद्योगाना भारतात परवाना देताना इथल्या सुपीक भुमीचा पाण्याचा हवेचा विचार केला गेला नाही.

सामान्य माणुसाला लहानपणापासूनच श्रीमंताकडे नोकरी करण्यासाठी शिक्षण देण्यात येते.. ज्यांना त्रास होतो ते थोडाफार विरोध करतात, काही मोर्चे काढतात तर काही लेखणी , उरलेले गुलामीत सुख शोधण्याला प्रगती म्हणतात.. पिढ्यानपिढ्या हि गुलामी सुरु रहाणार आहे, त्याला राजेशाही लोकशाही कम्युनिझम समाजवाद भांडवलशाही ह्यातल्या कोणत्याही प्रकाराने फरक पडणार नाही.

बदल घडवुन आणायचा असेल तर तक्रार करायचे बंद करा. शासनव्यवस्था कशी कार्य करते , आपला ज्या व्यक्ती समुहाशी संबंध येतो ते कोणत्या प्रकारचे वस्तु किंवा सेवा घेतात,  त्यांचे  दोन किंवा जास्त व्यक्ती किंव समुह ह्यांचे व्यवहार कसे होतात, गरज मागणी पुरवठा ह्यांचा अभ्यास करा.  अतिरिक्त उपलब्ध असलेली चैनीची वस्तु किंवा सेवा गरज म्हणून कशी द्यावी व त्याचा जास्तीतजास्त जास्त मोबदला कसा घ्यावा हे ज्यांना जमणार आहे तेच सर्वात पुढे असणार  आहेत.

हिंदु सणांनिमित्ताने

श्रावणी सोमवार जवळ येत आहेत तसे महादेव श्री शंकराच्या पिंडीवर दुध पाण्याचा अभिषेक करण्याबद्दल टीका करणारे महाभाग जन्माला येत आहेत. गरीब अनाथ भुकेलेल्यांना हे दुध आणि पाणी का देत नाहीत , तुमचा धर्म माणूसकीच नाही म्हणे..

सर्वधर्मसमभावचा टाहो फोडणारे हे निधर्मी शहाणे पंढरीच्या वारीत दंग होत नाहीत.  पण रमदान आणि इदला टोपी चढवुन मिठ्या मारत होते. एकमेकांना भरवुन उपवास सोडत होते. मशिदीत वजु करताना पाणी वापरले जाते हे कसे विसरता ? चर्चमध्ये वेफर्स आणि वाईन बनवताना पाणी वापरले जात नाही? लवकरच ख्रिसमस येईल तेव्हा केक आणि इतर वस्तुंची देवाणघेवाण होईल. पण कोणताही हिंदु त्याविषयी तक्रार करत नाही, हिंदु सामील होतात सर्व सणात.. सत्यनारायण पुजेचा प्रसाद इतर धर्मीय खायला धजावत नाहीत. हिंदुना चर्चमधे पवित्र प्रसाद दिला जातो का ? कारण तो धर्मावर असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. तिथे कोणी प्रश्न विचारायला जात नाहीत. सहिष्णुता आणि व्यापकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे.

शेतकरी (?) रस्त्यावर भाज्या दुध ओतत होते तेव्हा नाही का आठवण झाली गरीब भुकेल्या अनाथांची ? तेव्हा  शेतकऱ्यांच्या बाजुने तावातावाने भांडत होते. कोणी जाऊन विचारलय का खऱ्या शेतकऱ्यांना कि बाबारे तुला कर्ज देतो कोण आणि तुला लुटतो कोण ?

शहरात बर्गर पिझ्झा पेप्सी कोकवर जगणारे काय आणि गावाकडे साहेबांच्या हुकुमाची बजावणी करणारे काय.. दोघे सारखेच तुटुन पडतात हिंदु सणांवर..

पिझ्झा बर्गर केक सिगारेट दारू ह्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो पण हे हिंदु धर्माचा भाग नसल्याने त्यावर टीका नाही..


हिंदु सणांनिमित्ताने छोट्या दुकानदार शेतकरी दुधवाले (गवळी नाही लिहित, मुंबईत फोन फिरायचे) ह्यांना रोजगार मिळतो.. गावातुन उत्साह वाढतो.  हे दुध किंवा पाणी सरकारी खर्चाने वाया घालवत नाहीत. सरकारी खर्च म्हणजे आम्ही भरलेला कर. तुम्ही करमाफी होण्यासाठी CA कडे पैसे चेपता.
श्री शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणाऱ्यांमुळे जितके दुध वापरले जाते त्याचा फायदा दुध उत्पादक आणि विक्रेत्यांना होतो. रस्त्यावर दुध ओतुन त्याचा फायदा कोणाला होतो?

धर्म म्हणा किंवा व्यापार म्हणा, तिथे भेदभाव करु नका. तुम्हाला करायची असेल बचत तर फास्टफुड दारु तंबाखू पदार्थ बंद करुन बचत करा पण तुम्हाला ते झेपणारे नाही.

तुमचे पुरोगामी बुडबुडे हिंदु सणांच्या वेळीच येतात हे आता सर्वांना माहिती आहे. हेच कारण आहे कि तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण तुम्ही परकीय व्यापारी प्रवृतींच्या तालावर नाचत आहात आणि त्यात तुमचा अध:पातही होतो आहे.

जिहाद , उत्क्रांतिवाद, धर्म

*तुर्कस्तान आता जिहाद शिकवणार !! उत्क्रांती विज्ञान अभ्यासक्रमातुन बाद.*

तुर्कस्तानचे नवे पंतप्रधान एर्दोगान ह्यांचा जयघोष करणारे उदारमतवादी ह्या निर्णयामुळे तोंडघशी पडले आहेत.

उत्क्रांतिवाद हा बायबल किंवा कुराणमधील स्पष्टीकरणास पृष्टी देत नाही. ख्रिश्चन धर्माने आधुनिक विज्ञानातील शोधाना काही शतकानंतर का होईना परंतु मान्यता दिली. १९९६ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी उत्क्रांतीविज्ञान हे स्पष्टीकरणापेक्षा अधिक आहे अशी अधिकृतरीत्या भूमिका जाहीर केली. वेळोवेळी इस्लामिक विद्वानांनी उत्क्रांतिवाद हा कुराणातील आयतांना प्रमाणित करत असल्याचे मांडले. आता २० वर्षे उलटल्यावर एर्दोगान विरूध्द प्रवास करत आहेत.

मध्यपूर्वेत कट्टरधार्मिक संघटनांनी केलेल्या तणावामुळे लाखो निर्वासित युरोपमध्ये प्रवेश करत आहेत. सुरुवातीला युरोपीय देशांनी निर्वासितांचे स्वागत केले. आता निर्वासितांनी स्वतःचे धार्मिक हक्क मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी निर्वासित ज्या भागात जास्त आहेत तिथल्या लोकांवर आपले धार्मिक नियम लादण्याची सुरुवात केली, त्यातुन दंगली होत आहेत.

अमेरीकन फौजा (एक प्रकारे ख्रिश्चन फौजा) ३ दशके मध्यपूर्वेत तळ ठोकुन आहेत. त्याचा राग कट्टर मुस्लिम संघटनांना आहेच. आता जिहादचे अधिकृतरीत्या शिक्षण सुरु झाले आहे.

ख्रिश्चन व इस्लामिक धर्मप्रसारकानी तलवार व तराजू सोबत घेउनच धर्मांतरण मोहिमा राबवल्या त्यात स्थानिक संस्कृतींचा ऱ्हास होत गेला. व धर्म मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातल्या १० पैकी ६ मनुष्य ख्रिस्ती किंवा इस्लामिक आहेत.

विज्ञानयुगात प्रचंड प्रगती असली तरी दोन्ही धर्माच्या प्रमाणित ग्रंथात पृथ्वी सपाट किंवा स्थिर असुन उत्क्रांतीविषयी स्पष्ट उल्लेख नाही. ज्या प्राचीन धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांच्या ग्रंथात वैज्ञानिक तत्वे स्पष्ट आहेत.

 वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरीकेत ४४% लोकांच्या मते उत्क्रांतिवाद हा सत्य नाही व शाळांमध्ये तसे आग्रही प्रतिपादन होते.
मध्यपूर्वेत आधुनिक वैज्ञानिक उत्पादने व सेवा वापरल्या जात असल्या तरी उत्क्रांतीविज्ञान हे सत्य नसुन इस्लामी तत्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे व जगभरात सर्वप्रकारे फक्त इस्लामच असला पाहिजे ह्यासाठी हे राज्यकर्ते आग्रही आहेत. एर्दोगान त्यांचे प्रतिनिधी आहेत.

ह्या दोन धार्मिक समुहात गेले १००० वर्षे असणाऱ्या धार्मिक वर्चस्वाच्या चढाओढीत अण्वस्त्रांची भर पडली आहे. ११ व्या शतकापासुन दोन शतके सुरु असलेल्या ख्रिश्चन विरूध्द मुस्लिम क्रूसेड्सची ही नांदी होऊ नये.

-=-

Turkey’s new school curriculum ditches evolution, teaches jihad: Report
19/07/2017 Washington post

Turkey’s education ministry reportedly announced a new school curriculum that excludes lessons on Charles Darwin’s theory of biological evolution while *allowing religious schools to teach the concept of Islamic jihad.*

“It is also our duty to fix what has been perceived as wrong. This is why the Islamic law class and basic fundamental religion lectures will include [lessons on] jihad,” Mr. Yilmaz said, Reuters reported.

*“The new policies that ban the teaching of evolution and requiring all schools to have a prayer room, these actions destroy the principle of secularism and the scientific principles of education,”* said Mehhmet Balik, chairman of the Union of Education and Science Workers.

http://m.washingtontimes.com/news/2017/jul/19/turkeys-new-school-curriculum-ditches-evolution-te/

शेतीप्रश्नावर काही उपाय

*शेतीप्रश्नावर काही उपाय : *

*पारंपरिक बियाणे, खते, पीकबदल*
*शेतीमाल साठवणुक, प्रक्रिया केंद्र,*
*प्रशिक्षित शेतकरी व शेतीकामगार,*
*पाणीबचत, पाणीव्यवस्थापन, नदीजोडणी,*
*वीजेसाठी सौरउर्जा, पवनउर्जा*
*शेतीसाठी इंटरनेट व इतर आधुनिक तंत्रज्ञान,*
*कर्ज किंवा कोणत्याही प्रक्रियेला ऑनलाईन फॉर्म भरणे.*
*नव्या पिढीसाठी शेतीमाल विक्री , वाहतुक विपणन व्यवस्थापन प्रशिक्षण.*

*ह्या मुळे कर्जाची रक्कम कमी होईल. शेतीमाल दलालाशिवाय थेट विकला जाईल. शेतीमालाचे दर शेतकरी ठरवु शकतील.*

*बचत : कर्ज काढुन  प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दुसऱ्यांवर खर्च करणे बंद करणे. लग्न व इतर समारंभात आवश्यकतेनुसार खर्च करणे. दारु व इतर व्यसनांपासुन लांब रहाणे.*

*शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शहर असो वा गाव. कामगार असो वा इतर कोणी. सर्वांना शेतकऱ्यांचे महत्व आहे. एक माणुस म्हणून कोणावरही आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.*

*शेतकऱ्यांना योग्य नेतृत्व लाभेल तेव्हा लाभेल , पण शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्यांनी शेतीचे नवे तंत्र , बचत, मार्केटिंग शिकुन घ्यावे. राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा हे शिकणे सोपे आहे. प्रत्येक तालुक्यात हे शिक्षण मराठीत उपलब्ध असायला पाहिजे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या राजकारण्यांनी जागोजागी शिक्षणसंस्था उभ्या केल्यातच तिथे शेतकऱ्यांना मोफत शिक्षण द्यावे.*

*हे सर्व करायला वेळ लागेल पण जेव्हा होईल तेव्हा कर्जमाफीच्या रक्कमेपेक्षा कमी खर्चात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्महत्या थांबतील.*
-=-
शेवटी सामान्य जनतेच्या खिशात हात घालुनच कर्जमाफी होणार आहे आणि त्याचे श्रेय राजकारणी घेणार. *पण आम्हा सामान्य जनतेसाठी आमच्या शेतकरी बंधुंच्या आत्महत्या थांबल्या तेच पुरेसे आहे.*
-=-
जे कामगार दिवसाला १२-१४ तास रक्त घाम गाळुन कर भरतात त्यांच्या श्रमाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जे खरे शेतकरी कर्ज काढुन शेती करतात आणि नियमित कर्जफेड करतात त्यांच्या व्याजाचे पैसे करमाफीसाठी लागणार आहेत. जी जनता छोट्या मोठ्या खरेदीवर कर भरते त्यांच्या करातुन करमाफीसाठी लागणार आहेत. *कर्जमाफी होते तेव्हा त्याचे ओझे कामगार वर्ग , छोटे व्यापारी उचलतो , सामान्य जनतेवर कराचे भार वाढतात. तेव्हा कर्जमाफीचा हिशोब सर्वांना मिळाला पाहिजे.*
-=-
 जे आता शेतकऱ्यांच्या नावाने करत आहेत ते गेली २० वर्षे सुरु आहे त्याला राजकारण म्हणतात. त्यात राजकारणी सोडुन सर्वांचा सत्यानाश आहे पण त्यांना त्यातच लाभ दिसतो आहे. कारण *शेतकरी शिकुन स्वतःच विकु लागला तर राजकारण्यांची गरज उरणार नाही.*
-=-
आधीच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफी खरोखरीच कोणाची झाली हे तपासायला पाहिजे.
-=-
*कर्जमाफी मागणाऱ्या  शेतकऱ्यांच्या एकातरी नेत्याने आत्महत्या केली आहे का ?* किती कोटी संपत्ती आहे त्यांच्याकडे ? देतात का स्वतःच्या गावातल्या शेतकऱ्यांना ? ना विरोधी पक्षाचे खासदार आमदार स्वतःचे मानधान सोडणार, ना सत्ताधारी. *जेव्हा खासदार आमदारांनी महिन्याचे मानधन आणि इतर भत्ते वाढवुन घेतले तेव्हा कर्जमाफीची आठवण आली नाही?*
-=-
कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची जाहीर संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी केली का मदत ? ३५-४० हजार एकरची जमीन , अनंत कोटींची संपत्ती असणाऱ्या छत्रपतींच्या वंशजांनी पुढाकार घ्यावा ही रयतेची विनंती. निदान २ लाखांच्या खंडणीचा आळ निघुन जाईल.
-=-
*बीयाणे आणि खते कोणी महाग केली ?* शेतीक्रांतीच्या नावाखाली पारंपरिक बियाणे आणि खते बंद केली. पुर्वी आधीच्या पिकातले बियाणे वापरता यायचे. त्यावर रोग कमी होते. नैसर्गिक खते होती. *आता सहकारसम्राट श्रीमंत झाले आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत.*
-=-

हिंदुत्ववाद आणि देशाचा विकास

हिंदुत्ववादी अजेंडाच असता तर सर्वत्र हिंदुत्ववाद दिसला असता.. दिसत आहेत ती विकासाची कामे..स्टार्टप इंडीया, मेक इन इंडीया ते  सर्वात मोठ्या कर्जमाफीपर्यंत काम सुरु आहे.. स्टार्टप आणि मेक इन इंडीयात किती जणानी भाग घेतला ? विरोधाच्या राजकारणासाठी नव्या पिढीला व्यवसायापासून दुर ठेवण्यात येत आहे आणि पारंपरिक नोकरीतच जायला सांगितले आहे.

दादरी चघळुन चोथा केला , केरळ बंगालच्या प्रकरणांवर बोलायला तयार नाही. हा सर्वधर्मसमभाव ?

इंदु सरकार सिनेमावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आच नाही ?

मायवतींचा लाखो कोटींचा भ्रष्टाचार चौकशीच्या फेऱ्यात येत आहे म्हणून जातीयवादी राजकारणातुन संरक्षण मिळवले जात आहे. महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे ?

आम्ही इंटरनेट युगातील मतदार आहोत. सत्य लवकर उघड होते. गेली ६० वर्षे शालेय इतिहासाच्या पुस्तकात न सांगितलेला इतिहास आज प्रत्यक्ष मुळ कागदपत्रातुन उघड होतो.

 साहेब वेळोवेळी आधुनिक इतिहासकारांच्या लेखांवर विसंबुन विधाने करतात आणि पाठपुरावा करत नाहीत, कारण ह्या आधुनिक इतिहासकारानी आजपर्यंत कोणतेही पुराव्यानिशी संशोधन केलेले नाही. महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते हे सिद्ध करण्यासाठी अफजलखानाला मोठेपण देण्यापर्यंत मजल गेली. अफजलखानाने जे अत्याचार निशस्त्र हिंदुंवर केले त्याची वर्णने त्याने स्वतःच पत्रोतरात केली आहेत. तीच गत मोगल निजाम इंग्रज आणि पोर्तुगींजांची. पण आमचे आधुनिक इतिहासकार हे नाकारुन खोट्या इतिहासात समाधान मानत आहेत कारण वोट बॅंकेवर आफत येते.

गेल्या १० वर्षातील जे मतदार आहेत त्यांच्यापुढे मुळ कागदपत्रांचे पुरावे आहेत. गेल्या ६ दशकातील चुकांचे परीणाम आहेत. घराणेशाही ते अल्पसंख्याक लांगुलचालन ह्यात बरबाटलेल्या राजकारणात अल्पसंख्याक मागास समाज अजुन मागास होत गेले आणि त्यांच्यासाठी भांडणारे श्रीमंत होत गेले. हे आता गेल्या ३ निवडणुकांमधल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.

तुम्ही जेवढी टीका हिंदुत्ववादी व तत्सम समुहांवर कराल तितकीच जनता त्यांच्याकडे जाणार कारण गेल्या ६८ वर्षात जनता गरीबच राहिली. नोटंबदीमुळे श्रीमंती मिरवणारे आर्थिक अडचणीत आले हे पाहुन मागास गरीब आणि मध्यमवर्गीयांना (जे प्रमुख मतदार आहेत) नव्या सरकारवर विश्वास आहे. पहिल्यांदा सरकारी योजनांवर कोणत्याही घराण्याचे नाव नाही.  घराणेशाही संपुन आपल्यातील सामान्य मनुष्य पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती बनु शकतो हे जनतेने पाहिले आहे. हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.