लहानपणी परीक्षेसाठी ,
तरुणपणी नोकरीसाठी ,
कधी जोडले मी हात
तुझ्यासमोर प्रेमासाठी

तुझं हे मात्र नेहमीचंच,
ऐकून न ऐकल्यासारखे करायचे
अन स्वतःचे देवपण विसरायचे

पण आज काहीच न मागता जाणार
देवा आज तुला मी फसवून जाणार

आताही ह्याच विचारात असशीलच
"आज हा काय मागणार ?"
पण आज कालच्यापेक्षा वेगळा आहे
आज माझा माज जरा वेगळा आहे
तुझ्यासमोर झोळी नाही पसरणार
देवा आज तुला मी फसवून जाणार

कितीही बसुदे चटके मी सोसेन
कोसळू दे आभाळ ते मी तोलेन
मंदिरात मी तेंव्हा येईनही
नमस्कार मी घालेनही
पण ...
काहीही न मागता मी परत जाणार
तेंव्हासुद्धा देवा तुला मी फसवून जाणार

- आंतरजालावरून साभार....