सर्जिकल स्ट्राईक

गजस्तत्र न हन्यते|
https://www.facebook.com/abhijitvartak1/posts/1230436043764577
नीच व्यक्ती मुळात भेकड असतात. त्या शूरपणाचा आव आणतात. पण कालांतराने शौर्याचा बुरखा देखील फाटतो, ही उक्ती सर्वांनाच माहिती आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात चारदा सर्जिकल स्ट्राईक (धडक कारवाई) केल्याची शेखी संपुआ सरकारच्या शिलेदारांनी केली, तेव्हा या उक्तीची आठवण झाली. संपुआ सरकारच्या नेभळट व बोटचेप्या धोरणाची खिल्ली उडवली जाऊ लागली, तेव्हा लज्जारक्षणासाठी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम्, तत्कालीन हेवीवेट मराठा नेते शरद पवार यांनी संपुआ सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी, आम्ही देखील असे सर्जिकल स्ट्राईक केले होते; परंतु, त्याचा गवगवा केला नाही, असे जाहीर सांगितले. परंतु, माजी महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्ट. जनरल विनोद भाटिया यांनी चिदंबरम् व पवार यांचे पुरते वस्त्रहरण करून टाकले. संपुआ सरकारच्या काळात असले कुठलेही प्रकार झालेच नाहीत, असा दावा केला. जे काही थोडेफार झाले, ते फक्त नियंत्रण रेषेवरील कारवाई या सदराखालील कृत्ये होती, असे भाटिया यांनी म्हटले आहे. लेफ्ट. जनरल भाटिया खोटे बोलत आहेत, असे अजून तरी या दोन्ही नेत्यांनी किंवा कॉंग्रेसच्या वाचाळवीरांनी कुठे म्हटल्याचे ऐकिवात नाही. २०१४ साली भारतीय मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन, तसेच नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रिपदी बसवून सर्वच सराईत राजकारण्यांची पंचाईत करून टाकली; आणि त्यानंतर मोदी सातत्याने या सराईत पुढार्‍यांची गोची करीत आहेत. मोदींनी काही केले की, आम्ही देखील असे केले होते, असा त्वरित खुलासा कॉंग्रेस नेत्यांकडून येत असतो. परंतु, २९ सप्टेंबरच्या उत्तररात्री गुलाम काश्मिरात घुसून जी सैनिक कारवाई करण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांनी केले, त्याने तर या सराईत नेत्यांची झोपच उडाली आहे. संपूर्ण भारतीय जनता अभिमानाने मोदींच्या मागे उभी झाल्याचे चित्र दिसताच, कॉंग्रेससह इतर खुज्या विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजणे स्वाभाविक होते. नरेंद्र मोदी यांच्या परदेशवार्‍यांवरून किती खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली होती, हे लोक विसरले नाहीत. ज्यांची वीतभरही उंची नाही, अशा व्यक्ती देखील मोदींना टोमणे मारण्यात मागे नव्हत्या. परंतु, या सर्जिकल स्ट्राईकला जगभरातील प्रमुख शक्तिसंपन्न देशांकडून, तसेच भारताच्या शेजारी देशांकडून जो पाठिंबा मिळाला, तो पाहता, मोदी यांच्या परदेशवार्‍या अकारण नव्हत्या, हे सिद्ध झाले आहे. परकीय खात्यांमधील व्यवहार, पासबुकात नोंदविण्यासाठीही त्या नव्हत्या, हे पवारादी कॉंग्रेस नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. परस्परांमधील विवाद सोडविण्याचे जितके काही प्रचलित मार्ग आहेत, ते सर्व मार्ग, पाकिस्तानची समस्या सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणे चोखाळले. पाकिस्तान या सर्व शिष्टसंमत मार्गांनी बधणार नाही, याची कल्पना मोदींना नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु, ‘लातों के भूत, बातों से नहीं मानते’ या उक्तीनुसार मोदींनी पाकिस्तानच्या कंबरड्यात लाथ घातलीच. ही गोष्ट आधीचे सरकार करू शकले नसते का? मग त्यांनी प्रत्येक वेळी संयमाची मुत्सद्देगिरीच का दाखविली? मुळात भेकडांच्या संयमाला भारतात कदाचित डोक्यावर घेतले जात असेल; पण जगात मात्र त्याकडे ढुंकूनही कुणी बघत नाही. मोदींनी केली तशी कारवाई, तशी हिंमत संपुआ सरकार दाखवू शकले असते काय, हा खरा प्रश्‍न आहे. जे आमच्या रक्तातच नाही, ते आम्ही करून दाखविले, असे म्हणणे म्हणजे एका अर्थाने रक्तद्रोहच मानला पाहिजे. एखाद्या दुबळ्या, भेकड माणसाने शौर्याची, पराक्रमाची ऐट आणली, शत्रूवर मात करण्याची बढाई मारली की, त्याच्या हातून ते घडण्यासारखे नाही, असे सत्य सांगण्यासाठी पंचतंत्रात एक प्रसिद्ध गोष्ट आहे. कोल्ह्यांच्या कळपात लहानाचा मोठा झालेल्या सिंहाच्या छाव्याला, एकदा कळपासोबत जंगलात भ्रमण करीत असता, हत्तींचा कळप दिसतो. ते प्रचंड हत्ती बघून कोल्ह्यांची पिले घाबरून पळू लागतात. हा मात्र त्या हत्तीवर चालून जातो. घरी पळत आलेली पिले आपल्या आईला म्हणजे कोल्हीणीला धापा टाकत सांगतात की, आम्ही एक खूप मोठा हत्ती पाहिला. घाबरून आम्ही पळालो. परंतु आपल्यातील ‘तो’ मात्र त्या हत्तीवर चालून गेला. आम्ही त्याला समजावले. पण त्याने ऐकले नाही. आपल्या अपत्यांची ही तक्रार ऐकून ती शहाणी कोल्हीण मंद स्मित करीत त्यांना म्हणते-
शूरोऽसि कृतविद्योऽसि दर्शनीयोऽसि पुत्रक |
यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते ॥
(मुलांनो, तुम्ही शूर आहात, हुशार आहात, दिसायलाही देखणे आहात. पण ज्या कुळात तुम्ही जन्माला आला आहात, त्या कुळातील लोकांकडून कधी हत्ती मारला जात नाही.) संपुआ सरकारनेही सर्जिकल स्ट्राईक केले होते, हे सांगण्यासाठी जीभ उचलण्यापूर्वी पवार किंवा चिदंबरम् यांनी आपल्या कुळाचे तरी स्मरण करायला हवे होते. कुठल्या कुळाचे संस्कार आपल्यावर आहेत? इंदिरा गांधी यांचे पर्व संपल्यानंतर कॉंग्रेसच्या जनुकात जो ‘क्रांतिकारी’ बदल झाला आहे, त्याचे स्मरण या नेत्यांनी ठेवायला हवे होते. या क्रांतिकारी बदलाविरुद्ध एकदा पवार यांनी बंड केले होते. पण लवकरच त्यांनाही लक्षात आले असावे की, मुळातच आपली जनुके ही कॉंग्रेसची देखील नाहीत. ती, या देशाला, या समाजाला तोडून, प्रत्येकांत संघर्ष लावून देणारी कम्युनिस्ट विचारांची आहेत. आणि नंतर मग त्यांनी देखील आपला हा बंडोबा, थंडोबा केला. सांगण्याचे तात्पर्य हे की, हत्ती बघून घाबरून पळून जाणार्‍या कुळातील या लोकांनी, आम्ही देखील आमच्या काळात हत्तीवर चढाई केली होती, हे फुशारकीने सांगावे आणि ते भारतीय जनतेला ऐकून घ्यावे लागावे, हे किती दुर्दैवाचे आहे नाही! माजी संचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी हा खोटारडेपणा उघड केला नसता, तर समस्त भारतीय जनता माना डोलवत राहिली असती. हा प्रसंग टळला, यासाठी भाटिया साहेबांचे आभारच मानले पाहिजे. कॉंग्रेसचेच एक प्रधानंमत्री नरसिंहराव यांनी अणुचाचणी करण्याचा विचार केला होता; परंतु अमेरिकेने डोळे वटारताच, तो बेत रद्द केला. परंतु, २४ पक्षांचे कडबोळे असलेले सरकार सांभाळणारे भाजपाचे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र हिमतीने पोखरण येथे अणुचाचणी करून दाखविली. त्यासाठी आर्थिक नाकेबंदी देखील सहन केली. भारतातील तद्दन राजकारण्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सिंहाची छाती भाजपाच्याच नेतृत्वात आहे. भाजपाचे कूळ सिंहाचे आहे. आसमंताला थरकापून टाकणारी डरकाळी, सिंहकुलोत्पन्नच मारू शकतात. ऐर्‍यांनी केवळ संयमी मुत्सद्देगिरीचा जप करीत बकर्‍यांसारखी बें बें करीत जगभर फिरावे, हेच बरे.

चिनी मालावर बहिष्कार


चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन वाचून पुरोगाम्यांच्या हृदयाला भोके पडली आहेत. असे केले तर रस्त्यावर या वस्तू विकणारांचे नुकसान होईल म्हणून बहिष्कार टाकू नका अशी आवाहने वाचते आहे. सरळमार्गी मध्यम वर्गाला ते वाचून आपण मोठ्या पापातून वाचलो असे वाटते आणि बहिष्कार नको हे पटते. एक तर अशा वस्तू विकणारांना इतरही अनेक वस्तू विकता येतील. त्यामुळे त्यांच्या नुकसानाचे पाप आपल्या माथी येणार हा भ्रम आहे. सरकारला एवढे वाटते तर त्यांनी बंदी घालावी असेही हे शहाणे सुचवतात. परराष्ट्र संबंधात कधी काय करावे हे या सरकारला कळते आणि ते तसे करेलच. इथे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार चालू आहे. अनेक शहाण्यांनी अमुक गोष्टी कशा फक्त चिनी कंपन्या बनवतात टाका बहिष्कार तुम्हाला स्मार्टफोन मिळणार नाहीत असे पांडित्यही मिरवले आहे. जे भारतात बनत नाही ते इथे बनविण्यासाठीच मोदींनी Make In India ची सुरुवात केली आहे. जेव्हा या वस्तू भारतात बनतील तेव्हा त्याही बंद करू पण आज शक्य आहे तेवढा तरी बहिष्कार टाकणे गैर कसे? एखादा रोग झाला तर सगळे उपाय करणे शक्य नाही म्हणून कोणताच उपाय करू नका असेही हे शहाणे सांगतील. ही एक खूणगाठ बांधा त्यांना माहिती आहे की चिन्यांवर तुमचा राग आहे. तिथे तुम्हाला समजावणे शक्य नाही हे कळते त्यांना. मग काय तर तुम्हाला confuse करणे सोपे. तुमची दिशाभूल करण्यात ते पटाईत आहेत. त्यांना बळी पडू नका.

एक कसोटी देते ती लावून पहा. असाच बहिष्कार कोकाकोला आणि अन्य अमेरिकन मालावर अफगाण युद्ध प्रकरणी इथे भारतातही घालण्यात आला.तेव्हा यातले किती शहाणे हेच मुद्दे घेऊन त्यांना समजवायला गेले होते? नसतील तर ते दुतोंडी ठरत नाहीत का?

दिशाभूल करणारा आपले नुकसान करतो आपला शत्रू असतो.

-Facebook साभार