हिंदुराष्ट्र

सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा
1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे.एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ??मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ??भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ??
2. अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात In The Name Of GOD या वाक्याने होते, तर अमेरिकन डॉलरच्या दहा रुपयांच्या नोटेवर We Trust On GOD असे वाक्य लिहिलेले आहे.पण भारतातील सुशिक्षीत हिंदुना मात्र देवावर श्रध्दा ठेवणे ही अंधश्रध्दा असते असे का शिकविले जाते ??
3. 1947 साली अखंड भारताची धर्माच्या आधारे फाळणी करुन मुस्लीमांसाठी पाकीस्तान व हिंदुंसाठी हिंदुस्तान मंजुर झाला होता .पाकीस्तानने स्वतला अधिकृत इस्लामिक राष्ट्र घोषीत केले पण भारताने स्वतला हिंदुराष्ट्र का घोषीत केले नाही ??
4. स्वातंत्र्यावेळी भारतात 95% हिंदु असुनही व अनेक देशभक्तांची मागणी असुनही राष्ट्रध्वजाचा रंग भगवा का ठेवला नाही ?भगवा व हिरवा रंगाचा पट्टा समान ठेवला त्यामागे काय लॉजीक आहे ??घटना समितीमधे हिंदु महासभेला का स्थान दिले नाही ??
5. भारताला हिंदुराष्ट्र घोषित न केल्यामुळे हिंदु तरुणांचा उस्फुर्त उत्साह दाबला जाउन राष्ट्राचे चैतन्य हरविल्यासारखे वाटत नाही काय ??
6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत शेवटचा हिंदु भारतात येत नाही आणि शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत फाळणीला मान्यता देउ नका,जर असे झाले नाही तर पाकीस्तानातील हिंदु गुलाम होतील व भारतातील मुस्लिम राजकीय बंड करतील. असे म्हणाले होते.त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले गेले ??.
जगामधे स्वित्झर्लंड स्पेन या देशांप्रमाणे अनेक देशान्मधे नविन देश निर्माण झाल्यावर संपुर्ण धार्मीक आधारावर लोकसंखेची विभागणी केली .ती आपल्याकडे का केली नाही ?
7. फाळणीनंतर पाकीस्तानात अडकुन राहीलेल्या दलिताना गुलामासारखी वागणुक दिली गेली.कराचीतील बांधकामावर त्यांचा अमानुष छळ करुन वेठबिगार म्हणुन वापरले गेले.अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले.त्यावर आजपर्यंत एकाही नेत्याने आवाज का उठवला नाही ??
8. सर्व धर्म समान आहेत असे इतर कोणतेही धर्मीय मानत नसताना सर्वधर्मसमभाव हे फक्त हिंदुनाच का शिकविले जाते ???
9. महात्मा गांधी यानी आयुष्यभर गोहत्या बंदी व्हावी यासाठी प्रयत्न केले.गांधींच्या अनुयायानी मात्र स्वातंत्र्यानंतर देशात गोहत्याबंदी कायदा करुन खरी अहिसा का कृतीत आणली नाही.गायींबाबत का अहिंसा गुंडाळुन ठेवली ??
एका बाजुने हिंदुना अहिंसा शिकवुन नेभळट बनविणारे पुरोगामी गोवंशाच्या हत्येचे समर्थन कसे काय करतात ??
10. प्रत्येक हिंदुंच्या सणांवर अनिष्ट रुढी समजुन टिका केली जाते.पण ख्रिस्ती व मुस्लिम यांच्या एकाही सणावर तथाकथीत सुधारणावाद्यांकडुन टिका केली जात नाही असे का ??
11. भारतातील मेडीया फक्त हिंदु विरोधी बातम्या का देतो ??
12. भारतीय मेडीयामधे अरब देशातील मुस्लिम व ख्रिस्ती चर्च यांची मोठी भागीदारी आहे हे जनतेला का सांगीतले जात नाही ??
13. हिंदुत्ववादी नेते मेडीयावरील चर्चेत आले तर त्याना पुर्ण का बोलुन दिले जात नाही ??
14. हिंदु नेते व धर्मगुरु यानी हिंदुंच्या हिताच्या काही बाबी सांगीतल्या तर मेडीया त्याला वादग्रस्त वक्तव्य का म्हणते ??हिंदु हिंदुंच्या हिताबद्दल बोलणार नाहीत मग इतर धर्मीय मुल्ला व पाद्री हिंदु हिताबद्दल बोलणार आहेत का ??
15. कुटुंबनियोजनाद्वारे छोटे ;कुटुंब सुखी कुटुंब हे फक्त हिंदुवर का लादले आहे ??कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात कुटुंबनियोजनाला थारा नाही.! अष्टपुत्र सौभाग्यवती भव ! हा हिंदु स्त्रीला दिला जाणारा आशिर्वाद असतो.जगात कुठेही असला कार्यक्रम राबविला जात नाही.इतर धर्मीय मात्र त्यांची लोकसंख्या वेगाने का वाढवित आहेत ?? हे हिंदुना गाफील ठेवण्याचे षडयंत्र नाही काय ??
16. भारतात कायद्यापुढे समानता आहे असे म्हणता मग मुस्लिमाना चार बायका करायला कायद्याने परवानगी दिली ,हिंदुना मात्र बंदी का केली ?मुस्लिमाना चार बायका करायला परवानगी देताना कुराणाचा आधार घेतला ,पण हिंदु देवान्मधे देखील बहुपत्नीवाची प्रथा होती हे का दुर्लक्षीत ठेवले.यामागे हिंदु लोकसंख्या कमी करायचा डाव नाही काय ??
17. घटनेप्रमाणे प्रत्येक नागरीकाला त्याच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.शिख लोकाना त्यांचे धर्मात सांगीतले आहे म्हणुन अधिकृतरित्या शस्त्र बाळगायला परवानगी दिली.मग हिंदुंच्या तर प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे.विना शस्त्राचा कोणताही हिंदु देव नाही .हिंदुंचा दसरा (विजयादशमी )हा सण शस्त्रपुजनासाठी असतो.तरी सुध्दा हिंदुना शस्त्र सोबत बाळगायला का बंदी घातली ??
18. फक्त गुलामगीरीत जनतेला निशस्त्र केले जाते.अमेरिका इंग्लंड फ्रांस जर्मनी व इतर सर्व लोकशाही देशातील जनतेला आधुनिक रायफली सोबत बाळगायला परवानगी आहे तर मग भारतात का नाही ??औरंगजेब व इंग्रज याना देशातील हिंदुंची भिती वाटत होती म्हणुन त्यानी हिंदुना निशस्त्र केले होते.स्वातंत्र्य मिळुनही भारतीयाना अजुनही निशस्त्र का ठेवले आहे ??हे हिंदुमधील क्षात्रतेज नष्ट करण्याचे षडयंत्र नाही काय ??
19. हिंदुंवर झालेल्या अन्यायाची बातमी मेडीया का दाखवत नाही ??
20. जगामधे इस्लामिक जिहाद्याना जिहादी असा शब्द वापरला जातो.भारतात मात्र त्याना अतिरेकी हा मोघम शब्द वापरुन हिंदुंपासुन वस्तुस्थिती का लपविली जाते ??
आतंकवादी कारवाया कोणत्या धर्माचे लोक करतात हे माहीत असुनही आतंकवादका का कोइ धर्म नही होता असा डायलॉग का वापरला जातो.?
21.जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा नेहरु यांचा विवाह फिरोज खान यांचेशी झाला होता हे सर्वाना माहीत आहे.मग लग्नानंतर इंदिरा नेहरुचे नाव इंदिरा खान व्हायला हवे होते पण ते तसे न होता इंदिरा गांधी असे कसे काय झाले.फिरोज खान हा काही महात्मा गांधींचा मुलगा नव्हता.नेहरु हे काश्मीरी तर महात्मा गांधी हे गुजराती बनीया समाजाचे ,हे एकमेकांचे दुरुनही नातलग नव्हते . खानाची पुढील संतती खान आडनावाने ओळखली जायला पाहीजे होती .पण तसे न होता भारतीय जनता त्याना अजुन भोळेपणाने गांधी परिवार म्हणुन कसे काय समजते ??
22.देशातील साठ हजार हिंदु मंदीरांचा ताबा सरकारने घेतला असुन तेथे देवाला अर्पण केलेला भक्तांचा पैसा सरकारजमा केला जातो.मात्र एकाही मशिदीचा व चर्चचा ताबा सरकारने घेतला नाही असे का ??
23.हिंदु मिरवणुकीवेळी जाणुनबुजुन दंगल कोण करते हे माहीत असुन देखील हिंदुंवरच गुनहे का दाखल केले जातात ??
24.चित्रपट व जाहीरातीन्मधे हिंदु साधु संत यांची टिंगळ केली जाते.त्याना जोकर अथवा खलनायक दर्शविले जाते..पण मुस्लिम मौलवी व खिस्ती पाद्री यांचे कधीच विडंबन करण्याचे धाडस तथाकथीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावाले कधीच करत नाहीत.यामागे कारण काय आहे ??
25.बॉलीवुडमधे अलिकडे बहुतेक सर्व नायक मुस्लिम व नायीका हिंदु अशीच जोडी का दाखविली जाते.हिंदु नायक व मुस्लिम नायीका अशी जोडी का दाखवत नाहीत ??यामागे नट्यांप्रमाणे कॉलेज हिंदू तरुणीना आपणही मुस्लिम जोडीदार शोधावा असे त्यांच्या मनावर बिंबविण्याचे षडयन्त्र वाटत नाही काय ??
26.स्त्रीमुक्तीवाल्या कार्यकर्त्या हिंदु स्त्रीयांची थोडीफार शिल्लक असलेली सामाजीक बंधने नाहीसी करुन व त्याना स्वैर वागायला शिकवुन इतर धर्मीयांच्या जाळ्यात अडकवायला का मदत करत आहेत ??स्त्रीमुक्तीचळवळ हळुहळु कपड्यांपासुनच्या मुक्ततेकडे का वाटचाल करत आहे ??बुरख्यातील मुस्लिम महिलेच्या दुस्थीतीबद्दल बोलायला पुरोगामी स्त्रीमुक्तीवाल्यांचे तोंड का उघडत नाही ??
27.सरकारी शाळान्मधुन मुस्लिमाना धर्मशिक्षण द्यायला परवानगी आहे मात्र हिंदुना धर्मशिक्षण द्यायला बंदी आहे असे का ?हिंदु मुलानी धर्मशिक्षण कोठे घ्यायचे ?
हिंदुनो आता तरी जागे व्हा..
आणि धर्मरक्षणाकरीता एकञ या...

-
Satish More
https://www.facebook.com/satish.more.39108 https://www.facebook.com/satish.more.39108/posts/1644826969127759

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण
तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड !
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते !
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !
जगद्गुरु तुकोबाराय
सर्वप्रथमच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की ह्या लेखाचा उद्देश्य ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्याचा आहे.
चरितम् शिवराजस्य भरतस्यैव भारतम् !
शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.शिवाजी महाराज खरंच गोब्राह्नणप्रतिपालक होते का?? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे ??? नक्की गौडबंगाल काय आहे हे??? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टाहास !
गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय???
महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किॅवा नाही हे पहायच्या आधी गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे नक्की काय हे समजुन घेऊ. गो म्हणजे गाय ही हिॅदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी "अघ्न्य" म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असं प्रतिपादन करतात. त्यांचा शंकांचं निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश्यही नाही. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी गाईंचे संरक्षण नि प्रतिपालक स्वत:ला म्हटलं तर त्यात पाप ते काय??? पोटात गोळा यायचं कारण काय??? डाॅ आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिॅदु धर्मावर टीका करणारा मनुष्य देखील देखील गोहत्या करु नका असं त्यांच्या Untouchables - who were they ह्या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात
जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती.
आता ब्राह्मणांविषयी !
ब्राह्मण कुणाला म्हणाव ह्याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणे !
यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण: !
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। !
म्हणजो जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो, किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचं पालन करतो तो ब्राह्मण ! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आतारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण !
समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितलं आहे
करिती ब्रह्मनिरुपण ! जाणती ब्रह्म संपूर्ण !
ते चि जाणावे ब्राह्मण ! ब्रह्मविद् !
दशक ६.४.२४
हे ब्रह्मनिरुपण किॅवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात
जयांसि झाले आत्मज्ञान ! ते चि थोर महाजन !
वेदशास्त्रे, पुराणे ! साधु-संत बोलिले !
दशक - ६.४.१९
ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान ! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किॅवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्नण.
आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किॅवा आचारसंहिता आवश्यक आहे ती गोतेत भगवंत खालीलप्रमाणे सांगतात
शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च !
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् !
शम, दम् तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किॅवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.
आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे??? अशा व्यक्तींचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय??? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किॅवा तत्वज्ञ किॅवा काहीही मार्गदर्शक आहोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत Z Plus सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचं प्रतिपालन केलॅ असेल तर त्यात बिघडलं कुठं???? ह्याचं पाप ते काय??? किॅवा ह्यात जातीवाद तो काय???? ह्यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय???
हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते ! हे घ्या पुरावे ! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न !
सर्वप्रथम आपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे
ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा
नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्नण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछ्त्रपतींनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुको राम ह्याला पत्र लिहिल आहे
"नलावड्याने मराठा होऊन ब्राह्नणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला."
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ क्रमांक २४ चे पत्र
समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे
शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते. आणि ह्याबाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. हे शिवचरित्र जरी अफझुल्ल्याच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपतींच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे. शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी ह्या ग्रंथात शिवजन्माची नि अफझुलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळते ह्यावरूनच ते त्याला कुणीही आक्षेप त्यावेळी तरी कुणी घेतलेला नाही. ह्यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती होती त्यामुळे ते विश्वसनीय खात्रीनेच आहे. अफझुलखान प्रकरणात आणि आग्राच्याही प्रकरणात परमानंद शिवछत्रपतींबरोबर होते ह्याचा पुरावा आहे. आता गोब्राह्नणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु.
देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक: !
(पहिला अध्याय १५ वा श्लोक)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्नण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा
देवानां ब्राह्नणानां च गवां च महिमाधिकम् ! ३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचं वर्णन आहे
त्याकाळच्या स्खितीचं वर्णन करताना परमानंद म्हणतात
न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय: !
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोsपि !
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(५ वा अध्याय ४०-४२)
अफझुलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात
सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम् !
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच
शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंदांच्या ब्राह्मण ज्ञातीचा अडसर वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु.
आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु
ह्या सगळ्यावर संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिलं आहे त्यातील पुरावे !
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - २४ आॅगस्ट, १६८०
"सुरुवातीला शंकराला नमस्कार, सद्गुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार !"
पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो तो शंभुराजा असा मी
शिवरायांचे वर्णन करताना ते म्हणतात
शिवराय हे शंकराचे अवतार, वेद,
शास्त्र, स्मृति, आगम, पुराण ह्यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे सरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिॅदुधर्माचा जीर्णोध्दार ज्याने केला, अफझुलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृंसिहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता !"
आता स्पष्टपणे वर ते शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय??? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल तर ह्या खालील पुरावे पहा.
शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण
पुन्हा एकदा हे सांगणं आवश्यक आहे की ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्नण ठरतो. जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात
अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !
खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,
ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ अध्याय १२ ते १४ श्लोक
दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.
ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....
शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात
धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता ह्यांचा आशिर्वाद,
सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
ह्या पेणा आणखी काय पुरावा हवाय???
आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक का म्हटलं नाही???? त्याला आमचं उत्तर
कुणाचं नाव घेऊ नये ह्याची शास्त्रात जी यादी आहे त्यात स्वत:चे व गुरुचं नाव घेऊ नये.
आत्मनाम गुरोर्नाम नामानि कृपणस्यच !
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो: !
मी मी म्हणु नये थोडक्यात स्वत:चं कौतुक करू नये, गुरुचं नाव घेऊ नये, कंजुस माणसाचं नाव घेऊ नये, ज्येष्ट पुत्राचं आणि बायकोचं नावघेऊ नये असं शास्तर सांगतं.
शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसं मिरवलं नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हचे असं म्हणणं जसं मुर्खपणाचंच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक असं मिरवणंही तितकंच अप्रस्तुत वाटतं. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावडयाचा पत्रातून हे स्पष्ट होतंच आहे.
ह्याच्या उपरही काहीजणांना शंका असेल तर त्यांच्यापुढे आम्हांस हतबलच वाटेल. त्यामुळे इथेच लेखणीला विराम देतो.
प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिॅदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंतश्रीशिवछत्रपती महाराज की जय !!! हिंदुराष्ट्र की जय !!! आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय !!! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!
तुकाराम चिंचणीकर
tukaramchinchanikar.blogspot.com

पालकानो तुमची मुल सांभाळा

आपली बहिण फॅशनेबल कपडे घालते, व्हॉट्सअपवर मुलांशी बोलते म्हणून चिडलेल्या भावाने चक्क काठी आणि पाईपच्या सहाय्याने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कुठे चाललो आहोत आपण?

हो धक्कादायक. नक्कीच टोकाची भुमिका आहे.
इतक करायची गरज नव्हती.
वाट पहायची बहीणीचे फोटो विडीयो व्हाट्सप आणि इतर पॉर्न साईट्सवर.
जाणता अजाणता कितीतरी मुली पायरी ओलांडुन जातात, पहिल्या प्रेमाच्या आणाभाका निभावताना बॉयफ्रेंडला सर्वस्व देऊन बसतात. मग कधी खुशीने कधी जबरदस्तीने MMS बनतात.
दृश्यम ह्या चित्रपटात एक झलक दाखवली गेली. किती जणानी सॅमच्या हत्त्येच समर्थन केल?

तेव्हा , पालकानो तुमची मुल सांभाळा.
तुमची मुल मुली कुठे आणि कोणासोबत जातात
हे त्यानाच मित्र बनुन विचारा. मुलांच्या भविष्याची चिंता असेल तर आत्ताच उपाय करा.
जबरदस्तीने ह्या समस्या सुटत नाहीत. मुलांचे मुलींचे जे काही प्रश्न किंवा कुतुहल असेल त्याचे उत्तर त्याना व्यवस्थित द्या, तुम्हाला माहित नसल्यास लैंगिक शिक्षणाच्या साहित्याचा वापर करा.
सध्या कुमारी माता आणि गर्भपाताचे प्रमाण वाढत आहे, सावध व्हा. तुमच्या मुलाना सावध करा.

अन्यथा पुढचा बळी तुमच्या मुलांचा असु शकतो

शिकाल तर पुढे जाल

नुसते शिक्षण घेउन कसे चालेल?
ज्या व्यवसाय उद्योग रोजगारात आपण आहोत त्याची आवड पाहिजे.
आणि अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे त्यापासुन शिकाल तर पुढे जाल.
व्यवस्थापन , वितरण, जाहिरात आणि विक्री ह्या 4 पैकी एका क्षेत्रात तुम्हाला प्राविण्य मिळवता आल तर खुप फायदा होऊ शकेल.

क्रांती आणि आपण

आपण जेव्हा हात जोडतो किंवा हात टेकतो तेव्हा जबाबदारी दुसर्यावर सोडतो.

लोकशाहीने अधिकार आणि अभय दिले आहे.

शेवटी माणसच आहेत ती, स्वत:च्या स्वार्थानेच वागणार.
आणि राजकारणात शुचितेला स्थान नाही. तिथे पाहिजे जातीचे.

निष्काम कर्मयोग करणार्यानासुद्धा प्रसुद्धीची हाव असतेच.

माणुस कुठलीही व्यवस्था बदलायचा प्रयत्न करतो,
तेव्हा ती व्यवस्था त्या माणसाला बदलायचा प्रयत्न करते.
आणि जेव्हा माणुस बदलत नाही तेव्हा क्रांती घडवुन येते.

शाई (अर्ज विनंत्या उपोषण) सांडुन क्रांती होण्याची अपेक्षाच करु नका.

जगातल्या प्रत्येक यशस्वी क्रांतीसाठी रक्त सांडले आहे.

त्यासाठी आम्ही तयार नाही!!

जात पात उच्च नीचता

८०० वर्षांच्या इस्लामी आणि २०० वर्षांच्या फिरंगी आक्रमणात हिंदु धर्माच्या रीती बदलल्या गेल्या.
सहिष्णु सर्व समावेशक हिंदु धर्मात जात पात उच्च नीचता आली.

जो पर्यंत शंकराचर्य व धर्मगुरुंचा राज्यसत्तेवर व समाजव्यवस्थेवर नैतिक अधिकार होता, तो पर्यंत हिंदु धर्मात कर्मावर आधारीत स्थान, हक्क आणि अधिकार मिळत होते.

पण परकीय आक्रमणाच्या धर्मव्यवस्थेला स्वत:चे रक्षण करता आले नाही, त्याचा फायदा घेत राज्यकर्ते आणि धर्माच्या व्यापार्यानी जन्मावर आधारीत पद्धती रुजु केली. त्यामुळे जाती पातीचे उच्च शुद्रतेचे पाखंड निर्माण झाले.

परकीय आक्रमकानी बळजबरीने केलेल्या धर्मांतरानंतर ह्या पाखंडानी आपल्याच धर्म बांधवाना दुर लोटले. ते कालांतराने कट्टर परधर्मीय बनले.

इंग्रज जाताना हिंदु धर्मावर शेवटचा वार करुन गेले, त्यानी प्रत्येक सरकारी कागदावर जात आणि धर्म लिहायला सुरुवात केली, जातीच्या आधारावर नोकरी आणि इतर सरकारी सुविधा दिल्या.

आणि आपल्या राज्यकर्त्यानी आंधळेपणाने तेच स्वीकारल.

आज शोषण व आरक्षणाच्या नावाने भुंकणार्या नेत्यांची संपत्ती बघा, गेल्या 65 वर्षात आरक्षणाचा फायदा कोणी घेतला ते बघा, मगच आरक्षण मागा.

आरक्षण

ब्राम्हणानी कोणाला थांबवलय ?
आधीचे सगळे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ब्राम्हण होते का?
कुठले ब्राम्हण उद्योगपती तुम्हाला पात्रता असताना नोकरी देत नाहीत?
कुठले शाळा कॉलेज ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत आणि तुम्हाला प्रवेश देत नाहीत ?

भारतातली बहुतेक प्रमुख शाळा, कॉलेज, कंपनीच्या मॅनेजमेंट कमीटीवर जे नेते आहेत
त्यांची जात बघा, मग आरक्षण मागा.

उगाच बोंबलतात कुणाच्या पण नावाने.
गेली 68 वर्षे आरक्षण होत कि नव्हत ? 
आरक्षणाच्या जोरावर शिक्षण घेतलेले मागास वर्गीय कुठे गेले?
का नाही ते राजकारणात आले,
का नाही बाकिच्यांची प्रगती झाली?
तुमच्या नेत्यांची प्रॉपर्टी बघा मग आरक्षण मागा.

मी स्वत: खुल्या वर्गात (open category) आहे.
SC NT OBC Minority वाले शिकुन इंग्रज बनले, स्वत:च्या जाती पासुन लांब राहु लागले, 
का ते विचारा त्याना, मग आरक्षण मागा.

इतक करुन आरक्षण पाहिजे असेल,
तर काढा स्वत:ची शाळा कॉलेज कंपन्या
आणि बघा आरक्षण कोटा ठेवला तर काय होते ते.
आता शाळा कॉलेज सुरु करण्या साठी पैसा पाहिजे असेल तर तुमचे कान भरवणार्या नेत्याकडे बघा,
शेकडो एकर जमीन लाखो करोडो रुपये आणि गाड्या आहेत.
जमतय का बघा , मगच आरक्षण मागा.

काॅलेज जीवनातील भन्नाट कविता...

इंटरनेटवरून साभार

कॉलेजचे गेट
झाली तिथे भेट,
घुसलीस थेट मनात
देशील का मला डेट ?
मी शिरा तू रवा
तू फुगा मी हवा
तू पोळी मी तवा
सांग तुला मी हवा?
तू तपकीर मी चिमूट
मी शेंगदाणा तू कूट
मी दरोडा तू लूट
जमेल का मेतकूट ?
तू धाप मी छाती
मी भूत तू भानामती
मी शनि तू साडेसाती
जुळतील का आपली नाती ?
तू कोबी मी गड्डा
तू दारू मी अड्डा
तू रस्ता मी खड्डा
तू बुटकी मी गिड्डा
मी पेट्रोल तू गाडी
मी गवत तू काडी
मी विजार तू नाडी
जमेल का आपली जोडी?
तू हेल्मेट मी डोकं
मी बनियन तू भोकं
तू टूथपेस्ट, मी खोकं
रहा तू निर्धोकं
तू ढोल मी ताशा
मी बेवडा तू नशा
तू मिठाई मी माशा
ठेवू का मी आशा?
मी वरवंटा तू पाटा
तू संगणक मी डाटा
तू टेल्को मी टाटा
होतील का एक वाटा?
तू वाजंत्री मी ताशा
तू मिठाई मी माशा
तू बोली मी भाषा
ठेवू का एवढी आशा?
मी पाणी तू घागर
मी चहा तू साखर
जोडा जमेल सत्वर ?