वटपौर्णिमा,

सर्व विवाहीत स्त्रिवर्गाला एक आग्रहाची विनंती....

स्वत:च्या पतीच्या प्राणासाठी वडाच्या झाडाचे प्राण घेवू नका...!!

तरी कृपया घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याचे टाळा व अश्या प्रकारे वडाच्या फ़ांद्या तोडणा-यांना आवर घाला.

घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून मिळणारा लाभ मिळेल का ???

मृगाचे मनःपुर्वक स्वागत

ऑफिसमधे काम करत असतांना सहज नजर वर गेली आणि दिसलं की आकाशाच्या एका कोप-यात सूर्य, आपलं देखील अस्तित्व आहे असं काहितरी त्या काळ्या काळ्या मोठाल्या ढगांना सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रकार आहे बघावं म्हणून जागेवरून उठुन खिडकीपाशी गेले तर दिसलं की संपूर्ण आकाश काळ्या-निळ्या ढगांनी अगदी गच्च भरून आलंय आणि आता कधीहि पावसाला सुरूवात होईल....हे सगळं बघुन कुठेतरी मनात तुझा विचार चमकला आणि का काय माहित खुप हुरहूर वाटायला लागली....अगदी एकटं असल्याचा भास झाला...आजची संध्याकाळ खूप अवघड जाईल सरायला असं वाटायला लागलं...आणि अचानक एक विचार चमकला, ह्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे उमगलं, तू भेटू नाही शकत हे दिवसभर मनाला समजावून सांगितलं तरीहि त्याचं वाट बघणं आणि त्या वाट बघण्यात संध्याकाळचे चार तास चौपट झाल्यासारखं वाटणं ही सगळी प्रक्रिया काळिज चिरत जाते आणि आपल्याला ह्या धार-धार कात्रिला कुठेही थांबवता येत नाही!!! आह!!!

अजुन मी खिडकीपाशीच उभी होते...मधल्या वेळेत सूर्य कधी अस्ताला गेला आणि उरलं-सुरलं आकाशही त्या ढगांनी व्यापुन गेलं कळलंच नाही आणि बघता बघता पाउस सुरू पण झाला...पहिला पाउस!! एक मन अगदी लहान मुलाप्रमाणे उडया मारत होतं आणि दुसरं मन तुझ्या आठवणींनी अगदी काठोकाठ भरून आलं होतं....ह्या सगळ्या विचारांमधे मी कधी ऑफिसच्या बाहेर पडले ते माझा मलाचं कळालं नाही...मग पहिला थेंब, दुसरा, तिसरा आणि आणि सहस्त्र जलधारा...पहिल्या पावसात मी पुरती भिजले अगदी खोल खोल आतपर्यंत...जणू तुच मला सहस्त्र धारांनी कवेत घेतलस....



प्रियांका जगदिश जोशी

http://maziblogbhoomi.blogspot.com/

रामदेव बाबा आणि काळा पैसा !!

काळा पैसा ठेवलाय स्विस बॅकेंत ! सगळा पब्लिसिटी सस्टटं आहे! स्विस बॅकेंतून कोणत्याही प्रकारची माहिती उघड केली जात नाही मग ठरवणार कसे की काळा पैसा आहे कुठे आणि किती ?
आतापर्यंत एवढे घोटाळे झाले पण कधी कोणी घोटाळ्यातला पैसा सरकारजमा केलेला ऐकलाय का?

शिवराज्याभिषेक दिन



छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक र...ायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम रामदास स्वामी आणि आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशिर्वाद घेतले.
त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले (तत्पूर्वी क्षत्रियधर्मानुसार कर्मे न केल्याबद्दल.). जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.
दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. यानंतर दोन ब्रह्महत्या पूर्वी कधीतरी झाल्या होत्या याबद्दल ८००० होन प्रायश्चित्त म्हणून देण्यात आले.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशिर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरुन गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशिर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशिर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले....