भीमा-कोरेगावचं वास्तव

आता १ जानेवारी निमित्त "भीमा-कोरेगावच्या" पोस्ट्स पडतील. पण आपल्या माणसांना पारकीयांचा राज्य करण्याच्या हेतूने आपल्यातच भांडणं लावून देण्याचा कआवा कधीच समजला नाही असं दिसतंय.. भीमा-कोरेगावचं वास्तव काही वेगळं आहे पण इंग्रजांनी राज्य करण्याच्या हेतूने "फोडा आणि राज्य करा" ही नीति अवलंबली आणि आपली माणसं अकारण बळी पाडली. वास्तविक याला "महार विरुद्ध ब्राह्मण" हे लेबल नंतर चिकटवण्यात आले. वास्तविक, ही मनस्थिती तत्काळी कोणाचिही नव्हती. दुसर्या बाजीरावांच्या काळात महार समाजाला सरंजाम सुद्धा दिल्याचा एक उल्लेख त्यांच्याच रोजनिशीत सापडतो. शिवाय, मराठी फौजेत "अरब" होते बहुतांशी. शिवाय '५०० महारांनी २५००० ब्राह्मणांचा केलेला पराभव' वगैरे अतिशयोक्ती तर हास्यास्पद आहे, कारण मूळात, मराठी फौजेत मूठभर ब्राह्मण वगळता बहुतांशी अब्राह्मण होते, त्यामूळे हा दावाही फोल ठरतो. इंग्रजांना चार वर्षानंतर केवळ येथे हा 'तथाकथित जयस्तंभ' उभारावा लागतो यातच सारे स्पष्ट होते. पण ना इथल्या ब्राह्मणांना हे कधी समजले ना ब्राह्मण विरोधकांना ! दोघेही इंग्रजांच्या या अपप्रचाराचे बळी पडले. "भीमा-कोरेगाव" ची लढाई इंग्रजांनी मुळात "जिंकली" नसून 'इंग्रजांना इतके मारले, आता आणखी काय करणार' म्हणून मराठी फौजा दक्षिणेकडे वळल्या, पण याअलाच चार वर्षानंतर इंग्रज "आमचा विजय झाला" असं समजतात, समजो बापडे, आपल्याला काय.. पण भीमा कोरेगावचे वास्तव काय आहे ? आपण गैरसमजातून आपल्याच समाजात दुही पसरवतोय का ? पाहुया-
================================================
भीमा-कोरेगाव : विजयाची कहाणी


दि. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळ कोरेगाव येथे झालेल्या तिसर्या इंग्रज-मराठा युद्धातील एका चकमकीत इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला खरा, पण इंग्रजांनी “झाकली मूठ सव्वा लाखाची” या उक्तीनुसार जगासमोर आम्ही जिंकलो अशी हूल उठवली आणि त्यातही, इथल्या जाती-पातींमध्ये भांडणे लावून द्यायला ‘महार रेजिमेंट’ विरुद्ध ‘पेशवा’ वगैरे किनार या वादाला मुद्दाम जोडून दिली. वास्तविक पाहता, तत्कालीन पुरावे अभ्यासल्यास, या युद्धात इंग्रजी फौजांची अक्षरशः लांडगेतोड मराठी फौजांनी केली असून या फौजांच्या मदतीला येणार्या दुसर्या इंग्रजी फौजांनाही सतावून सोडले होते हे आपल्याला सहज लक्षात येईल. काय आहे ही कोरेगावची मराठ्यांना अभिमानास्पद असलेली लढाई ?
येरवड्याच्या लढाईनंतर दुसरे बाजीरावसाहेब एकदम दक्षिणेकडे वळले आणि त्यांनी वर्तुळाकार पलायन सुरु केले. इंग्रजांना बाजीराव ‘पळत आहेत’ असे वाटणे स्वाभाविक होते, पण हा ‘गनिमीकावा’ काही इंग्रजांच्या लक्षात आला नाही, आणि आला तेव्हा मात्र बराच उशीर झालेला होता. येरवड्यानंतर मराठी फौजा या पुरंदर-माहुली करत पुसेसावळीला येऊन पोहोचल्या. माहुलीला पेशव्यांना सरलष्कर अप्पा देसाई निपाणकर येऊन मिळाले. पुसेसावाळीहून मिरजमार्गे बाजीराव दक्षिणेकडे न जाता थेट पूर्वेकडे पंढरपूरच्या रोखाने वळले. इंग्रजांच्या फौजा, अजूनही बाजीराव दक्षिणेच्या रोखाने जात आहेत असे वाटून पुसेसावळीत आल्या तेव्हा त्यांना बाजीरावांनी आपल्याला चकवले हे त्यांच्या ध्यानात आले. पुढे या इंग्रजी फौजा पंढरपुरच्या रोखाने येत असताना सेनापती बापू गोखल्यांच्या सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. बाजीरावसाहेब पुढे येथून नगर जिल्ह्यातील पीरगाव आणि तेथून नाशिकच्या दिशेने वळले. बाजीरावसाहेबांच्या या हालचाली इतक्या जलदगतीने केलेल्या आहेत की इंग्रजी फौजांना आता बाजीरावांचा पाठलाग करणे अशक्य होऊ लागले. मराठयांचा “गनिमीकावा” काय असतो याची ब्रिगेडीअर जनरल स्मिथला खात्री पटून तो मोठा तोफखाना सोबत नेण्यामूळे कंटाळला आणि नाशिककडे जाण्याचा नाद सोडून तो शिरूरला पोहोचला. तेथे त्याने आपला तोफखाना मागे ठेवून सड्या फौजेनिशी प्रवरा नदीच्या काठी संगमनेरला येऊन पोहोचला.
आतापर्यंत स्मिथची अशी समजूत होती की बाजीराव नाशिकला गेले आहेत. पण संगमनेरवरून बाजीरावसाहेब त्रिंबकजी डेंगळ्यांच्या सोबत थेट डाविकडे वळून ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून थेट पुण्याकडे वळले हे ऐकताच स्मिथ अगदी रडकुंडीला आला. बाजीराव स्मिथला झुकांड्या देत दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पुण्याजवळ चाकण येथे जाऊन पोहोचले. येथून पुणे आता अगदी जवळ, म्हणजे जेमतेम आठ कोस (साधारणतः २५ किमी) होते. १८ नोव्हेंबरला पुणे सोडल्यापासून सुमारे दीड महिन्याच्या अवधीत पुरंदर, सालप्याचा घाट, माहुली, पुसेसावळी, मिरज, पंढरपूर, पीरगाव, संगमनेर, ओझर, जुन्नर, खेड आणि चाकण करत बाजीराव पुन्हा पुण्याजवळच आले आणि आपल्याला गोल फिरवून दमण्याचा बाजीरावांचा “गनिमीकावा” इंग्रजांच्या चांगलाच लक्षात आला. गेल्या दीड महिन्यात दहा-बारा ठिकाणच्या मुक्कामात आणि सुमारे दोनशे कोसांच्या प्रवासात स्मिथला बाजीरावांचे नखही दिसले नाही, यावरूनच या सार्या रणनीतीचे यश स्पष्ट होते. ही तर इंग्रजांना नामुष्कीची गोष्ट होतीच, पण त्याहूनही नामुष्कीची गोष्ट असही, की ज्या पेशव्यांना इंग्रजांनी पुण्यातून पळवून लावले असा डंका ते पिटत होते ते पेशवे इंग्रजांनाच मूर्खात काढून अगदी सहज दीड महिन्यात पुन्हा फिरून पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते. म्हणजे गोर्यांचा सारा खटाटोप गेला की फुकटच. दीड महिना इंग्रजी सैन्य बाजीराव हाती लागतील या आशेने उगाच रानोमाळ फिरत राहीले. बाजीरावांनी या सगळ्या खेळात एक अशी चाल खेळली होती की सैन्याच्या मागे लहान तुकड्या इंग्रजांच्या नजरेस पडतील अशा पद्धतीने मुद्दाम रेंगाळत राहत, आणि बाजीराव गेले त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने हळूहळू सरकत. साहजिक, इंग्रजांना बाजीरावही याच वाटेने पुढे गेले आहेत असे वाटे आणि दुसर्या वाटेने पेशवे बरेच पुढे गेले याची खात्री पटताच मागे असणार्या या तुकड्या जंगलात हळूच काढता पाय घेत. मग मात्र इंग्रज सेनाधिकारी विचार करण्या शिवाय काहीकरू शकत नसत.
बाजीराव चाकणला पोहोचले तेव्हा कर्नल बर या नावाचा अधिकारी पुण्याच्या इंग्रजी तुकडीचा प्रमुख होता. त्याने स्मिथचा पत्ता नाही आणि बाजीराव तर आता केव्हाही पुण्यावर हल्ला चढवू शकतात हे पाहताच काहीतरी मदत मिळावी असं म्हणून शिरूरला कॅप्टन स्टाँटनकडे मदत मागितली. शिरूरच्या, पाचशे बंदुका, दोन तोफांसह पंचवीस गोरे गोलंदाज, आणि तीनशे मराठी लोक असणार्या या पलटणीला “सेकंड ग्रेनेडीअर अथवा सेकंड बटालिअन” असे म्हणत. बरचा निरोप आल्यावर स्टाँटन ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता शिरूरहून निघाला आणि दि. १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी १० वाजता कोरेगाव नजिकच्या एका टेकडीवर जाऊन पोहोचला. अर्थात, आपण आत्ता पुणे घेतले तर पुन्हा अडकू हे माहित असल्याने बाजीरावांनी पुण्याला वळसा घालून येणार्या स्टाँटनला मराठी हिसका दाखवत, वाट मोकळी करून पुन्हा दक्षिणेकडे जाण्याचे ठरवले. स्टाँटनला याची काहीच खबरबात नव्हती. १ तारखेला सकाळी तो टेकडीवरून खाली पाहतो तर भीमा नदीच्या खोर्यात त्याला पेशव्यांची प्रचंड फौज दिसली. एवढ्या मोठ्या सैन्यापासून आता आपला काही बचाव होत नाही हे पाहताच स्टाँटन आपली पलटण घेऊन जवळच असणार्या कोरेगावात शिरला. इंग्रज गावात शिरत आहे हे पाहताच त्यांना मारण्यासाठी आणि मुख्यतः त्यांची गळचेपी करण्यासाठी मराठी फौजेच्या एका तुकडीनेही इंग्रजांवर चालून घेतले. कोरेगावला चारही बाजूंना तटबंदी होती. येथेजास्त वेळ काढणे उपयोगी नाही म्हणून केवळ तीन हजारांची एक तुकडी मागे ठेवून पेशवे सोलापूरच्या रोखाने निघून गेले.
इंग्रज रात्रभरच्या प्रवासाने दमलेले होते, अशातच सकाळी सकाळी युद्धाचा प्रसंग उभा ठाकला. इंग्रजी तोफा आधी भीमेच्या रोखाने वाळवंटात उभ्या होत्या पण मराठे दुसर्याच्य बाजूने हल्ला करू लागले हे पाहताच इंग्रजांनी नाईलाजाने त्या तोफा तटबंदीच्या आत घेतल्या आणि मार्याच्या ठिकाणी बसवल्या. इंग्रजांचे पाणी मराठ्यांनी तोडले होते. भीमेवर मराठी चौक्या बसल्या असल्याने इंग्रजी सैन्याला पाण्याची वानवा होती. अशातच, पेशव्यांच्या फौजेतील अरबांनी इंग्रजांवर चालून घेतले आणि त्यांची एक तोफ बंद पाडली. या तोफेवरील इंग्रज अधिकारी लेफ्टनंट चिशोम याला ठार मारण्यात आले आणि विजयाप्रित्यर्थ त्याचे मस्तक पेशव्यांकडे पाठवण्यात आले. इंग्रजांकडील लेफ्टनंट स्वाँस्टन, लेफ्टनंट कोनलन आणि असिस्टंट सार्जंट विंगेट यांना जबरदस्त जखमा झाल्या. विंगेटला गावातील एका धर्मशाळेत हलवण्यात आले असता अचानक मराठी फौजांनी ती धर्मशाळा काबिज केली आणि विंगेटलाही ठार केले. एवढ्यात इतर काही इंग्रज अधिकारी तेथे आल्याने बाकीचे दोघे अधिकारी वाचले आणि मराठ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याशिवाय गावात एक मोठी मजबूत गढी होती. इंग्रजांची नजर तीच्यावर पडण्याआधीच मराठी फौजांनी ती गढी काबीज केली. आता येथून इंग्रजी फौजांना मारणे चांगलेच शक्य होते. मराठे मोक्याच्या जागी पोहोचले हे पाहताच इंग्रजांची पाचावर धारण बसली.
इकडे रात्र झाली आणि दिवसभरात पेशवे लांबच्या मजला मारत खूप पुढे निघूलन गेले हे पाहताच मराठी फौजांनी आपले काम झाले असे समजून हळूच काढता पाय घेण्याचे ठरवले, कारण पुन्हा स्मिथच्या फौजा कोरेगावनजिक आल्या तर आपण आतच अडकू त्यामूळे तसंही इंग्रज मोडले आहेत, येथून गेलेले बरे असा विचार करून मराठी फौजा रात्री नऊच्या सुमारास गावातून बाहेर पडल्या आणि त्या भीमा ओलांडून गेल्याची खात्री होताच इंग्रजी पलटण चक्क भीमेकडे पाण्यासाठी धावत सुटली. दिवसभर मराठ्यांनी इंग्रजांचे पाणी तोडले होते. अशा रीतीने कॅप्टन स्टाँटनचा पूर्ण पराभव करून मराठी फौजा लोणीमुक्कामी आल्या. इकडे स्टाँटनची मराठ्यांनी ही गत केली हे स्मिथला आणि बरला माहीतही नव्हते. संगमनेरहून निघाल्यानंतर ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या माणसांनी स्मिथची अक्षरशः लांडगेतोड करवली होती आणि तो कसाबसा दि. २ जानेवारी रोजी चाकणला येऊन पोहोचला. स्टाँटनचाही पूर्ण पराभव झाल्याने तो पुण्याला बरच्या मदतीला जाणे शक्यच नव्हते, म्हणून तो २ जानेवारी रोजी रात्री पुन्हा शिरूरला निघाला. या लढाईत इंग्रजांकडील तीनशे तर मराठी फौजेतील सुमारे पाचशे लोक पडले, पण यातही इंग्रजांचे २ नामांकीत सरदार मारले गेले. समकालीन इंग्रज अधिकारी आणि पुढे सातार्याचा रेसिडेंट ग्रँट डफ इंग्रजांच्या झालेल्या नुकसानीबद्दल म्हणतो, “त्या लढाईत इंग्लिशांचे मेले व जखमी मिळून एकशे छप्पन शिपाई व वीस गोरे गोलंदाज पडले. इतके होऊन तो उरातून दोन गोळ्या पार झालेला पॅटीसन साहेब आपल्या तळाअवर पोहोचल्यानंतर मेला. त्याशिवाय दुसरे दोघे साहेब त्या लढाईत मृत्यू पावले व दोन जखमी झाले. आणि नवे ठेवलेले मराठे तीनशे त्यापैकी दीडशे उरले वरकड काही मेले व कित्येक जखमी झाले व काही पळाले. मराठ्यांचे सुमारे पाच साहाशे पडले”
रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१ कोरेगावसंबंधी काही बातमीपत्रे प्रसिद्ध केली आहे. त्यातील मजकूर असा- “१ स्वारी श्रीमंत माहाराजाची (पेशव्यांची) राजेवाडी जेजुरीनजिक आहे तेथे आली. चाकणचे ठाणे राजश्री त्र्यंबकजी डेंगले यांणी घेतले. ताम्रमुख (इंग्रज) यांजकडील आत लोक होते ते कापून काढिले. स्वारी ब्राह्मणवाड्याचे घाटातून निघोन फुलगाव आपटीचा मु॥ आहे. नंतर गुरुवारी कूच होऊन फुलगावापुढे तीन कोश कोरेगाव आहे तेथे फौजा गेल्या, तो तेथे इंग्रजांकडील दीड पलटण व तोफा आल्या. नंतर त्याणी तोफ डागली. तेव्हा सरकारफौजेनी चालून घेतले. ते गावात सिरले. फौजाही बेलासिक गावात सिरून दीड पलटण व तीनशे तुरुप स्वार कापून काढीले. त्यात जो खासा होता त्याचे डोसके मारीले”. दुसर्या बातमीपत्रात “गोखले, रास्ते वगैरे पायउतारा होऊन पारपत्य केले. त्याजपैकी येक तोफ व दोनशे लोक कोरेगावचे वाड्यात सिरले ते मात्र राहीले. येक तोफ व येक पलटण कापून काढिले”. यानंतर इंग्रज जवळपास बुडाल्यात जमा आहेत हे पाहताच मराठी फौजा मागे फिरल्या.
इंग्रजांनी मात्र या वेळी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण मूळात पेशव्यांनी दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्रजांना कोरेगावात डांबून ठेवण्याची ही युक्ती केली होती हे काही त्या बिचार्यांना समजले नाही. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीरावसाहेब बापू गोखल्यांना स्पष्ट म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”. ‘ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले’ असं स्पष्ट नमूद आहे.
एकूणच, इंग्रजांचे सुमारे पावणे तीनशेच्या आसपास लोक पडले आणि मराठ्यांचे पाचशेच्या आसपास पडले. कोरेगावात मराठी फौजांचा निःसंशय विजय झाला, पण नंतरच्या काळात, योगायोगाने पेशव्यांचा पाडाव झाल्याने इंग्रजांनी खुशाल ‘आमचाच जय झाला’ अशी थाप ठोकून दिली. १८२२ मध्ये मराठी राज्य बुडाल्यानंतर इंग्रजांनी भीमेच्या काठावर चक्क विजयस्तंभ उभारला अन् त्यावर लिहीले, One of the proudest triumphs of the british army in the east ! म्हणजे ‘गीरे तो भी टांग उपर’ यातली गत ही. शिवरामपंत परांजपे यांनी चपखल शब्दात ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’ मध्ये याचे वर्षन केले आहे- “ब्रिटीश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे !”
इंग्रजांनी उभारलेल्या विजयस्तंभावरील इंग्रजी आणि मराठी मजकुरातही प्रचंड तफावत आहे. इंग्रजी मजकुरातून त्यांची परिस्थिती वास्तविक किती बिकट होती हे उघड उघड दिसते, पण मराठी मजकुरात इथल्या लोकांना सहज वाचता येईल म्हणून शक्य तितके आपल्या बाजूने लिहीण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रथम इंग्रजी मजकूराचा मराठी सारांश पाहूया-
“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अॅँड कर्नल लेवलीन स्कॉट, कलकत्ता” असे लिहीले आहे.
आता याच स्तंभावरील मराठी मजकूर पाहू-
“कप्तान स्थान्तनसाहेबाच्या स्वाधीन मुंबई सर्कार्च्या पळटणचे लोक ५०० व स्वार २५० व तोफखान्याचीं मनुष्ये २५ व तोफा २ होत्या त्याजवर सन इसवी १८१८ ज्यानेवारी तारीख १ शके १७३९ मार्गशीर्ष वद्य ९ गुरुवार ते दिवसी कोरेगावच्या मुकामी पेशव्यांच्या सारे फौजेने चालन येऊन घेरा दिला आणि आरब व दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यांनी मोठ्या चढायावर चढाया केल्या अस्तां पेशव्यांच्या फौजेचा मोड करून इंग्रेजी लोकांनी जय मेळविला. ही कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारीला आहे. यावर या वीरांचा पराक्रम व सर्कार्चाकरी विषई प्राणास उदार जाले हा लोकीक बहुत काळ राहावा यास्तव त्यांच्या पळटणाचीं व लढाईत पडले व जखमी जाहाले यांची नावे इंग्रेजी सर्कार्ची आज्ञा होऊन या जयस्तंभावर दुसर्या अंगास लिहीली आहेत. सन इसवी १८२२, शके १७४३”
समकालीन मराठी साधने जे सांगतात त्याच्या नेमके उलटे चित्र इंग्रजांनी चार वर्षानंतर, जेव्हा त्यांना अडवायला येथे कोणीही नव्हते तेव्हा उभारले आहे. अर्थात, साधा प्रश्न एवढाच, की स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या मदतीला गेला ना पेशव्यांच्या पाठलागावर गेला. असो, बहुत काय लिहीणे ? आपल्याच जातीजातींमध्ये फूट पाडण्याची ही नीति आम्हांला तेव्हा तरी कळली नाही.
कारण, इंग्रजांनी जेव्हा पेशव्यांना बंडखोर ठरवले आणि राज्य घेतले तेव्हा इथल्या लोकांच्या मनातून ‘पेशव्यांची’ प्रतिमा जोवर मलिन होत नाही तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना पक्के समजून चूकले होते. बंडखोर ठरवूनही आणि पेशवे पदावरून दूर करवूनही बाजीराव चार महिने इंग्रजांशी लढत होते आणि माल्कम त्यांच्या पाठलागावर जंगल तुडवत होता यातच इंग्रजांना पेशव्यांची किती धास्ती होती हे समजून येते. म्हणूनच, ३जून १८१८ ला बाजीरावांकडून शरणागती लिहून घेतल्यावर माल्कमने त्यांना शक्य तितके महाराष्ट्रापासून दूर ठेवले, जेणेकरून इथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत. यासोबतच इथाल्या माणसांच्या मनात ‘ब्राह्मण-अब्राह्मण’ हा संघर्ष पेटवून इंग्रजांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले आणि त्याकरीता मुद्दाम पेशवाईत ब्राह्मणेतरांवर किती अन्याय झाला अशा अर्थाने कथा पसरवून दिल्या. इंग्रजी अमदानीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाले हे उघड आणि सर्वज्ञात आहेच, किंबहुना म्हणूनच डॉ. आंबेडकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजसुधारकांना वर्णवर्चस्वतेविरुद्ध झगडावे लागले, पण म्हणून हे सारे पेशवाईपासून सुरु आहे हा समज पूर्ण निराधार आहे.
दि. ५ जून १९३६ च्या “केसरी”मध्ये इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर (साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे पुत्र) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘पेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होता’ या आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच पत्रोत्तर देऊन “ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली दंतकथा असून लिखित पुरावा नसल्याचे” मान्य केले. अर्थात, बाबासाहेबांनी हे उत्तर देण्यापूर्वी जवळपास सव्वाशे वर्षे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या मनात फूट पाडण्यासाठी जातियवादाची बिजे रोवली होती, त्यामूळे नंतरच्या पिढ्यानपिढ्या इंग्रजांनी पसरवलेल्या या गैरसमजुतींना खर्या मानू लागल्या. पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. “पेशवेकालीन सामाजिक आणि आर्थिक इतिहास” यावार भारत इतिहास संशोधक मंडळाने एक विशेष त्रैमासिकच प्रसिद्ध केले आहे. पण तरिही इंग्रजांनी पसरवलेल्या या विषवल्लीचा परीणाम मात्र ब्राह्मण आणि बहुजन या दोघांवरही इतका झाला की एकेकाळी एकमेकांच्या साथीने, विचाराने काम करणारे, लढणारे हे दोन समुह एकमेकांचा न भूतो न भविष्यती दुस्वास करू लागले. यात दोन्हीही समाजांचे आजवर नुकसानकच झाले. पण इंग्रजी राज्य जाऊन, आज इतकी ऐतिहासिक साधने उपलब्ध असतानाही या दोन्हीही समाजांना हे समजू नये का ? किमान आतातरी हे सगळे गैरसमज दूर करून ही जातियता संपेल अशी अपेक्षा करावी काय ? दुर्दैवाने आपण अजूनही परकीयांच्याच बोलण्यावर-लिहिण्यावर विश्वास ठेवत आपल्याच लोकांवर सूड उगवत आहोत. अगत्य असु द्यावे. हा लेख लिहिण्याचे कारण कोणावरही जातिय दृष्टीकोनातून पाहण्याचा नसून आपण आपल्याच इतिहासाची विल्हेवाट लावत आहोत ती थांबावी असा आहे.


खाली दुसर्या बाजीरावसाहेबांच्या युद्धातील हालचाली, कोरेगावच्या लढाईचा नकाशा तसेच भीमा-कोरेगावच्या इंग्रजांनी उभारलेल्या स्तंभाची छायाचित्रे जोडलेली आहे.
© www.kaustubhkasture.in

सर्जिकल स्ट्राईक

गजस्तत्र न हन्यते|
https://www.facebook.com/abhijitvartak1/posts/1230436043764577
नीच व्यक्ती मुळात भेकड असतात. त्या शूरपणाचा आव आणतात. पण कालांतराने शौर्याचा बुरखा देखील फाटतो, ही उक्ती सर्वांनाच माहिती आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात चारदा सर्जिकल स्ट्राईक (धडक कारवाई) केल्याची शेखी संपुआ सरकारच्या शिलेदारांनी केली, तेव्हा या उक्तीची आठवण झाली. संपुआ सरकारच्या नेभळट व बोटचेप्या धोरणाची खिल्ली उडवली जाऊ लागली, तेव्हा लज्जारक्षणासाठी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम्, तत्कालीन हेवीवेट मराठा नेते शरद पवार यांनी संपुआ सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी, आम्ही देखील असे सर्जिकल स्ट्राईक केले होते; परंतु, त्याचा गवगवा केला नाही, असे जाहीर सांगितले. परंतु, माजी महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्ट. जनरल विनोद भाटिया यांनी चिदंबरम् व पवार यांचे पुरते वस्त्रहरण करून टाकले. संपुआ सरकारच्या काळात असले कुठलेही प्रकार झालेच नाहीत, असा दावा केला. जे काही थोडेफार झाले, ते फक्त नियंत्रण रेषेवरील कारवाई या सदराखालील कृत्ये होती, असे भाटिया यांनी म्हटले आहे. लेफ्ट. जनरल भाटिया खोटे बोलत आहेत, असे अजून तरी या दोन्ही नेत्यांनी किंवा कॉंग्रेसच्या वाचाळवीरांनी कुठे म्हटल्याचे ऐकिवात नाही. २०१४ साली भारतीय मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन, तसेच नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रिपदी बसवून सर्वच सराईत राजकारण्यांची पंचाईत करून टाकली; आणि त्यानंतर मोदी सातत्याने या सराईत पुढार्‍यांची गोची करीत आहेत. मोदींनी काही केले की, आम्ही देखील असे केले होते, असा त्वरित खुलासा कॉंग्रेस नेत्यांकडून येत असतो. परंतु, २९ सप्टेंबरच्या उत्तररात्री गुलाम काश्मिरात घुसून जी सैनिक कारवाई करण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांनी केले, त्याने तर या सराईत नेत्यांची झोपच उडाली आहे. संपूर्ण भारतीय जनता अभिमानाने मोदींच्या मागे उभी झाल्याचे चित्र दिसताच, कॉंग्रेससह इतर खुज्या विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजणे स्वाभाविक होते. नरेंद्र मोदी यांच्या परदेशवार्‍यांवरून किती खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली होती, हे लोक विसरले नाहीत. ज्यांची वीतभरही उंची नाही, अशा व्यक्ती देखील मोदींना टोमणे मारण्यात मागे नव्हत्या. परंतु, या सर्जिकल स्ट्राईकला जगभरातील प्रमुख शक्तिसंपन्न देशांकडून, तसेच भारताच्या शेजारी देशांकडून जो पाठिंबा मिळाला, तो पाहता, मोदी यांच्या परदेशवार्‍या अकारण नव्हत्या, हे सिद्ध झाले आहे. परकीय खात्यांमधील व्यवहार, पासबुकात नोंदविण्यासाठीही त्या नव्हत्या, हे पवारादी कॉंग्रेस नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. परस्परांमधील विवाद सोडविण्याचे जितके काही प्रचलित मार्ग आहेत, ते सर्व मार्ग, पाकिस्तानची समस्या सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणे चोखाळले. पाकिस्तान या सर्व शिष्टसंमत मार्गांनी बधणार नाही, याची कल्पना मोदींना नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु, ‘लातों के भूत, बातों से नहीं मानते’ या उक्तीनुसार मोदींनी पाकिस्तानच्या कंबरड्यात लाथ घातलीच. ही गोष्ट आधीचे सरकार करू शकले नसते का? मग त्यांनी प्रत्येक वेळी संयमाची मुत्सद्देगिरीच का दाखविली? मुळात भेकडांच्या संयमाला भारतात कदाचित डोक्यावर घेतले जात असेल; पण जगात मात्र त्याकडे ढुंकूनही कुणी बघत नाही. मोदींनी केली तशी कारवाई, तशी हिंमत संपुआ सरकार दाखवू शकले असते काय, हा खरा प्रश्‍न आहे. जे आमच्या रक्तातच नाही, ते आम्ही करून दाखविले, असे म्हणणे म्हणजे एका अर्थाने रक्तद्रोहच मानला पाहिजे. एखाद्या दुबळ्या, भेकड माणसाने शौर्याची, पराक्रमाची ऐट आणली, शत्रूवर मात करण्याची बढाई मारली की, त्याच्या हातून ते घडण्यासारखे नाही, असे सत्य सांगण्यासाठी पंचतंत्रात एक प्रसिद्ध गोष्ट आहे. कोल्ह्यांच्या कळपात लहानाचा मोठा झालेल्या सिंहाच्या छाव्याला, एकदा कळपासोबत जंगलात भ्रमण करीत असता, हत्तींचा कळप दिसतो. ते प्रचंड हत्ती बघून कोल्ह्यांची पिले घाबरून पळू लागतात. हा मात्र त्या हत्तीवर चालून जातो. घरी पळत आलेली पिले आपल्या आईला म्हणजे कोल्हीणीला धापा टाकत सांगतात की, आम्ही एक खूप मोठा हत्ती पाहिला. घाबरून आम्ही पळालो. परंतु आपल्यातील ‘तो’ मात्र त्या हत्तीवर चालून गेला. आम्ही त्याला समजावले. पण त्याने ऐकले नाही. आपल्या अपत्यांची ही तक्रार ऐकून ती शहाणी कोल्हीण मंद स्मित करीत त्यांना म्हणते-
शूरोऽसि कृतविद्योऽसि दर्शनीयोऽसि पुत्रक |
यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते ॥
(मुलांनो, तुम्ही शूर आहात, हुशार आहात, दिसायलाही देखणे आहात. पण ज्या कुळात तुम्ही जन्माला आला आहात, त्या कुळातील लोकांकडून कधी हत्ती मारला जात नाही.) संपुआ सरकारनेही सर्जिकल स्ट्राईक केले होते, हे सांगण्यासाठी जीभ उचलण्यापूर्वी पवार किंवा चिदंबरम् यांनी आपल्या कुळाचे तरी स्मरण करायला हवे होते. कुठल्या कुळाचे संस्कार आपल्यावर आहेत? इंदिरा गांधी यांचे पर्व संपल्यानंतर कॉंग्रेसच्या जनुकात जो ‘क्रांतिकारी’ बदल झाला आहे, त्याचे स्मरण या नेत्यांनी ठेवायला हवे होते. या क्रांतिकारी बदलाविरुद्ध एकदा पवार यांनी बंड केले होते. पण लवकरच त्यांनाही लक्षात आले असावे की, मुळातच आपली जनुके ही कॉंग्रेसची देखील नाहीत. ती, या देशाला, या समाजाला तोडून, प्रत्येकांत संघर्ष लावून देणारी कम्युनिस्ट विचारांची आहेत. आणि नंतर मग त्यांनी देखील आपला हा बंडोबा, थंडोबा केला. सांगण्याचे तात्पर्य हे की, हत्ती बघून घाबरून पळून जाणार्‍या कुळातील या लोकांनी, आम्ही देखील आमच्या काळात हत्तीवर चढाई केली होती, हे फुशारकीने सांगावे आणि ते भारतीय जनतेला ऐकून घ्यावे लागावे, हे किती दुर्दैवाचे आहे नाही! माजी संचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी हा खोटारडेपणा उघड केला नसता, तर समस्त भारतीय जनता माना डोलवत राहिली असती. हा प्रसंग टळला, यासाठी भाटिया साहेबांचे आभारच मानले पाहिजे. कॉंग्रेसचेच एक प्रधानंमत्री नरसिंहराव यांनी अणुचाचणी करण्याचा विचार केला होता; परंतु अमेरिकेने डोळे वटारताच, तो बेत रद्द केला. परंतु, २४ पक्षांचे कडबोळे असलेले सरकार सांभाळणारे भाजपाचे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र हिमतीने पोखरण येथे अणुचाचणी करून दाखविली. त्यासाठी आर्थिक नाकेबंदी देखील सहन केली. भारतातील तद्दन राजकारण्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सिंहाची छाती भाजपाच्याच नेतृत्वात आहे. भाजपाचे कूळ सिंहाचे आहे. आसमंताला थरकापून टाकणारी डरकाळी, सिंहकुलोत्पन्नच मारू शकतात. ऐर्‍यांनी केवळ संयमी मुत्सद्देगिरीचा जप करीत बकर्‍यांसारखी बें बें करीत जगभर फिरावे, हेच बरे.

चिनी मालावर बहिष्कार


चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन वाचून पुरोगाम्यांच्या हृदयाला भोके पडली आहेत. असे केले तर रस्त्यावर या वस्तू विकणारांचे नुकसान होईल म्हणून बहिष्कार टाकू नका अशी आवाहने वाचते आहे. सरळमार्गी मध्यम वर्गाला ते वाचून आपण मोठ्या पापातून वाचलो असे वाटते आणि बहिष्कार नको हे पटते. एक तर अशा वस्तू विकणारांना इतरही अनेक वस्तू विकता येतील. त्यामुळे त्यांच्या नुकसानाचे पाप आपल्या माथी येणार हा भ्रम आहे. सरकारला एवढे वाटते तर त्यांनी बंदी घालावी असेही हे शहाणे सुचवतात. परराष्ट्र संबंधात कधी काय करावे हे या सरकारला कळते आणि ते तसे करेलच. इथे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार चालू आहे. अनेक शहाण्यांनी अमुक गोष्टी कशा फक्त चिनी कंपन्या बनवतात टाका बहिष्कार तुम्हाला स्मार्टफोन मिळणार नाहीत असे पांडित्यही मिरवले आहे. जे भारतात बनत नाही ते इथे बनविण्यासाठीच मोदींनी Make In India ची सुरुवात केली आहे. जेव्हा या वस्तू भारतात बनतील तेव्हा त्याही बंद करू पण आज शक्य आहे तेवढा तरी बहिष्कार टाकणे गैर कसे? एखादा रोग झाला तर सगळे उपाय करणे शक्य नाही म्हणून कोणताच उपाय करू नका असेही हे शहाणे सांगतील. ही एक खूणगाठ बांधा त्यांना माहिती आहे की चिन्यांवर तुमचा राग आहे. तिथे तुम्हाला समजावणे शक्य नाही हे कळते त्यांना. मग काय तर तुम्हाला confuse करणे सोपे. तुमची दिशाभूल करण्यात ते पटाईत आहेत. त्यांना बळी पडू नका.

एक कसोटी देते ती लावून पहा. असाच बहिष्कार कोकाकोला आणि अन्य अमेरिकन मालावर अफगाण युद्ध प्रकरणी इथे भारतातही घालण्यात आला.तेव्हा यातले किती शहाणे हेच मुद्दे घेऊन त्यांना समजवायला गेले होते? नसतील तर ते दुतोंडी ठरत नाहीत का?

दिशाभूल करणारा आपले नुकसान करतो आपला शत्रू असतो.

-Facebook साभार

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

नक्षत्रांच्या पुराणकथा : २

सुहास गोखले @ facebook :

ग्रह नक्षत्राांवर आधारीत पुराणकथाः आणखी काही कथा.
अश्विनीच्या पाठोपाठ येणारे नक्षत्र म्हणजे भरणी, तीन तार्‍यांचा समुह असलेले हे नक्षत्र अत्यंत अशुभ समजले गेल्याने, त्याचा उल्लेख किंवा संदर्भ, कथांमध्ये फारसा होत नाही. मी पहील्या पोस्टमध्ये लिहीले तसे दशराथाच्या तीन राण्या हे भरणी नक्षत्राची प्रतिक होते म्हणुन दशरथाचे अकाली निधन झाले.
त्यानंतरचे नक्षत्र कृत्तिका, सहा तार्‍यांचा समुह, सप्तर्षी सारखाच आकार त्या सहा ऋषींच्या पत्नी असल्याच्या कथेचा मी यापुर्वीच उल्लेख केला होता, त्यात लिहीण्याचा राहुन गेलेला तपशिल म्हणजे, सप्तर्षींना सोडुन गेल्यामुळे, सप्तर्षी आपल्या ऋषीपत्नींशी संबंध ठेवत नव्हते, त्यामुळेच कृत्तिका मावळण्याच्या मार्गाला पश्चिमेकडे सरकायला लागल्यावरच सप्तर्षी अकाशात येतात.
या व्यतिरीक्तही कृत्तिकेच्या काही कथा वाचायला मिळतात. कृत्तिके मधिल सर्वात प्रखर तारका म्हणजे आंबा, ईतर पाच तारकांची नावे आहेत 1) दुला, 2) नितत्नी, 3) अभ्रवंती, 4) मेघयंती आणि 5) वर्षयंती. कृत्तिका तारकासमुहाला प्लिहादीही असेही नाव आहे आणि बहुतेक त्यावरूनच इंग्लिश नाव प्लिडस पडले असावे.
दुसर्‍या कथेनुसार महादेवामुळे अग्निला गर्भ राहीला. अग्निला याची खुप लाज वाटल्याने त्याने त्या गर्भाचे सरोवरात विसर्जन केले, त्याच सरोवरात रहाणार्‍या सहा कृत्तिकांनी तो गर्भ धारण करून मुलाला जन्म दिला, तो मुलगा म्हणजे महादेवपुत्र षडानन (सहा मुखे असलेला) किंवा कृत्तिकेय किंवा कार्तीकेय.
कृत्तिकेनंतरचे नक्षत्र रोहीणी, पुन्हा एक तीन तार्‍यांचा समुह.
प्रजापतीनी यज्ञकर्मासाठी विराट नावाची स्त्री तयार केली पण यज्ञविधीत योग्य तो मान न मिळाल्याने ती आकाशात निघुन गेली. आवकाश आरोहण करणारी म्हणुन तीचे नाव पडले रोहीणी. रोहीणी तारकासमुहातला सर्वात प्रखर तारा नेहमी चंद्राच्या जवळ दिसत असल्याने, अत्यंत जिवलग प्रमिकांना चंद्र आणि रोहीणीची उपमा दिली जाते.
दुसर्यां कथेनुसार प्रजापतीनी आपल्या 27 मुलींचे (नक्षत्रही 27 च आहेत) लग्न चंद्राशी लावुन दिले पण चंद्र रूपसुंदर रोहीणीशिवाय ईतर 26 जणींकडे लक्ष देत नसल्याने, प्रजापतीनी चंद्राला क्षय होईल असा शाप दिला पण रोहीणीच्या विनंतीवरून त्याला वृध्दीचा उश्शापही मिळाला म्हणुन चंद्राच्या क्षय आणि वृध्दीचे चक्र सुरू झाले.
काही वेळा पिता प्रजापती मुलीच्या सौंदर्यावर भाळल्याने ती मुलगी रोहीणी आकाशात निघुन गेल्याचाही उल्लेख झाला आहे.

सुहास गोखले @ facebook

त्यानंतरच्या मृगशिर्ष नक्षत्रावरून रामायणामधिल सोन्याच्या हरीणाची कथा आली त्या चार तार्‍याांच्या मध्ये एका रेषेत असलेले तीन तारे म्हणजे रामाचा बाण आणि त्या बाणाच्या सरळ रेषेत आकाशातला सर्वात प्रखर तारा व्याध दिसतो.
रोहीणीचा पिता प्रजापती तीच्यावर भाळल्याने, सर्वांनाच चिड आली आणि रागाच्याभरात रूद्र प्रजापतीवर धाऊन गेला. घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप धारण केले व त्याच्या मागे असलेला व्याध म्हणजे रूद्र, अशीही एक कथा ऐकायला मिळते.
त्यानंतरच्या आर्दा नक्षत्राची मात्र कोणतीही कथा कधी ऐकायला मिळाली नाही. बहुधा पावसाळी नक्षत्र असल्याने सगळेच शेतीच्या कामात गुंतल्याने असावे.
त्यानंतरचे पुनर्वसु नक्षत्र म्हणजे दोन तार्‍यांचे नक्षत्र, अर्थात मिथुन राशीत येणारे. सगळ्यात भाषातल्या पुराण कथात यांची जोडीच असते, कधी स्त्री आणि पुरूष, कधी दोन झाडे. आपल्याकडे आदीवासी भागात मात्र त्यांना ती मोराची जोडी दिसते. आपल्या पुराणातल्या कथेप्रमाणे पुनर्वसु ही दोन राक्षस होते, दोघांनी देवांच्या तोडीस तोड यज्ञ करायचे ठरवले. नॅचरली देवांचा विरोध होता. देवांनी यज्ञ उधळायचे ठरवले. इंद्रदेव ब्राम्हणाच्या रूपात गेले (इंद्र म्हणजे हिंदु देवातला मेक ओव्हरचा तज्ञ असावा. तो ओरीजीनल रूपात कमीच आढळतो) ब्राम्हणाने सांगीतले की चांगल्या रिझल्टसाठी यज्ञकुंडात सोन्याची वीट लावा, असे सांगुन त्यानेच सोन्याची विट दिली आणि यज्ञ अर्ध्यावर आल्यावर आपली विट परत मागीतली आणि जबरदस्तीनी काढुन घेतली व आकाशात फेकली, विट घ्यायला आकाशात धावलेले दोन राक्षस म्हणजे पुनर्वसुचे दोन तारे आणि ती विट म्हणजे चित्रा नक्षत्र.
पुनर्वसु पाठोपाठचे नक्षत्र आहे पुष्य. अत्यंत अंधुक नक्षत्र. पुनर्वसु पासुन काही अंतरावर मघा नक्षत्राची टपोरी चांदणी दिसते आणि या दोन चांदण्यांमध्ये अंधुक धुरकट पुष्य नक्षत्र, खुपबारकाईने पाहीले तर त्यात तीन चांदण्या दिसतात. प्राचिन काळात ऋषीमुनी आकाशवेध घेताना, गुरु ग्रह जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा तो ग्रह असल्याचे ऋषीमुनींना ओळखता आले म्हणुन तो गुरूपुष्य योग अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो, पण गुरू ग्रह 12 वर्षांनी एकदा पुष्य नक्षत्रात येत असल्याने, (आम्हा भटा ब्राम्हणांच्या) सोयीसाठी चंद्र पुष्य नक्षत्रात आला आणि त्या दिवशी गुरूवार असला तर त्याला गुरूपुष्य योग समजला जाऊ लागला.
त्यानंतरचे नक्षत्र अश्लेषा, नागाच्या फण्यासारखे पाच तारे, यांना अश्लेषा पंचकही म्हणतात. यावरून महाभारतात पाच फणे असलेल्या वासुकी या सर्पाचा उल्लेख झाला असावा. आकाशात हा सर्प अश्लेषा नक्षत्रापासुन सुरू होऊन, हस्त नक्षत्रापाशी संपतो.
पुष्य नक्षत्राच्या पुर्वेकडे दिसणारी ठळक चांदणी म्हणजे मघा नक्षत्र. पाच तार्‍यांच्या नक्षत्राचा आकार विळ्यासारखा आणि मघेची चांदणी त्या विळ्याची मुठ आहे, थोडी कल्पना केल्यास हे नक्षत्र उलट्या प्रश्नचिन्हासारखे दिसते. नघा नक्षत्रावरचा पाउस खुप बेभरवशाचा असल्याने, या नक्षत्राबाबतही फारशा कथा रचण्याच्या मुडमध्ये कोणी फारसे नसावे. शेतात काम करणारी खेड्यापाड्यात भाषाही खणखणीत स्पष्ट त्यामुळे काही भागात या नक्षत्रावरच्या पावसाबद्दल, ‘’कोरड्या मघा तर नभाकडे बघा पण बरसल्या मघा तर चुलीपाशी हगा’’ असेही म्हणतात. मघा नक्षत्राचा आकार काहींना सिंहासारखा दिसतो, हे नक्षत्र सिंह राशीतच येते, या काळात साजरा केला जाणारा शिमगा हे बहुधा सिंह – मघा याचे मिश्रण होऊन पडलेले नाव असावे.U

नक्षत्रांच्या पुराणकथा

सुहास गोखले @ facebook

नक्षत्रांच्या पुराणकथाः-
अश्विनी नक्षत्रात तीन तारे, आडव्या व्ही च्या आकारात म्हणजे घोड्याच्या तोंडाच्या आकारात दिसतात त्यामुळे आलेली कथा. दधिची ऋषी अश्विनी कुमाराला (अश्विनीकुमार म्हणजे हिंदु वैद्यकशास्त्राचे प्रणेते), मृताला जिवंत करण्याची विद्या देणार होते. देवांनी दधीची ऋषींना भिती घातली की, त्यांनी अश्विनीकुमाराला विद्या शिकवल्यास त्यांचा शिरच्छेद केला जाईल, यातुन मार्ग म्हणजे, दधिची ऋषींचा शिरच्छेद करून त्यांना घोड्याचे (अश्व) शिर बसवण्यात आले व त्या मुखातुन अश्विनी कुमाराला ज्ञान दिले गेले म्हणुन त्यांचा शिरच्छेद झाल्यावर त्यांना पुन्हा मुळ दाधिची ऋषींचे शिर बसवले गेले. म्हणुन ते नक्षत्र अश्विनी.
शंकरानी गणपतीच्या मस्तकावर केलेली शस्त्रक्रिया आपण देवांच्या खात्यात जमा केल्यास, ही मानवानी केलेली ऑर्गन ट्रान्सप्लंटची पहीली शस्त्रक्रिया म्हणता येईल. मनात आलेला दुसरा मजेशिर विचार म्हणजे, स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ या वाक्प्रचाराचे मुळ हेच असेल का?

पुढिल भाग 

नक्षत्रांच्या पुराणकथा १

सुहास गोखले @ facebook

माझ्या तरूणपणी मी महाराष्ट्रात आणि हिमालयात बरेच ट्रेकिंग केले. बर्‍याचदा रात्री किंवा पहाटे डोंगरातुन चालताना आम्ही तारे आणि नक्षत्रांच्या मदतीने दिशा आणि वेळ ठरवण्याच सराव केला होता, त्यावेळी डोक्यात आलेला एक विचार होता की पुर्वीच्या काळी जेव्हा ऋषी मुनी जंगलातुन फिरत तेव्हा दिशाज्ञानाची हीच पद्दत होती त्यामुळे त्यांचा खगोल शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्या ज्ञानाचा वापर करून काही कथा लिहील्या, महाकाव्ये रचली, ती म्हणजे रामायण आणि महाभारत.
राजा दशरथाला तीन राण्या होत्या, भरणी नक्षत्रात तीन तारे असतात. पत्रिकेत भरणी योग हा मृत्यू योग समजतात म्हणुन दशरथाला अकाली मृत्यू आला.
तेजस्वी चंद्र म्हणजे प्रभु रामचंद्र आणि डागाळलेला चंद्र म्हणजे लक्ष्मण. चंद्र जेवढा तेजस्वी दिसतो तेवढेच त्याच्यावरचे डाग स्पष्ट दिसतात, म्हणुन राम आणि लक्ष्मण कायम सोबत असतात. (लक्ष्मणाचे वर्णन काळासावळा, कायम रामासोबत रहाणारा आहे ते त्यामुळे)
तुटणारा तारा म्हणजे सिता. तुटलेल्या तार्‍याचे दगड (अशनी) शेतात नांगराच्या फाळाला लागतात, सिता देखिल जनक राजाला नांगराच्या फाळाखालीच मिळाली होती. उल्कापात होतो तेव्हा तारे जळत येतात आणि जमिनीत जातात, सितेनी देखिल अग्निदिव्य केले आणि शेवटी ती जमीनीत गेली.
धुमकेतु म्हणजे हनुमान, मोठी शेपटी, कायम सुर्याकडे तोंड, क्षणात येणारा अचानक नाहीसा होणारा हनुमान.
मृग नक्षत्रावरून सोन्याच्या हरीणाची कथा आली.
सात आद्यऋषी सप्तर्षीवरून आले, तशाच सप्तकन्या म्हणजे सात ऋषींच्या पत्नी, त्यातल्या सहाजणी पतीशी भांडुन घर सोडुन गेल्या म्हणुन आकाशात सप्तर्षीच्या विरूध्द दिशेला कृत्तिका नक्षत्र आहे, सप्तर्षीसारखीच रचना पण छोटा आकार, त्यात सहाच तारे आहेत. सप्तर्षीकडे बारकाईने पाहीले तर शेपटीचा मधला तारा हा जोड तारा आहे. ती आत्री ऋषींची पत्नी अनुसया, तीने पतीची साथ सोडली नाही म्हणुन ती महासती ठरली.
पुराणातील कथेनुसार विंध्यमुनीनी स्वतःचा आकार वाढवुन सुर्याचा मार्ग रोखला होता आणि सुर्याला परतवले होते. मकरवृत्तावर विंध्यपर्वताची रांग आहे, सुर्य मकरवृत्तापर्यंत येऊन परत जातो, म्हणुन ही कथा. आणखीही साम्यस्थळे आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.........

पुढिल भाग 

टिळक : शिक्षण हक्क आणि अधिकार

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात ..... एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'
- सर्व श्रेय मूळ लेखकांचे

वयात येताना


संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. ती ज्ञानेश्वरी की जी भगवद् गीतेवर टीका आहे.

तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.

समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.

जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.
तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या 16 व्या वर्षीच.
अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.
ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची,  स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती..
इस कदर वाकिफ है,
मेरी कलम मेरे जज्बातोसे ।
मै इश्क लिखना भी चाहू,
तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।
एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.
ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.
अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?
आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात,  एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.
हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.  शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत.  शाळेत शिकणा-या  विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय
ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात.
मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?
इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.
सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची.  जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.
जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?
आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर,  त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी, आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.
ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.
सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे.  तुला बाॅयफ्रेंड  किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.
असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????
ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?
की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?
दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.
एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
दुसरी अधोगतीकडे जाणारी.

संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.
दोनच गोष्टी कळतायत
आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...
आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...
अखंड असावे सा..व..धा..न
-व्हाट्सप वरुन 

महाराष्ट्र दिवस १ मे

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.

त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहरराज्य अनुस्यूत होते; पण त्याचे स्वरूप स्पष्ट झालेले नव्हते. १६ जानेवारी १९५६ रोजी पं. नेहरूंनी असे घोषित केले, की मुंबई केंद्रशासित केली जाईल. १७ जानेवारीस विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. १७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरू झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (१९५२-५६) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण ३१,०९२ इसमांना अटक करण्यात आली, १९,४४५ लोकांवर खटले गुदरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली; ८० ट्रामगाडयांची आणि २०० बसगाडयांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.

जय महाराष्ट्र 🚩🙏🏼

महात्मा फुले, शिवाजी महाराज आणि अन्यायकारक हिंदु धर्म

ज्योतिबा फुले यांनी आपल्या पोवाड्यात राज्याभिशेकाब्द्दल खालीलप्रमाणे लिहिले आहे
"काशीकर गंगाभात घाली डौल धर्माचा /केला खेळ गारुड्याचा /लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फौजेचा /खर्च नको दारूगोलीचा... /बहुरूपी सोंग तुलादन सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा /कुळवाडीभूषण पवाडा गातो भोसल्याचा /छत्रपती शिवाजीचा /"
ज्योतिबा फुले यांच्या मते राज्याभिषेक म्हणजे धर्माच्या नावाखाली केलेला गारुड्याचा खेळ आणि या लुटारू शिवाजीने (शिवराय माफ करा या हरामखोर फुलेमुळे तुम्हाला लुटारू म्हणावे लागते )फौजेच्या धाकाने जी संपत्ती लुटली होती त्या लुटारू शिवाजीस लुटले सोन्याने तुला करून ते सोने गगभात्ताने लुटले

महाराजांना घाबरट कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांना दगलबाज कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांना
लुटारू कोणी म्हंटले आहे ? गागा-भट्टाने राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांन्कडून दक्षिणा घेतली म्हणजे एका लुटारूने दुसर्या लुटारूला लुटले असे कोणी म्हंटले आहे ?शहाजी राजे मुखदुर्बळ होते असे कोणी म्हंटले आहे ?शहाजी राजेंनी नाटकशाळा ठेवल्या(लग्न न करता ठेवलेल्या स्त्रिया ) आणि शहाजी त्या नाटकशाळाच्या तोंडावर... भाळला असे कोणी म्हंटले आहे? जिजाऊने यास कंटाळून शहाजीचा त्याग केला व त्या माहेरी येवून राहिल्या असे कोणी म्हंटले आहे ?शिवाजी महाराजांनि लोकप्रीतीकारिता रामदासस्वामीना गुरु केले असे कोणी म्हंटले आहे ? दादोजी कोंडदेव याने शिवाजीला अक्षरओळख मुद्दामून करून दिली नाही असे कोणी म्हंटले आहे ?शिवाजीने आपले राज्य केवळ गो-ब्राह्मणासाठी स्थापले व शिवाजीच्या राज्यात शूद्राची स्तिथी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या वेळेपेक्षा वाईट झाली असे कोणी म्हंटले आहे ?मोहमद घोरी मोहमद गझनी कुतुबिद्दन आईबक बख्तियार खिलजी चेंगीझखान तैमूरलंग बाबर यांचा सारा इतिहास देवळांची लुट मुतींचे बिडंबन ,अफाट संपत्तीची लुट स्तीयांवर बलात्कार ,स्त्रिया मुले यांना गुलाम करून नेणे आणि अफाट नरसंहार यांनी भरलेला आहे ज्या मुस्लिम धर्मात अजिबात सहिष्णुता नाही अत्यंत क्रूरपणा स्त्रियांची विटंबना जबरदस्तीने धर्मांतर आहे आणि ज्या धर्मात स्त्रियांचे दुय्यम दर्जा आहे पुरुषांना एकाच वेळी ४बायका करण्यची परवानगी देण्यार्या धर्माचे गुणगान करणारा पुरोगामी लोकांचा आयकॉन कोण आहे ?मुसलमान राजवटीने शुद्र अतिशूद्र यांना बळजबरीने मुसलमान करून सुखी केले असे कोणी म्हंटले आहे ? मुसलमान राजवटीने उरलेल्या शुद्र अतिशूद्र यांना बळजबरीने मुसलमान केले नाही हि मुसलमान राजवटीची चूक आहे असे कोणी कबूल केले आहे ?मराठा समाज हा येथील भूमिपुत्र नसून ते भारतावर आक्रमण केलेले तुर्क आहेत व आदि शंकराचार्यांनी त्या तुर्कांना हिंदू मराठा करून घेतले आणि त्यांचेकडून भारतातील बुद्ध धर्मियांचा नाश केला असे कोणी म्हंटले आहे ?
वरील सर्वांचे उत्तर एकच ते म्हणजे ज्योतिबा फुले( संदर्भ म्हणून ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शिवाजीचा पोवाडा व त्यांचे समग्र वैन्ग्मय जे महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध करून केवळ १० रुपये नाममात्र किमतीत "म फुले समग्र वैन्ग्मय "या नावाने प्रसिद्ध केले आहे )

______________________________________________

फुल्यांचा धोबीपछाड - गोविंद रहाटीकर

बरं ब्राम्हणांवर टीका केली हे ठीक पण हिंदू धर्मातील संत, देवी देवता हे पण त्यांचा तावडीतून
सुटले नाहीत. समर्थ रामदास, वामन, श्रीराम, परशुराम, ज्ञानेश्वर, शंकराचार्य या सर्वांवर ओळीने प्रहर करून काय मोठ पुण्य मिळवलं ना जाणे. ह्यातील काही उतारे महात्मा फुले समग्र वांग्मय मधील पुराव्यासाठी देत आहे... समस्त वारकरी संप्रदाय हा ज्या ज्ञानोबा माउली आणि पांडुरंगाचे नामस्मरण करण्यात आपले आयुष्य घालवतात या पांडुरंगाला आणि माउलींना पण ह्या फुल्यांनी सोडले नाही. माउलींबद्दल हे महात्मा काय बोलतात पहा बरे जरा

"जेव्हा जेंव्हा मर्द(?) मुसलमान लोकांचे या देशात राज्य आले तेव्हा अज्ञानी क्षुद्रादि अतिक्षुद्र लोक पवित्र कुराणाती सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागतील या भयास्तव धूर्त देशस्थ आळंदीकर ब्राह्मण ज्ञानोबा ने तो गीतेतील बोध
उचलून त्याच्यावर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ केला.तो सर्व अक्षरशः वाचून पहिल्या बरोबर धूर्त आर्याधर्माचे पाचपेची आंधळे भारुड सर्व लोकांच्या ध्यानात सहज येईल" (महात्मा फुले समग्र वांग्मय आवृत्ती १९८८
पृ. क्र.४०२ ते ४०५.)

म्हणजे तात्पर्य काय? मुसलमान जवळचे ह्या महात्म्याला पण ज्ञानेश्वर माउली नाही.

बरं ह्याच फुलेंचे
पंढरीच्या विठोबा माऊलीं बद्दलचे मत --
सर्व भूता निर्मी धोंड्याचा विठ्ठल | पंढरी सकळ  वेडी केली ||१||
विठ्ठलाची मूर्ती ध्यान मनी धरी | गाता ताल धरी नाच्यापरी ||२||
निर्लज्य होऊनी फुगड्या खेळतो | पकवास घालितो | स्त्रियांसंगे ||३||"
सुखरूप होशी" उपदेश करी | वेडा वारकरी | जोती म्हणे ||४||
(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान नं. ५६१)

म्हणजे फुलेंच्या मते विठोबा हा दगडाचा असून
त्याच्या भक्ती करणारे वारकरी हे निर्लज्य आणि महिलांसोबत नाच करणारे "नाच्ये" म्हणजे नर्तक आणि वेडे आहेत. ह्याच पानावर पुढे भगवान श्रीकृष्णावर देखील जहरी टीका केली आहे.
फुले म्हणतात-
१)लंपट, खोटे बोलायला लावणारा काळा कृष्ण, आपणा सर्वांचा महापवित्र निर्माणकर्ता आर्य ब्राम्हणांच्या कल्पित काळ्या कृष्णासारखा दह्यादुधाच्या चोय्रामाय्रा करून सोळा सहस्त्र एकशत नारींसह गवळयाच्या भकलेल्या राधेबरोबर लंपट होऊन त्यांच्या उश्यापायाथ्याशी लोळत पडणारा नव्हे..... लढाईमध्ये अश्वथामा हत्ती अगर अश्वथामा (मनुष्य) मारला गेला, अशी कंड उठली तेव्हा आपला मुलगा मारला गेला, असे द्रोणास वाटून तो सत्यवादी धर्मास विचारावयास आला, ते वेळेस कृष्णाने
त्याजकडून खोटे बोलवून( त्याच्या) गुरूस मारविले. तेव्हा अशा प्रकारच्या सदा सत्यवादी पुरुषास पापात ढकलणाय्रा काळया कृष्णास देवबाप्पा मानून, अज्ञानी पंगु मानव बांधवास त्यविषयी नानाप्रकाराचा भक्तिभाव दाखवून
आपण स्वतः साधूसंतांची सोंगे घेतात.
(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान क्र. ४५९- ४६०)

२) त्यावेळच्या रुढीप्रमाणे गवळयांच्या स्त्रीया नग्न होऊन नदीत स्नान करीत असताना अति चावट कृष्णाजीने त्या सर्वांची, भामट्यासारखी लुगडी व चोळ्या बगलेत मारून कदंब वृक्षावर बसून त्या सर्वांची निर्लज्जपने मोठ्या हौसेने मजा पाहत बसला. आता हा निर्लज्जपणा आपल्या परम पवित्र निर्मिकाच्या नावाला शोभेल काय ? यावरून इतर धर्मातील लोकांपेक्षा एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राम्हणांस स्त्रियांबरोबर उद्धटपणा करून त्यांची अमर्यादा करण्याचा विधिनिषेध वाटत
नाही

(महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान क्र. ४६९).

_____________________________________________

आता राहीला शेवटचा व सर्वात महत्वाचा मुद्दा.... शिव-समाधी शोधाचा.. तर त्यावर अखेरचे २ शब्द....

शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.

पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
त्यावेळी अजिंक्यतारा,  रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.

अजिंक्यतारा- निवासस्थान
परळीचा किल्ला- गुरूस्थान
रायगड- राजधानी.

ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते ...

त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती... हां केवळ एक खोटा प्रचार आहे... अप-प्रचार.... तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल.... व जिचा शोध लावावा लागेल....

मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती... आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही... त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती.... जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे.

किंतु; काही हिंदु धर्म-द्रोही व ब्राम्हण-द्वेषी उपटसुंभ प्रवृत्तींना एका ब्राम्हणाला मिळत असलेले हे श्रेय पाहवले नाही... व त्यांनी समाधी शोधाची काल्पनिक स्टोरी बनवून तीचा प्रचार केला... मुळात, फुलेंच्या समाधीच्या शोधाचा एकही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्धच नाही.. जसे की एखादे तेलचित्र, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात बातमी.... किंवा फुलेंच्या एखाद्या सोबतीने आपल्या लिखाणात कुठे नमूद केलेले त्याचे वर्णन वगैरे....

त्यामुळे त्यांच्या समाधी-शोधाचा हां दावा पूर्णपणे फोल असून त्यामागे द्वेषपूर्ण वृत्तीने रचलेले कारस्थान मात्र आहे.... तेव्हा असा हां खोटा इतिहास व अप-प्रचार त्वरीत थांबवावा ही विनंती...

-राजेश बसेर

महात्मा गांधी अहिंसा शांतता आणि भारतीय स्वातंत्र्यलढा

आज महात्मा गांधीजींचा स्मृतीदिन.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी, अहिंसा आणि शांततेचे प्रतीक.

शालेय इतिहासाच्या पुस्तकात गांधींजींच्या अनुयायांनी आणि अहिंसेच्या वारसानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक प्रकरण लिहिली आहेत, त्यात सुद्धा इंग्रजी अत्याचारांची वर्णन आहेत.

म्हणजेच अहिंसेचा मार्ग इंग्रजांपुढे उपयोगाचा नव्हता. 1920 ते 1942 पर्यंत प्रत्येक अहिंसक आंदोलनात हजारो बळी गेले. त्यांचे रक्त म्हणजे पाणी होते का? मग हि अहिंसक क्रांती कशी?

अहिंसा फक्त बलवानाला शोभते हे इतिहासात सिद्ध झाले आहे. आणि वर्तमानात सुद्धा!

27 वर्षात प्रत्येक ठिकाणी गांधींचे सेवक त्यांच्या भोवती कडे करुन असायचे. इतका लाठीमार गोळी होऊन सुद्धा गांधीजी सुखरुप कसे?
उपवासाने इंग्रजांच मन जिंकता आल असत तर देशात गरीब जनता काय कमी होती ?
गांधीना अपाय झाल्यावर हिंसाचार वाढेल म्हणुन गांधीना सुखरुप ठेवल जात असे.

शेवटी भारतीयसैन्याने उठाव केल्यावर इंग्रज निघाले.
जाताना फाळणी करुन गेले.

गांधीनी 1920 नंतर इंग्रजांचे मन वळवण्यासाठी येशुच्या तत्वांचा आधार घेतला आहे. अगदी 3 माकडा सकट.
फाळणीच्या आणि दंगलीच्या वेळी ते कोणत्या बाजुने उभे राहिले?

शांतता गांधीपुरतीच राहिली. त्यांच्या मागे धावणारी जनतेची डोकी फुटली गोळ्या लागुन जीव गेला.

शेवटी पाकिस्तानात लाखो हिंदु मेल्यावरसुद्धा फक्त हिंदुनाच शांततेच आवहन केल, त्यानंतर भारतात हिंदुंच्या कत्तली सुरु झाल्यावर गांधीनी कोणाची वकिली केली?

गांधींच्या वारसदारानी पण हिंसाच केली शेवटपर्यंत. आणि शांतता तिकडे इंग्लंडातच राहिली.
गांधी आफ्रिकेत जे म्हणाले त्याप्रमाणे भारतात काय केल नक्की? 1920-1948 सर्वात जास्त बळी कोणाचे गेले?

गांधी कृष्णापेक्षा ख्रिस्ताचे भक्त जास्त बनले होते. त्यात चुकीच काहीच नाही, येशुचा शांती आणि प्रेमाचा संदेश सर्वमान्य आहे, फक्त इंग्रजाना सोडुन. ते अत्याचार करत राहिले, आणि गांधीजी अत्याचार सहन करायला शिकवत राहिले.

 पण कृष्णाने शस्त्र धारण केले होते, धर्माच्या रक्षणासाठी कृष्णाने स्वतची प्रतिज्ञासुद्धा मोडली,द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कृष्णच पुढे आला होता  हे कसे विसरले?

भारतमातेचे तुकडे होत असताना ना ख्रिस्त ना कृष्ण आठवला. फक्त अहिंसेचा पुरस्कार केला. आणि अहिंसा फक्त बलवानाला शोभते. ह्याचा धडा इंग्रजानी 1920 ते 1947 पर्यंत अमानुष राज्य करुन दिला. त्याच जोरावार आजची लोकशाही टीकुन आहे. बघा आजुबाजुला अहिंसक नेत्यांकडे किती खाजगी सेना असते ती.

.
अहिंसेला इंग्रजानी प्रोत्साहन दिले, स्वातंत्र्य लढा का लांबला? स्वातंत्र्य हे भारतीय सेनेच्या बंडानंतरच मिळाले हे सत्य आहे.
अहिंसेने मिळायचे असते तर 1920 ते 1945 मध्ये का मिळाले नाही?

गांधी जिंवत असतानाच दंगे झाले ज्यात हिंदुच निर्वासित झाले, ज्याना नेहरु सरकारने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. दिल्लीच्या थंडी पावसात हिंदुना उघड्यावर टाकणार्या अहिंसेला काय बोलणार? निधर्मीपणा?

ह्याच निधर्मी अहिंसेने देशाचे तुकडे केले, देशावर आणिबाणी लादणारे गांधींच्या अहिंसेचे शिष्य नव्हते का? 1948 मध्ये ब्राम्हणांचे आणि 1984 मध्ये शिखांचे शिरकाण करणारे कोण होते?
 गेली 70 वर्षे काश्मिरी पंडीताना निर्वासित करणार्या अहिंसकाना डोक्यावर घेउन नाचणार का?

अहिंसेच्या मार्गाने न जाणाऱ्या क्रांतिकारकांची फाशी टाळण्यासाठी उपोषण केल्याचे किंवा वॉईसरॉय ऑफिसवर मोर्चा नेला होता का ? दुसऱ्याला स्वातंत्र्यलढ्याच क्रेडीट मिळु नये म्हणून का ?

फाळणीला जबाबदार असणारे मंत्री झाले, भारतरत्न म्हणुन स्वत:लाच पुरस्कार दिले,
त्यांच्या सातशे पिढ्या बसुन खातीक एवढी संपत्ती निर्माण झाली, एकही उद्योग धंदा न करता इंग्लंड अमेरीका युरोपात महाल विकत घेतले फाळणीला जबाबदार असणार्या नेत्यांच्या वारसदारानी.

फाळणीला विरोध करणार्या नेत्यांची वाताहात झाली. जे शिल्लक उरले त्यांच्या मागे खटल्यांची माळ लावुन दिली. का नाही सर्व नेत्याना समान सन्मान मिळाला?

शनी स्त्रीस्पर्श आणि इतर मुद्दे

राहु केतु सुर्य व चंद्राच्या परीक्रमेचे छेदन बिंदु आहेत.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानी २००० वर्षापूर्वी ९ ग्रहांची आणि इतर ताऱ्यांची माहिती लिहून ठेवली आहे.
आर्यभट्ट वराहमिहिर हि नाव ऐकून माहिती असतीलच.

हे घ्या दुर्बिणीशिवाय शनी बघा nakedeyeplanets.com/index.htm
पण स्वतःच हसु करुन घेउ नका.

शनीतुन स्पंदन बाहेर पडतात कि नाही ह्या साठी शनीवर जायची गरज काय ? सोलार फ्लेअर अनुभवायला सुर्यावर जातात का?
uv किरण असतील तर चव घेउन बघणार का ?

देव देवता ह्या मानसशक्ती आहेत, स्वर्ग नरक ह्या काल्पनिक आहेत, पोथ्या पुराणे ह्या रुपक कथा आहेत, हा तत्कालिन संस्कृतीचा शब्दश: इतिहास नाही. काव्यरुपाने एका पिढीकडुन दुसर्या पिढीत आले आहे हे सर्व.
 पण नैतिक जबाबदारीसाठी ह्या जागांचे मोह आणि भय आहे.

देवाच्या प्रतिमा किंवा देऊळ हे माणसाची कल्पना आहेत. त्यामुळे एखादी मुर्ती आणि लंबाकृती आयत ह्या दोन्ही शनीच्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक प्रदेशातल्या नैसर्गिक स्थिती प्रमाणे देवाची संकल्पना आहे. त्यामुळे रुप किंवा उत्त्पती किंवा रुढी वेग वेगळ्या आहेत.

प्राचीन साहित्यातात शस्त्रास्त्र मिसाईल्स, आकाशविहाराचे वर्णन आहे जे आज सुद्धा तसेच आढळुन आले आहे. अवयवरोपण व प्लॅस्टिकसर्जरीच्या शस्त्रक्रिया तपशीलात आहेत.

अमेरीकेचे उदाहरण घ्या.तिथे नारायण अस्त्र,पर्जन्यास्त्र, बह्मास्त्र अशी अनेक अस्त्रे व स्त्री-पुरूष वैवाहिक जीवन व महाभारत कालीन जीवन यात साम्य आहे. त्यामुळे जांबूद्विपात समृद्धी होती हे निश्चित.

भारतीय खगोल शास्त्र अमेरिका जपान जर्मनीपेक्षा प्राचीन तरीसुद्धा अचुक आहे.

जपानी सुद्धा त्यांच्या देवळात कर्मकांड करतात.
आणि जर्मन सुद्धा चर्च मध्ये तितकेच धार्मिक असतात.
वर्जिन मेरीच्या कथेवर विश्वास ठेवला तर ते श्रद्धाळु.
राहु केतुंवर विश्वास ठेवला तर हिंदु अंधश्रद्धाळु?

मंगळावर यान पाठवणाऱ्या आधुनिक भारतीय शास्त्रज्ञांनी देवांचे आभार मानले होते. हिंदुंची चेष्टा करणारे इंग्रज आज भारतीय अवकाशातंत्रज्ञानाचा आस धरत आहेत.

हिंदु धर्मात स्त्रीशक्तिला आदिमाया मानले आहे. स्त्रीचा आदर मान सन्मान समानतेने केला पाहिजे अशी शिकवण आहे. समाजव्यवस्थेचा गैरफायदा घेणार्यानी, स्त्रीयाना दुय्यम स्थान दिले.
सती सारख्या प्रथा तिरस्कारणीय आहेतच. स्त्री शिक्षणावर आक्षेप घेणारे मुर्ख आहेत. पण हे धर्माच्या नावाने करणारे नीच हरामखोर आहेत.
मनुस्मृतीत स्त्रियांना हक्क आणि अधिकार आहेत.
गार्गी, अत्रेयी , मैत्रेयी ह्या इसपू काळातील महिला सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या विदुषी होत्या. तेव्हा अरब वाळवंटात आदिमानवी जीवन जगत होते आणि युरोपीय एकमेकांचा जीव घेत होते.

आता तुम्ही म्हणाल भारतीयांचे ज्ञान कुठे गेले.
उत्तर ऐकल तर दुख: होईल का तुम्हाला?

१२ व्या शतकापासुन होणार्या मुसलमानी आक्रमणात ही ज्ञानपरंपरा नष्ट झाली. ईंग्रजानी तर शैक्षणिक आणि वैचारीक  गुलामीच लादली, त्यातुन भारतीय ज्ञानाला कमी लेखणार्या कारकुनी पिढ्यांचे छापखाने तयार झाले.

तरी सुद्धा आज पण आमचा अडाणी शेतकरी पावसाचा आखाडा वेधशाळेपेक्षा चांगला बांधतो.
आयुर्वेदाने असे आजार ठिक होतात जे आधुनिक वैद्यकशास्त्राला जमत नाही.
महाभारत रामयणातली अवकाश प्रवासाची वर्णन खरी कशी ह्याच उत्तर द्यायला जड जाईल तुम्हाला.
 सुश्रूताने शस्त्रकिया यशस्वी केल्याच माहिती नसेलच तुम्हाला. अवकाश विद्येची पुस्तक नष्ट झाली म्हणुन आसुरी आनंद का?
 गणित भुमिती खगोल अवकाश वैद्यक ह्या शाखात भारतीय ज्ञान परीपुर्ण होते व आजसुद्धा वापरता येते.
पण पाश्चात्य विज्ञान खुप ठिकाणी चुकले आणि प्रत्येक शतकात बदलत गेले. आपण लादल गेल आहे म्हणुन पाश्चात्य ज्ञान प्रमाण मानतो. त्याला प्रणाम करायची गरज नाही.