गणपती सेलिब्रेशन आणि ईव्हेंट मॅनेजमेंट


आता गणपती येतील.
जागोजाग मंडप लागतील,
दिवसभर आणि रात्रभर सुद्धा DJ वाजतील.
कार्यकर्ते वर्गणीसाठी दारोदार फिरतील.
कधी प्रेमाने तर कधी दमाने वर्गणी घेउन जातील.
दारु आणि गुटखा विकणार्यांची देणगीदारांच्या नावाखाली बॅनर लागतील.
आयुष्याभर केलेले सगळे गैरधंदे आणि काळा पैसा पचवुन, कंटक आणि टगे झब्बे कुर्ते घालुन बॅनवर गणपतीच्यापण आधी झळकतील, गणेश मंडळाच्या समितीवर पण दिसतील.
दुसर्या गणपती मंडळापेक्षा आपला भारी आणि मोठ करताना वाद, संवाद, विवाद, राडा सगळ यथासांग होईल.
सिनेस्टार सेलिब्रिटी पैसे वाल्याना डायरेक्ट उर्फ VIP एंट्री कार्यकर्ते मिळवुन देतील.
सेक्युलर लोक तक्रारी करतील.
मंडपामुळे ट्रॅफिक आणि गैरसोय होते.
DJ खुप मोठ्याने लावतात..
DJवर अश्लील गाणीच लावतात..

हे सर्व पाहिल्यावर टिळक (बाळ गंगाधर) स्वर्गातुन अग्रलेख लिहतील.

लोकमान्य टिळकानी सार्वजनिक सण (गणेशोत्सव) साजरे करायला उद्युक्त केले ते रस्त्यावर मंडप आणि DJ वर अश्लील गाणी लावुन नाचायला नाही.

हिंदु आणि इतरही समाज एकत्र व्हावा म्हणुन सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. आज मुसलमान किंवा ख्रिश्चन कार्यकर्ते संपुर्णवेळ गणेशमंडपात असतात , हे सामजिक सलोख्यासाठी खुपच महत्वाचे आहे.

व्याख्यानमाला किंवा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणार्यांची चेष्टा होते.
अश्लील गाण्यावर ढुंगण उडवायचे नाचगाण्याचे कार्यक्रम असले की मंडळाचा संपुर्ण खर्च वसुल!!

आता, मंडळाचे मॅनेजमेंट झाले
आणि उत्सवाचे ईव्हेंट झाले.