स्वप्न


स्वप्नातल्या जगात
मनातल्या गोष्टी दिसतात
काही घडलेल्या
काही न घडलेल्या
काही घडव्याश्या वाटणर्‍या

स्वप्नात असतात
प्रिय अप्रिय सगे सोयरे
कधी कधी आपणच असतो
आपल्या स्वप्नातले पाहुणे

कधी करतो प्रेम 
कधी भांडण
कधी करतो गोष्टी
कुणाला न 
सांगाव्याश्या वाटणार्‍या

कधी स्वप्न अचानक
संपुन जाते
आणि जाग येते
आपण समजावु
पहतो अर्थ मनाला
पण वेडे मन ते 
ते  स्वप्नातच दंग रहाते

- अस्मादिक 
प्रेयसीच्या केसांमधून फिरणारी बोटे जेव्हा, बंदुकीच्या चापांवरून फिरतील तेव्हा या देशाला लोक हिंदूस्थान संबोधतील.-वि. दा. सावरकर. वंदे मातरम!!!

प्रेयसीच्या केसांमधून फिरणारी बोटे जेव्हा, संगणकाच्या किबोर्डवरून फिरतील तेव्हा या देशाला लोक इंडिया संबोधतील. -अज्ञात. जय संगणक!!!

एका आजोबांची प्रेमकहाणी

प्रेमविवाह झालेल्या एका आजोबांना,
एकदा मी विचारले-
डोक्यात तुमच्या प्रेमाचे,
भूत कसे संचारले?

सांगा आजोबा आजीला,
तुम्ही डोळा कसा मारलात?
सांगा तेव्हा आजीच्या,
तुम्ही प्रेमात कसे पडलात?

आजोबा म्हणाले, थांब लेका,
करू नकोस घाई
तिच्या माझ्या प्रेमाची,
गोष्ट छोटीशी नाही काही

मी म्हटले आजोबा,
आजीला पाहिलात तरी कुठे?
आयुष्य तिच्या नवे आणि
झालात वेडे पिसे

आजोबा म्हणाले प्रेमाचिया
गम्मत असे न्यारी
थोडासा तू धीर धार
सांगतो सर्व काही

घरात एका छोट्याशा,
होतो आम्ही राहत
जात असे घरासमोरून त्यांच्या,
रोजच मी चालत

पाणी घालताना तुळशीला अंगणात,
एकदा तिला पहिले
एका नजरेत हृदय माझे
तिला मी वाहिले

पुजेची तिच्या वेळ
मला जेव्हा कळली
कामावर जायची घाई मी
तेव्हापासून टाळली

काय आजोबा तुम्ही सुद्धा
फारच भावूक दिसता
एका क्षणात कोणालाही
हृदय देऊन बसता

माझ्यासाठी बाला ती
सर्व काही होती
ती माझी झाली तर,
मला कुणाचीच गरज नव्हती

म्हातारी असून आज्जी अजून
एवढी सुंदर दिसते
सांगा ना आजोबा आजी तेव्हा
अशी दिसत असे?

आज्जी तुझी बाला जणू
अप्सराच दिसे
तिला पाहता हरवून जाई
मला कसलेच भान नसे

सुंदरशी काय अन
नखरेल ती नर
सुंदरसा चेहरा
पडे जगाचा विसर

रोज फाटकातून त्यांच्या तिला,
मी चोरून पाहत असे
ओल्या केसांत चेहरा तिचा
खूपच गोड दिसे

लांबसडक केस अन
मोहक असा चेहरा
पाहून मग होत असे
होत असे मी बावरा

नाजुकशी बांधणी तिची,
साडी ती नेसायची
तंग अशा चोळीमधून,
अंग ती चोरायची

बारीक त्या भुवया तिच्या
काळे काळे डोळे
मधेच मग लावत असे
पापण्यांचे जाळे

गोड गुलाबी ओठांमध्ये
नेहमीच स्मितहास्य असे
शुभ्र तिच्या त्या दातांमध्ये,
जणू द्वितीयेचा चंद्र दिसे

अशा सुंदर ललनेला,
रोज चोरून मी पाहायचो
नजर माझ्यावर पडताच तिची,
दडून मग रहायचो

आजोबा तुम्हाला आजी जर,
एवढी एवढी आवडायची
मनातली गोष्ट तुमच्या मग,
लगेच सांगून टाकायची

प्रत्येक गोष्टीत बाला अशी,
घाई करायची नसते
प्रेमाच्या या विषयाला,
थोडे सबुरीने घ्यायचे असते

मी म्हटले आजोबा,
काय झाले मग?
आजोबा म्हणाले ऐक पोर,
पुढे गम्मत बघ

हा हा म्हणता अशामध्ये,
बारा महिने गेले
तरीसुद्धा माझे प्रेम मी
व्यक्त नाही केले

हृदयातला शब्द कधी,
ओठांवर येत नसे
घाबरत नसलो जरी तरी,
थोडा 'भीत' मी असे

म्हणजे आजोबा तुमचे प्रेम,
इथेच बोंबलले असेल
मागणी घालायला तुम्ही आणखी,
वर्ष घालवले असेल

म्हणजे मला पोर तू,
भेकड समजतोस कारे?
जा पुढे सांगत नाही,
गेलास उडत तू रे!

मी म्हटले आजोबा,
मला तसे म्हणायचे नव्हते
जाऊ देत ना ते! मला सांगा,
पुढे झाले काय ते?

एके दिवशी कळले मला,
तिलाही मी आवडत असे
कारण, प्रदक्षिणा पूर्ण झाल्या,
तरी ती तुलशीभोवातीच रेंगाळत असे

माझ्याही आधी मला ती,
म्हणे गुपचूप गुपचूप पहायची
मला सरळ सांगणार कशी,
माझ्यासारखीच घाबरायची

मग काय मी पठ्ठा
घाबरतोय कोणाला कसला?
उद्याच तिला विचारतो,
मनात एकाच निश्चय केला

रात्रभर बसून मग एक,
प्रेमपत्र लिहिले
मनातल्या सगळ्या भावनांसाहित,
त्यात मनसुद्धा ओतले

रोजसारखा ऐटीत मी,
त्यांच्या फाटकापाशी आलो
पुन्हा पाहताच तिला,
सारे विसरूनच गेलो

मग आलो भानावर,
का आलो ते आठवले
सारी हिम्मत एकवटून,
मग मन घट्ट केले

पत्र गुंडाळून दगडात एका,
तिच्या कडे भिरकावले
नशीब माझे दगडासाहित पत्र,
तिच्या डोक्यात नाही पडले

तुळशीभोवती आज फेऱ्या,
पुरे मारल्या तेवढ्या
किती उशीर केलास,
वाट किती पहायची वेड्या?

पत्र उचलून माझे ती,
घरात निघून गेली
उततात द्यायला पुन्हा बाहेर,
कशी नाही आली

शंकांचे ते काहूर मनी,
घेऊन मी निघालो
कितीवेळा आपटलो अन
कितेकदा पडलो

दुसऱ्या दिवशी त्याच वेळी
त्यांच्या फाटकाबाहेर
होकार मिळतो आहे,
की दंडुक्यांचा अहेर

पूजेला ती तुळशीपाशी,
आज थोडी उशीरच आली
तिला पाहताच मनाची माझ्या,
शांती जरा झाली

प्रत्त्युत्तरादाखल तिने मला,
पत्र होते लिहिले
गालातच हसून तिने,
माझ्याकडे फेकले

उत्तर वाचेपर्यंत माझा,
मलाच नव्हता धीर
कासावीस जीव आणि,
काळजाची खीर

होकार तिचा कळताच मला,
मीच चिंता गेटला
एवढे सोप्पे होते,
कदाचित मीच उशीर केला

मग काय आजोबा तुम्ही,
हाती लागत नसाल
चोरी चोरी चुपके चुपके
रोजच भेटत असाल

चोरून तिला भेटण्याचा
आता प्रश्नच उद्भवत नसे
संध्याकाळी बागेमध्ये,
रोजच भेट असे

एकदा आमची चोरी,
आम्हाला भलतीच महागात पडली
जेव्हा तिच्या बापाची
नजर आमच्यावर पडली

कान धरून त्यांनी
तिच्या कानफटीत मारल्या
घाबरलेलो मीही, पण मनातच,
त्यांना चार शिव्या घातल्या

चार दिवस त्यांनी तिला,
कोन्दुनही ठेवले
मीही तिला भेटण्यासाठी,
फार प्रयत्न केले

एके दिवशी धीर करून,
सरळ त्यांची घरी गेलो
माफ करा सासरेबुवा,
पण आम्ही प्रेमात न्हाऊन गेलो

आता आम्ही राहणार नाही,
एकमेकांशिवाय
जास्त विचार करू नका,
आता लग्न हाच पर्याय

तुमच्या या लेकराला मी,
फुलासारखा जपेन
सुखासाठी तीच्या मी,
आयुष्यभर झटेन

नाही नाही म्हणता म्हणता,
परवानगी माळली
तिच्या माझ्या घरच्यांनी,
लग्नाची बोलाणीसुद्धा केली

ठरला आमचा साखरपुडा,
ठरला लग्नाचा दिवस
याच्यासाठीच केले होते,
आम्ही कित्येक नवस

लग्नाच्या त्या प्रेमळ अशा,
बंधनात आम्ही अडकलो
साथ देऊन एकमेका
अजूनपर्यंत सुखात राहिलो

डोळ्यात पाणी आजोबांच्या,
आले गोष्ट सांगतेवेळी
नांदा सौख्यभरे!
संपली आजोबांची प्रेमकहाणी
 
No One Can Be Vaishali Like Me.. - Buzz