१५०० कोटी आणि सरकार , वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर वगैरे वगैरे

वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर
या सारख्या रिटेल क्षेत्रात पारंगत परकिय उद्योजकांना भारतात संधी देण्यापेक्षा आपले सरकारच स्वतः १५००कोटी रुपये गुंतवतणुक करुन का हे उद्योग सुरु करत नाही
त्यामुळे खालील फायदे होतील.
१ मक्तेदारी ःMONOPOLY
फक्त भारत सरकारची राहील जशी रेल्वेची आहे तशीच
२ रोजगार ः LABOUR
अंदाजे २००० व्यक्ती किमान काम करतील
आणि जोड व्यवसायक RELETED SECTOR आहेतच.
३ स्थायी नागरिक
रोजगार मिळेल म्हणजे प्रांतवाद कमी होईल सदर प्रदेश सक्षम बनतील
३ डबघाईत BANKCRUPCY
आलेले व्यापारी सुद्धा प्रेरित होतील गुंतवणुक करायला भारतात ़
जागतिक बाजारपेठेत भारत प्रगती करेल
PLEASE GIVE YOUR IMP ADVCE
कृपया आपले सल्लेरुप मत नोंदवा.

बालभारती - आठवणीतील कविता


या पुस्तकाची original कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. मराठी भाषा आता कात टाकते आहे. नव्या सुंदर स्वरूपात ती विश्वाला गंवसणी घालण्यास सज्ज झाली आहे. साता समुद्रापार मायबोलीची पताका फ़डकावी  हे तो श्रींची ईच्छा. मराठी भाषेला नव्या युगात मानाच्या स्थानावर नेण्याच्या असंख्य लोकांच्या प्रयत्नाला आम्ही हातभार लावू शकतो यात आम्हाला आनंद आहे. इंग्रजी भाषेत सुमारे चार लाखांहून अधिक पुस्तके आहेत. या युगात मराठीला मागे राहून चालणार नाही. म्हणून आपल्यासारख्या वाचकांच्या पाठिंब्यासह आम्ही वाटचाल करत आहोत. आजवर आम्ही नियतकालिके आणि -पुस्तकांची १५० प्रकाशनं केली अहेत. आणि जिद्द आहे इंग्रजीच्या महासत्तेला टक्कर देण्याची. माझी अमृताते पैजा जिंकणारीआपली मायबोली, आम्हाला ही पैजही जिंकूनच देईल असा आम्हांला ठाम विश्वास आहे.

ई साहित्य प्रतिष्ठानची पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठीभेट द्या : www.esahity.com
हे ई पुस्तक कसे वाटले ते जरूर कळवा.

ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तके विनामूल्य़ नियमित मिळण्यासाठी लिहा : esahity@gmail.com

हा अंक नियमीत मिळण्याकरिता आपला ईमेल ऐड्रेस आमच्याकडे नोंदवा
-
ई साहित्य प्रतिष्ठान

मराठी माणूस कधीच झोपत नाही,
कोणाच्या वाटेला हि जात नाही आणि दुसर्याच्या तोंडाचा घास सुद्धा खात नाही,
पण कोणी जर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळेच काय पोटातली आतडी पण बाहेर काढायला मागे सरत नाही.
तो शांत आहे शांतच राहूद्या नाहीतर नवा इतिहास लिहायला कागद पुरणार नाही आणि वाचायला शत्रू उरणार नाही.
अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.

फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.

आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्‍यावरती जाऊ नका.

करुन टाकेन तुकडे तुकडे aamchay नादाला लागू नका
 
-http://www.facebook.com/aawarakar

घरघुती मराठी-अड्डा गणेश-उत्सव स्पर्धा..2011..!!

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्या..!!

मित्रांनो...आपण गणेश-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो! हयावर्षी अड्डा टीम ने स्पर्धा आयोजित केली आहे. आपण ह्या स्पर्धेत आपल्या गांपतीबाप्पाचा फोटो, थोडीफार गणेश-उत्सवाची माहिती आणि तुमचं पत्ता लिहून भाग घेऊ शकता..! मित्रांनो विजेता डेकोरेशन, आणि तुमच्या घरी कसं साजरा होतो ह्यावर ठरवलं जाईल..!   तुम्ही फोटो टाकताना "ganesh spardha" हा tag वापरा म्हणजे http://www.marathiadda.com/photo/index-7 ह्या पेज वर फोटो आपोआप अपलोड होईल .!! ह्या पानावर फक्त गणेश-उत्सव स्पर्धेचे फोटो असतील...!
काही समस्या असतील तर एथे सांगा मग आमचे संचालक (admin) हेल्प करतील..!
प्रथम, द्वितीय  आणि तृतीय क्रमांक येणार्‍यास अड्ड्याकडून छोटीशी भेट दीली जाईल..

जास्तीत जास्त सभासद सहभागी होतील अशी अपेक्षा आहे..गणपती बाप्पा मोरया..!!

नोट: तुमच्या मित्राच्या/शेजारच्यांचा गणपतीबाप्पाचा देखावा टाकू शकता..!!

"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???

"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???
१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा"लोकायुक्त" निवडला जाईल.
२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सरकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्...तीत जास्त १ वर्षआणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.
४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.
५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...
......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूलकेला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.
६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचेकाम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोगजास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.
७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय !
८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही!या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.
९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.
१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरु द्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.
११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.
आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे.
म्हणून अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या

साधेपणा, टोपी, चष्मा, लाठी आणि बापू

एकदा सोनियाजींच्या स्वप्नात बापू आले.
"मी मरताना कॉंग्रेसला साधेपणा, टोपी, चष्मा आणि लाठी दिली होती. आता कुठे आहेत?
सोनियाजींनी अत्यंत विनम्रतेने सांगितले,
"टोपी राहुल लोकाना घालत आहे,
साधेपणा माझ्या आणि प्रियंका कडे आहे,
चष्मा मनमोहन कडे आहे,
आणि लाठी सामान्य लोकांच्या सेवेमध्ये आहे."

लोकमान्य : जुलै २३,इ.स. १८५६ -ऑगस्ट १, इ.स. १९२०

 http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/58/Bal_G._Tilak.jpg 
इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"  त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे.

९१ वर्षांपूर्वी टिळक ज्या गोष्टींची चिंता करत होते त्या अजूनही थोड्या फार प्रमाणात आहेतच.गटारीच्या शुभेच्छा देणारे टिळक पुण्यातीथीला मात्र गायब !!

पाउस , पाणी आणि वसई नवघर रेल्वे स्थानक.

















Lashing rains throw vasai out of gear : heavy rains lashed the city throughout disrupting road,train services. Water logging was reported at most of the places. Picture by Manoj Mehta @ http://www.vasai.com/

U think authorities didn't noticed it?
It has been same way for many years.Nothing going to change unless we pour that water bucket-by-bucket into the Authority's offices :D

ओर्कुट फेसबुक आणि गुगल+



prafulla patil originally shared this post:
कोणे एके काळाची गोष्ट आहे ज्यावेळेस ओर्कुट वापरले जायाचे ओर्कुट वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता तर फेसबुक लास्ट बेंचवर बसायचा पण फेसबुक ने खुप मेहनत घेतली आणि वर्गात पहिला आला. ओर्कुट चा हिरमोड झाला.नंतरची काही वर्ष फेसबुकच प्रथम येत होता.थोड्याच दिवसांनी ओर्कुटने आत्महत्या केली. गुगल त्याची आई कायम म्हणायची 'मेरे बेटे आयेंगे मेरे करन अर्जुन जरुर आयेंगे' आणि गुगल+ चा जन्म झाला.

स्वयंपाक घरे अडचणीत -

स्वयंपाक घरे अडचणीत -

.
दिल्लीच्या बाईकडे गहाण पडल्याने महाराष्ट्रात चमच्यांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे !!!!
:D :D :D
source-मराठी मुलगा (फेसबूक)

राहुल गांधीची मुक्ताफळे आणि esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

  • राहुल बाळा तुझे वडील आणि आजी हे दहशतवाद्या कडून मारेली गेले आहेत हे लक्षात ठेव . आणि मग काय ते बोल. आणि त्या दिग्गी राजा ला काही काळात नाही . त्याची बुद्धी काम करत नाही. 
  • लहान तोंडी मोठा घास!  
  • तरीच म्हटले अजून भावी पंतप्रधानांचे विधान कसे आले नाही. हा माणूस पंतप्रधानाच्या लायकीचा अजिबात नाही. अशी बेताल आणि बेधडक विधाने करून या मुर्खाला कुठे काय बोलावे कळते का? ह्या माणसाला लाज कशी वाटत नाही अशी बेधडक विधाने करायला. अरे राहुल तू नको तेथे काशाल उगाच नाक खुपसत बसलाय. तुला राजकारणातले काय कळते का? जपून विधाने कारण सोडाच हा सरळ म्हणतोय की मुंबईवर आणखी दहशतवादी हल्ले होताच राहणार. ह्याने काय दहशतवाद्याकडून सुपारी घेतली आहे काय ह्याची चौकशी कोण करणार. दहशतवादी बहुदा ह्याचे नातेवाईक दिसतात. 
  • एका नवा जावई शोध : जगातील कुठल्याही राष्ट्रापेक्षा आपलं राष्ट्र सुरक्षित . त्या दिग्विजय सिँगाचा आणि राहूल गांधी ' अक्कलचे तारे ' तोडायची सवयचं आहे . ज्या देशाचे दोन - दोन "पंतप्रधान "दहशतवादी हल्ल्यात मारले गेले ते राष्ट्र सुरक्षित .॥  
  • खरा धोका भारताला दहशतवाद्यांपासून नसून राहुलबाबा, दिग्गीरजा, धूर्त सोनिया यांच्यासारख्या नेत्यांपासून आहे. याने जे अकलेचे तारे तोडले आहे ते पाहून येशूने काढलेल्या उद्गाराची आठवण होते. " देवा यांना क्षमा कर हे काय बोलत आहेत ते त्यांना काळात नाही " 
  • अरे लाज वाटत नाही का बोलताना?? हरामखोर साले !!!!!!! तुमचे आई, बाप, भाऊ , बहिण, मित्र कोणी मेले नाही ना या हाल्यात ??? आणि मेले असते तरी तुम्ही अशीच प्रतिकिया दिली असती का ?
  • अहो युवराज तुम्ही कुठल्या जगात राहता? ९९% हल्ले कमी झालेत?? मग कालचाहल्ला आणि बाकी देशभरात चालू असलेले हल्ले काय गणेशोत्सव म्हणायचे का काय? 
  • मूर्ख माणूस आहे हा :-( लाज वाटते कि हा आपला भावी "पंतप्रधान" असणार आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, दहशदवाद, प्रदूषण, लोकसंख्यावाढ, गरिबी... किती घाणेरडं आयुष्य जगतोय आपण. अरे काही तरी करा! एकही चांगला नेता नाही का?
  • ९९% हल्ले कमी? अरे कोणी तरी ह्या राहुल ला आवरा रे. नाहीतर comedy circuis के तानसेन मध्ये तरी भाग घेऊ द्या. 
  • बोलले, राहुल गांधी बोलले ... तरीच म्हटलं अजून कसे बोलले नाहीत. दहशतवाद जाऊदेत हो, पहिले तुम्हालाच थोपवायला हवे ... म्हणजे दहशतवाद आपोआपच थोपवला जाईल. दहशतवाद टक्क्यात मोजतायत ... पण एक नक्की, पुढच्या निवडणुकीत तुम्हाला १००% निवडून देणार नाही.  

esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

  • विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला | तेथे पैजाराचे काम, व्हावे अधमाशी अधम............. माउली माफ करा.......आता नको तुमचे पसायदान...... आता हवी तुकोबांच्या हातातली वहाण............... 
  • मेन बत्त्या गोळा करू या चला
  • हे सरकार काहीही करू शकणार नाही. आता एकच करा, काश्मीर पाकला देऊन टाका आणि इस्ट इंडिया कंपनीला सरकार चालवन्याचा ठेका द्या. आऊत सोर्स करा.
  • बहुतेक केंद्र सरकार भारताची लोकसंख्या बॉम्बस्फोटात मरून अर्ध्यावर येण्याची वाट पाहत आहे. म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला.
  • अफझल गुरु तुम जियो हजारो साल - हम मरते रहेंगे सालोसाल !!!  
  • आता परत एकदा चर्चा, चौकशी आणि मेणबत्या घेऊन फिरणे; परत तीच NSG धावपळ, आणि कातडी वाचवण्यासाठी राजकारण्याची लगबग; शांततेचं आवाहन; जगण्याचं Mumbai Spirit; देवा एकतर तुच आता बदल हे सारं, अथवा मुर्दाड बनवं आम्हाला असं कि काहीच वाटु नये परत परत ... 
  • पाकिस्तान या बाबतीत पूर्णपणे निर्दोष आहे. लवकरच पुन्हा दुसरा बॉम्बस्फोट झाल्यावर हे सिद्ध होईल. हे फक्त पाकिस्तान, कसाब "जी", अफजल "जी" यांना बदनाम करण्याचा कट आहे.  
  • १००% कॉंग्रेसचा हात !!! हातावर शिक्का मारा आणि कॉंग्रेस ला विजयी करा ... 
  • मेडियाच्या टेबल मध्ये आणखी एका हल्ल्याची भर पडली...४ दिवस फुल धंदा...जाहिरातींचे रेट वाढवलेसुद्धा असतील...  
  • सर्वात प्रथम, दयेचा अर्ज राष्ट्रपती कडे करण्याचा निंयम बंद करा आत्ता तरी आणि या हरामखोर कसाब ला आणि त्या अफझल गुरु ला फाशी द्या. कोणती माहिती गोळा करत आहे सरकार त्याच्या कडून कोण जाणे. " हे दहशतवादी मंत्रालयावर आणि संसदेवर बॉम्ब का टाकत नाहीत." म्हणजे निम्मे तर कमी होतील. 
  • मला आता वाटते कि "सायमन परत ये" चे एक आंदोलन करायला पाहिजे.. इंग्रजांच्या शिवाय या देशाला चांगला पर्याय दिसत नाही... शिवाजी राजे, झाशीची राणी या सारखी मुत्सदी लोक जन्माला घालणे आमच्या देशाने बंद केलेले दिसते.. कोण कोण येणार आंदोलन करायला... मी ब्रिटन च्या राणी ला पत्र लिहायला तयार आहे.... :)  

- esakal.com वाचकांच्या प्रतिक्रिया :D

हे सगळे ....आमच्या नशिबात आले रे बाबा .......... .. !!!!!!!!!! !!!!!!

मुंबईत पून्हा ब्लास्ट ..
१ } बडेबडे शहरोमे छोटेछोटे बाते .. {आर.आर} 
२ } वर्क इन प्रोग्रेस .. वी विल कम आफ्टर टू हवर वीत न्यू अपडेट .. { चिंदबरम } 
२ } मी महाराष्ट्र . मुख्य मंत्रि .. म्हणून सांगतो .....शांतत ा .. राखा { पृथ्वीराज चव्हाण } 
३ } घाबरून जाऊ नका .....अशा हल्यांचा समर्थ पणे सामना केलेला आहे या पुढे हि करू ... { अजित दादा } 
५ } मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला { मनमोहन सिंग ..} 
अरे देवा .......... ..... अरे कोणती पाप केली रे .......... .......... .. आणि हे सगळे ....आमच्या नशिबात आले रे बाबा .......... .. !!!!!!!!!! !!!!!!

मुंबईवर १८ वर्षांत १४ हल्ले; ५०० ठार , २००० जखमी.

अधिक वाचा ईथे : सकाळ

 

मेरा नेता (काम)चोर है !!



बाकी 'कसाबचा' वाढदिवस जोरदार साजरा झाला !

       असे ऐकण्यात आले आहे की सहानुभूतीच्या तव्यावर प्रसिद्धिची पोळी भाजून घ्यायला गेलेल्या नेत्यांना मृत व जखमींच्या नातेवाईकांनी हाकलून दिले!!! दहशत्वाद्यांना सुरक्षित ठेवून जनतेला नाक मुठीत घेऊन जगायला लावणर्‍या या निर्लज्ज नेत्यांना कसली अपेक्षा होती? 
        संसदेवर ११ वर्षापुर्वी हल्ला करणारा मोहम्मद अफझल अजुनही सरकारी पाहुणचार झोडत आहे. या निगरगट्ट जाकिटधारी टोणग्यांना वाचतांना शहिद झालेल्या जवानांचे आत्मे तडफडत असतील.२.५ वर्षापुर्वी शेकडो निरपराध्यांचे प्राण घेणारा अजमल कसाब अजुन जिवंत आहे.
बहुदा सरकाचे असे सांगणे आहे कि निरपराध लोकंना मारा आणि सरकारी खर्चाने सुरक्षित आयुष्य जगा !

वासूनाका'ची नवीन आवृत्ती



वासुनाका पहिल्यांदा वाचल.अगदी नकळत्या वयातच वाचल.वावटळीत सापडलेल्या पल्यापाचोळ्यासारख मन विस्काटून गेल.असा नाका एकदा तरी बघायला मिळेल का अशी हुरहूर लागली.पुढे कॉलेजच्या नावाखाली उनाडक्या करताना मुबंईत अनेकदा वासुनाक्याचे अवशेष दिसले.काही वर्षांनंतर ईटंरनेटवर ऑर्कुट हेच वासुनाका बनल.आता वासुनाक्याची जागा फेसबूकने घेतलीय.नाक्यची जागा बदलली पण माणस तशीच राहीली.

वटपौर्णिमा,

सर्व विवाहीत स्त्रिवर्गाला एक आग्रहाची विनंती....

स्वत:च्या पतीच्या प्राणासाठी वडाच्या झाडाचे प्राण घेवू नका...!!

तरी कृपया घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याचे टाळा व अश्या प्रकारे वडाच्या फ़ांद्या तोडणा-यांना आवर घाला.

घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून मिळणारा लाभ मिळेल का ???

मृगाचे मनःपुर्वक स्वागत

ऑफिसमधे काम करत असतांना सहज नजर वर गेली आणि दिसलं की आकाशाच्या एका कोप-यात सूर्य, आपलं देखील अस्तित्व आहे असं काहितरी त्या काळ्या काळ्या मोठाल्या ढगांना सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रकार आहे बघावं म्हणून जागेवरून उठुन खिडकीपाशी गेले तर दिसलं की संपूर्ण आकाश काळ्या-निळ्या ढगांनी अगदी गच्च भरून आलंय आणि आता कधीहि पावसाला सुरूवात होईल....हे सगळं बघुन कुठेतरी मनात तुझा विचार चमकला आणि का काय माहित खुप हुरहूर वाटायला लागली....अगदी एकटं असल्याचा भास झाला...आजची संध्याकाळ खूप अवघड जाईल सरायला असं वाटायला लागलं...आणि अचानक एक विचार चमकला, ह्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे उमगलं, तू भेटू नाही शकत हे दिवसभर मनाला समजावून सांगितलं तरीहि त्याचं वाट बघणं आणि त्या वाट बघण्यात संध्याकाळचे चार तास चौपट झाल्यासारखं वाटणं ही सगळी प्रक्रिया काळिज चिरत जाते आणि आपल्याला ह्या धार-धार कात्रिला कुठेही थांबवता येत नाही!!! आह!!!

अजुन मी खिडकीपाशीच उभी होते...मधल्या वेळेत सूर्य कधी अस्ताला गेला आणि उरलं-सुरलं आकाशही त्या ढगांनी व्यापुन गेलं कळलंच नाही आणि बघता बघता पाउस सुरू पण झाला...पहिला पाउस!! एक मन अगदी लहान मुलाप्रमाणे उडया मारत होतं आणि दुसरं मन तुझ्या आठवणींनी अगदी काठोकाठ भरून आलं होतं....ह्या सगळ्या विचारांमधे मी कधी ऑफिसच्या बाहेर पडले ते माझा मलाचं कळालं नाही...मग पहिला थेंब, दुसरा, तिसरा आणि आणि सहस्त्र जलधारा...पहिल्या पावसात मी पुरती भिजले अगदी खोल खोल आतपर्यंत...जणू तुच मला सहस्त्र धारांनी कवेत घेतलस....



प्रियांका जगदिश जोशी

http://maziblogbhoomi.blogspot.com/

रामदेव बाबा आणि काळा पैसा !!

काळा पैसा ठेवलाय स्विस बॅकेंत ! सगळा पब्लिसिटी सस्टटं आहे! स्विस बॅकेंतून कोणत्याही प्रकारची माहिती उघड केली जात नाही मग ठरवणार कसे की काळा पैसा आहे कुठे आणि किती ?
आतापर्यंत एवढे घोटाळे झाले पण कधी कोणी घोटाळ्यातला पैसा सरकारजमा केलेला ऐकलाय का?

शिवराज्याभिषेक दिन



छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक र...ायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम रामदास स्वामी आणि आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशिर्वाद घेतले.
त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले (तत्पूर्वी क्षत्रियधर्मानुसार कर्मे न केल्याबद्दल.). जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.
दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. यानंतर दोन ब्रह्महत्या पूर्वी कधीतरी झाल्या होत्या याबद्दल ८००० होन प्रायश्चित्त म्हणून देण्यात आले.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशिर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरुन गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशिर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशिर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले....

थोड्या गप्पा मारूया !

    थोड्या गप्पा मारूया !

    

    गप्पा मारायला जमायचंय दोस्तांनो. आपल्या या ई मेलने जाणार्‍या अंकाचे वाचक आणि कवी आणि संपादक कधी एकत्र भेटतच नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे संपादक आहेत की जे गेली चार वर्षं एकत्र काम करतात पण एकमेकांना आजवर भेटलेले नाहीत. कवी आहेत जे नेटमुळे दोस्त झालेत पण प्रत्यक्षात भेटलेच नाहीत. तर रवीवारी प्रत्यक्ष असे कॉलेजच्या एका वर्गात एकत्र भेटून गप्पा माराव्यात. समव्यसनी लोकांच्या नुसत्या अनौपचारीक गप्पा. ओळख. कविता. गाणी.

    

    कशी आहे कल्पना ?

    

    तर निमित्त म्हणून नेटाक्षरीचा शतकोत्सवी अंक .

    

    रविवार दिनांक २९ मे २०११ रोजी नेटाक्षरीच्य़ा शंभराव्या अंकाचे प्रकाशन कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते होत आहे.

    

    त्यानंतर आपल्या आपल्यात गप्पा गोष्टी वगैरे करायला भेटुया का ? एकमेकांचे विचार समजून घेऊयात.

    

    स्थळ : SIES कॉलेज, सायन सर्कल जवळ. सायन(ईस्ट). मुंबई

    

    वेळ : रविवार २९ मे सकाळी ११.०० वाजता

    

    भेटाच्चं, बरं का ! नक्की या !

मराठीचे चित्रपटांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर वर्चस्व

 लोकसत्ता २० मे २०११
सन २०१० च्या ५८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट ‘बाबू बँड बाजा’मधील अभिनयाने मिताली जगताप वराडकरला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला. ‘मी सिंधुताई सपकाळ’ ने तीन तर सामजिक आशयाचा सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह ‘चॅम्पियन्स’ या मराठी चित्रपटातील शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर तसेच ‘बाबू बँड बाजा’तील अभिनयासाठी विवेक चाबुकस्वार यांनी सवरेत्कृष्ट बाल कलावंतांचा विभागून पुरस्कार पटकावित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटविला.


वसईच्या वाडवळी बोलीतील कविता

वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता . मुसळधार पडणाऱ्या पावसाची , एका गृहिणीने घातलेली ही समजावणी .)

अवडा पर जाला का तुला
कांय होते रे आबा
कोण पोटात रेते तुया उबा
आथं तरी बस कर रे बाबा।।धृ।।

पोटाईन अलेल्या बायकोयावाणी
खाली उतरतात जये ढग
वाटते आथ्थंस बुडेल यं जग
जीवायी कायली होते मंग
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।१।।

तू केला रागावलाय अवडा
तरी माथ्यात भरते ईजेया केवडा
कोण थोपील रे या गडगडाटा
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।२।।

वावून गेला तुआ जकला पाणी
मयना जाल्या रगताया वाणी
माफ कर रे बाबा आमशी करणी
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।३।।

पडून पडून तू थकला रे
रडून रडून तू भगला रे
तू माआ जकल्यात धकला रे
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।४।।

शब्दार्थ -
अवडा पर- या प्रहरी, या वेळी
जाला- झाला
आबा- आभाळ
उबा- उभा
आथं- आता
पोटाईन- गर्भवती
आथ्थस- आत्ताच
अवडा- इतका
वावून- वाहून
जकला- सगळा
मयना- महिना, ऋतुस्त्राव
आमशी- आमची
धकला- धाकटा मुलगा
भगला- भागला, थकला

(ref:http://www.aamhimarathi.in/samjavan/)
समजावणी - Aamhi Marathi
www.aamhimarathi.in
वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता . मुसळधार पडणाऱ्या पावसाची , एका गृहिणीने घातलेली ही समजावणी .)

सरकार आणि माश्या.

काही कामानिमित्त २ वेगवगळ्या सरकारी हापिसात जाण्याचा योग आला.सरकारची लाडकी सेवा BSNL पुर्णपणे ठप्प असल्याने कामकाजाच्या बाबतीत आनंदच होता.एरवी सरकारी कर्मचार्‍यांच्या तोडांवरची माशी उडत नाही असे म्हणतात पण BSNL बंद असल्याने तेच कर्मचारी माश्या मारत बसले होते.
तसे पाहता बहूतेक सरकारी कार्यालयात BSNL ची सेवा पुरवली जाते.आणि एतर ईटंरनेट सेवांपेक्षा जलद व स्वस्त असल्याने BSNLचा वापरही जास्त आहे.पण आठवड्यातून २-३ दिवस बंद होणार्‍या सेवेस कटांळून ग्राहक ईतर ईटंरनेट सेवांकडे वळत आहेत.वास्तविक बॅंकेसारख्या ठिकाणी BSNL सारखी बेभरवश्याची सेवा असल्याने कामपेक्षा व्याप जास्त होतो.अर्थात साक्षात BSNLच्या कार्यालयात ईटंरनेट बंद असल्यावर ईतरांची काय कथा?

२८ रुपये प्रती लिटर!!

हार्दिक अभिनंदन...
पेट्रोल चे वाढलेले भाव पुन्हा एकदा सहन केल्या बद्दल आपले हार्दिक आभार...
खरच आपण खूप महान आहोत.. सहन करण्याच्या बाबतीत तर आपण गांधीजींनाही मागे टाकले...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० $ प्रती पिंप आहे... म्हणजे अंदाजे ४५०० रुपये प्रती पिंप... प्रत्येक पिंप हि १५८ लिटर ची असते म्हणजे जवळपास २८ रुपये प्रती लिटर...प्रक्रीया केलेल्या पेट्रोलसाठी आपण देतो ६८ रुपये प्रती लिटर...१० रुपये आपण कर दिला तरी वरचे ३० रुपये आपण देतो विकाससाठी... आणि विकास तर खूपच जोरात चालू आहे... खरच आपण महान आहोत...
ए. राजा ने केलेला घोटाळा आहे १ लाख ७५ हजार कोटीचा... आणि पेट्रोल डीजेल ची सबसिडी सरकार देते वर्षाला ७०-८० हजार कोटी... म्हणजे एकटा राजा ११० कोटी लोकांचे २ वर्ष पैसे खातो... असे कित्येक आहेत घोटाळे...
आणि आपण हे सहन करतो...
खरच आपण महान आहोत...
Received With Thanks From
Rahul Borse.

अधिक माहितीसाठी http://www.kshitij.com/research/petrol.shtml

वसई विजयोत्सव.: शाहिर महर्षी पाडूंरंग दत्तात्रय खाडिलकरकृत पोवाडा....

वसई विजयोत्सव.: शाहिर महर्षी पाडूंरंग दत्तात्रय खाडिलकरकृत पोवाडा....: "Pdk Book1 Pgs163-170 Vasaivedha"

वसई विजय दिन १५ मे

वसई विजय दिन १५ मे.

Vasai Vijay Din 15 May 2011

स्वप्न


स्वप्नातल्या जगात
मनातल्या गोष्टी दिसतात
काही घडलेल्या
काही न घडलेल्या
काही घडव्याश्या वाटणर्‍या

स्वप्नात असतात
प्रिय अप्रिय सगे सोयरे
कधी कधी आपणच असतो
आपल्या स्वप्नातले पाहुणे

कधी करतो प्रेम 
कधी भांडण
कधी करतो गोष्टी
कुणाला न 
सांगाव्याश्या वाटणार्‍या

कधी स्वप्न अचानक
संपुन जाते
आणि जाग येते
आपण समजावु
पहतो अर्थ मनाला
पण वेडे मन ते 
ते  स्वप्नातच दंग रहाते

- अस्मादिक 
प्रेयसीच्या केसांमधून फिरणारी बोटे जेव्हा, बंदुकीच्या चापांवरून फिरतील तेव्हा या देशाला लोक हिंदूस्थान संबोधतील.-वि. दा. सावरकर. वंदे मातरम!!!

प्रेयसीच्या केसांमधून फिरणारी बोटे जेव्हा, संगणकाच्या किबोर्डवरून फिरतील तेव्हा या देशाला लोक इंडिया संबोधतील. -अज्ञात. जय संगणक!!!

एका आजोबांची प्रेमकहाणी

प्रेमविवाह झालेल्या एका आजोबांना,
एकदा मी विचारले-
डोक्यात तुमच्या प्रेमाचे,
भूत कसे संचारले?

सांगा आजोबा आजीला,
तुम्ही डोळा कसा मारलात?
सांगा तेव्हा आजीच्या,
तुम्ही प्रेमात कसे पडलात?

आजोबा म्हणाले, थांब लेका,
करू नकोस घाई
तिच्या माझ्या प्रेमाची,
गोष्ट छोटीशी नाही काही

मी म्हटले आजोबा,
आजीला पाहिलात तरी कुठे?
आयुष्य तिच्या नवे आणि
झालात वेडे पिसे

आजोबा म्हणाले प्रेमाचिया
गम्मत असे न्यारी
थोडासा तू धीर धार
सांगतो सर्व काही

घरात एका छोट्याशा,
होतो आम्ही राहत
जात असे घरासमोरून त्यांच्या,
रोजच मी चालत

पाणी घालताना तुळशीला अंगणात,
एकदा तिला पहिले
एका नजरेत हृदय माझे
तिला मी वाहिले

पुजेची तिच्या वेळ
मला जेव्हा कळली
कामावर जायची घाई मी
तेव्हापासून टाळली

काय आजोबा तुम्ही सुद्धा
फारच भावूक दिसता
एका क्षणात कोणालाही
हृदय देऊन बसता

माझ्यासाठी बाला ती
सर्व काही होती
ती माझी झाली तर,
मला कुणाचीच गरज नव्हती

म्हातारी असून आज्जी अजून
एवढी सुंदर दिसते
सांगा ना आजोबा आजी तेव्हा
अशी दिसत असे?

आज्जी तुझी बाला जणू
अप्सराच दिसे
तिला पाहता हरवून जाई
मला कसलेच भान नसे

सुंदरशी काय अन
नखरेल ती नर
सुंदरसा चेहरा
पडे जगाचा विसर

रोज फाटकातून त्यांच्या तिला,
मी चोरून पाहत असे
ओल्या केसांत चेहरा तिचा
खूपच गोड दिसे

लांबसडक केस अन
मोहक असा चेहरा
पाहून मग होत असे
होत असे मी बावरा

नाजुकशी बांधणी तिची,
साडी ती नेसायची
तंग अशा चोळीमधून,
अंग ती चोरायची

बारीक त्या भुवया तिच्या
काळे काळे डोळे
मधेच मग लावत असे
पापण्यांचे जाळे

गोड गुलाबी ओठांमध्ये
नेहमीच स्मितहास्य असे
शुभ्र तिच्या त्या दातांमध्ये,
जणू द्वितीयेचा चंद्र दिसे

अशा सुंदर ललनेला,
रोज चोरून मी पाहायचो
नजर माझ्यावर पडताच तिची,
दडून मग रहायचो

आजोबा तुम्हाला आजी जर,
एवढी एवढी आवडायची
मनातली गोष्ट तुमच्या मग,
लगेच सांगून टाकायची

प्रत्येक गोष्टीत बाला अशी,
घाई करायची नसते
प्रेमाच्या या विषयाला,
थोडे सबुरीने घ्यायचे असते

मी म्हटले आजोबा,
काय झाले मग?
आजोबा म्हणाले ऐक पोर,
पुढे गम्मत बघ

हा हा म्हणता अशामध्ये,
बारा महिने गेले
तरीसुद्धा माझे प्रेम मी
व्यक्त नाही केले

हृदयातला शब्द कधी,
ओठांवर येत नसे
घाबरत नसलो जरी तरी,
थोडा 'भीत' मी असे

म्हणजे आजोबा तुमचे प्रेम,
इथेच बोंबलले असेल
मागणी घालायला तुम्ही आणखी,
वर्ष घालवले असेल

म्हणजे मला पोर तू,
भेकड समजतोस कारे?
जा पुढे सांगत नाही,
गेलास उडत तू रे!

मी म्हटले आजोबा,
मला तसे म्हणायचे नव्हते
जाऊ देत ना ते! मला सांगा,
पुढे झाले काय ते?

एके दिवशी कळले मला,
तिलाही मी आवडत असे
कारण, प्रदक्षिणा पूर्ण झाल्या,
तरी ती तुलशीभोवातीच रेंगाळत असे

माझ्याही आधी मला ती,
म्हणे गुपचूप गुपचूप पहायची
मला सरळ सांगणार कशी,
माझ्यासारखीच घाबरायची

मग काय मी पठ्ठा
घाबरतोय कोणाला कसला?
उद्याच तिला विचारतो,
मनात एकाच निश्चय केला

रात्रभर बसून मग एक,
प्रेमपत्र लिहिले
मनातल्या सगळ्या भावनांसाहित,
त्यात मनसुद्धा ओतले

रोजसारखा ऐटीत मी,
त्यांच्या फाटकापाशी आलो
पुन्हा पाहताच तिला,
सारे विसरूनच गेलो

मग आलो भानावर,
का आलो ते आठवले
सारी हिम्मत एकवटून,
मग मन घट्ट केले

पत्र गुंडाळून दगडात एका,
तिच्या कडे भिरकावले
नशीब माझे दगडासाहित पत्र,
तिच्या डोक्यात नाही पडले

तुळशीभोवती आज फेऱ्या,
पुरे मारल्या तेवढ्या
किती उशीर केलास,
वाट किती पहायची वेड्या?

पत्र उचलून माझे ती,
घरात निघून गेली
उततात द्यायला पुन्हा बाहेर,
कशी नाही आली

शंकांचे ते काहूर मनी,
घेऊन मी निघालो
कितीवेळा आपटलो अन
कितेकदा पडलो

दुसऱ्या दिवशी त्याच वेळी
त्यांच्या फाटकाबाहेर
होकार मिळतो आहे,
की दंडुक्यांचा अहेर

पूजेला ती तुळशीपाशी,
आज थोडी उशीरच आली
तिला पाहताच मनाची माझ्या,
शांती जरा झाली

प्रत्त्युत्तरादाखल तिने मला,
पत्र होते लिहिले
गालातच हसून तिने,
माझ्याकडे फेकले

उत्तर वाचेपर्यंत माझा,
मलाच नव्हता धीर
कासावीस जीव आणि,
काळजाची खीर

होकार तिचा कळताच मला,
मीच चिंता गेटला
एवढे सोप्पे होते,
कदाचित मीच उशीर केला

मग काय आजोबा तुम्ही,
हाती लागत नसाल
चोरी चोरी चुपके चुपके
रोजच भेटत असाल

चोरून तिला भेटण्याचा
आता प्रश्नच उद्भवत नसे
संध्याकाळी बागेमध्ये,
रोजच भेट असे

एकदा आमची चोरी,
आम्हाला भलतीच महागात पडली
जेव्हा तिच्या बापाची
नजर आमच्यावर पडली

कान धरून त्यांनी
तिच्या कानफटीत मारल्या
घाबरलेलो मीही, पण मनातच,
त्यांना चार शिव्या घातल्या

चार दिवस त्यांनी तिला,
कोन्दुनही ठेवले
मीही तिला भेटण्यासाठी,
फार प्रयत्न केले

एके दिवशी धीर करून,
सरळ त्यांची घरी गेलो
माफ करा सासरेबुवा,
पण आम्ही प्रेमात न्हाऊन गेलो

आता आम्ही राहणार नाही,
एकमेकांशिवाय
जास्त विचार करू नका,
आता लग्न हाच पर्याय

तुमच्या या लेकराला मी,
फुलासारखा जपेन
सुखासाठी तीच्या मी,
आयुष्यभर झटेन

नाही नाही म्हणता म्हणता,
परवानगी माळली
तिच्या माझ्या घरच्यांनी,
लग्नाची बोलाणीसुद्धा केली

ठरला आमचा साखरपुडा,
ठरला लग्नाचा दिवस
याच्यासाठीच केले होते,
आम्ही कित्येक नवस

लग्नाच्या त्या प्रेमळ अशा,
बंधनात आम्ही अडकलो
साथ देऊन एकमेका
अजूनपर्यंत सुखात राहिलो

डोळ्यात पाणी आजोबांच्या,
आले गोष्ट सांगतेवेळी
नांदा सौख्यभरे!
संपली आजोबांची प्रेमकहाणी
 
No One Can Be Vaishali Like Me.. - Buzz