महाराज निधर्मी ?

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.
*उत्तर* :  इष्टदेवतेसमोर  युद्धपुर्व बळी देणे ही तत्कालीन समाजामान्य प्रथा होती, शत्रूचे शीर धडावेगळे करताना काही वाटू नये म्हणून बळी दिले जात असत. पुढे हीच रीत मान्य पावली आणि देवांसाठी बळी देण्यात येऊ लागले.
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.
*उत्तर* : महाराज देवभक्त होते, विशेषकरून शिवशंकर , म्हणून रायरेश्वरचरणी स्वराज्याची शपथ घेतली, बहुतेक सर्व गडांना शंकराचे नाव आहे.
■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
*उत्तर* : लिंबू मिरची प्रथमोपचारासाठी असते, आणि तत्कालीन परीस्थितीत सर्वोत्तम.  महाराज देवभक्त होते, ह्याचा पुरावा महाराजांच्या पत्रव्यवहारात आहे.
■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले.
*उत्तर* :  मनुस्मृती हजारो वर्षे प्राचीन आहे, त्यात तत्कालीन नियम किंवा संकेत आहेत जे समाजास एकसंध ठेवू शकत होते. मनुस्मृतीच्या काळात समुद्रापलीकडे व्यापार होता ह्याचे पुरावे जगभर उपलब्ध आहेत. शूर्पारक (नालासोपारा) बंदर तर आपल्या जवळचे.
■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.
*उत्तर* : सत्यनारायण १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. इंग्रजांविरुद्ध जनता एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक पूजन सुरू झाले. सत्यनारायण पुजा नैतिकतेची कथा आहे, सत्य बोलावे, दिलेले वचन मोडू नये हा कथेचा सार आहे. सत्यनारायण नाकारणारे पक्षासकट बुडाल्याचे उदाहरण महाराष्ट्रतच आहे!!
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
*उत्तर*: अमावस्या अशूभ? हिंदु तर अमावास्येला दीपपुजन करतात. धर्मग्रंथ लिहिले गेले तेव्हा वीजेवर मानवी हुकुमत नव्हती. अमावास्येच्या अंधारात प्रवास किंवा इतर कार्य करताना चुक होण्याची संभावना असल्याने अशा गोष्टी न करण्याचा कटाक्ष होता.
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या
*उत्तर* : सतीप्रथा मोजक्या राजघराण्यात होती. आणि सती प्रथा ऐच्छिक होती. मात्र जबरदस्तीने केली जाणारी सतीप्रथा अन्यायकारक होती. तरीसुद्धा इतर धर्मग्रंथात विधवा स्त्रीयांविषयी केलेल्या उपदेशांपेक्षा हे बरे. मनुस्मृतीत स्त्रीयांना संपत्तीचा समान हक्क दिला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदु कोड मनुस्मृतीवर आधारित केले, आणि तसे भाषण संसदीय कामकाजात अधिकृत आहे.
■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.
*उत्तर* : महाराज लढाईच्या आधी व नंतर कुलदैवत तुळजाभवानीचे पूजन करत. आजही सर्वच गडांवर देऊळ आहेत. आईसाहेबांनी स्वराज्य स्थापनेपुर्वी ठिकठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता.

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
*उत्तर* : महाराजांचे जनसेवेचे कार्य हिंदु राजांच्या परंपरेतले आहे. इक्वाक्षू कुळातील राजांचे हे वैशिष्ट्य आहे

-----
तात्पर्य :
हे प्रश्न विचारणारे कोणत्या विचारसरणीचे असतील हे त्यांच्या हिंदु धर्मावर टीका करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांतुन दिसून येते.

*महाराजांचे व एकूणच स्वराज्याचे विरोधक कोण होते ? मुघल आदिलशाही निजामशाही कुतुबशाही सिद्दी काही प्रमाणात महाराजांचे मातृकुल*.

आज जे महाराजांच्या नावाने हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दुर करण्याचे मेसेज पाठवतात ते महाराजांच्या विरोधकांच्या वंशजांच्या कळपात आहेत.

*आज अंधश्रद्धानिर्मूलन किंवा हिंदुधर्मविरोध अशा प्रकारचे कार्य करणारे लोकांचा सोशल व प्रिंट मिडीयावर सुळसुळाट झाला आहे. इतर धर्मांवर चुकूनही एक शब्द न काढणाऱ्या ह्या ढोंगी लोकांचे काय करावे?*

*दुरदृष्टी असलेल्या महाराजांच्या खास व्यक्तीमध्ये असे लोक नव्हते ह्याचमुळे महाराजांपुढे नतमस्तक होते!!*