थोड्या गप्पा मारूया !

    थोड्या गप्पा मारूया !

    

    गप्पा मारायला जमायचंय दोस्तांनो. आपल्या या ई मेलने जाणार्‍या अंकाचे वाचक आणि कवी आणि संपादक कधी एकत्र भेटतच नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे संपादक आहेत की जे गेली चार वर्षं एकत्र काम करतात पण एकमेकांना आजवर भेटलेले नाहीत. कवी आहेत जे नेटमुळे दोस्त झालेत पण प्रत्यक्षात भेटलेच नाहीत. तर रवीवारी प्रत्यक्ष असे कॉलेजच्या एका वर्गात एकत्र भेटून गप्पा माराव्यात. समव्यसनी लोकांच्या नुसत्या अनौपचारीक गप्पा. ओळख. कविता. गाणी.

    

    कशी आहे कल्पना ?

    

    तर निमित्त म्हणून नेटाक्षरीचा शतकोत्सवी अंक .

    

    रविवार दिनांक २९ मे २०११ रोजी नेटाक्षरीच्य़ा शंभराव्या अंकाचे प्रकाशन कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते होत आहे.

    

    त्यानंतर आपल्या आपल्यात गप्पा गोष्टी वगैरे करायला भेटुया का ? एकमेकांचे विचार समजून घेऊयात.

    

    स्थळ : SIES कॉलेज, सायन सर्कल जवळ. सायन(ईस्ट). मुंबई

    

    वेळ : रविवार २९ मे सकाळी ११.०० वाजता

    

    भेटाच्चं, बरं का ! नक्की या !

मराठीचे चित्रपटांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर वर्चस्व

 लोकसत्ता २० मे २०११
सन २०१० च्या ५८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट ‘बाबू बँड बाजा’मधील अभिनयाने मिताली जगताप वराडकरला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला. ‘मी सिंधुताई सपकाळ’ ने तीन तर सामजिक आशयाचा सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह ‘चॅम्पियन्स’ या मराठी चित्रपटातील शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर तसेच ‘बाबू बँड बाजा’तील अभिनयासाठी विवेक चाबुकस्वार यांनी सवरेत्कृष्ट बाल कलावंतांचा विभागून पुरस्कार पटकावित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटविला.


वसईच्या वाडवळी बोलीतील कविता

वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता . मुसळधार पडणाऱ्या पावसाची , एका गृहिणीने घातलेली ही समजावणी .)

अवडा पर जाला का तुला
कांय होते रे आबा
कोण पोटात रेते तुया उबा
आथं तरी बस कर रे बाबा।।धृ।।

पोटाईन अलेल्या बायकोयावाणी
खाली उतरतात जये ढग
वाटते आथ्थंस बुडेल यं जग
जीवायी कायली होते मंग
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।१।।

तू केला रागावलाय अवडा
तरी माथ्यात भरते ईजेया केवडा
कोण थोपील रे या गडगडाटा
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।२।।

वावून गेला तुआ जकला पाणी
मयना जाल्या रगताया वाणी
माफ कर रे बाबा आमशी करणी
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।३।।

पडून पडून तू थकला रे
रडून रडून तू भगला रे
तू माआ जकल्यात धकला रे
बस कर रे बाबा … आथं तरी बस कर ।।४।।

शब्दार्थ -
अवडा पर- या प्रहरी, या वेळी
जाला- झाला
आबा- आभाळ
उबा- उभा
आथं- आता
पोटाईन- गर्भवती
आथ्थस- आत्ताच
अवडा- इतका
वावून- वाहून
जकला- सगळा
मयना- महिना, ऋतुस्त्राव
आमशी- आमची
धकला- धाकटा मुलगा
भगला- भागला, थकला

(ref:http://www.aamhimarathi.in/samjavan/)
समजावणी - Aamhi Marathi
www.aamhimarathi.in
वसईच्या वाडवळी बोलीतील ही कविता . मुसळधार पडणाऱ्या पावसाची , एका गृहिणीने घातलेली ही समजावणी .)

सरकार आणि माश्या.

काही कामानिमित्त २ वेगवगळ्या सरकारी हापिसात जाण्याचा योग आला.सरकारची लाडकी सेवा BSNL पुर्णपणे ठप्प असल्याने कामकाजाच्या बाबतीत आनंदच होता.एरवी सरकारी कर्मचार्‍यांच्या तोडांवरची माशी उडत नाही असे म्हणतात पण BSNL बंद असल्याने तेच कर्मचारी माश्या मारत बसले होते.
तसे पाहता बहूतेक सरकारी कार्यालयात BSNL ची सेवा पुरवली जाते.आणि एतर ईटंरनेट सेवांपेक्षा जलद व स्वस्त असल्याने BSNLचा वापरही जास्त आहे.पण आठवड्यातून २-३ दिवस बंद होणार्‍या सेवेस कटांळून ग्राहक ईतर ईटंरनेट सेवांकडे वळत आहेत.वास्तविक बॅंकेसारख्या ठिकाणी BSNL सारखी बेभरवश्याची सेवा असल्याने कामपेक्षा व्याप जास्त होतो.अर्थात साक्षात BSNLच्या कार्यालयात ईटंरनेट बंद असल्यावर ईतरांची काय कथा?

२८ रुपये प्रती लिटर!!

हार्दिक अभिनंदन...
पेट्रोल चे वाढलेले भाव पुन्हा एकदा सहन केल्या बद्दल आपले हार्दिक आभार...
खरच आपण खूप महान आहोत.. सहन करण्याच्या बाबतीत तर आपण गांधीजींनाही मागे टाकले...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० $ प्रती पिंप आहे... म्हणजे अंदाजे ४५०० रुपये प्रती पिंप... प्रत्येक पिंप हि १५८ लिटर ची असते म्हणजे जवळपास २८ रुपये प्रती लिटर...प्रक्रीया केलेल्या पेट्रोलसाठी आपण देतो ६८ रुपये प्रती लिटर...१० रुपये आपण कर दिला तरी वरचे ३० रुपये आपण देतो विकाससाठी... आणि विकास तर खूपच जोरात चालू आहे... खरच आपण महान आहोत...
ए. राजा ने केलेला घोटाळा आहे १ लाख ७५ हजार कोटीचा... आणि पेट्रोल डीजेल ची सबसिडी सरकार देते वर्षाला ७०-८० हजार कोटी... म्हणजे एकटा राजा ११० कोटी लोकांचे २ वर्ष पैसे खातो... असे कित्येक आहेत घोटाळे...
आणि आपण हे सहन करतो...
खरच आपण महान आहोत...
Received With Thanks From
Rahul Borse.

अधिक माहितीसाठी http://www.kshitij.com/research/petrol.shtml

वसई विजयोत्सव.: शाहिर महर्षी पाडूंरंग दत्तात्रय खाडिलकरकृत पोवाडा....

वसई विजयोत्सव.: शाहिर महर्षी पाडूंरंग दत्तात्रय खाडिलकरकृत पोवाडा....: "Pdk Book1 Pgs163-170 Vasaivedha"

वसई विजय दिन १५ मे

वसई विजय दिन १५ मे.

Vasai Vijay Din 15 May 2011