"इंटरनेट तटस्थता" #NetNeutrality

"इंटरनेट तटस्थता" #NetNeutrality काय आह?? ❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗ आपल्याला इंटरनेट सेवा पुरवणारे (BSNL, MTNL, Vodaphone, Airtel, TATA, etc.. ) ह्या कंपन्या आपल्याकडून इंटरनेट साठी सेवाशुल्क घेतात . (मर्यादित वापर साधाराण २५० प्रती महिना ) , आणि हेच पुरवठादार आपण काय सेवा (Facebook, Whatsapp, Instagram, Flipcart, Hike, etc..) , किती वापरणार हे ठरवू शकतात. उदा.. Airtel तुमचे Whatsapp चा वेग Hike पेक्षा इतका कमी ठेवेल कि तुम्ही Whatsapp वापरू शकणारच नाही , आणि Whatsapp साठी अतिरिक्त सेवाशुल्क भरावे लागेल. Vodaphone तुम्हाला Flipcart च्या ऐवजी Ebay वापरायला भाग पाडू शकते. पण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ह्या वर नियंत्रण ठेवून आहे. हे महत्वाचे आहे कि , सर्व वेबसाईट किंवा online Apps समानरीत्या उपलब्ध असली पाहिजे सर्व वेबसाईट किंवा online Apps साठी समान दर व वेग (per KB/MB) असला पाहिजे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने (TRAI) जर आभासी सेवा पुरवठादारांना( (Facebook, Whatsapp, etc..) इंटरनेट सेवा पुरावाठादारांचे परवाना दिल्यास ह्या कंपन्या आपण काय वारायाचे आणि किती वापरायचे हे ठरवू शकतात , आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. Whatsapp ची सेवा आपण घेतली असेल तर आपण कदाचित Hike किंवा Instagram वापरूच शकणार नाहे. थोडक्यात , > आभासी सेवा पुरवठादारांना इंटरनेट सेवा पुरावाठादारांचे परवाना देऊ नये. > Internet.org, Data VAS सारखे पर्याय , censorship असू नये. > फक्त काही ठराविक वेबसाईट किंवा online Apps ना प्राधान्य असू नये. अजून वेळ गेली नाही.. २४ एप्रिल २०१५ पर्यंत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला आपले मत ttp://www.savetheinternet.in किंवा for http://www.netneutrality.in/. अधिक माहितीसाठी ही चित्रफीत पहा youtube.com/watch?v=mfY1NKrzqi0

आयुष्य आणि छोट्या छोट्या गोष्टी..

👍: लाईक नाही केले तरी चालेल, पण जरूर वाचा. जिवनात खूप शिकायला मिळेल नक्कीच..

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं.

पण तासा भरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता.

त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय?

सुरक्षा रक्षक म्हणाला या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जिव वाचवेल

म्हणून नेहमी लक्षात ठेवा,

जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा मला नाही माहीत कधी पण तुमच्या आयुष्यात पण असाच एखादा चमत्कार निश्चित घडेल.
चित्रपटगृहात प्राईम टाईमला मराठी सिनेमा दाखवणं अनिवार्य! मुंबई : महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दररोज संध्याकाळी 6 ते 9 (प्राईम टाईम) या वेळेच मराठी चित्रपट दाखवणं अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज याची घोषणा केली.  येत्या काळात सर्व मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये राष्ट्रगीतासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी एक चित्रफित दाखवण्यात येणार आहे, असंही विनोद तावडे म्हणाले.  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार पाठपुरावा करेल, असंही आश्वासन विनोद तावडेंनी यावेळी दिलं. गेल्या आठवड्यात राज्यातील कला संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाबद्दल विधानसभेत चर्चा झाली, त्यावर आज विनोद तावडेंनी उत्तर दिलं. याशिवाय ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं स्मारक बांधण्यात येईल. तसंच शाहीर साबळे यांच्या नावाने नवा पुरस्कार सुरु करणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.

उदासबोध

पाडगावकरानी दासबोधावरून उदासबोध लिहिला! त्यांचीच एक कविता ' दिवस तुझे हे फुलायचे' आयुष्यातील एक नाजुक वळणावरील मुलीला उद्देशून! जेव्हा ती फूलते !एका कळीचे जेव्हा फुलात रूपांतर होते! आता 'दिवस तुझे हे फुलायचे' याचे चाळीशी नंतर 'दिवस तुझे हे फुगायचॆ' केलयं कोणीतरी ! वाचा!😀 दिवस तुझे हे फ़ुगायचे….. दिवस तुझे हे फ़ुगायचे मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥ लाडकी माझी तु राणी नको तु खाऊ गं लोणी पाण्यात लिंबाला पिळायचे॥१॥ दिवस तुझे..... साजुक तुपाची धार वाढवी calories फ़ार पोटात salad भरायचे॥२॥ दिवस तुझे..... प्रभाती फिराया जाणे वाटेत धाप लागणे दमुन जरासे टेकायचे॥३॥ दिवस तुझे..... वजन वाढते फ़ार सोसेना काट्याला भार कळेना काय ते करायचे॥४॥ दिवस तुझे ..... आपुल्या घरच्यापाशी फिर तु गडे जराशी हालत चालत राहायचे॥५॥ दिवस तुझे ......😀😀

देशी तंत्रज्ञानाची कमाल:

हा एक अफलातून किस्सा आहे... प्रत्यक्षात एका सिव्हिल इंजिनीअरने सांगितलेला... एका जर्मन कंपनीचं कार्यालय बीकेसीमध्ये बांधलं जात होतं. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हा भाग समुद्रात भराव टाकून तयार केला आहे. इमारतींचा पाया खोल घट्ट दगडापर्यंत खणला जावा म्हणून अनेक इमारतींचे दुमजले जमिनीच्या पोटात आहेत. तर या जर्मन कंपनीच्या कार्यालयात बेसमेंटच्या भागात एक प्रचंड मोठं ३० टनांहूनही अधिक वजनाचं यंत्र बसवण्यात येत होतं. बंदरात जहाजामधून उतरवून एका माथाडी कामगारांच्या टोळीने ट्रेलरवर चढवून ते बीकेसीमध्ये आणलं. मात्र ते खाली उतरवून इमारतीच्या तळमजल्यात ३० फुट खाली उतरवायचं कसं हा मोठाच प्रश्न त्यांना पडला. कारण जर्मनीहून आलेलं ते यंत्र प्रचंड महाग होतं, रिस्क घेणं शक्यच नव्हतं. आणि त्यावेळी एवढं वजन उचलू शकणारी मोबाइल क्रेन मुंबईत नव्हती. ऐन पावसाळ्यात हे सगळं होत असल्याने आसपास दलदलही खूप होती. विचार करण्यातच दोन दिवस गेले. शेवटी जमशेदपूरहून एक मोबाइल क्रेन मागवण्याचं ठरलं. त्याला दोन आठवडे सहज लागणार होते. तोपर्यंत माथाडी कामगार थांबणं शक्य नव्हतं. त्यांचा काँट्रॅक्टर घाई करू लागला. मी मशीन कामगारांच्या साहाय्याने खाली उतरवतो. मला मोकळं करा असं तो म्हणू लागला. अखेरीस त्याला सांगण्यात आलं की हे मशीन खाली उतरवणं कठीण जातंय. त्यासाठी लांबून क्रेन मागवलीय. ती येईपर्यंत पंधरा दिवस तरी थांबावं लागेल. त्यावर तो काँट्रॅक्टर म्हणाला, 'साहेब, मला सांगितलं असतं तर मी झटक्यात मशीन खाली उतरवून दिलं असतं.' त्यावर कंपनीचा इंजिनीअर हसला. त्याला म्हणाला, 'एवढं सोपं काम नाही ते. आम्ही सगळे इंजिनीअर दोन दिवस त्यावर डोकं घासतोय.' हे चॅलेंज घेत माथाडी कंत्राटदार म्हणाला, मी अगदी अल्लद मशीन उतरवून दिलं तर मला काय द्याल? तरीही भारतीय इंजिनीअर त्याची खिल्ली उडवत राहिला. मात्र त्यांच्या जर्मन साहेबाने ते ऐकलं आणि त्याची काय युक्ती आहे ते ऐकून तर घेऊया, असं तो म्हणाला. माथाडी त्यांना म्हणाला, 'मला आइस फॅक्टरीतून हा खड्डा भरेल एवढ्या बर्फाच्या लाद्या आणून द्या आणि एक चांगला पंप लावा इथे.' त्या खड्ड्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे बर्फ आणून भरला गेला आणि मग त्यांनी ते यंत्र त्या बर्फावर उभं केलं. आणि जस जसा बर्फ वितळत गेला तस तसं ते पाणी खड्ड्यातून पंपाद्वारे बाहेर टाकत गेले. ते मशीन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच अल्लद खाली उतरत गेलं. भारतीय तांत्रिक जुगाडाला जर्मन तंत्रज्ञानाने केलेला तो सलाम होता.👌👌👌 (दि. ०४-०४-१५: श्री. किरण श्रीकांत गायकवाड, चेंबूर, मुंबई यांचे कडून)